Unconventional Lamps Ideas (more added)

Submitted by रचना. on 5 November, 2012 - 05:34

खरतर चांदणी, पारंपारिक आकाशकंदिल लावल्या शिवाय दिवाळी आली असं वाटत नाही.
पण ह्या काही वेगळ्या कल्पना.

१. fortune tellers ओरिगामी लॅम्प
fortune tellers http://en.wikipedia.org/w/index.php?title=File:Fortuneteller_mgx.svg&page=1 बनवुन ते गोल कागदी चायनिज लॅम्पला चिकटवायचे.
il_570xN.257647384.jpgil_570xN.260826830.jpg

२. प्लॅस्टिकचे आयस्क्रिम कप एकमिकांना स्टेपल करुन गोल बनवायचा. त्यात प्रत्येक कापत एक-एक प्लॅस्टिकचे फुल ग्लु डोट्स किंवा ग्लु गन ने चिकटवायचे. ह्याची बरिच व्हेरिऐशन्स आता विकायला असतात.

३. कागदाचे निमुळते त्रिकोणी भाग कापुन चायनीज लॅम्पला एका खाली एक गोलाकार चिकटवायचे.
00-paper-starburst-light-a-032.jpg

४. वरच्या सारखंच पण त्रिकोणा ऐवजी गोल कापायचे.
il_570xN.239300704.jpg

५. कागदाच्या (वर्तमान पत्राच्या सुद्धा चालतील ) पुंगळ्या बनवायच्या. त्या एखाद्या पक्षाच्या घरट्यासारख्या रचुन लॅम्प बनवायचा.
IMG_2841.JPG

६. चायनीज लॅम्पला ज्युट (सुतळी) गुंडाळायची. त्यावर ज्युटचीच फुलं लावायची.
किंवा मोठ्या फुग्याभोवती भर्पुर फेव्हिकॉल लाऊन सुतळी गुंडाळायची. त्यावर परत जाड ग्लुचा कोट द्यायचा. वाळल्यावर फुगा फोडायचा.
jute_lamp.jpg

७. सीडीज एकावर एक काही अंतराने ठेऊन मधल्या भोकातुन छोटी ट्युब फिट करायची. किचकट आहे; पण जबरदस्त दिसतो.
unplggd-spoolslmap.jpg
ही लिंक http://photocreations.ca/cd_lamp2/index.html

८. संत्र्याचं सालावरुन अलगद सुरी फिरवुन सालाचे दोन भाग करायचे. आतलं संत्र काढायचं. सालाच्या एका भागात तेल टाकायचं. संत्र नीट काढलं तर आत संत्र्याची वात पण राहते. मस्त अ‍ॅरोमा लॅम्प तयार.
हा व्हिडिओ http://www.youtube.com/watch?v=-YJgdOFYtj8

९. काचेच्या (सेट मधले फोडुन उरलेले ) ग्लास, बोल यांना रंगीबेरंगी बटणं चिकटवायची. आत टी लाईट ठेवायचा.

१०. ओरिगामी kusadama फुलांचा बॉल
images f.jpg

व्हेरियेशन
stock-photo-colorfull-origami-kusudama-from-rainbow-flowers-isolated-on-white-and-unit-for-it-on-the-box-46739026.jpg

हा व्हिडिओ http://www.youtube.com/watch?v=HRxoeyHeLjo&noredirect=1

*फोटो आंतरजाळावरुन साभार

सध्या कामात असल्याने थोडक्यात सांगतेय. वेळ मिळाल्यावर अजुन काही कल्पना देईन.
खरतर सुशांतला काही कृती हव्या होत्या. मग विचार केला त्याला मेल करण्यापेक्षा धागाच काढु. अजुन कोणाला हवं असल्यास उपयोग होईल.
फार उपयोगी वाटलं नाही तर धागा उडवेन.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा झब्ब्बु ,

IMG554.jpgIMG572.jpg

वर लावलेल्या क्लिप्स कडे दुर्लक्श करा . finishing नाही जमलं पण पहिल्याच प्रयत्नात जे काही जमलं ते बरचं जमलं

या सगळ्या कल्पना आता दिवाळी संपल्यावर पाहील्या.
पुढच्या वर्षीसाठी नक्कीच वापरणार.
यावर्षी चौकोन त्रिकोण जोडून करायचा असतो तसा पारंपारिक कंदिल केला होता.

ओरिगामी kusadama फुलांचा बॉल

akashakandil.JPGakashakandil1.JPG

kusadama फुलांचा बॉल कसा करायचा हे वरती लेखातल्या लिंकवरुन शिकलो.
मी केलेला प्रयोग
१. ७ रंगाचे जाड कागद आणले- आप्पाबळवंत चौकातच दुकान आहे. २३x३६ ईंच आकाराचे कागद घेतले. (८/- रुपये प्रत्येकी - ५६ रुपये)
२. ५ रंगाचे प्रत्येकी २ फुल याप्रमाणे १० पाकळ्या बनवण्यासाठी १० चौरस हवे होते . शनिवारवाड्या शेजारी प्रिंटिंग गल्लीतुन सगळ्या कागदांचा गट्ठा कट करुन आणला. (प्रत्येक कटींग स्ट्रोकला ३ रुपये - ७ स्ट्रोक - २१ रुपये)
३. चिटकवण्यासाठी फेविकॉलची येक ट्युब - १० रुपये , लाईट्ची माळ (२१ बल्ब), वायर, कनेक्टर्स - ६० रुपये
४. ५ रंगाचे २ - २ फुल बनवली. २ रंगाचे येक येक फुल बनवल.
५. येक फुल बनवायला साधारणपणे २० मिनिटे लागली. फुल बनवल्यानंतर बॉल बनवायला अर्धा तास लागला.
झालेल्या चुका :
१. लाईट बसवण्याचा घोळ झाला म्हणुन सगळ्यात शेवटी लाईटच्या माळेचा बल्ब फुलात बाहेरुन खोचला. हेच जर आधीच क्लियर असत तर फुल बनवतांच ते आतुन बसवता आल असत आणि बाहेरुन वायर्स दिसल्या नसत्या.
२. फुल आणि शेवटचा बॉल खुप हाताळला गेल्यामुळ आणि समोरच्यांच्या दरवाज्या मुळ पाकळ्यांची टोक सारखी दुमडली जायची. पाकळ्यांचा आकारपण खुप खराब झाला.
सगळा खर्च : १४७/-
वेळ : ४ तास साधारणपणे. पण आम्हाला २ तास लागले (२.५ जण काम करत होतो)

जबरीच आहेत एकेक मंडळी - काय काय अभिनव कल्पना, काय काय सुंदर आकाशकंदील -
वा वा वा वा ----- फार, फार्फारच सुंदर....

मस्त आहे. मी क्र. ४ मधला कंदिल केला होता. मला तरी आवडला. इतर प्रकार करुन पाहिनच. कुसादामा फुले खुपच आवडली. त्यांचा काहीतरी प्रकार करुन पाहिन.

Pages

Back to top