उंच माझा झोका

Submitted by सानी on 13 March, 2012 - 05:59

ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया. Happy

Uncha Maza Zoka-Promo.jpgUncha Maza Zoka-News.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा! हे म्हणजे उदबत्ती विझुन गेल्यावरचा दरवळ किंवा तुपाच्या वातीचा विझल्यानंतरचा गंध देवघरात रेंगाळत रहावा असे भारुन राहिले आहे इथले वातावरण.

<या मालिकेमुळे मला कळले, कि आजची स्त्री सुस्थितीत आहे, तर ती फक्त रमाबाई रानडे आणि माधवराव रानडे यांच्यामुळ>

म. फुले, सावित्रीबाई, महर्षी धोंडो केशव कर्वे, गो.ग.आगरकर, राजा राम मोहन रॉय इत्यादिकांवही मालिका निघण्याची आत्यंतिक गरज आहे असे दिसते. नाहीतर त्यांचे कार्य जे फक्त टी.व्ही.मालिकांचे प्रेक्षक आहेत, अशांपर्यंत कसे पोचेल?

म. फुले, सावित्रीबाई, महर्षी धोंडो केशव कर्वे, गो.ग.आगरकर, राजा राम मोहन रॉय इत्यादिकांवही मालिकाच निघण्याची आत्यंतिक गरज आहे असे दिसते. नाहीतर त्यांचे कार्य जे फक्त टी.व्ही.मालिकांचे प्रेक्षक आहेत, अशांपर्यंत कसे पोचेल?>>> अशी कळकळ खरंच मनात असेल तर अशा मालिकांना लोकांकडून प्रोत्साहन मिळायला हवे.. मान्य आहे की या मालिकेत भाषा, वेषभूषा, नेपथ्य या तांत्रिक बाबींमध्ये त्रुटी होत्या, पण ही मालिका त्या काळातल्या थोर समाजसुधारकांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात नक्कीच यशस्वी झाली याबाबतीत शंकाच नाही. किमान या गोष्टीचे जरी कौतुक झाले आणि चांगला रिस्पॉन्स मिळाला, तर अशा अजूनही मालिका नक्की बनतील.. नाहीतर आहेतच आपल्या टिपिकल मालिका, ज्यातून फक्त किचन पॉलिटिक्स कसे खेळावे, हेच दाखवले जाते!! लोक कंटाळतात, पण दुसरा पर्याय नसल्याने बघत राहतात...

'विवेक आणि विद्रोह' या अरुणा ढेर्‍यांच्या पुस्तकात महादेव गोविंद रानड्यांवर 'युगंधर द्रष्टा' हा सुरेख लेख आहे. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातल्या पुरोगामी समाजसुधारकांबद्दल समजून घ्यायचं असेल, तर हे पुस्तक जरूर वाचा.

मायबोलीच्या खरेदीविभागातून हे पुस्तक विकत घेता येईल - http://kharedi.maayboli.com/shop/Vivek-Aani-Vidroh.html

सानी, होणार सून च्या धाग्यावर आपण लिहिले आहे -"पूर्वग्रह दूषित होऊनच एखाद्या गोष्टीकडे पाहणारे किंवा त्या गोष्टींकडे पाठ फिरवणारे लोक आपल्या मतांच्या बाबतीत अगदी ठाम असतात.. मग त्या गोष्टीत कितीही सकारात्मक बदल झाले तरी या लोकांचे मत बदलत नाही किंवा त्यांना तसे दिसू द्यायचे नसते. मग ते सातत्याने येऊन नकारार्थी मते नोंदवत राहतात. सकारात्मक बदलांकडे बघतच नाहीत.. अशांशी काय आणि कसे बोलायचे??? असो..."

मालिकेबद्दलचे माझे मत मालिका न बघता झालेले नाही. त्यामुळे ते पुर्वग्रहदूषित नाही. जेव्हा जेव्हा ही मालिका माझ्या दृष्टीस पडली तेव्हा तेव्हा किचन पॉलिटिक्स चाललेले दिसले. न्या. रानडे आपले इच्छापत्र वाचत/सांगत असताना, त्यांच्या निधनानंतर रमाबाईंच्या दागिन्यांबद्दल, कोणत्यातरी मुलाला दत्तक घेण्याच्या इश्युबद्दल...ही अलीकडची उदाहरणे. या सगळ्यांत रानडे पती-पत्नींचे सामाजिक कार्य नावापुरतेच दाखवले गेले असेच मला वाटते. वर निर्माता-दिग्दर्शकाचा आव या महान विभूतींचे कार्य लोकांपर्यंत पोचवण्यासाठी मालिकेची निर्मिती केली असा. प्रत्येक भागाच्या सुरुवातीला दाखवण्यात येणारा डिस्क्लेमर (रंजकतेसाठी नाट्यमयता.इ.इ.) तुम्ही वाचला असेलच.

