खरतर चांदणी, पारंपारिक आकाशकंदिल लावल्या शिवाय दिवाळी आली असं वाटत नाही.
पण ह्या काही वेगळ्या कल्पना.
१. fortune tellers ओरिगामी लॅम्प
fortune tellers http://en.wikipedia.org/w/index.php?title=File:Fortuneteller_mgx.svg&page=1 बनवुन ते गोल कागदी चायनिज लॅम्पला चिकटवायचे.
२. प्लॅस्टिकचे आयस्क्रिम कप एकमिकांना स्टेपल करुन गोल बनवायचा. त्यात प्रत्येक कापत एक-एक प्लॅस्टिकचे फुल ग्लु डोट्स किंवा ग्लु गन ने चिकटवायचे. ह्याची बरिच व्हेरिऐशन्स आता विकायला असतात.
३. कागदाचे निमुळते त्रिकोणी भाग कापुन चायनीज लॅम्पला एका खाली एक गोलाकार चिकटवायचे.
४. वरच्या सारखंच पण त्रिकोणा ऐवजी गोल कापायचे.
५. कागदाच्या (वर्तमान पत्राच्या सुद्धा चालतील ) पुंगळ्या बनवायच्या. त्या एखाद्या पक्षाच्या घरट्यासारख्या रचुन लॅम्प बनवायचा.
६. चायनीज लॅम्पला ज्युट (सुतळी) गुंडाळायची. त्यावर ज्युटचीच फुलं लावायची.
किंवा मोठ्या फुग्याभोवती भर्पुर फेव्हिकॉल लाऊन सुतळी गुंडाळायची. त्यावर परत जाड ग्लुचा कोट द्यायचा. वाळल्यावर फुगा फोडायचा.
७. सीडीज एकावर एक काही अंतराने ठेऊन मधल्या भोकातुन छोटी ट्युब फिट करायची. किचकट आहे; पण जबरदस्त दिसतो.
ही लिंक http://photocreations.ca/cd_lamp2/index.html
८. संत्र्याचं सालावरुन अलगद सुरी फिरवुन सालाचे दोन भाग करायचे. आतलं संत्र काढायचं. सालाच्या एका भागात तेल टाकायचं. संत्र नीट काढलं तर आत संत्र्याची वात पण राहते. मस्त अॅरोमा लॅम्प तयार.
हा व्हिडिओ http://www.youtube.com/watch?v=-YJgdOFYtj8
९. काचेच्या (सेट मधले फोडुन उरलेले ) ग्लास, बोल यांना रंगीबेरंगी बटणं चिकटवायची. आत टी लाईट ठेवायचा.
१०. ओरिगामी kusadama फुलांचा बॉल
व्हेरियेशन
हा व्हिडिओ http://www.youtube.com/watch?v=HRxoeyHeLjo&noredirect=1
*फोटो आंतरजाळावरुन साभार
सध्या कामात असल्याने थोडक्यात सांगतेय. वेळ मिळाल्यावर अजुन काही कल्पना देईन.
खरतर सुशांतला काही कृती हव्या होत्या. मग विचार केला त्याला मेल करण्यापेक्षा धागाच काढु. अजुन कोणाला हवं असल्यास उपयोग होईल.
फार उपयोगी वाटलं नाही तर धागा उडवेन.
मस्त!!
मस्त!!
रचु जबरदस्त आहेत
रचु जबरदस्त आहेत आयडिया...
मला ३ आणि ५ नंबरचा असे दोन लँप करून देशिल का?
इब्लिस, दिवाळीची गडबड
इब्लिस, दिवाळीची गडबड संपल्यावर सांगते. सीडीज च्या बर्याच आयडिया डोक्यात आहेत. वेगळा धागाच काढेन
दक्षु, तु त्रिकोण काप आणि
दक्षु, तु त्रिकोण काप आणि पुंगळ्या बनव. मी चिकटवुन देते
रच्याकने, घरातले उद्योगांना लई वैतागलेत. नवरा म्हणतो, "बाई मी पैसे देतो, तु नवीन वस्तु विकत घे. तुझे टाकाऊतुन टिकाऊ उद्योग जास्त महागात पडतात"
मस्त डिजाईन्स , तुमचे पाय
मस्त डिजाईन्स ,
तुमचे पाय कुठे आहेत? डोके ठेवेन म्हणते. >>> रैना पाय सापडले का नसेल तर रचनाशिल्पला त्याचा पण कंदील बनवुन टाक म्हणुन सांग .
सुरेख आहेत सगळेच
सुरेख आहेत सगळेच आकाशकंदिल...१नंबरचा करुन बघावा का?विचारात पडलेली बाहुली
भारी कल्पना आहेत. तो सिडीवाला
भारी कल्पना आहेत. तो सिडीवाला दिवा घरी बनवता येतो? सीड्यांना भोकं कशी पाडायची. त्या लिंकमध्ये त्याने खास उपकरण वापरलय त्यासाठी.
स्वप्ना, करुनच बघ.
स्वप्ना, करुनच बघ.
माधव,
साध्या पंचने सी डी ला भोक पडतं.
