उंच माझा झोका

Submitted by सानी on 13 March, 2012 - 05:59

ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया. Happy

Uncha Maza Zoka-Promo.jpgUncha Maza Zoka-News.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुहू काही केल्या डोक्यातून जाईना +१
रच्याकने किती वर्षांनी पुढे गेलीये आता मालिका?
कारण फक्त रमाच मोठी झालिये Uhoh
बाकी सगळे आहे तेवढेच तरूण आहेत
केसही काळे कुळकुळीत सगळ्यांचे Uhoh

स्पृहाच्या फर्स्ट लूक मध्ये कविता लाडचा खुपसा भास होत होता!
>>
प्रचंड अनुमोदन Happy
मलाही हेच वाटलं
अगदी आई मुलगी शोभतायेत Happy

पण रमेचं खरेsssच काही जमेना स्पृहाला Proud

स्पृहाचे खरेऽऽ हे वेगळे आहे पण चालतय. बाकिच्या बायकांच्या साड्या वेगळ्या दाखवल्या नाहीत. यांच्याकडे हळूवार धुणे धुतात वाटते. Wink काहीजणी थोड्या वयस्क बघायला आवडल्या असत्या पण सगळ्यांच्या तब्येती ठणठणीत आहेत हे पाहून बरे वाटले. Wink आता स्पृहाची खरी परिक्षा आहे. नाहीतर छोटी रमा अभिनयात जास्त सरस ठरायची.

रमेचं खरेsssच काही जमेना स्पृहाला >>

हो, मला ही असंच वाटलं

पण स्पृहामुळे मालिका परत बघणेबल झाली..हे आपलं माझ मत हं...:)

नवीन रमा कोण असेल ही उत्सुकता होतीच! बरेच चेहरे डोळ्यासमोर येऊन गेले. त्यातल्या त्यात प्रिया बापट छान करेल असं वाटलेलं. स्पृहाने स्पप्नाळू, स्वतःच्या जगात रमणारी हळवी, भाबडी कुहू मस्त साकारली होती. भाबडा चेहरा, फ्रेश स्माईल आणि भावूक डोळे हे तिचे प्लस पॉईंटस आहेत त्यामुळे रमाबाईसुद्धा ती खूप ताकदीने साकारेलच असं वाटतंय!

स्पृहाच्या फर्स्ट लूक मध्ये कविता लाडचा खुपसा भास होत होता!
>>१००००

रच्याकने किती वर्षांनी पुढे गेलीये आता मालिका?>>> रिया, ४ वर्षांनीच पुढे गेलीये मालिका फक्त... म्हणूनच वाढत्या वयातली मंडळी- रमा, आबा आणि बाबाच तेवढे वाढलेले दाखवलेत. (रमाची वाढलेली भावंडंही दाखवतील पुढेमागे.) बाकी कोणात काही बदल नाही. पहिल्या भागात बदललेली रमा नाही आवडली. दुसर्‍या भागात जरा बरी वाटली. हळू-हळू सुसह्य होईलसे वाटतेय. कुहू म्हणून खुप आवडली होती स्पृहा. रमा म्हणून अजूनतरी विशेष भावली नाही.

असो, ताई सासूबाईंचे पात्र आऊट केले वाटते! माईच्या भावाकडे ती रहायला गेली, असा संवाद सुभद्राकाकूच्या तोंडी होता, म्हणजे तो भाऊ आणि त्याची नवीन बायको आता करवीरांस आहेत. नव्या रमेसोबत नवे पर्व सुरु झालेय खरे, पण मूळ सिरियलपासून फारच डिस्कनेक्टेड वाटतेय त्यामुळे.

रिया, ४ वर्षांनीच पुढे गेलीये मालिका फक्त... म्हणूनच वाढत्या वयातली मंडळी- रमा, आबा आणि बाबाच तेवढे वाढलेले दाखवलेत.
>>
ओके मग ठिक आहे Happy
पण तरी एवढी मोठी झाली मग रमा Uhoh
केतकी घ्यायला हवी होती मग

स्पृहा नको होती...कारण एखाद्या पहिल्या इमेजला लोकांच्या मनातून जायला बराच काळ जातो. एलदुगो नुकतीच संपलीये त्यामुळे ती अजून कुहूच वाटते. असं वाटलं आत्ता एखादी कविता म्हणेल फटकन Proud

मला आवडली स्पृहा. (तिला कुहू म्हणाय्चं थांबवा म्हणजे तुम्हाला पण आवडेल) Happy
मला उलट लहानगी रमा १३ वर्ष्याच्या मानाने फारच लहानखुरी वाटायची. ७-८ वर्षाची वाटायची ती.