मालिका, तिचा फोकस नंतर सुधारला हे वादासाठी मान्य केले, तर मी ती न पाहिल्यामुळे मालिकेचे काहीच नुकसान होणार नव्हते. झालेच तर एका चांगल्या मालिकेला मुकल्याने माझेच नुकसान झाले असते. तसेही माझ्यासाठी कोणाच्या कार्याची महती जाणून घेण्यासाठी मालिका हे एकमेव माध्यम /साधन नाही.

आता हे सगळं लिहिताना दूरदर्शनवरील शांताबाई कांबळे यांच्या आत्मचरित्रावर आधारित माज्या जल्माची चित्तरकथा या मालिकेची आठवण झाली.

असोच.

भरत, तुम्ही त्या होणार सूनच्या धाग्यावर<<<उंच माझा झोकाला निगेटिव्ह पब्लिसिटीची अजिबातच गरज नव्हती. त्या मालिकेबद्दल लिहिण्यासाठी काय, बघण्यासाठीही मला कोणी पैसे दिले असते तरी धुडकावून लावले असते. >>> हे जे लिहिलं होतं, त्यावर ते माझं उत्तर होतं... असो, तुमच्या प्रतिसादांवरुन तुम्हाला महादेवराव आणि एकूणच आपल्या इतिहासाची बर्‍यापैकी माहिती आहे, हे लक्षात येते आणि त्यामुळेच मूळ इतिहासाला कलाटणी देत निर्माण केलेली नाट्यमयता तुम्हाला खपत नाही, हे स्पष्ट जाणवते आणि मी तुमच्या मताचा आदरच करते. पण सामान्य प्रेक्षकांना फक्त डॉक्युमेन्टरी स्वरुपात माहिती पुरवली, तर तो वर्ग त्याकडे पाठ फिरवेल, म्हणून नाट्यमयता आणत हळूहळू विचारांचा डोस दिलेला आहे, असे मला वाटले. सुरुवातीला ह्या मालिकेत सामाजिक कार्याचा भाग अगदीच शून्य टक्के दाखवला जात होता. पण हळूहळू थोडे थोडे करत हा भाग वाढवत नेल्याचे दिसले.

ह्या प्रक्रियेला अंमळ जास्तच वेळ लागल्याने काही चांगल्या प्रेक्षकांनी तिच्याकडे पाठ फिरवली. पण जे टिकून राहिले, त्यांनी पाहिले असेलच. माझ्या निरिक्षणाप्रमाणे अर्धा भाग किचन पॉलिटिक्स आणि अर्धा सामाजिक कार्यावर बेतलेला, अशी नंतर नंतर विभागणी झाली होती.

माधवरावांचे विचार सोप्या भाषेत सामान्यांपर्यंत पोहोचावे, म्हणून त्यांची अख्खीच्या अख्खी भाषणे, त्यांच्या सोबतच्या इतर कार्यकर्त्यांसोबतच्या सभा आणि भेटी, त्यांच्या बदलीच्या ठिकाणी त्यांनी केलेल्या अनेक सुधारणा, रमाबाईंचे मनोगत, त्यांची भाषणे, त्यांचे कार्य अशा अनेकविध प्रकारे हे दाखवले जात होते. किचन पॉलिटिक्स आणि घरातले प्रसंग दाखवतांनाही माधवरावांनी कसा निवाडा केला, हेच बरेचदा दिसले.

शेवटी कुठलीही मालिका अथवा गोष्ट बघतांना आपण कुठल्या पद्धतीने त्यावर विचार करतो, त्याच पद्धतीने ती आपल्यापर्यंत पोहोचत असते. तुम्हाला त्यात "निर्माता-दिग्दर्शकाचा या महान विभूतींचे कार्य लोकांपर्यंत पोचवण्यासाठी मालिकेची निर्मिती" असा आव दिसला, तर मला त्यात "सर्वसामान्यांना समजेल, अशा पद्धतीने केलेली महान विभूतींचे कार्य लोकांपर्यंत पोचवण्यासाठीची धडपड" दिसली. शेवटी, सोच अपनी अपनी नाही का?

