उंच माझा झोका

Submitted by सानी on 13 March, 2012 - 05:59

ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया. Happy

Uncha Maza Zoka-Promo.jpgUncha Maza Zoka-News.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रमाबाईंचे चरीत्र वाचलेले कोणी इथे आहे का? दुर्गाक्काच घटना खरोखर घडली होती का हे मालिकेच्या लेखकाने / दिग्दर्शकाने घेतलेले स्वातंत्र्य आहे?>> स्वातंत्र्य नाही.........दिग्दर्शकाने घेतलेला स्वैराचार Happy

<<आणि असली सामान्य घर घरकी कहानीच दाखवायची होती, तर अशा थोर व्यक्तिमत्त्वांच्या चरित्राचा आधार का घेतलात? एखादी काल्पनिक कथाही चालली असती.>>
सानी , नाही पटल . अरे थोर व्यक्तिमत्वाच्या आयुष्यात सुद्धा अशा घरोघरी घडणाऱ्या घटना घडत नसतील का? नक्कीच घडत असतील .फक्त आता मालिका पुढे सरकायला पाहिजे . रमाबाई मोठ्या झाल्यावरच त्यांनी केलेल सामाजिक कार्य दाखवता येईल ना. तोपर्यंत प्रेक्षकांनी थोड थांबायला पाहिजे Happy

<<रमाबाईंच्या सामाजिक कार्यात प्रेक्षकांना रस असेल का?>>
ज्यांना रस असेल ते बघतीलच . शेवटी रमा बाईंच्या प्रेरणादाई आयुष्याचा आलेख मांडण्याकरताच ही मालिका प्रोड्यूस केली आहे .

प्रेरणादाई आयुष्य अजून १ वर्ष तरी बघता येईल असे वाटत नाहीये. रमाबाईंच्या नावाखाली सास्वा-सुना, जावा जावा ड्रामाच चालू आहे अजून तरी....

प्रेरणादाई आयुष्य कसे दाखवणार?? टिवीवाल्यांच्या मते लोकांना हिंसाचारच आवडतो. हे प्रेरणादाई वगैरेच्या भानगडीत पडले तर प्रेक्षक सोडून जातील ना त्यांना...

प्रेरणादाई आयुष्याचा आलेख हे वाक्य सरळ सरळ मी ट्रेलर वरून उचलले आहे. Happy साधना अग बाई च्यानल वाल्यांना सगळ्या प्रकारच्या मालिका प्रक्षेपित करायच्या असतात . चरित्रात्मक , निखळ मनोरंजन करणाऱ्या , सासू सुनेचे हेवे दावे, सीआयडी सारख्या , खादाडी, नृत्य, गायन सगळ्याला वाव देणाऱ्या. सगळ्या प्रकारच्या प्रेक्षकांना पसंत पडतील अशा. आत्ता हि मालिका चरित्रात्मक आहे.ज्यांना अशा मालिका बघायला आवडतात ते तर बघणारच. प्रत्येक प्रेक्षकाची आवड वेगवेगळी आहे.

मोठी रमाबाई कोण असावी यावर चर्चा करा आता लोक्स..... Happy

म्हणजे कोण शोभेल मोठी रमाबाई????? उचला बोटे.... बडवा कीबोर्ड Wink Proud

कोण शोभेल मोठी रमाबाई????? >>> बहुतेक 'असंभव'च्या प्रोमोज मधे नऊवारी साडी आणि खोपा घातलेली बघितली म्हणुन असेल पण मला वाटतं उर्मिला कानेटकर. ती हसते पण वरच्या फोटोतल्या छोट्या रमासारखी. मला आता तरी दुसरी कोणी मराठी मुलगी आठवतच नाही जुन्या काळच्या गेटअप मधे.

मी ही सिरियल पहात नाही. इथे वाचते फक्त, म्हणुन उगाच आपली एक काडी. इथे काही पेटलं तर मी जबाबदार नाही. मला उर्मिला कानेटकर आवडते. ( अरेच्चा ही पण उका आहे की. Happy )

लहान मुले केंद्रस्थानी असलेल्या काही मालिका हिंदीत बर्‍या चालल्या. म्हणून हीच चावी मराठीतही लागेल असा कयास असावा. या मालिकेच्या निर्मितीची खरी प्रेरणा रमाबाईंचे चरित्र/कार्य नसून हिंदीतली बालिका वधू ही मालिका असावी असा मला संशय आहे. असो.