शुम्पी +१.
स्पृहाने डिग्नीटी आणली त्या रोलमध्ये. ती आल्यापासुन पुन्हा पहायला सुरवात केली आहे. Sad
दिग्दर्शक वाईट्ट् आहे अगदी. (अंडरस्टेटमेंट)

रैना Lol
स्पृहासाठी म्हणून एक-दोन सीन्स मुद्दाम जाऊन पाहिले. तिचे काम आवडले मला पण एकट्या तिच्यासाठी बाकी सगळे सहन करणे अशक्य वाटले त्यामुळे रिलॅप्स नाही झाले Wink

हे सर्व लोक अनुनासिक शब्द स्पष्ट नाकात का उच्चारत नाहीत कोण जाणे. कोंकणात आत्ताआत्तापर्यंत अनुनासिके उच्चारली जात असत. म्हणजे उदा. 'माझे बोलणे तूस समजते का?' हे वाक्य 'माझें बोलणें तूस समजतें का?' असे उच्चारायला हवे. मी गेलें,मी आलें, हें काम कसें बाई करावयाचें, इ. सर्व अनुनासिके स्पष्ट हवीत.
की फक्त कोंकणातच अशी पद्धत होती आणि पुण्यात नव्हती? कदाचित तसेही असेल कारण चिनूक्सच्या धाग्यातली लोकमान्यांची ध्वनिफीत ऐकली त्यात अनुनासिके अगदी स्पष्ट अशी काही ऐकू आली नाहीत. अस्पष्टसा भास मात्र झाला.
रमेच्या तोंडी पुन्हा 'स्वतः' हा शब्द येऊ लागलाय. त्यांच्या 'आठवणी'त जरी हा शब्द जाड ठश्यात वापरला असला तरी आपापसात बोलतांना त्या तो वापरत असतील हे काही पटत नाही. रमाबाई मोठ्या झाल्यावर, सुशिक्षित, सुसंस्कृत,प्रगल्भ झाल्यावर त्यांनी लिखित भाषेत जुन्या काळचे 'इकडून, तिकडून्,इकडची स्वारी' वगैरे शब्द वापरायचे टाळावेत हे एकवेळ समजू शकते पण लहानगी रमा जी सुरुवातीला इतर चारचौघींसारखीच होती, तिच्या तोंडी स्वतः हा शब्द अतिशय कृत्रिम वाटत होता. आताची रमाही वयाने फार मोठी नाहीय. तिचा स्वतःचा शब्दसंग्रह आणि भाषा अजून विकसित व्हायची आहे अशा वेळी स्वतः हा शब्द तिच्या तोंडी शोभत नाही.

स्पृहाला कुहूच्या भूमिकेत पाहिल्यामुळे तिची रमाबाई ही भूमिका फ़ारशी खास नाही वाटत त्या जागी जर एखादा नवीन चेहरा घेतला असता तर मालिका बघायला जास्त आवडली असती Sad पण आता काय रमाबाईंच्या जीवनावर आधारित कथा आहे मग पाहाविच लागणार.

इथे थोपूवर वाचलेली एक खुप मस्त पोस्ट शेअर करावी वाटतेय
मला विशालदादाने शेअर केलेली ही लिंक मिळाली आणि खुपस पटलं म्हणुन इथे शेअर करतेय Happy

.............................

Zee Marathi - Oonch Mazha Zhoka

उंच माझा झोका मालिकेचे पटकथाकार आणि दिग्दर्शक विरेन ( विरेन्द्र प्रधान ) यांनी व्यक्त केलेली ही भावना ( यातून कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही तर ही एका सृजनशील व्यक्तीची कळकळ आहे ).

