उंच माझा झोका

Submitted by सानी on 13 March, 2012 - 05:59

ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया. Happy

Uncha Maza Zoka-Promo.jpgUncha Maza Zoka-News.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगल्या नोटवर थांबायची तुझी खरोखर प्रामाणिक इच्छा असेल, तर ह्या धाग्याचा शेवट मालिकेच्या चाहत्यांसाठीच राखून ठेव. >>> Uhoh हे बळंच आहे. सतराव्या पानावरची माझी प्रतिक्रिया वाचलेली दिसत नाही.

रमाबाईंच्या आयुष्याचे आणि विचारांचे सार दाखवणार्‍या शेवटच्या भागातील गीत.. मालिकेच्या चाहत्यांसाठी खास.. Happy

पेरले व्रत सोबतीने
रोप झाले...
वाढले ते बीज त्याला
रुप आले
थांबलेही याचसाठी
जन्म सारा
हासता तू पूर्ततेचे
फुल आले..

Happy

मयेकर , भास्कराचार्य +१००००

मी ही मालिका पहिले काही भागच पाहिली मग अजीबत न बघवल्याने सोडून दिली.
पहिले काही भाग तर अतिशय बेक्कार होते Sad हे बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा लोक पुस्तक घेऊन वाचत का नाहीत असा प्रश्न पडला. अगदी म्हणजे या मालिकेचे कौतूक सांगणार्या एकीला तर ' मराठी वाचता येत नाही का तुला ' असेच विचारले होते मी.

पण इथे एकंदरीत मालिकेचे कौतूक करणारे इतके प्रतिसाद पहाता सध्याच्या काळात प्रेक्षकांच्या 'चांगल्या' मालिके कडूनच्या अपेक्षा कीती खालच्या पातळीवर उतरल्या आहेत ते लक्षात येते.
आमच्यासारख्या ९० च्या दशकातल्या, डेली सोप फोफावण्याच्या आधीच्या काळातल्या मालिका पाहून मोठे झालेल्या मंडळींना कशा काय या मालिका बघवतील/आवडतील बरे ?

पण इथे एकंदरीत मालिकेचे कौतूक करणारे इतके प्रतिसाद पहाता सध्याच्या काळात प्रेक्षकांच्या 'चांगल्या' मालिके कडूनच्या अपेक्षा कीती खालच्या पातळीवर उतरल्या आहेत ते लक्षात येते.

>> वेळच तशी आली आहे.. Sad

<< आमच्यासारख्या ९० च्या दशकातल्या, ...आधीच्या काळातल्या मालिका पाहून मोठे झालेल्या मंडळींना कशा काय या मालिका बघवतील/आवडतील बरे ? >> -

Unchamaza.JPG

Pages