फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स!

Submitted by माधवी. on 27 December, 2012 - 02:28

खुप दिवसापासुन मला असा धागा असावा असे वाटत होते.
हल्ली बाजारात रोज कपड्यांच्या, चप्पल्/सॅंडलच्या, अ‍ॅक्सेसरीजच्या निरनिराळ्या फॅशन बघायला मिळतात.
पण ते आपण घ्यावं की नाही असा प्रश्न पडतो बरेचदा. किंवा कुठल्या समारंभाला जाताना बरेचदा असे नवीन काही घालावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होते. बर्‍याच नवीन कुर्तीज, जॅकेटच्या ज्या फॅशन येतात त्यांना काही नावं असतात, ती देखिल आपल्याला माहित नसतात. मग दुकानात गेल्यावर दुकानदाराला समजावत बसावे लागते :).
शिवाय सिल्कच्या साड्या आणि त्यांचे प्रकार हा तर मोठाच टॉपिक होऊ शकतो.
तर ह्याची चर्चा आपण इथे करु शकतो का? एखादी छोटी इमेजही शेअर करु शकतो समजत नसेल तर.
तसेच अशा नवीन गोष्टी आपल्या गावात कुठे चांगल्या मिळतील हे देखिल सांगु शकतो.
तर मैत्रिणींनो, जरा स्वयंपाकघरातुन बाहेर येऊन ह्या गप्पाही मारूया का? Wink
आणि हो, मित्रांचे देखिल स्वागत आहे हो!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण माझ्या बिल्डींगमधे एक मॉडेल फिगर आणि हाइटची मुस्लीम शेजारीण आहे तीही घालते. तिला ती एवढी छान दिसते. >
अगदी खर. माझ्या नवर्‍याच्या एका मुस्लीम मित्राची बायको तिला तर हाइट पण नाही पण ती अतीशय सुंदर मटेरीयल आणि खाली पँट स्टाइल पायजामा वापरते. खुपच छान दिसत तिला ते. रच्याकने मुंबईतल्या बहुतेक मुस्लीम बायांना हल्ली असेच पँट स्टाइअल पायजामे वापरताना पाहील आहे.

मने पर्मनंट टॅटू काढणार आहेस? मला तर जाम भिती वाटते >>> मला पण भीती वाटते म्हणुनच एवढी वर्ष मोह आवरुन ठेवला आहे.
आपली इच्छा असली तरी तो जात नाही म्हणे. >>> नको जावु दे ना. मला काही बॉफ्रेचं नाव काढायचं नाही कि बदलला बॉफ्रे तर टॅटु पुसावा लागेल. Wink

काढलास आणि म्हातारी झालिस, नातवंडांनी विचारलं 'आज्जी हे काय आहे?' तर काय उत्तर देणारेस? >>> नातवंडं विचारणारच नाहीत. हल्ली सगळ्या पोराटोरांना टॅटुज माहित असतात. नर्सरीमधे असतानाच, When i will become big n go to college then i want tatoo like Beckham अशा गप्पा मारतात एकमेकांमधे. आणि टॅटु लोकांना दाखवण्यासाठी नसतोच. ती अगदी पर्सनल गोष्ट आहे. लगेच दिसेल असा नसणारच आहे माझा टॅटु. सासुला पडलेला प्रश्न कि एवढे हजारांमधे पैसे देवुन एवढुसं चित्र काढणार ते सुद्धा लपवायचं. मग कशासाठी त्रास करुन घ्यायचा? Happy

मी पण टोचले आहे पण ९वीत असताना कानाच्या आपले जे रेग्युलर टोचतो तिथुन थोडेसे वरती . मागे टुंगु आला होता पण २-३ दिवस खोबरेल तेल+कुंकु लावुन गेले ते कायमचे. पारंपारिक सोन्याच्या तारेनेच टोचले आहे.

कशा उत्साहाने बोलताहेत सगळ्या...

नाक न टोचता, चमकी वा नोज रिंग घालणे शक्य आहे का? मला घालायची इच्छा आहे, पण टोचण्याची भिती...
फारा पुर्वी चापाची नाजूक खडे असलेली कानातली मिळायची जी कानाच्या कडेच्या पाळीला अडकवायची असायची. तशा प्रकराचे काही नाकासाठी असते का?