अशा अजूनही अनेक कार्यकर्त्यांच्या मालिका येत राहोत. जो एक मोठा वर्ग आपल्या देशात ज्ञानार्जनासाठी केवळ ह्या एकाच प्रसारमाध्यमावर अवलंबून आहे, किमान त्यांच्यासाठी तरी... असे मला अगदी तीव्रतेने वाटते. Happy

माझे तुमच्याशी काहीच वैयक्तिक मतभेद नाहीत. वैचारिक मतभेदांच्या बाबतीत- I agree to disagree या positive note वर थांबते. Happy

मला या मालिकेत काय किचन पॉलिटिक्स दाखवले ते माहीत नाही, मात्र रमाबाईंना सासरी खूप जांच होता. त्यांचं शिकणं घरातल्या स्त्रियांना मंजूर नव्हतं. त्यांनी एकदा एक इंग्रजी कविता वाचल्यावर महिनाभर घरात त्यांच्याशी अबोला धरला गेला होता. त्यांना बराच काळ घराबाहेर पडायलाही बंदी होती. त्या गोठ्यात शाल आणि चपला लपवून ठेवत, आनि दुपारी घरात मंडळी झोपली की लपून बाहेर पडत.

सानी
अशी अप्रतिम मालिका पुन्हा कधी होईल माहिती नाही.
<<
सहमत
मी ही एकच मालिका पाहायचो.
रमाबाईंच्या प्रत्यक्ष्य कार्यासंबंधीचा भाग अधिक तपशीलवार हवा होता. लहानपणाच्या भागाला वाजवीपेक्षा जास्त एपिसोड वापरल्या गेल्या असे वाटले. तरीही छान होती मालिका.

मी-भास्कर Happy

चिनूक्स, इन्टरेस्टिंग माहिती! Happy हे मालिकेत पाहिल्याचं आठवत नाही. पण त्यांच्या एका मैत्रिणीने असा अनुभव तिच्याबाबतीत आल्याचं एका प्रसंगात दाखवलं होतं. तू दिलेल्या दोन्ही लिंक्ससाठी धन्यवाद. (मागे एकदा पुस्तकाची दिली होतीस आणि आत्ता एक.) मी लवकरच मायबोलीच्या पुस्तक-खरेदीविभागातून ही दोन्हीही पुस्तके विकत घेऊन वाचायचे ठरवले आहे. हा खरेदीविभाग म्हणजे ज्ञानाचं, मनोरंजनाचं भांडार आहे. Happy

चिनूक्सच्या पोस्टला अनुमोदन. मी विजय खोले संपादित तसेच स्वतः रमाबाईंच्या आठवणींवरचे एक अशी दोन पुस्तके वाचली. रमाबाईंना आत्यंतिक तीव्र किचन पॉलिटीक्सला तोंड देऊनच पुढे जावे लागले हे त्यांच्या आठवणींमधे अनेकदा उल्लेखले आहे. बरेच प्रसंगही त्यांनी लिहिले आहेत. मालिकेत त्यावर भर दिला नसता तर रमाबाईंचा लढा, घरातल्या जाचाला तोंड देऊन त्यांनी रानडे गेल्यानंतरही निर्धाराने पुढे चालू ठेवलेले कार्य लोकांपर्यंत पोचू शकले नसते प्रभावीपणे.

मी शेवटचे बरेच भागही पाहीले मालिकेचे. मालिका आधी कशी होती मला फारसे माहीत नाही. पण जे पाहीले ते भाग आवडले. कर्तृत्वाचा योग्य आढावा घेण्याचा प्रयत्न होता. भडकपणा नव्हता. कामे चांगली होती. त्रुटी होत्याही, पण मालिकेच्या निमित्ताने सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत रमाबाईंचे कार्य, महादेवराव रानडेंचं कर्तृत्व पोचू शकलं हे चांगलेच झाले आहे.

या मालिकेमुळे मला कळले, कि आजची स्त्री सुस्थितीत आहे, तर ती फक्त रमाबाई रानडे आणि माधवराव रानडे यांच्याच मुळ>>>> या वाक्यासंदर्भात सरकॅझम का दाखवावा मयेकरांनी कळाले नाही. प्रामाणिक प्रतिक्रिया आहे ही एका टीव्ही मालिका प्रेक्षकाची. असो.