विरेन यांचं मत पुढीलप्रमाणे आहे -
नमस्कार. लहान रमा , मोठी रमा .... तेजश्री... स्पृहा .... खूप काही लिहिलं जातंय. आपल्या जुन्या लोकांचे , ज्यांनी इतिहास घडवला... ते रानडे , भांडारकर, ज्योतिबा फुले, गांधीजी , शिवाजी महाराज, अशा अनेक सर्व थोर मोठ्यांच्या कार्यापेक्षा लोकांना तेजश्री चांगली कि स्पृहा वाईट हे लिहिण्यात आणि अंदाज बांधण्यात जास्त रस दिसला आणि वाईट वाटले. तेजश्रीने कमाल केली.... स्पृहा किती गोड आहे किंवा तिने कशी वाट लावली या पेक्षा आपण ही मालिका रमाबाई आणि महादेवराव रानडेंच्या जीवन चरित्राची ओळख व्हावी या साठी पहिली असतीत तर त्या महान लोकांना आपल्याला सलाम करण्याची संधी मिळवता आली असती . पण आपल्या समाजासाठी अहोरात्र झटलेल्या या लोकांच्या ओळखीपेक्षा स्पृहा , तेजश्री तुलना करत बसणे, मालिकेमधल्या अशा काही चुका काढणे ज्या वरून असे वाटावे की हा चुका काढणारा माणूस त्या काळी १८७३ मध्ये होता की काय ?
चुका झाल्या तर आम्ही त्या स्वीकारू... क्षमा मागू. त्यात कसलाही कमीपणा नाही . पण उंच माझा झोकाच्या टीमने प्रामाणिकपणे , तो काळ, त्या काळ्चे संस्कार , ती थोर माणसे , त्यांचे विचार, त्यांचा समाजासाठी चा त्याग, संस्कृती , मानापमान , नाते संबंध, क्रांती, देश साठी ,समजा साठी समर्पणाची भावना , अशा विविध अंगांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला , कदाचित खारीचा वाटा उचलला असे म्हणता येईल. पण आपल्या प्रतिक्रिया वाचून मन उदास झाले.
प्रसिध्द नट नाना पाटेकर एकदा म्हणाले होते .... त्यांचे गाजलेले नाटक " पुरुष " त्यांनी अचानक बंद केले कारण बलात्कार करणाऱ्या त्यांच्या पात्राच्या स्टेज वरच्या आगमनाने , प्रेक्षक टाळ्या वाजवायचे. बलात्कार करणाऱ्या माणसाला टाळ्या ?... नाही. टाळ्या नाना पाटेकाराना मिळायच्या. यातून काय सिद्ध होते ? लेखकाला काय म्हणायचे आहे ? दिग्दर्शकाला काय म्हणायचे आहे ? या पेक्षा नाना पाटेकर लोकांसाठी मोठा. रमाबाई आणि माधवरावांना काय म्हणायचे आहे या पेक्षा तेजश्री आणि स्पृहा मोठ्या.
रसिक हो ....शाळेत असताना.... माझ्या शेजारच्या बाकावरचा मुलगा मला एकदा हसत हसत म्हणाला ..... विरेन... आपल्या सरांच्या पॅन्ट ची झिप बघ उघडी आहे.... मी सुन्न झालो. कारण तो सोडून आम्ही इतर सगळेच आमचे लाडके सर् शिकवत असलेल्या विषयात गुंग झालो होतो आणि त्याला मात्र ती उघडी राहिलेली झिप दिसत होती.
आपला विषय काय.... आपण बोलतोय काय .... हे प्रत्येकाने तपासून घ्यायला हवे. त्या काळी फेस बुक नव्हते. तरी लोकांनी महान कार्य केली. रादर आजही महान कार्य करणारी माणसे फेस बुक वापरताना दिसत नाहीत कारण ते त्यांचे काम करत असतात. एवढा रिकामा वेळ कोणाकडे आहे ?
मी महान कार्य करतोय असे मला मुळीच वाटत नाही पण मला सरांच्या उघड्या झिप कडे पाहण्या पेक्षा , ते सांगत असलेल्या विषयाकडे लक्ष देणे जास्त गरजेचे वाटते. कदाचित असे करून मी रानडे , भांडारकर, फुले, आणि अशा अनेक महान लोकांना सलाम करेन. नतमस्तक होईन. तेवढीच माझ्या कडून या सर्व थोरांना फुल न फुलांची पाकळी .
ज्यांना उघड्या झिप कडे पहायचे आहे .....बलात्कारी पुरुष मधल्या गुलाबरावना टाळ्या मारायच्या आहेत .... तेजश्री, स्पृहा यांची तुलना करत राहणे पसंत आहे.... त्यांनी ते अवश्य करावे. कारण हे करणे हा त्यांचा सार्वभौम हक्क आहे.
पण आज मी फेस बुक सोडतोय. हताश होऊन, चिडून नव्हे. तर ..... हा वेळ मला अजून काही चांगले करण्यासाठी वापरता येतोय का हे पडताळून पाहण्यासाठी.
आपण आपला सार्वभौम अधिकार आणि हक्क अबाधित ठेवावा ही नम्र विनंती. कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नाही. तेवढी माझी योग्यता ही नाही. काही कमी जास्त बोललो असेन तर क्षमस्व,
बाय.