बारीक असणे आणि चिंध्या घातल्या तरी स्टायलिश असल्यासारख्या कॅरी करता येणे हे दोन्ही असेल तर मग काय हवे Happy

नेलपेंटच्या बाबतीत माझा ठार पास. बार्रीक कापलेली नखे, कॉर्नर्स घासून गोल केलेले जेणेकरून स्किनमधे घुसून त्रास होणार नाही, कुठेही घाण अडकलेली नाही... इथे माझ्या नखशृंगाराची व्याप्ती संपते Happy

एखाद्या दिवशी नेलपेंट लावलेच तर दुसर्‍या दिवशी काढून टाकायची घाई असते मला. आणि मरून-ब्राउन्स किंवा मग एकदम नॅचरल याशिवाय काहीही चांगले दिसत नाही यावर पूर्ण विश्वास.

दक्षीणा मी एकदा इथे मुंबईत नेल स्पा म्हणुन जागा आहे तिथे फ्रेंच मेनीक्युअर केलेल. एकदम प्रोफेशनल आहेत ती. त्यांच्याकडे ईस्ट ईंडीया साइडच्या मुली असतात त्यांचा हात एकदम नाजुक चालतो. पुण्याला बघ कुठे नेल स्पा आहे तर.

माधवी, प्रिंसेस धन्यवाद.
पण मला स्टॉकिंग्ज खुपच ट्रांस्परन्ट वाटतात. व्यवस्थित कॅरी करु शकेन असे नाही वाटत.
पुण्यात असे वन पीस ड्रेसेस कुठे मिळतील?

पुण्यात असे वन पीस ड्रेसेस कुठे मिळतील? >>> तुझी वरची पोस्ट वाचली तेव्हा मी हेच लिहिणार होते कि 'बेब' इस्ट स्ट्रीट, इथे आता इतके मस्त वन पीस आले आहेत. अ‍ॅमेझिंग डिझाइन्स आणि बॉम्ब प्राइसेस. Happy आता कॅम्पमधे बर्‍याच छोट्या मोठ्या दुकानात वनपिसेस दिसतील. सगळीकडे क्रिसमस आणि न्यु इयरसाठी लेटेस्ट स्टॉक दिसतो आहे.

फक्त वनपीस खाली लेगिंग्ज घालणं फारच काही तरी वाटतं. तेवढं मात्र नको करुस. आवडतं तर घाल की बिनधास्त.

त्यामुळे वेस्टर्न फॉर्मल/ जीन्स घातले की एकदम लहान दिसते. कॉलेज मध्ये जाणारी वाटते. >>> हायला, हा प्रॉब्लेम कसा असु शकतो. कांचन चांगलं आहे की>>>>>
माझ्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम आहे हा. त्यामुळे ऑफीस मध्ये मी सीनीयर बिलकूल वाटत नाही, घरी एका मुलीची आई वाटत नाही... Sad ...

पेरू पुण्यात मनि म्हणतेय तसे.. MG road,क्लोवर सेन्टर आणि ईस्ट स्ट्रीटच्या गल्ल्यांमधे खुप शॉप्स आहेत. मस्त वन पीसेस मिळतील. शिवाय मॉल्स.. तुला अनकॉम्फि असेल तर ब्लूमर्स किंवा सायकल शॉर्ट्स घाल आणि स्टॉकिंग्स. पण leggings are a big NO NO..

एक साड्यांच्या रंगाबद्दल प्रश्न आहे.
आईला मधे एका लग्नासाठी साडी घ्यायची होती. तेव्हा तिला आधी वाटले की इंग्लिश कलरची घ्यावी पण मग दुकानात गेल्यावर वाटलं की ट्रॅडिशनल साड्या इंग्लिश कलरमधे चांगल्या दिसत नाहित्.आणि समारंभालाही कदचित सुट होणार नाही. ह्यावर कोणाकोणाचे काय मत आहे ?

स्टॉकिंग्जचा विषय निघालाच आहे तर, मला सांगा ज्या वुलन स्टॉकिंग्ज असतात त्या जीन्सच्या आत (थंडीपासून बचावासाठी) घालता येवू शकतिल का? जीन्स स्ट्रेचेबल , पेन्सिल टाइपची असल्याने तिच्या आत बॉडी वॉर्मर घालता येत नाही.

इंग्लिश कलर हे खूप रॅण्डम आहे.
प्रत्येक कॉम्बिनेशनवर अवलंबून आहे. स्कायब्लू मधला अगदी फिका टोन पारंपारीक काठापदरांच्या, जरीच्या साड्यांमधे जनरली भयाण दिसतो.

