Unconventional Lamps Ideas (more added)

Submitted by रचना. on 5 November, 2012 - 05:34

खरतर चांदणी, पारंपारिक आकाशकंदिल लावल्या शिवाय दिवाळी आली असं वाटत नाही.
पण ह्या काही वेगळ्या कल्पना.

१. fortune tellers ओरिगामी लॅम्प
fortune tellers http://en.wikipedia.org/w/index.php?title=File:Fortuneteller_mgx.svg&page=1 बनवुन ते गोल कागदी चायनिज लॅम्पला चिकटवायचे.
il_570xN.257647384.jpgil_570xN.260826830.jpg

२. प्लॅस्टिकचे आयस्क्रिम कप एकमिकांना स्टेपल करुन गोल बनवायचा. त्यात प्रत्येक कापत एक-एक प्लॅस्टिकचे फुल ग्लु डोट्स किंवा ग्लु गन ने चिकटवायचे. ह्याची बरिच व्हेरिऐशन्स आता विकायला असतात.

३. कागदाचे निमुळते त्रिकोणी भाग कापुन चायनीज लॅम्पला एका खाली एक गोलाकार चिकटवायचे.
00-paper-starburst-light-a-032.jpg

४. वरच्या सारखंच पण त्रिकोणा ऐवजी गोल कापायचे.
il_570xN.239300704.jpg

५. कागदाच्या (वर्तमान पत्राच्या सुद्धा चालतील ) पुंगळ्या बनवायच्या. त्या एखाद्या पक्षाच्या घरट्यासारख्या रचुन लॅम्प बनवायचा.
IMG_2841.JPG

६. चायनीज लॅम्पला ज्युट (सुतळी) गुंडाळायची. त्यावर ज्युटचीच फुलं लावायची.
किंवा मोठ्या फुग्याभोवती भर्पुर फेव्हिकॉल लाऊन सुतळी गुंडाळायची. त्यावर परत जाड ग्लुचा कोट द्यायचा. वाळल्यावर फुगा फोडायचा.
jute_lamp.jpg

७. सीडीज एकावर एक काही अंतराने ठेऊन मधल्या भोकातुन छोटी ट्युब फिट करायची. किचकट आहे; पण जबरदस्त दिसतो.
unplggd-spoolslmap.jpg
ही लिंक http://photocreations.ca/cd_lamp2/index.html

८. संत्र्याचं सालावरुन अलगद सुरी फिरवुन सालाचे दोन भाग करायचे. आतलं संत्र काढायचं. सालाच्या एका भागात तेल टाकायचं. संत्र नीट काढलं तर आत संत्र्याची वात पण राहते. मस्त अ‍ॅरोमा लॅम्प तयार.
हा व्हिडिओ http://www.youtube.com/watch?v=-YJgdOFYtj8

९. काचेच्या (सेट मधले फोडुन उरलेले ) ग्लास, बोल यांना रंगीबेरंगी बटणं चिकटवायची. आत टी लाईट ठेवायचा.

१०. ओरिगामी kusadama फुलांचा बॉल
images f.jpg

व्हेरियेशन
stock-photo-colorfull-origami-kusudama-from-rainbow-flowers-isolated-on-white-and-unit-for-it-on-the-box-46739026.jpg

हा व्हिडिओ http://www.youtube.com/watch?v=HRxoeyHeLjo&noredirect=1

*फोटो आंतरजाळावरुन साभार

सध्या कामात असल्याने थोडक्यात सांगतेय. वेळ मिळाल्यावर अजुन काही कल्पना देईन.
खरतर सुशांतला काही कृती हव्या होत्या. मग विचार केला त्याला मेल करण्यापेक्षा धागाच काढु. अजुन कोणाला हवं असल्यास उपयोग होईल.
फार उपयोगी वाटलं नाही तर धागा उडवेन.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर

शेवटचा प्रकार खुप सोप्पा आहे.... ट्रायलसाठी म्हनुन छोट्या फुग्याला जाड धागा गुंढाळुन पण करता येईल. अंदाज येण्यासाठी. मी फुग्याच्या आत थरमॉकॉलचे बॉल्स टाकले होते आणि जरा दाटसर विणल होत. पण आकाशकंदिल म्हनुन नव्हत वापरल. असच टेबलावर ठेवायला म्हनुन केल होत.

वर्षा मी पण माघच्या वर्षी पाणी पिण्याचे कागदी ग्लास वापरुन मोठा स्पाईक बॉल केला होता आणि प्रत्येक ग्लासात दिव्याच्या माळीचा येक येक लाईट फिट केला होता. बॉल बनवन सोप जात पण आतमधे प्रत्येक ग्लासात छोटा लाईट बसवण महाकठिण जात. लाईट फिटींगला मला येक दिवस गेला होता.

उगवला का हा Happy
त्यातच अजुन म्हणजे डेकोरेटिव्ह कॅन्डल्स साठी जे जेल वापरतात, त्यात रंग टाकुन गरम करायच. फार नाही. त्यात फुगा बुडवायचा. रिस्की आहे. टेम्प फार नको. माझे २-३ फुगे फुटले. गार झाल्यावर आतला फुगा फोडायचा. झक्कास अ‍ॅब्सट्राक्ट रंगाचं तयार होतं.

वर्षा, मस्तच गं. मी ह्यात फुलं लावली होती. आता फोटो काढण्यासारखी स्तिथी नाही त्याची. Proud

हा चायनीज लॅम्प कुठे मिळतो ?
की जे गोल कागदाचेह मिळतात त्यालाच म्हणतात Uhoh
पण त्याची किंमत बरीच असते.. तो कागद डिझाईनचा असतो

वर्षा, डिझाईनचा असण्याची गरज नाही. तसही तो लॅम्प पुर्ण झाकला जाणार आहे. साधा पांढरा मिळतो. ह्या वर्षी दिव्यांच्या मागे असल्याने (तेव्हडीच जाहिरात :फिदी:) सध्याच्या किंमती माहित नाहित.

ओके शोधते साधा पांधरा... गेल्या दिवाळीनंतर एक जुना झाला म्हणुन फेकुन दिला Angry
आत्ता उपयोगी आला असता

भारी आहेत सगळेच. ३ नंबरचा सगळ्यात जास्त आवडला.
फार वर्षांपूर्वी मी आईस्क्रिमचे लाकडी चमचे वापरुन षटकोनी आकाराचा लँप केला होता. आता लाईट लावून मस्त दिसायचा अंधारात.

व्वा...रचना.....तुझे मायबोली नाव अगदी सार्थ केलेस असेच मी म्हणेन !

दिवाळीपूर्वीच दिवाळीच्या तेजोमय प्रकाशाचा असा आनंद मिळणे अपेक्षित नव्हते. प्रत्येक कंदिल कमालीचा देखणा झालाय.

मध्यंतरी "शिंपल्यां"चा एक कंदिल पाहिला होता पणजी बाजारात, चटदिशी खरेदीही केला....अगदी अस्साच मोहक. पण दिवाळी झाल्यानंतर त्यातील शिंपल्यांचे पापुद्रे हळुहळू गळत गेले....आपसूकच. ते परत पेस्टही करता येईनात.

"कागदी पुंगळ्यां" ची कल्पना जबरदस्तच.

मस्त आहेत सर्व लॅम्प. संत्राच्या सालाचा अ‍ॅरोमा लॅम्प ही मस्त आहे. फुग्याला दोरा गुंडाळुन केलेल्या लॅम्पची आयडीया ही छान आहे. मी पण आयस्क्रिमच्या काड्या वापरुन लॅम्प केलेला. धन्यवाद रचना!

Pages