Unconventional Lamps Ideas (more added)

Submitted by रचना. on 5 November, 2012 - 05:34

खरतर चांदणी, पारंपारिक आकाशकंदिल लावल्या शिवाय दिवाळी आली असं वाटत नाही.
पण ह्या काही वेगळ्या कल्पना.

१. fortune tellers ओरिगामी लॅम्प
fortune tellers http://en.wikipedia.org/w/index.php?title=File:Fortuneteller_mgx.svg&page=1 बनवुन ते गोल कागदी चायनिज लॅम्पला चिकटवायचे.
il_570xN.257647384.jpgil_570xN.260826830.jpg

२. प्लॅस्टिकचे आयस्क्रिम कप एकमिकांना स्टेपल करुन गोल बनवायचा. त्यात प्रत्येक कापत एक-एक प्लॅस्टिकचे फुल ग्लु डोट्स किंवा ग्लु गन ने चिकटवायचे. ह्याची बरिच व्हेरिऐशन्स आता विकायला असतात.

३. कागदाचे निमुळते त्रिकोणी भाग कापुन चायनीज लॅम्पला एका खाली एक गोलाकार चिकटवायचे.
00-paper-starburst-light-a-032.jpg

४. वरच्या सारखंच पण त्रिकोणा ऐवजी गोल कापायचे.
il_570xN.239300704.jpg

५. कागदाच्या (वर्तमान पत्राच्या सुद्धा चालतील ) पुंगळ्या बनवायच्या. त्या एखाद्या पक्षाच्या घरट्यासारख्या रचुन लॅम्प बनवायचा.
IMG_2841.JPG

६. चायनीज लॅम्पला ज्युट (सुतळी) गुंडाळायची. त्यावर ज्युटचीच फुलं लावायची.
किंवा मोठ्या फुग्याभोवती भर्पुर फेव्हिकॉल लाऊन सुतळी गुंडाळायची. त्यावर परत जाड ग्लुचा कोट द्यायचा. वाळल्यावर फुगा फोडायचा.
jute_lamp.jpg

७. सीडीज एकावर एक काही अंतराने ठेऊन मधल्या भोकातुन छोटी ट्युब फिट करायची. किचकट आहे; पण जबरदस्त दिसतो.
unplggd-spoolslmap.jpg
ही लिंक http://photocreations.ca/cd_lamp2/index.html

८. संत्र्याचं सालावरुन अलगद सुरी फिरवुन सालाचे दोन भाग करायचे. आतलं संत्र काढायचं. सालाच्या एका भागात तेल टाकायचं. संत्र नीट काढलं तर आत संत्र्याची वात पण राहते. मस्त अ‍ॅरोमा लॅम्प तयार.
हा व्हिडिओ http://www.youtube.com/watch?v=-YJgdOFYtj8

९. काचेच्या (सेट मधले फोडुन उरलेले ) ग्लास, बोल यांना रंगीबेरंगी बटणं चिकटवायची. आत टी लाईट ठेवायचा.

१०. ओरिगामी kusadama फुलांचा बॉल
images f.jpg

व्हेरियेशन
stock-photo-colorfull-origami-kusudama-from-rainbow-flowers-isolated-on-white-and-unit-for-it-on-the-box-46739026.jpg

हा व्हिडिओ http://www.youtube.com/watch?v=HRxoeyHeLjo&noredirect=1

*फोटो आंतरजाळावरुन साभार

सध्या कामात असल्याने थोडक्यात सांगतेय. वेळ मिळाल्यावर अजुन काही कल्पना देईन.
खरतर सुशांतला काही कृती हव्या होत्या. मग विचार केला त्याला मेल करण्यापेक्षा धागाच काढु. अजुन कोणाला हवं असल्यास उपयोग होईल.
फार उपयोगी वाटलं नाही तर धागा उडवेन.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी ३० सेकंदात १ ! >> अरे हे तुझ्यासाठी.. इथे चौकोन कापायचा म्हटले तरी वेळ लागतो Uhoh

आज घड्याळ लावुन सांगते किती वेळ ते.. रच्याकने.. मी प्रिटरला वापरतात तो पेपर वापरते आहे.. की दुसरा कुठला Uhoh

वर्षा, तुला पण जास्त वेळ लागणार नाही. सोप्पय ते. Happy
प्रिंटरचा कागद चालेल. पांढरा छान दिसतो. फोटो बघ.

सगळेच मस्त!! पन मला तो त्रिकोणी कागदांचा आणि कागदी पुंगळ्यांचा जास्त आवड्ला...तो सीडीजचा तर खासच्...कसला मस्त aqua blue कलर आलाय!!

भारीच... सुतळीचा नी कागदांच्या पुंगळ्याचा नक्कीच करुन बघणार... त्यातल्या त्यात सोप्पा .. Happy

धन्यवाद रचना.. Happy

रचना म्हणते.....