ह्म्म. म्हणजे थंडी जास्त असेल तर स्ट्रेचेबल जीन्स न घालता बॉडी वॉर्मर्स घालून नॉर्मल जीन्स घालणे हाच पर्याय आहे. ओके.

अल्पना, तुझ्याकडे दिल्लीत माहित नाही, पण पुण्यात तरी फार चांगल्या क्वालिटीचे स्टॉकिंग्ज मिळत नाही. डेनिम्सच्या आत घालुन स्कीनला इरिटेशन नाही होणार का? थोडावेळ ठीक आहे, पण कधी कधी आपण पुर्ण दिवस डेनिम्समधे असतो तेव्हा?

अगं इथे वुलनचे मिळतात. लहान मुलींचे बघितलेत. माझ्या पुतण्या घालतात.

सध्याच्या थंडीमध्ये बर्‍याचदा आतून वॉर्मर घालावे लागतात स्पेशली बाईकवर जायचं असल्यास. टाइट जीन्स वॉर्मर घातल्यावर अंगात चढत नाही. Happy म्हणून मी विचार केला की वुलनचे स्टॉकिंग्ज घात्ल्यावर जर जीन्स त्यावर चढत असेल तर माझ्या साइझमध्ये चांगले मिळाले तर घ्यावे.

बरं झालं आधीच इथे विचारलं. नाहीतर घेवून आले असते आणि तश्याच पडल्या असत्या त्या स्टॉकिंग्ज.

दक्षे, इतके कान का टोचायचेत, लोकं कान काय कमी टोचतात की काय? Proud

ते तू म्हणते तसे मध्ये कान टोचणे जरा त्रासदायक असते. जखम भरायला वेळ लागतो कधी कधी.
तिथे कार्टीलेज असते ते टोचणे एका निष्णात सोनाराकडून घे.

मनिमाऊ, माझ्या एका मैत्रीणीने सॅबीजमधून पायावर फार भारी टॅटू काढून घेतला आहे. तुला आवड असेल तर गो अहेड! Happy
तो कानात चिकटवायचा खडा कुठे मिळतो?

हो पण ते प्रत्येक रंगावर अवलंबून आहे.
डार्क ग्रेला केशरी किंवा राणी काठाच्या गढवाल सिल्क फार अशक्य भारी दिसतात.

धन्यवाद सगळ्यांना. सायकल शॉर्ट नको वाटतेय. काहितरी गुडघे झाकणारे हवे आहे.

पुण्यात गेल्यावर नक्की वन पीस ड्रेस बघते. पण इथे आता एक घेतला आहे ब्लॅक कलरचा. पण घालायची डेअरींग नाही होतेय Sad

हो पण ते प्रत्येक रंगावर अवलंबून आहे.>>+ १
माझ्याकडे आहे एक इंग्लिश कलरची जरीची साडी गिफ्ट मिळालेली.
पाहिल्यावर एकदम बकवास वाटत होती, पण नेसल्यावर एकदम सुंदर, मस्त दिसत होती.

माझ्या कडे पण आहे ग्रे कलर ची काठाला प्रिंटेड तसर सिल्क. एकदम एलिगंट दिसते. मी बर्‍याचदा नेसते. त्या वर ग्रे च ब्लाउज घालुन काळ्या मोत्यांचा सेट घालते. ती साडी नेसली की ऑफिस मधल्या पोरी एकदा तरी येउन भेटुन जातात.

तसाच एक एकदम लाईट लव्हेंडर कलर पण आहे माझ्या कडे सिल्क मधे. त्या वर काठाला जांभळ्या हलक्या कलर ची एम्ब्रॉयडरी आहे. खुप मस्त साडी... मला ती एका एक्स्पो मधे मिळाली.

मला स्वत्;ला साडीत हिरवा रंग का कोण जाणे पण अतोनात आवडतो. एकदम बॉटल ग्रीन. आणि त्या वर एम्ब्रॉयडरी असली तर बहारच... त्यात ती साडी तसर किंवा सिल्क असेल तर अगदी मार डाला....

टिश्यु चे चांगले कापड कुठे मिळेल?.... लेकीला ड्रेस बनवायचा आहे... तसेच चांगले वेल्व्हेट मुंबईत कुठे मिळेल?

रच्याकने.....
अत्ता दुबईला गेले तिकडे होतं... पण खडुस (कोण ते कळलच असेल) ने घेवुन नाही दिलं... ओझं होतं म्हणाला

Pages