निसर्गाच्या गप्पांचा १० वा भाग सुरु होत आहे हो$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
(मधला हार गुंफलेला फोटो शोभा कडून साभार)
मूलं भुजङ्गै:, शिखरं प्लवङ्गै:
शाखा विहंगै:, कुसुमानि भृङ्गै: |
नास्त्येव तच्चन्दनपादपस्य
यन्नाश्रितं सत्वभरै: समन्तात ||
हे आहे सुगंधी चंदनवृक्षाचं लेकुरवाळं चित्र; त्याच्या मुळांना सर्पाचं वेटोळं आढळतं. खोडाच्या टोकाकडे मर्कटवर्गीयांच्या लीला, पानापानात दडलेले पक्षीगण आणि फुलांवर रुंजी घालणारे भुंगे.
- डॉ. हेमा साने (वृक्ष - एक आधारवड, निसर्गायन, ऑक्टो. २०११)
(शशांक पुरंदरे यांच्याकडून)
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग ९) http://www.maayboli.com/node/35557?page=35
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf
ज्ञानेश, आफ्रिकेत अजूनही
ज्ञानेश, आफ्रिकेत अजूनही त्यांच्या मूळ निसर्गदेवाची अर्चना केली जातेच. ( उपरे आलेले इतर धर्म त्यांचा मूळ गाभा, हलवू शकलेले नाहीत. ) शिव्या देण्याचा प्रकार जसा खरा तसा झाडाला सर्व श्रेय द्यायचाही खरा.
कुठल्याही स्पर्धेत / सामन्यात जिंकलेले खेळाडू, आधी एखाद्या झाडाला किंवा ते नसेल तर जमिनीला स्पर्श करतात.. इद नं मम, प्रज्ञाय स्वाहा.. हाच भाव असतो.
माझा एक अनुभव share करतो एका
माझा एक अनुभव share करतो
एका ठिकाणी वाचले होते आफ्रिके मध्ये लोकांना झाड कापायचे असल्यास ते झाडा जवळ जाऊन त्या खूप शिव्या देतात , त्याच्या बद्दल वाईट बोलतात , आणि ते झाड काही दिवसात अपोआप मारून जाते , ती लोक त्या नंतर ते झाड कापतात .
http://www.youtube.com/watch?v=O6Xd7HSLA4o&feature=related
नमस्कार मंडळी ____/|\____ निग
नमस्कार मंडळी ____/|\____
निग वर पहिल्यांदाच पोस्ट टाकतो आहे.
इकडे द. अफ्रिकेत नुकताच स्रिंग सुरु झाला.. सगळी झाडे मस्त बहरली आहेत .. हे फोटो आजच सकाळी ऑफिसला येतांना काढले.
तुम्हाला आवडतील ही आशा
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
'कणगी म्हटलं कि मला हमखास
'कणगी म्हटलं कि मला हमखास श्यामची आई आठवलं.'.. जिप्स्या.. १०० मोदक तुला..
शाग.. सुंदर फुलं.. ही तू पूर्वी तुझ्या प्रचिंमधे टाकली होतीस ना..
दरवर्षी बहर पाहिला तरी अप्रूप ओसरणार नाही अशी ही फुलं..
जागुले.. . 'गणपती बाप्पा मोरया'..
मागल्या वर्षी तुझ्याच मुळे साखर चतुर्थी बद्दल कळलं होतं
ही तू पूर्वी तुझ्या प्रचिंमधे
ही तू पूर्वी तुझ्या प्रचिंमधे टाकली होतीस ना..>>> नाही ग .. ही आजच काढली आहेत .. आणि ही जॅकरांडाची फुले नाहित .... जॅकरांडा अजुन फुललाच नाही इथे .. तो ऑक्टोबर मधे बहरतो
अर्रे नाही.. मलाही याच
अर्रे नाही.. मलाही याच वर्षीची म्हणायचं होतं.. दरवर्षी फुलत असणार ना बहर..
तो जांभळा ही जॅकरंडा नाही..??? ( परत एकदा घोर अज्ञान उघडं पडलं!!!! अर्र!!! )
मस्तच फुले ! आणि येत जा रे
मस्तच फुले ! आणि येत जा रे !
इथे अंगोलात कधी बहर येतोय त्याची वाट बघतोय !
जागूकडे, २ / २ माहेरवाशिणी गौरी !
शा.गं. काय मस्त फोटो आहे
शा.गं. काय मस्त फोटो आहे !
<<<जागूकडे, २ / २ माहेरवाशिणी गौरी !>>> अगदि, अगदि.
जागूकडे, २ / २ माहेरवाशिणी
जागूकडे, २ / २ माहेरवाशिणी गौरी !
अगदि, अगदि.
आज सकाळी आकाशवाणी , पुणे
आज सकाळी आकाशवाणी , पुणे केंद्रावर हेमा साने यांनी लिहीलेली `गणपतीला लागणारी पत्री' यावर माहिती ऐकली. मस्तच होती.
आज सकाळी आकाशवाणी , पुणे
आज सकाळी आकाशवाणी , पुणे केंद्रावर हेमा साने यांनी लिहीलेली `गणपतीला लागणारी पत्री' यावर माहिती ऐकली. मस्तच होती. >>> वा रावी, आमच्या सानेमॅडमचा आवाज ऐकलात तर......त्यांच्या बॉटनीज्ञानाबाबत तर मी काही बोलूच शकत नाही मी, फक्त शिर सा. नम. ......
