Submitted by सानी on 13 March, 2012 - 05:59
ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया.
"विप्र"ची उदाहरण कै च्या कै!
"विप्र"ची उदाहरण कै च्या कै! उघडी झिप किंवा बलात्कारी पात्राला टाळ्या.. ह्या दोन्ही गोष्टी नि मालिकेतल्या तृटी.. दोन्ही एकच?
उघडी झिप आणि नाना पाटेकरला कलाकार म्हणून त्याच्या बलात्कारी पात्रासाठी टाळ्या हे दोन्ही सेम विचारधारा किंवा वागणूक ठोकताळे (बिहेविअर पॅटर्न) आहेत का?
थोडी टिका झाली की आधी आत्मपरिक्षण केलं तर त्यातल्या योग्य त्या चुका टाळता येतात आणि अस्थानी टिकेकडे दुर्लक्ष करता येतं.. मग टोकाच्या भुमिका घ्याव्या लागत नाहीत.
रच्याकने, स्पृहा थोडी रुळली की कदाचित फारसा फरक जाणवणार नाही, हे मा वै म!
मालिकेचं सादरीकरण १०० टक्के
मालिकेचं सादरीकरण १०० टक्के बिनचूक नाहीच पण तरीही ही मालिका मी अपवाद वगळता रोज पाहते. त्यावेळच्या मानाने मानाने मला मिळालेले स्वातंत्र्य यापेक्षा माझ्या दोन्ही आज्ज्यांच्या मानाने मला मिळालेले स्वतंत्र्य, शिक्षण यांचे महत्व आधी फक्त वाटायचे आता अगदी आतून जाणवते की मी किंवा माझ्या पिढीतल्या, आईच्या पिढीतल्याही किती नशिबवान आहोत. कृज्ञतेने मन भरून येते. रमाबाई, सावित्रिबाई आणि अश्याच अनेकजणींवर चुकत माकत का होईना मालिका आल्या तर मी पाहीन. त्यांचे कष्ट अफाट होते. एखाद्याने सोसायचे म्हणजे तरी किती हे समजले. मालिकेत अगदी तसेच दाखवता आले नसेल पण दृष्य परिणाम साधला जातोय. बाई म्हणजे फक्त आणि फक्त चूल मूल असे समिकरण असणे एवढे तरी नक्कीच दिसत आहे. गैरसमज, अंधश्रद्धा यांच्यामुले पोखरलेले जीवन, विधवांची सगळीकडून होणारी उपासमार, कुढणे पाहिले की आईच्या एका मैत्रिणीची आठ्वण येते. त्यांनी दुर्दैवाने लवकर आलेले विधवापण किती वेगळेपणाने स्विकारले. मुलांना शाळेत पाठवून त्या बाई नाच शिकायला जाऊ शकल्या (किंवा अर्थार्जनासाठी नोकरी करण्याचा मोकळेपणा आहे. कोणावर अवलंबून नको.) . इतक्या मोकळेपणाच्या काळात माझ्यासारख्या हजारो मुलींचा जन्म झाला हे केवळ माझ्यासारख्या अनेक मुलींचे नशीब व अनेक दशके आधी आमच्यासाठी कष्ट घेतलेल्या स्त्रीयांमुळेच!
मोकिमी फुल्ल अनुमोदन मने
मोकिमी फुल्ल अनुमोदन
मने तुझीही पोस्ट काही अंशी पटली
कलाकरांच्या निवडीबद्दल नाही पटली पण मालिकेतल्या दोषांबद्दल तुला अनुमोदन
त्यावेळच्या मानाने मानाने मला
त्यावेळच्या मानाने मानाने मला मिळालेले स्वातंत्र्य यापेक्षा माझ्या दोन्ही आज्ज्यांच्या मानाने मला मिळालेले स्वतंत्र्य, शिक्षण यांचे महत्व आधी फक्त वाटायचे आता अगदी आतून जाणवते की मी किंवा माझ्या पिढीतल्या, आईच्या पिढीतल्याही किती नशिबवान आहोत. कृज्ञतेने मन भरून येते.>>>
मैना +१
माझी आजी .. जी आज ८५ वर्षांची आहे. ती त्या काळात हिंदी कोविद ची परिक्षा पास होती. तिचे वडिल अचानक गेले आणि मग लग्न करुन अगदी सनातन घरात आली. आणि ती आणि तिच्या शिक्षणाचा चोळामोळा झाला. एकदम पाचोळा... आजही ती आठवड्यात एक पुस्तक वाचुन संपवते ( सध्या माझ्या कडे आली आहे महिना भर) अनेक मासिके वाचते. बातम्या ऐकते. एकदम अप डेटेड आहे.... पण त्या वेळी तिच्या वर झालेला अन्याय आजही ती विसरु शकत नाही. मग रमाबाई तर तिच्या ही आधीच्या काळातल्या... त्यांना तर केवढ्या रामायणाला सामोरे जायला लागले असेल...
