सिंहशोकांतिका... अर्थात् सिंहाची शोकांतिका... (एक अत्यंत टुकार गद्यकविता)

Submitted by चैत रे चैत on 4 December, 2012 - 11:48

सिंहशोकांतिका... अर्थात् सिंहाची शोकांतिका...

रानात दूरवर कुठेतरी सिंहाने एक डरकाळी फोडली...
नंतर दुसरी, नंतर तिसरी...
असे करत करत सर्व डरकाळ्या फोडून संपल्या. एकही डरकाळी फोडायला शिल्लक राहिली नाही...
मग त्याने विचार केला की ह्या फुटलेल्या डरकाळ्या जोडून परत फोडूयात.
तेवढ्यात त्याला चौथी 'ई'च्या वर्गातल्या फळ्यावरचा सुविचार आठवला, 'तोडणे सोपे, जोडणे अवघड'
म्हणून तो नाक शिंकरून झोपायला निघून गेला...

-- इतरत्र पूर्वप्रकाशित
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबर्‍या आवडलाय!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

चैत रे चैत, डरकाळ्या तुटल्या असत्या तर जोडायला अवघड होत्या. पण सिंहाने तर त्या तोडल्या नसून फोडल्या होत्या ना? मग परत चिकटवायला काय झालं? असा कसा हो तुमचा सिंह एव्हढा झाम्या झाला?
Rofl
आ.न.,
-गा.पै.

अहो पैलवान,

आमचा सिंह चौथीनंतर काहीच शिकला नाही ना... नाही तर त्याला नक्की कळलं असतं की तोडण्यात आणि फोडण्यात काय फरक आहे ते..

Rofl

रानात दूरवर कुठेतरी सिंहाने एक डरकाळी फोडली...
नंतर दुसरी, नंतर तिसरी...
<<<< या ओळी वाचताना तर मला 'ताल'मधला अक्षय खन्ना आठवला. तो डरकाळी फोडू शकत नाही म्हणून ग्लास फोडतो. तुमची कविता चित्रदर्शी आहे.

Lol

सिंहाने सर्व डरकाळ्या आजच फोडल्या मग तो उद्या काय फोडणार? >> नाक शिंकरुन झोपलाय ना तो मग आता तो मोकळेपणाने घोरेल.. मग ते त्याच्या गुहेत सेव्ह होईल नि तेच तो उद्या डरकाळ्या म्हणून फोडेल.. हाकानाका (सिंहासाठी हां)

एक कोकणी कविता आठवली (कोकणीच आहे का ते नक्की माहित नाही)

खार खार खारीक, कमार माजी बारीक,
अटकम बटकम फटाक फटा,
आयाळीक माज्या बजाभर बटा,
काळी काळी काळी माजी असा डरकाळी,
पिवळो पिवळो पिवळो बापूस माजो,
मी तर आसय बाबा जंगलचो राजो,
जवा मी बगताय पाटी वळान पटकन,
तेकाच तुमी म्हंताय सिंहावलोकन

Pages