"लोक्स, बनवुन झब्बु द्या....."

~ चांगली आहे सूचना, पण माझ्यासारख्या या 'पेपर कटिंग आर्ट' क्षेत्रातील केजी मध्येही शिकत नसलेल्याने झब्बु द्यायचा म्हटले तर 'करायला गेलो मारुती अन् झाले माकड....' अशी अवस्था व्हायची.....त्यामुळे मी तुझ्या कलाकृतीकडे पाहातच दिवाळी आनंदात व्यतीत करतो, रचना.

वन मोअर टाईम.....ग्रेट वर्क, रीअली !

अशोक पाटील

जबरदस्त कल्पना !!!!!!!!!
सगळेच अप्रतिम दिसताहेत !!

भारी!!
३ आणे ५ खूप आवडले..
चायनिज लँप म्हणजे?? (बेसिक बुद्धिमत्तेचा अभाव आहे ह्या बाबतीत Uhoh )

मनी,
चायनीज लॅम्प गोल, बहुतेक्दा पांढर्‍यावर काळे बांबु काढलेले असतात. त्यातला साधा पांढरा घ्यायचा.

हे सगळं तू केलेलं असशीलच ना? त्याचे फोटो टाक ना.
DIY craft गुगल केल्यावर हे अश्या टाइपचे बरेच प्रोजेक्टस बघितलेले आहेत पण खरोखर कुणी केल्याचे अनुभव ऐकले नाहीयेत.
अपवाद एका ब्लॉगचा. ती बाई पिंटरेस्ट किंवा इतर क्राफ्ट साइटस वरून क्राफ्ट, बेकिंग इत्यादी प्रोजेक्टस करून बघते पण बहुतेक वेळेला पचका होतो. सामान्यतः हातात असलेले कौशल्य आणि त्यामुळे झालेला पचका हे सगळं छान वर्णन करते.

नीधप,
यातला सीडीज चा सोडला तर सगळे लॅम्पस मी केलेले आहेत. बरेचसे ट्रायल बेसिस वर करुन पाहिले होते. त्यामुळे फोटो नाहित. उरलेल्या लॅम्पसचे फोटो मात्र शोधुन वेळ मिळाल्यावर टाकेन.
सीडीजचा करुन बघायचा आहेच. त्यात जरा किचकट काम आहे. उरलेले मात्र नक्कीच सोप्पे आहेत. अर्थात प्रत्येकाच्या हातात असलेल्या कौशल्यावर परफेक्शन अवलंबुन आहे.

नीधप,
पार्ल्यातली तुमची "मी उद्या गुगल करून काही क्राफ्ट प्रोजेक्टस जमवून एका धाग्यात फोटो टाकणारे. अगदी लिंकेसकट. केवळ धागा मी टाकलाय म्हणून लोक माझ्याच कल्पकतेला दाद देतील याची खात्री" ही पोस्ट वाचल्यावर वरच्या तुमच्या पोस्ट मधले काटे कळाले. एकतर ह्या सगळ्या कल्पनांचा शोध "मीच" लावला असं मी कुठेही म्हटलेलं नाहिये. आधी म्हटलं तसं, सुशांतला काही कृती हव्या होत्या. मग विचार केला त्याला मेल करण्यापेक्षा धागाच काढु. अजुन कोणाला हवं असल्यास उपयोग होईल.फार उपयोगी वाटलं नाही तर धागा उडवेन. मुख्य म्हणजे मी फक्त कॉपी- पेस्ट केलं असतं आणि मला तितका क्राफ्ट्चा सेन्स नसता तर विचारलेल्या प्रश्नांची उत्तर मला देताच आली नसती.
पण असोच !

काटे? बर...
तुम्ही हे नेटवरून टाकलेले आहेत हे स्पष्ट केलेले असूनही प्रतिक्रियांमधे लोकांनी तुमच्या कल्पकतेला आणि फोटोंना दाद दिली आहे.
हा एक विनोद
ती तुम्ही स्वीकारताही आहात.
हा दुसरा विनोद...

हे क्राफ्ट प्रोजेक्टस तुम्ही केलेले असतेत, तुमच्या वस्तूंचे फोटो असते तर ती दाद स्वीकारण्याला अर्थ असता.

तुमच्या क्राफ्ट सेन्सवर मी शंका घेतली असं तुमचं म्हणणं हा तिसरा विनोद...
तुम्हाला क्राफ्टचा सेन्स आहे की नाही याबद्दल मी काही म्हणालेच नाहीये. ते तुम्हीच बोलताय. तुम्ही जगातल्या सगळ्यात अत्युच्च पातळीचं क्राफ्ट करणार्‍या आहात हे मान्य करायलाही मला काहीच प्रॉब्लेम नाहीये.