ह्या मालिकेच्या माध्यमातुन चुकत माकत का होइना तो काळ चित्रित होतोय हे ही नसे थोडके... आर्थात ह्याचा अर्थ असा नव्हे की दिग्दर्शन ग्रेट आहे, वा मालिकेच्या कलादिग्दर्शनात काही खोट नाही...
पण तरीही......कुठेतरी ही मालिका पहावीशी वाटते आहे.... का कोण जाणे...
मोकिमी, अगदी. विषयाच्या
मोकिमी,
अगदी. विषयाच्या महत्वामुळे काही कलात्मक मुद्दे दुर्लक्षित करावेच लागणार आहेत. किमान त्याकाळातली घुसमट आणि रानड्यांचे काम तरी लोकांसमोर येतेय. अन्यथा मुद्दम कोण वाचतो.रमाबाईंचे ते चरित्र पुस्तक शोधूनही मला मिळालेले नाही... नवी पिढी काही वाचते यावर माझा विश्वास नाही.ती फक्त 'पाहते'... आमचीच जन नेक्स्ट बघा. आमची कन्या महर्षी कर्व्यांच्या संस्थेत शिकली. म. कर्व्यांच्या कामाचे महत्व सांगताना मी तिला म्हटले की कर्वे झाले म्हणून तुम्ही शिकू शकलात. त्यांनी स्त्री शिक्षणाबाबत समाजाचा मेंटल बॅरियर काढाला . त्यावर नाक उडवून उत्तर आले 'त्यात काय विशेष ? त्यानी शाळा काढली नसती तर कुणी तरी काढलीच असती ना?' मला ब्रम्हांड आठवलेच पन दोष कुणाला द्यायचा?. तिला दिसते तसे तिने इन्टरप्रीट केले. पतंगराव कदमांनी कॉलेज काढले नाही तर कराडांनी काढले असते नाही तर नवल्यांनी इतके सोपे हे इन्टरप्रिटेशन आहे. त्यामुळे या मालिकेचे महत्व आहेच तिला एक प्रचंड शैक्षणिक मूल्य आहे. त्यात त्यांच्या कोरलेल्या भुवया, तुकतुकीत चेहरे, अभिनयाचा कमजास्तपणा, स्पृहा जोशी चपखल आहे की नाही. ह्या बाबी शोधणे म्हणे छिद्रान्वेषण आहे असे मला वाटते.
"उंच माझा झोका" ला झी मराठीचा
"उंच माझा झोका" ला झी मराठीचा सर्वोत्कृष्ठ मालिकेचा पुरस्कार
congo
congo
त्यातकाय दरवर्षी कोणाला तरी
त्यातकाय दरवर्षी कोणाला तरी मिळ्तेच मला वाटल national Award मिळाला
आजच ही सिरीयल बघायला सुरुवात
आजच ही सिरीयल बघायला सुरुवात केली. ३ भाग बघितले!
कथानक चांगले वाटतय पण चकचकीत मेकप वगैरेमुळे जुन्या काळाचा फील येत नाहीये. त्यात यमीचे आणि तिच्या मैतीणीच्या कापलेल्या केसांच्या दोन इटुकल्या वेण्या?? ते असो. पण तो स्त्रीयांनी केलेला उपास कोणता आहे ज्यात स्त्रीयांना चंद्रदर्शनाशिवाय उपास सोडता येत नाही? महाराष्ट्रात असे कोणते व्रत असते? मला खरच माहीत नाही म्हणुन विचारते आहे.