रमा वयाने लहान असली तरी दुर्गाची मोठी भावजयी आहे आणी त्याकाळी ( अजुनही खेडोपाडी) नंणदा-भावजया एकमेकींना अहो-जाहोच म्हणत असत.इथे ही रमा त्या दुर्गेला चक्क अग-तुग करताना दाखवलिय ..

अलका कुबल. मोठी रमाबाई.

कालचा 'मामंजी' एपिसोड चुकून पाहिला. आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या पुरूषाला 'मामंजी' शब्द वापरताना पाहिले ("तुमचे मामंजी भेटले होते" सारखे काहीतरी) Happy मला वाटले आता तो सिनीयर माणूस पुढे 'अय्या, वन्सं आल्या की काय?' म्हणतो की काय? पूर्वीच्या काळी जर वापरत असतील तर काळ पुढे गेला हे किती चांगले झाले!
तर तेवढ्यात त्या शिक्षिकेला गूळपाणी द्यायला कोणालातरी सांगून रमाबाई मुले खेळत असतात तेथे जातात. तेथे तुला काय मुलांचे खेळ खेळता येणार वगैरे झाल्यावर लगोरीसारख्या लावलेल्या फरश्यांच्या तुकड्यावर नेम धरून उभी असलेली चिमुकली रमा पाहून "आता हिचा नेम हुकणार, आणि मग सगळे हसणार. मग आम्ही (प्रेक्षकही) एकमेकांना 'बघा बायकांचे स्थान घरातच आहे' वगैरे पटवणार" अशा तयारीत असतानाच तिने त्या फरश्या ... big surprise, big surprise...अचूक उडवल्या! आणि आम्हाला आश्चर्याचा धक्का दिला. तिच्या टिपर्‍या उडवण्याने तीन चार लोकांना तरी जीवनाचा अर्थ कळला असेल, जर तिला लग्नामुळे कळला असेल तर.

मात्र तिने तो तुकडा नेम धरून टाकणे व टिपर्‍या उडणे हे एकाच फ्रेममधे दाखवायचे होते. वेगवेगळ्या शॉट्स मधे दाखवल्याने बायकांचे स्थान नक्की कोठे आहे हे ठरवता आले नाही.

अलका कुबल. मोठी रमाबाई.>>>>>>

हहपूवा........ ( प्रचंड हसणारी बाहुली)

ती जर रमाबाई झाली तर फर्स्ट क्लास्स जज्ज असणार्‍या रानड्यांना नक्की कडेवर घेईल आणि त्यांच्या आईची कमतरता त्यांना भासणार नाही....

आपका सुझाव सॉलीड आहे.....( त्या करीता तुम्हाला एक पाटी हापुसचे आंबे भेट)

mango.jpg

कालच्या भागात शैलेश दातार- कविता मेढेकर शंकर-पार्वती दाखवले होते! गुटगुटीत, पोट सुटलेला मनुष्य शंकर????? तांडवनृत्य कसं जमणार मग? काहीही दाखवतात पाणी घालण्यासाठी!

ज्यांना रस असेल ते बघतीलच . शेवटी रमा बाईंच्या प्रेरणादाई आयुष्याचा आलेख मांडण्याकरताच ही मालिका प्रोड्यूस केली आहे .>>>>>> ज्यांना रमाबाईंच्या समाजकार्यात रस आहे त्यांना सध्या सुरू असलेला प्रकार मुळीच आवडणार नाही. ज्यांना हा प्रकार बघायचा असेल त्यांना हे रमाबाईंचं आयुष्य आहे कि आणखी कुणा बाईचं यानं काही फरक पडणार नाही.
उगाच त्या रमाबाईंच्या नावानं काहीही दाखवायचं हा खरंतर गुन्हा (क्रिमीनल ऑफेन्स) आहे.