पहिल्या विनोदा बद्द्ल मी काही बोलु शकतं नाही. दुसरं मात्र बरोबर आहे. धन्यवाद म्हणतांना मी स्पष्ट करायला हवं होतं (जरी मी फोटो आंतरजाळावरुन आभार असं लेखात म्हणाले असले तरी) की मी फक्त संकलन केलं आहे. मी दाद स्विकारली कारण यातील काही लॅम्पसचे फक्त फोटो नेटवर आहेत, कृती दिलेली नाहिये (माझ्या माहितीनुसार तरी). मी इथे थोडक्यात का होईना कृती दिली आहे. आणि त्या संदर्भात येणार्‍या अडचणींचे शंकानिरसन केले आहे.
तिसर्‍या बद्दल,
तुमच्या क्राफ्ट सेन्सवर मी शंका घेतली असं तुमचं म्हणणं हा तिसरा विनोद...>>>तुमचा काही गैरसमज झाला आहे, असं मला वाटतं. "मी उद्या गुगल करून काही क्राफ्ट प्रोजेक्टस जमवून एका धाग्यात फोटो टाकणारे. अगदी लिंकेसकट. केवळ धागा मी टाकलाय म्हणून लोक माझ्याच कल्पकतेला दाद देतील याची खात्री" ह्या संदर्भात ते लिहिलय.कारण हे प्रॉजेक्ट्स फक्त जमवुन लिंका देऊन टाकलेले नाहियेत. ते बनवतांना असणार्‍या खाचा-खोचा मला माहिती आहेत. बाकी माझ्या क्राफ्ट सेन्स बद्दल तुमचं काय मतं आहे, याने मला काहीच फरक पडत नाही. फाटेच फोडायचे असतील तर प्रत्येक शब्दाचा किस पाडता येऊ शकतो. असो, माझ्यातर्फे हा विषय संपलेला आहे. Happy

रचनाशिल्प,
गेली ३-४ वर्षे घरी कंदिल करीत आहे. फोटो मात्र नाहीत. यावर्षी तुमच्याकडून प्रेरणा घेउन केलेला कंदिल. कॅलेंडर पेपरच्या पुंगळ्या करून केला. दोन कॅलेंडर होती. एक बरेचसे काळे दुसरे रंगीत + पांढरे. सगळ्यांना फार आवडला. पटकन, अगदी तासाभरात झाला.
paper-roll-kandil-3.JPGpaper-roll-kandil-9.JPGpaper-roll-kandil-10.JPG

धन्यवाद. दिवाळीच्या शुभेच्छा!!!!

अरे, हे बघितलेच नाही.
मधु, मस्तच झालाय. असा चौकोनी पण छान दिसतोय Happy
एक टिप अर्थात दिवाळी स्ंपली आता पण नंतर उपयोगी पडेल. पुंगळ्या करतांना सारख्या आकाराचे कागद घ्यायचे आणि मघ्ये रिफिल (पेक्षा जाड खर तर) सारखे काही घेऊन पुंगळ्या वळायच्या.म्हणजे एकाच आकाराच्या पुंगळ्या होतात.
दुसरं म्हणजे जमल्यास रफ कागदाची पुंगळी केल्यावर चांगल्या पांढर्‍या कागदाने गुंडाळायचं.म्हणजे आणखी छान दिसतं. फोटोत असं केलय.

सुंदर आकाशकंदील मधु.
idea खूपच मस्त साकार केलीत तुम्ही.
या कंदिलाचा प्रकाश पण खूप पडत असेल , नाही का?

रचनाशिल्प,
पुंगळ्या करतांना सारख्या आकाराचे कागद घ्यायचे आणि मघ्ये रिफिल (पेक्षा जाड खर तर) सारखे काही घेऊन पुंगळ्या वळायच्या.म्हणजे एकाच आकाराच्या पुंगळ्या होतात. >>>>> मी पेन्सिलवर वळल्या होत्या. त्या आधी कागदाचे एकसारखे चौकोन कापून घेतले होते.

अनुप,
या कंदिलाचा प्रकाश पण खूप पडत असेल , नाही का? >>>> छानच पडला. रंगीत बल्ब वापरला आहे म्हणून फिरता प्रकाश पडत होता.

हा एक दोन वर्षांपूर्वी केलेला... बिसलेरी पाण्याची बाटली वापरून.
bisleri-bottle-kandil-1.JPG

बाटलीला मधे उभ्या चिरा दिल्या. नंतर बाटली आडवी धरून झांज वाजवल्यासारखे केले (बरेच वेळा). त्यामुळे मधला फुगीरपणा आला. तळ कापून टाकला. खालच्या भागात झिरमिळ्या कापल्या. नेल-पॉलिशने थोडी रंग-रंगोटी केली. कंदिल टांगन्यासाठी जुन्या बुटाच्या नाड्या गळ्यात बांधल्या. ..... मैत्रिणीच्या आईने अशा प्रकारचा केला होता. तेच पाहून केला.

Pages