रच्याकने क्राफ्ट वर्ल्ड मध्ये खास यासाठी crop a dile puch ३० $ ना मिळतो. आणि साध्या पंचची किंमत २००-३०० रु. अर्थात साध्या पंचला लिमिटेशन्स (किती अंतरावर भोक वै.) आहेत.
ओरिगामी kusadama फुलांचा
ओरिगामी kusadama फुलांचा बॉल
व्हेरियेशन
हा व्हिडिओ http://www.youtube.com/watch?v=HRxoeyHeLjo&noredirect=1
पहिला लॅम्प मधे ते पार्ट्स
पहिला लॅम्प मधे ते पार्ट्स कसे चिटकवायचे ??????????????
पहिला लॅम्प मधे ते पार्ट्स
पहिला लॅम्प मधे ते पार्ट्स कसे चिटकवायचे ??????????????>>>>>...उदय, शाब्बास. शुभेच्छा!
फारच सुंदर, रचना मला कुठला
फारच सुंदर, रचना मला कुठला बनवून देणार आहेस सांग
अधि सागां तरी.........
अधि सागां तरी.........
रचना, इथे विचारते. माझ्या
रचना, इथे विचारते. माझ्या लेकीला तू बनवलेले कानातले वगैरे हवे आहेत काही. तुझा विचार आहे का ते विकत द्यायचा वगैरे? आकाशकंदिलही चालेल दिलास तर.
वा अप्रतीम कल्पकता आणि कल्पना
वा अप्रतीम कल्पकता आणि कल्पना
उदयन, fortune tellers बनवुन
उदयन,
fortune tellers बनवुन त्यांचा बेस चायनीज लॅम्पला चिकटवायचा.
सगळे भारी आहेत.
सगळे भारी आहेत.
रचनाशिल्प अ प्र ति म! मी पण
रचनाशिल्प
अ प्र ति म! मी पण करुन बघेन!
'फार उपयोगी वाटलं नाही तर धागा उडवेन.'
हे वाक्य उडवा मात्र
मस्तआयड्या ! जबरीच आहेत सगळे
मस्तआयड्या ! जबरीच आहेत सगळे
मागच्या वर्षी लेकीने बॉल चा बनवला होता, फेविकॉल ने त्यावर कागद चिकटवून, मग तो वाळला की फोडायचा , मग त्यावर डेकोरेशन वगरे करायच, मुलांना करायला अगदी सोप्पा, सापडल्यास फोटो लावेन.
ह्या वर्षी तर अजून परिक्षा संपायचीय कधी करणार ?
पहिल्या कंदीलात कागदाचे
पहिल्या कंदीलात कागदाचे पंचपाळ करुन चिकटवायचय. जमेल्स वाटतय
त्यांचा बेस चायनीज लॅम्पला
त्यांचा बेस चायनीज लॅम्पला >>>>>>>>>> जम्या नही.............त्याला त्रिकोणी बेस आहे....आणि एकमेकांना चिटकवले तर गोल होत नाही
उदय स्मिता म्हणतेय
उदय स्मिता म्हणतेय त्याप्रमाणे कागदाचे पंचपाळ करुन चिकटवायचं आणि त्याचा त्रिकोणी बेस आहे तो कापून टाकायचा अस केलतर बघ चिकटतय का .
रचना हे चालेल काय ?
अरे खालुन कापला तर त्या
अरे खालुन कापला तर त्या पंचपाळ राहतील का ???
.
.
इथे मी प्रॅक्टीक्ल घेउन बसलोय
अरे खालुन कापला तर त्या
अरे खालुन कापला तर त्या पंचपाळ राहतील का >>>>+१
उदयन, हे बघा,
कृपया पसार्याकडे दुर्लक्ष करावं
fortune tellers उलटा केल्यावर (निळा ठिपका) एकच टोक दिसेल त्याला ग्लु लाऊन लॅम्पला चिकटवायच. दुसरा तसाच. मध्ये गॅप पडतेच. त्याने काही फरक पडत नाही. वरच्या फोटोमध्ये पण गॅप्स आहेत.
आणि हो, एकमिकांना चिकटवायचे
आणि हो, एकमिकांना चिकटवायचे नाहीत. वरही बदल केला.
मी खाली कागदाचा तुकडा जोडून
मी खाली कागदाचा तुकडा जोडून चिकटवलाय,
निळा ठिपका ग्लू आहे का ?
निळा ठिपका ग्लू आहे का ?>>>>
निळा ठिपका ग्लू आहे का ?>>>> नाही ! दिवे रंगवतेय. त्याचाच रंग पटकन हाताशी होता म्हणुन स्पष्टिकरण द्यायला वापरलाय
रचनाशिल्प, चायनीज लॅम्प
रचनाशिल्प,
चायनीज लॅम्प म्हणजे?
जुना चायनीज लॅम्प सापडला...
जुना चायनीज लॅम्प सापडला... काल पंचपाळे करुन चिटकवले काही.. पण खुप वेळ लागेल से वाटतेय.. दुसरे काही लवकर करुन चिटवण्यासारखे आहे का? कागदी फुले वगैरे?
वर्षा, मेहनत आहेच पण fortune
वर्षा,
मेहनत आहेच पण fortune tellers खुप पटकन होतात. अगदी ३० सेकंदात १ !
Pages