तिला एखाद्या पुलावरून रेल्वेच्या डब्यावर उडी मारायला लावून, रस्त्याने जोरात पळायला लावून तिच्या पायांवर कॅमेरा ठेवून किंवा हीरो ला पटकन मोठे करणारे तत्सम उपाय करून बघायला लावावेत (***)

*** कल्पना माझी नाही Happy एका तमिळ पिक्चर मधे आई मुलाला लौकर मोठे होण्यासाठी हे उपाय करायला सांगते Happy

आता ही रमा खरच मोठी झाली पाहिजे. शाळा सुरु झाली ना?? पुरे आता हे नाच्-गाणं, अभ्यास कर घरी बसून!! Happy

दुसरी आणा कुणीतरी - अलका कुबल नको बरं का.

आमच्या चार वर्षीय कन्यकेने आत्ता नोंदवलेले निरिक्षण: (रमेची बोलण्याची पद्धत बघून): "ही अशी लाडात का बोलत्ये?"

Proud

आमच्या घरात नवा टीव्ही आणण्याचं श्रेय रमाबाई लाटणार. परवा त्या अगदी लाजलाजून 'स्वतः घरी आले घर भरल्यासारखं झालं. आता मला कळलं माझे बाबा घरी नसताना आई का उदास असायची' वगैरे काहीतरी बोलत होत्या म्हणे. मातोश्रींनी टीव्ही जवळपास फोडलाच होता. Proud

आज येताजाता एक संवाद पाहिला आणि थक्क झालो - ती रमा त्या नवर्‍याला सांगत होती असे फिरायला ("फिरावयास") जाणे आम्हास खूप आवडते कारण आपल्याला बोलता येते वगैरे. सिरीयसली? ९-१० वर्षाच्या मुलीला घरी पन्नास माणसे असताना असे बोलता येण्याचे वेगळेपण वगैरे समजत असेल?

९-१० वर्षाच्या मुलीला घरी पन्नास माणसे असताना असे बोलता येण्याचे वेगळेपण वगैरे समजत असेल?>>>>> फारेंड खरं म्हणजे रमाबाईंचं लग्न त्या १३ वर्षांच्या असतांना झालं होतं. त्या वयानंतर हळुहळु या जाणिवा मुलींमधे येऊ लागतात. पण इथे ती खांदे उडवुन हसणारी मुलगीच ६ ते जोपर्यंत लोकांना रडवता येतय तितक्या वर्षांपर्यंतच्या रमाबाई म्हणुन दाखवली जाणार याची गॅरेंटी आहे. एकदा तर गोविंदरावांनी (काय कारण होते देव जाणे) दुर्गाआक्काला चक्क पोटाशी धरलेले बघितले. पुढे काय झालं ते ही देव जाणे! आणि हे १८ व्या शतकातले वडील आणि मुलगी दाखवलेत.

फु.स. - माझ्यासारखं मालिका बघुच नकोस. चुकुन दिसलीच तर शक्य तितक्या लवकर चॅनल बदलण्याची व्यवस्था कर. आमच्याकडे मुलाला ते टायटल साँग आवडतं त्यामुळे ते संपलं की शक्यतो टीव्ही बंद केला जातो किंवा म्युट तरी.

एकदा तर गोविंदरावांनी (काय कारण होते देव जाणे) दुर्गाआक्काला चक्क पोटाशी धरलेले बघितले. >> +१
हो परवाच. चक्कर आली ते पाहुन.

प्रचंड वैताग आहे.

थॅन्क्स श्रुती, शक्यतो सलग पाहात नाहीच. अधूनमधून कधीतरी दिसते तेवढे पाहिले जाते.

विंदरावांनी (काय कारण होते देव जाणे) दुर्गाआक्काला चक्क पोटाशी धरलेले बघितले. >>> हे नक्की काय आहे कळण्याएवढी त्या सिरीयलमधली पात्रे माहीत नाहीत Happy

चांगली सबसीडी बंद केल्यामुळे बंद पडत होती मालिका तर पुन्हा सुरू झाली. काहीच कसा विचार करत नाहीत हे लोक? भयानक राग येतो असं काही पाहीलं की. इतक्या मान्यवर स्त्रीच्या आयुष्याबद्दल दाखवतांना किती जबाबदारीनं वागलं पाहीजे. हे सगळं म्हणजे त्यांचा प्रतिमाभंग करण्यासारखं आहे. त्यांच्या कष्टाची, मताची, त्या मतासाठी ठामपणे ऊभे राहण्यामागच्या मानापमानांची काहीही जाणिवच नाहीये. वाट्टेल ते दाखवत सुटतात.

Pages