<<मला त्यात "सर्वसामान्यांना समजेल, अशा पद्धतीने केलेली महान विभूतींचे कार्य लोकांपर्यंत पोचवण्यासाठीची धडपड" दिसली.>> सानी +१.

मालिकेत त्यावर भर दिला नसता तर रमाबाईंचा लढा, घरातल्या जाचाला तोंड देऊन त्यांनी रानडे गेल्यानंतरही निर्धाराने पुढे चालू ठेवलेले कार्य लोकांपर्यंत पोचू शकले नसते प्रभावीपणे.>>> अगदी अगदी... शिवाय त्यामुळे पात्रांशी- ह्या कुटुंबाशी रिलेट करता आले, असा दुहेरी फायदा झाला, ते वेगळेच.. Happy

उपरोध त्या वाक्यातल्या 'फक्त' आणि 'च' यांच्याबद्दल आहे. निदान महाराष्ट्रातल्यातरी समाजसुधारकांच्या कार्याबद्दल किमान माहिती इंटरनेट वापरणार्‍या लोकांमध्ये असायला हवी अशी अपेक्षा गैरवाजवी असू नये.

माझ्या ऐकण्या/वाचण्यात आलेल्या संदर्भांनुसार रमाबाईंना जाच सहन करावा लागला तो बहुतकरून त्यांच्या सुधारकीपणामुळे. मालिकेत मला दिसलेल्या किचन पॉलिटिक्सचा या गोष्टींशी संबंध दिसला नाही.
टिपिकल मालिकांमध्ये गरीब बिचार्‍या नायिकेला छळणारी एक बाई असते तसाच प्रकार वाटला.

वरच्या दोन प्रतिसादांतली ही वाक्ये पहा.
<त्यांनी एकदा एक इंग्रजी कविता वाचल्यावर महिनाभर घरात त्यांच्याशी अबोला धरला गेला होता. त्यांना बराच काळ घराबाहेर पडायलाही बंदी होती. त्या गोठ्यात शाल आणि चपला लपवून ठेवत, आनि दुपारी घरात मंडळी झोपली की लपून बाहेर पडत>
<हे मालिकेत पाहिल्याचं आठवत नाही. पण त्यांच्या एका मैत्रिणीने असा अनुभव तिच्याबाबतीत आल्याचं एका प्रसंगात दाखवलं होत>

असो.

इंटरनेटचा वापर अशाप्रकारची माहिती मिळवण्यासाठी करणारं पब्लिक 'आदर्श' या गटात मोडणारं आहे. त्याची संख्या दुर्दैवाने काही टक्केच असेल. त्यामुळे ही अपेक्षा खरोखरच गैरवाजवी आहे. होम मिनिस्टर सारख्या मालिका पाहिल्या, की जाणवतं, आपल्या देशातल्या बायकाच काय बर्‍याचशा पुरुषांचंही माहितीविश्व किती मर्यादित आहे... त्या मोठ्या वर्गासाठी अशा मालिका अवेअरनेसचं काम नक्कीच करु शकतात.. याविषयी विश्वास वाटतो.

<<<<मालिकेत मला दिसलेल्या किचन पॉलिटिक्सचा या गोष्टींशी संबंध दिसला नाही.
टिपिकल मालिकांमध्ये गरीब बिचार्‍या नायिकेला छळणारी एक बाई असते तसाच प्रकार वाटला.>>>>??????? गोर्‍या मडमेकडून शिकवणी घेतल्याबद्दल दररोज डोक्यावरुन पाणी घेऊन आंघोळ करायला भाग पाडणे, तिचा वावर असलेल्या सर्व भागावर गोमूत्र शिंपडायला लावणे, रमाबाईंना सुधारकी कामाला बाहेर जातांना अडवणे आणि त्यांचे बेत रद्द करणे, इंग्रजी शिक्षण घेतांना त्यांच्यासमोर नाना अडचणी निर्माण करुन त्यात आडकाठी आणणे, हे सगळं आणि असं बरंच काही टिपिकल मालिकेसारखं वाटलं का तुम्हाला??

आणि तो प्रसंग- गोठ्यात शाल आणि चपला लपवून ठेवून दुपारी घरात मंडळी झोपली की लपून बाहेर पडण्याचा- ती मैत्रिण गोदावरी की कोण- तिच्याबाबतीत घडला असे संवादात वारंवार दाखवले होते. सगळेच रमाबाईंच्या बाबतीतच दाखवायला हवे, असे म्हणणे आहे का तुमचे?