स्पृहाला कुहूच्या भूमिकेत पाहिल्यामुळे तिची रमाबाई ही भूमिका फ़ारशी खास नाही वाटत त्या जागी जर एखादा नवीन चेहरा घेतला असता तर मालिका बघायला जास्त आवडली असती >>>>>>>>

मराठमोळ, बरोबर बोलिस तु ! इतके दिवस जाहिरात करत होते नवीन रमा कोण ?आम्हालाही उत्सुकता होती कोण असेल मोठी रमा शेवटी स्पृहाला बघितलनी सासुबाईंनी टि.व्हीच बंद करुन टाकला.. नवीन चेहरा असता तर मालिका लक्षात राहते जणु त्याकाळी अशीच वागत असेल रमाबाई.

"पण आज मी फेस बुक सोडतोय. हताश होऊन, चिडून नव्हे. तर ..... हा वेळ मला अजून काही चांगले करण्यासाठी वापरता येतोय का हे पडताळून पाहण्यासाठी""

सुपरलाइक. मीदेखील याच कारणासाठी मराठी मालिका बघणे सोडून दिले होते. एलदुगोमुळे त्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.

नक्की माधव रानडे आहे का महादेव रानडे नाव आहे न्यायमूर्तींचे ?
मालिके मधे माधव म्हणतात आणि एक पुस्तक बघितले त्यावर ही माधव होते.

रमाबाईंच्या भुमिकसाठी आधी अमृता सुभाष, उर्मिला कानेटकर ,केतकी माटेगावकर, प्रिया बापट, मृण्मयी देशपांडे यांची नावे चर्चेत होती म्हणे -इति आजचा पुणे टाइम्स!
>>>>

अमृता सुभाष ते केतकी माटेगावकर - केवढा मोठा तो व्यास! धन्य तो वीरेन!!

नक्की माधव रानडे आहे का महादेव रानडे नाव आहे न्यायमूर्तींचे ?
मालिके मधे माधव म्हणतात आणि एक पुस्तक बघितले त्यावर ही माधव होते.>>>

कागदोपत्री नाव "महादेव गोविंद रानडे" पण घरातील नाव "माधव" हा उल्लेख ह्या मलिकेत सुरुवातीला आलेला आहे.

८-१० दिवसांपुर्वी लोकसत्तेत न्या. रानडेंचं टिळकांना लिहिलेलं पत्र आलं होतं ( म्हणजे त्याचा उल्लेख). त्यात रानडेंनी टिळकांना लिहिलं होतं की " गणेश उत्सव सार्वजनिक करुन, देवाला रस्त्यावर आणु नका. काही वर्षांनी हा उत्सव गुंडांच्या ताब्यात जाईल"

केवढे खरे लिहिले आहे!!! तेही १०० वर्षां पुर्वी. द्रष्टा माणुस....

विरेन प्रधानची फेबु पोस्ट मला अगदीच नाही पटली. मला व्यक्तिशः ही मालिका फार अभ्यास करुन तयार केली आहे असं वाटत नाही. यावर जर एवढे कष्ट घेतले असते तर किती तरी ढोबळ चुका दिसताहेत त्या झाल्याच नसत्या.
मी 'रमाबाई रानडे' हे नाव ऐकुन फार उत्सुकतेने पाह्यला सुरुवात केली होती, पण अगदीच सुमार वाटली. रमाबाईं-महादेवराव यापेक्षा त्यांचं घर, घरगुती गोष्टी, नातेवाइक, खाणं-पिणं आणि भांडणं यात कितीतरी वेळ घालवला. मी निराश होवुन मालिका पहाणं सोडुन दिली. आणि कलाकारांकडे पाहु नका, फक्त व्यक्तिरेखेकडे पहा म्हणणं बरोबर आहे का? कोणत्याही सिनेमा, नाटक, मालिकेचं कास्टींग किती महत्वाचं असतं. त्याकडे दुर्लक्ष करुन मालिका बघा म्हणणं अगदीच पटलं नाही. त्या त्या व्यक्तिमत्वाला ( ऐतिहासिक किंवा सत्यघटनेमधल्या) आपण कल्पनेत पाहिलेलं असतं. काही किंचित अपेक्षा असतात, पण कलाकार त्या व्यक्तिरेखेला मिळताजुळता नसेल तर कसं चालेल? स्पृहाला नुकत्याच एलदुगोच्या अवखळ ( खरंतर वेडपट) भुमिकेत पाहिल्यावर मला तरी ती रमाबाई म्हणुन झेपली नाही. अगदीच न बघता दुराग्रही मत बनवायला नको म्हणुन १-२ एपिसोडस पाहिले. नाही आवडली. मग परत एकदा पहाणं सोडुन दिलं. अजुनही 'रमाबाईं'चं आकर्षण आहेच. जर तुम्हाला कोणाला ती मालिका खरंच छान चालु आहे असं वाटलं तर मला प्लीज विपु कराल का?