पुढील भाग बघते आणि वरील चर्चाही वाचते!
माझ्या ८ वर्षाच्या मुलीला जुना काळ समजावा या उद्देशाने ही सिरियल बघायचे ठरवले पण तिला अजिबात इंटरेस्ट वाटला नाही! तिचे म्हणणे कसे काय त्या मुलीला शाळेत पाठवत नाही? लग्न का करतात?
पण माझा मात्र जीव दडपतो आहे बालविवाह, मुलींनी न शिकणे बघुन!
ही मालिका बघण्याबद्दल माझाच
ही मालिका बघण्याबद्दल माझाच निषेध! ती पाहुन पाहुन मी हताश होत असते.
-मोठी रमा सारखी उठसुठ गळ्यात का पडत असते सासवांच्या?
-सासवांची वये कशी वाढत नाहीत?
-सखुताई म्हणुन ज्या मंदाबाईंना आणले अशा लोकांना मालिकेत का घेतात? त्यांच्यापेक्षा आपण कोणीही बरे काम केले असते की .
वत्सलातै,
वेलकम टु द क्लब. यात एका भागागणिक ७ तरी गोष्टी खटकतील.
तरीपण भाचीने (१२ वर्षे) सांगीतले की तिच्या मैत्रिणी ही मालिका आवडीने पाहतात म्हणे, दुसर्या दिवशी शाळेत त्याबद्दल बोलतात. त्या 'राम प्रिया' वर बोलण्यापेक्षा रमाबाई रानड्यांवर गॉसिप केलेले काय वाईट याचा निर्णय होईना माझा..
"तुला माहितीये मामी, मुलींच्या एज्युकेशनसाठी त्यांनी बरेच कायकाय केले. ""हे ऐकुन माझे हृदय आणि मतपरिवर्तन झाले थोडेसे. आता महात्मा फुल्यांवर 'भंगार' मालिका आली तरी तक्रार करणार नाही (फारशी)
तुम्ही सगळ्या छिद्रान्वेषी
तुम्ही सगळ्या छिद्रान्वेषी आहात..
संकष्टी चतुर्थीचा उपास
संकष्टी चतुर्थीचा उपास चंद्रदर्शनाशिवाय सोडता येत नाही
काल सुभद्रा काकूंच्या
काल सुभद्रा काकूंच्या नवर्याचे प्रताप पाहून तो उगाचच आला असे त्यांना वाटले असेल. गायब होता तेच बरे.
असे नवरे असणार्या त्या काळच्या बायकांना खरेच नवर्याचा तिटकारा वाटत असेल का? आताच्या बायकांनाही नकीच वाटेल पण आता निदान त्या निदान राग आणि त्रागा व्यक्त तरी करू शकतात.
नताशा+१.
नताशा+१.
बर्याच दिवसांनी हि मालिका परत
बर्याच दिवसांनी हि मालिका परत बघितली. शेवटचे ३-४ भाग आवडले. वादविवाद स्पर्धेतील वेद आणि स्मृती मधील फरक सांगून केलेली चर्चा आवडली. माधवरावांचा शांतपणा आणि त्याचबरोबर कणखरपणा छान वाटला. रमाबाई आणि साखुबाई मधील संवाद, रमाबाईमध्ये होत असलेला बदल दाखवतो.
काल सुभद्रा काकूंच्या
काल सुभद्रा काकूंच्या नवर्याचे प्रताप पाहून तो उगाचच आला असे त्यांना वाटले असेल. गायब होता तेच बरे. +१
Nuktech Babane lihilelya eka
Nuktech Babane lihilelya eka patrat Rama aani Subhdra Kaku yanchya navapudhe Chi. Sau. Kan. Lavlyache paahile. Pan tyanche lagn zalele aahe na?
हो ती भली मोठी चूक
हो ती भली मोठी चूक होती....असे वाटते.....चि सौ कां असं फक्त लग्न ठरल्यापासून होईपर्यंतच म्हणतात......