असो, म्हणतात ना? नावडतीचे मीठही अळणी- तशातला प्रकार दिसतो हा... चालायचेच...

मला आवडलेली ही एक मालिका
शीर्षक गीतापासुन्न अभिनय सगळ जमुन आलेल होत

मी व्यक्तिशः मयेकरांशी सहमत आहे. रमाबाईंना बराच जाच होता हे खरे. तोच त्यांनी मालिकेत तपशीलस्वातंत्र्य घेऊन दाखवला हे काही काळासाठी खरे मानून चालू. परंतु त्या सर्व प्रसंगांची दाखवण्याची धाटणी एखाद्या टिपीकल मालिकेमध्ये नायिकेला जसा त्रास दिला जाईल तशीच होती. बर्‍याच मराठी मालिका ह्या एकाच छापाच्या असतात. त्याच छापाची हीदेखील वाटली. ह्याबद्दल विस्ताराने लिहिता येऊ शकेल, पण एकंदरीत कटकारस्थानीपणाचा ढंग, कोणीतरी चोरुन काहीतरी ऐकतेय, असे काहीतरी. एकच गोष्ट टीव्हीच्या माध्यमातून दाखवण्याचे वेगवेगळे प्रकार असू शकतात. परंतु अशा मालिकेमधून संयत घटना, अभिनय पाहावयास मिळणे जास्त अपेक्षित होते. (विशेषतः दिग्दर्शक वगैरेंचा आव पाहून) म्हणजे मालिका फक्त रमाबाईंच्या सामाजिक कार्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनाची पकड घेऊन राहील ह्याची खात्री नसल्याने लोकांना जे पाहायची सवय आहे तोच मसाला वापरायचा आणि ओरड मात्र समाजप्रबोधनाची, असे काहीसे मला वाटले.

मीही मयेकरांशी सहमत आहे. भास्कराचार्यं यांच्याशीही.
मी ही मालिका नेटाने जवळजवळ ८०% पाहिली बहुतेक. शेवटचे दोन महिने नाही पाहिली फक्त. मध्ये मध्ये अगदी वाईट होती. स्पृहा आणि विक्रम यांनी जे काम केले ते मात्र मला आवडले.

तरीही मागील पानावर लिहीलेला भाचीचा किस्सा मला बरेच काही शिकवून गेला. त्यामुळेच बाजो जे म्हणतायेत त्याचा प्रत्यय मला आला.

आणि हो केवळ मालिकेमुळे अस्वस्थ होऊन 'आ.आ.आ.आ' पूर्ण वाचले आणि मालिका (किती) वाईट आहे हे समजले.

मयेकर- 'माझ्या जल्माची चित्तरकथा' चे पार पोतेरे झाले होते टेलिव्हाईज्ड एडिशन मध्ये. आता जास्त आठवत नाही पण फारच वाईट होते ते तेवढे नक्की आठवते. चारुशीला वाच्छानी होत्या ना लीड रोल मध्ये?

मुद्दा जर असा असेल की
निदान मोठ्या लोकांचे कार्य लोकांपुढे येते (तिखट-मीठ लावून का होईना) तर हो- तो मुद्दा आता मला मान्य आहे.

पण यापेक्षा चांगली मालिका होऊ शकत नाही, किंवा करता येत नाही, किंवा टीका करु नये हे मात्र मान्य नाही. आणि खरंच, इतक्या त्रुटी असुनही बाकीच्या रद्दड, बिनडोक, चीप मालिकांच्या मानाने ही बरीच बरी होती.

मुद्दा जर असा असेल की
निदान मोठ्या लोकांचे कार्य लोकांपुढे येते (तिखट-मीठ लावून का होईना) तर हो- तो मुद्दा आता मला मान्य आहे.

पण यापेक्षा चांगली मालिका होऊ शकत नाही, किंवा करता येत नाही, किंवा टीका करु नये हे मात्र मान्य नाही. आणि खरंच, इतक्या त्रुटी असुनही बाकीच्या रद्दड, बिनडोक, चीप मालिकांच्या मानाने ही बरीच बरी होती. >>>

शब्दशः अनुमोदन रैना.