परत एकदा 'विप्र'च्या विधानाकडे वळते. खरं तर अगदीच एक्स्ट्रीम उदाहरण देते आहे ( क्षमा करा), पण उद्या राखी सावंतने द्रोपदी/सीतेची व्यक्तीरेखा अगदी सोज्वळ आणि सर्वोत्तम वठवली तरी आपण तिला त्या भुमिकेत पाहु शकु का? कलाकार भुमिकेला सुयोग्यच हवा. कलाकाराकडे दुर्लक्ष करुन व्यक्तिरेखा पुजनिय आहे म्हणुन तेवढीच बघा, हे म्हणणं काहीच्या काहीच.

मी भारतात असताना अगदी ओझरती बघितली होती, त्यामूळे मनिमाऊ ला अनुमोदन... मूळात मालिकेवर जर श्रम घेतले असते, तर विरेन ला असे लिहावे लागतेच ना.

आधीच्या भुमिकेचा छाप पुसून टाकायचा असेल तर कलाकार आणि दिग्दर्शक, दोघेही तितकेच समर्थ हवेत.

मला वाटतय आपण स्प्रुहा वर अन्याय करतोय असे बोलुन... तिचा काय दोश... तिच्या दुर्दैवाने ए.ल.दु.गो नंतर अगदी लगेच ही मालिका आली. खरेतर ती काम चांगले करते आहे. आपणच आपल्या मनातली कुहू पुसुन टाकु शकत नाहीयोत.

विरेन ने लिहिले त्या वर.... एका परीने तो मालिकेतले दोष झाकुन टाकु बघतो आहे. तरीही हा विषय फक्त कलाकार चांगले नाहीत किंवा त्यांची प्रतिमा ती नाही म्हणुन झटकुन टाकता कामा नये. बाकी ते रमाबाईंचं पुस्तक वाचलं तर ध्यानात येइल की त्यांनी त्यांचा शिक्षणाचा प्रवास आणि त्या करता भोगलेल्या अडचणी ह्या बाबत लिहिताना घरच्या एकंदर जाचा बद्दल लिहिले आहे. आर्थात त्यांच्या लिखाणाचा सुर "मला त्रास झाला" असा नाहीच आहे... "हे आहे हे असे आहे " असा आहे. त्या मुळे सहाजिकच त्या काळचं वर्णन आणि घरातले संबंध ह्या बद्दल भाष्य आहेच.

आता ही मालिका मी ही नियमित पहातेच असे नाही. मागच्या आठवड्यात नेमका एक भाग पाहिला. त्यात रमा नेवैद्याचे ताट वाढताना पानात मीठ वाढते. ते पुजेला बसलेले भटजी गहजब करतात... असा प्रसंग होता. आता हे चित्रण १२० वर्षां पुर्वीचे साधारण... आजही ह्या प्रकाराचा रीलेव्हन्स आहे... माझ्या बाबतित सिमिलर प्रसंग २ वर्षां पुर्वी झाला होता. तेंव्हा साबा आणि सासर्‍यांनी मोठा इशु केला होता. आर्थात तेंव्हा ते प्रकरण मिटलं.... पण त्या दिवशी रमाच्या आयुष्यातला हा प्रसंग पहाताना साबांचा चेहेरा पहाण्या सारखा झाला होता. कारण एरवी त्या खुप तिच्या सास्वान्ना शिव्या घालतात... मी पटकन रीलेट झाले रमाशी.... आज माझ्या सारख्या मुलीवर हा प्रसंग येतो तर १२० वर्षां पुर्वी तिने ते सगळे कसे निभावुन नेले असेल?...

ह्या प्रसंगाने मी एकदम रीलेट झाले ... त्या मुळे त्या काळातलं आज बरच काही बदलल आहेही आणि नाहीही....

मला वाटतय आपण स्प्रुहा वर अन्याय करतोय असे बोलुन... तिचा काय दोश... >>>>>>
>>>>
मला नाही वाटत स्प्रुहाला कोणी दोष देत आहे.सर्वजण तिला कुहू म्हणून ओळ्खतात त्यात लगेच हया मालिकेत ती मेन रोल साकारत आहे हे बघितल्यावर रमाबाईंनची व्यकितरेखा पुसट पडल्या सारखी दिसते.मुळात दिग्दर्शकाने नव्या मुलीला घेतले असते तर मालिकामध्ये खरेपणा शोभला असता

Pages