प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 07:30

मोरया मंडळी,
मायबोली गणेशोत्सवात आता आपण वळूयात एका अत्यंत जिवलग, उत्साह वाढवणार्‍या, गमतीच्या खेळाकडे. हा खेळ आहे, 'कानगोष्टी' फक्त थोडासा बदल म्हणून या कानगोष्टी करायच्या आहेत छाया/प्रकाशचित्रांच्या माध्यमातून.

चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी!

हे लक्षात ठेवा:-
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.
३. तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.
४. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.
५. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र कानगोष्टी करू शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र कानगोष्टी देऊ शकत नाही. थोडा दुसर्‍यांनाही कानगोष्टी करायला चानुस गावला पायजेल, न्हवं का? Wink
७. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.

उदाहरणार्थ
जर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले
Zabbu_003.jpg
आणि नवीन क्लू दिला- होडी

तर दुसरा सभासद हे टाकू शकेल
IMG_1339.JPG
नवीन क्लू आहे क्षितिज (skyline)

चला तर सज्ज व्हा आणि खेळा, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी...
पहिला प्रतीसाद देणार्‍यासाठी क्लू आहे क्षितिज (skyline)

*प्रकाशचित्र :- जिप्सी आणि तोषवी कडून साभार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

so maze picture correct consider karawe ani navin clue "paan" consider karawa Happy

बाद

Happy

शांत तुम्ही चंद्रकोर हा माझा क्लू घेतला असेल तर तुमच्या चित्रातून आम्ही काय क्लू घ्यायचाय ते द्या की

अहो आधीचा क्लू तुमच्या चित्रात असायला हवा आणि नवा क्लू तुम्ही द्यायला हवा.

चंद्रकोर, चंद्र हा क्लू मीच दिलाय की, शांत. तुम्ही परत तोच काय क्लू देताय?
शांत ह्यांच्या चित्रातून काळोख्/रात्र हा क्लू घेऊ यात का?

चला आता घ्या काहीतरी.. सगळे थंडावालेत मी पण निघतो आता.. घरी गेल्यावर परत पाहिल कुठपर्यंत पोचलो आहोत आपन मायबोलीकर

Pages