चि सौ कां असं फक्त लग्न
चि सौ कां असं फक्त लग्न ठरल्यापासून होईपर्यंतच म्हणतात......>>> हो कारण कांक्षिणी चा अर्थ आहे अपेक्षा/ईच्छा असलेली.
रमाबाई आणि माधवराव बयोला छान
रमाबाई आणि माधवराव बयोला छान समजून घेत आहेत.
ती बयो चांगले काम करते.
चि सौ कां असा उल्लेख फक्त
चि सौ कां असा उल्लेख फक्त नवरी मुलगी असताना केला जातो. सवाष्ण बाई साठी सौभाग्यवती असा उल्लेख करतात.
वयाच्या सहाव्या वर्षी सखूचं
वयाच्या सहाव्या वर्षी सखूचं लग्न ठरलंय... माधवराव रोखु शकतील का हे लग्न.
कालचा भाग पहाताना एक गोष्ट
कालचा भाग पहाताना एक गोष्ट खटकली ती म्हणजे, आबा, बाबा, सार्वजनिक काका, बयोचे वडील ई. व्यक्तींच्या कानात भिकबाळी होती पण माधवरावांच्या कानात नव्हती. असे कशामुळे झाले असेल?
काल लवकर घरी पोचल्याने बर्याच
काल लवकर घरी पोचल्याने बर्याच दिवसांनी मालीका पाहिली.
माधव रावांचे एक भाषण सुरू झाले. वाटले आता काहीतरी चांगले ऐकायला मिळणार. पण तो भाग mute केला.
पांडू आणि इतर बायकांचा टाईम पास दाखवण्यापेक्षा हे दाखवायचे ना
नताशा, अगदि खरं आहे. खूप
नताशा, अगदि खरं आहे. खूप उत्सुकतेने भाषण ऐकायला सुरुवात केली, आणि खरंच निराशा झाली.
माधवरावांची बदली आता मुंबईस
माधवरावांची बदली आता मुंबईस झालेली आहे, रमाबाई भांडारकरांच्या घरातील एकत्र सहभोजनामुळे गडबडुन गेल्यात. चांगली चाललीय मालिका.
अजून चालू आहे का हि मालिका
अजून चालू आहे का हि मालिका
हो, चालू आहे.
हो, चालू आहे.
माधव रावांचे एक भाषण सुरू
माधव रावांचे एक भाषण सुरू झाले. वाटले आता काहीतरी चांगले ऐकायला मिळणार. पण तो भाग mute केला. >>> नताशा, पुढच्या भागात ते भाषण दाखवले होते... ह्या मालिकेत त्यांनी शक्यतो बरिचशी भाषणे दाखवून माधवराव आणि रमाबाईंचे विचार त्यातून उलगडायचा प्रयत्न अलिकडच्या बर्याच भागांमध्ये केलाय.
मालिका आता बहुतेक संपायच्या मार्गावर आहे. सगळेजण बरेच वयस्क झालेले दाखवत आहेत. हल्लीचे बरेच भाग संवाद लेखनाच्या बाबतीत फारच प्रगल्भ वाटले. छोट्या रमेला घेऊन रमाबाईंच्या मूळ पुस्तकातली पाने उलगडण्याची संकल्पना छान वाटली. http://www.youtube.com/watch?feature=player_detailpage&v=bRXwfRxdm2s#t=153s येथे मूळ रमाबाई आणि माधवरावांचे खरेखुरे चित्र पहायला मिळाले.
पहिल्या भागापासून न चुकता ही मालिका पाहात आलेय. मध्यंतरीचे काही भाग सोडले, तर बाकी सगळीच मालिका मला प्रचंड आवडली. आता संपली तर मी नक्कीच तिला खुप खुप मिस करेन... विशेषतः रमा आणि माधवराव (स्पृहा आणि विक्रम) यांना... आणि त्याच्या शीर्षकगीताला आणि पार्श्वसंगीतालाही.. सोज्ज्वळ, निर्मळ आणि गोड मालिका.
आज ही मालिका बघणे जीवावर आले
आज ही मालिका बघणे जीवावर आले आहे........एका युगाचा अंत....माधवरावांचा अंत.......
Pages