रैना | 22 July, 2013 - 06:47नवीन
मी ही मालिका नेटाने जवळजवळ ८०% पाहिली बहुतेक. शेवटचे दोन महिने नाही पाहिली फक्त.
<<
अहो तोच ७५% महत्वाचा होता.

सानी, मालिका संपल्यावर इतक्या चांगल्या नोटवर हा धागा आला होता, पुढे हे वाद काढण्याची काहीच गरज नव्हती हे माझे स्पष्ट मत.

मी भरत मयेकरांशी सहमत आहे. रमाबाईंच्या आयुष्यात जेव्हा शिक्षण-संसार-घरातील वडिलधारी मंडळी-नवरा हा संघर्ष चालू झाला त्यावेळी मालिकेचे निर्माता-दिग्दर्शक घसरले होते. मी दररोज नित्यनेमाने वगैरे ही मालिका बघत नव्हते, पण जे काही थोडके भाग पाहिले त्यावेळी माझंही मत असंच झालं होतं की 'वीरेनला मोह आवरला नाही.'

मंजूडी, तू सुजाण वाचकांपैकी आहेस ना? मग वाद कोणी काढले, ते जरा मागे जाऊन वाच. उपरोध आणि उपहासात्मक स्टेटमेन्ट असलेली शेवटची नोट चांगली होती का? ती ही ज्यांनी मालिका रिमोट बदलत अधून मधून पाहिली त्या व्यक्तीची? आणि दुसर्‍या धाग्यावर लिहिलेल्या गोष्टी इकडे कोणी आणल्या? मयेकरांशी सहमत असलेल्या तुझ्यासकट सगळ्यांनी मालिका सुरुवातीला नीट पाहून नंतर वैतागाने पाहायची सोडलेली असल्याने नंतरच्या काळात झालेले समारात्मक बदल तुम्ही पाहिलेले-अनुभवलेले नाहीत. तेंव्हा मालिका शेवटपर्यंत नीट मन लावून पाहणार्‍यांची किंवा नंतरच्या काळात पाहायला सुरुवात करुन शेवटपर्यंत पाहणार्‍यांची मतेच इथे प्रामाणिक आहेत, हे मी मानते. मालिकेविषयीच्या पूर्वीच्या मतांनी मनात पूर्वग्रह निर्माण झालेला असतांना ती पहायची सोडल्यावर तेंव्हाच्याच मतांच्या आधारावर शेवटी येऊन टीप्पण्या करणे, हे मालिकेवर अन्याय करण्यासारखे आहे.

असो, अशा विषयांवरच्या अजूनही बर्‍याच मालिका चांगल्या पद्धतीने हाताळणार्‍या लेखक-दिग्दर्शक निर्मात्या चमूतर्फे येवोत आणि लोकप्रिय होवोत, या पॉझिटिव्ह नोटवर मी आता थांबते.

उंच माझा झोका- यु रॉक्ड. तुम्ही आमच्या मनात खास स्थान निर्माण केले होते, म्हणूनच इतके लिहावेसे वाटले, हे तुमचे यशच. धन्यवाद. Happy

वाचलं होतंस ना सगळं? मग तरीही?? असो, चांगल्या नोटवर थांबायची तुझी खरोखर प्रामाणिक इच्छा असेल, तर ह्या धाग्याचा शेवट मालिकेच्या चाहत्यांसाठीच राखून ठेव. Happy

बर्‍याच नियमितपणे मी ही मालिका पहात असे व क्वचितच कांही गोष्टी खटकल्या तरीही ही मालिका सर्वांगाने दर्जेदार व भरीव वाटली. स्त्रीशिक्षण, केशवपन, सोवळं-ओवळं इत्यादीबाबत त्यावेळची सामाजिक परिस्थिती काय होती याची कल्पना येण्यासाठी रानडे कुटूंबियांचाच दाखला कांहींसा जास्त भर देवून दाखवला असण्याची शक्यता आहे व तसं असेल तें कल्पक होतं असंच म्हणावं लागेल. मला वाटतं त्यावेळीं स्त्रियांसाठी 'नर्सींग'चा वर्ग किंवा शाळा काढणं याचं आत्यंतिक महत्व आतां उमगण्यासाठीं व ठसवण्यासाठी त्यावेळच्या कडव्या सामाजिक मानसिकतेची पार्श्वभूमी रंगवणं अपरिहार्य असावं व त्याकरतां केलेला असा प्रामाणिक प्रयत्न कौतुकास्पदच म्हणायला हवा.

Pages