मागील काही पानांवर दिनेशदांनी
मागील काही पानांवर दिनेशदांनी आफ्रिकेतून माणूस बाहेर कसा गेला याचा उल्लेख केला होता - त्यासंदर्भात - डॉ सुब्बाराव (बहुतेक) यांचं एक शास्त्रीय व्याख्यान मला ऐकायला मिळालं होतं - त्यांच्या संशोधनानुसार भारतात दोन मार्गाने माणूस आला - एक उत्तरेकडून व दुसरा दक्षिणेकडून....
मायटोकॉन्ड्रिअल डी एन ए व अजून एक मार्कर (मला आता आठवत नाहीये नेमका कुठला ते) यांचा वापर करुन त्यांनी असे सिद्ध केले होते की आफ्रिकेतील मानव व अंदमानातील मानव (जारवा जमात) यांच्यात कमालीचे साम्य आहे. आफ्रिकेतून अंदमानात मानव कसा गेला हे अनाकलनीयच....
पुढे अंदमानातून दक्षिणेतून तो वर वर वसाहती करत गेला....
या मानवाचे व वरुन येणार्या मानवाचे संकर होत भारतात एंडोगॅमी (त्याच त्याच टोळ्यांमधे / समाजामधे होणारी वंशवृद्धी) पद्धतीमुळे जवळजवळ ८ -१० प्रकारचे लोक सापडतात... (वरील मार्कर्सच्या सहाय्याने केलेले संशोधन लक्षात घेता - ज्यात त्यांनी अशा समाजातील लोकांकडून सँपल्स घेतली जिथे ही एंडोगॅमी बर्यापैकी राखली गेली होती)......
हे सर्व फारच मनोरंजक व माहितीपूर्ण असे व्याख्यान होते... सर्व श्रोत्यांना खूपच आवडले...... चर्चाही खूप झाली....
या डॉ सुब्बारावांच्या
या डॉ सुब्बारावांच्या व्याख्यानातील अजून एक माहिती - आपल्याकडे "वैश्य" (हे माझ्या स्मरणशक्तिनुसार आहे) म्हणून एक जात/जमात आहे(वर उल्लेख केलेले मार्कर्स वापरुन व एंडोगॅमी शक्यता लक्षात घेउन) - या जमातीत हार्टचा एक विशिष्ट प्रॉब्लेम अनुवंशिक असतो, तसेच एका एन्झाईमच्या कमतरतेमुळे त्यांना अॅनेस्थेशियाही जपून द्यावा लागतो - बर्याच वेळा हा अॅनेस्थेशिया प्राणघातकही ठरतो.....
>>>या मानवाचे व वरुन
>>>या मानवाचे व वरुन येणार्या मानवाचे संकर होत <<< आणि >>>एंडोगॅमी<<< हे परस्पर विरोधी आहेत.
म्हणजे त्यांना असे म्हणायचे होते का - एकदा संकर झाल्यावर पुढे एंडोगॅमी राखली गेली? पण मग अशी एंडोगॅमी राखण्यामागचे कारण काय असावे?
भारताच्या पूर्वेला काही
भारताच्या पूर्वेला काही बेटांवर काही मानव राहतात पण त्यांच्याशी संपर्क साधणे अजूनही शक्य झालेले नाही, त्यांच्या रक्तात काही क्लू सापडतील, असा अंदाज आहे.
डॉ अॅलिस रॉबर्ट्स यांची हि मालिका म्हणजे एक पर्वणीच आहे.
त्या, प्रो इयाम, डॉ. जेफ आणि अर्थातच सर अटेंबरो या सर्वांनी सादर केलेले कार्यक्रम बघणे म्हणजे माझ्यासाठी सुखनिधान असते. आपल्या क्षेत्राची आवड आहेच पण ती सोप्या भाषेत सांगण्याची हातोटी आणि त्यासाठी धाडस करायची त्यांची तयारी, यामूळे आदर्श माहितीपट ते तयार करु शकतात... आणि असे कार्यक्रम सादर करायला त्यांना, बीबीसी आणी इतर संस्था आर्थिक आणि इतरही मदत करतात, हे किती तरी मोलाचे आहे.
शशांक बहुधा आवाज दुसर्यांचा
शशांक बहुधा आवाज दुसर्यांचा असावा. लेखन त्यांच होतं. अतिशय माहितीपूर्ण ! त्यांच्याकडून प्रत्यक्ष शिकणं म्हणजे भाग्यवानच तुम्ही !
म्हणजे त्यांना असे म्हणायचे
म्हणजे त्यांना असे म्हणायचे होते का - एकदा संकर झाल्यावर पुढे एंडोगॅमी राखली गेली? पण मग अशी एंडोगॅमी राखण्यामागचे कारण काय असावे? >>> बरोबर असेच म्हणायचे होते.... सुरुवातीला नवनवीन टोळ्यांमधे संघर्ष होत गेला - यात स्त्रियांची पळवा पळवी हा भाग होता ज्यामुळे हे संकर होत गेले...... पुढे थोडे स्थैर्य लाभल्यावर जमाती बळकट झाल्या - मग पुढे परंपरा, रुढी यामुळे रोटी-बेटी व्यवहारावर बंधने आली - परिणामतः एंडोगॅमी - आजही काही ठिकाणी फक्त त्याच समाजात मेळावे घेऊन लग्ने लावतात - तसेच ..... या संशोधकांनी सँपल्सही अशीच घेतली जिथे शक्यतो ही एंडोगॅमी खूपच पाळली गेली.....
सध्याच्या काळात या संकरांची शक्यता अजून वाढतेच आहे त्यामुळे या संशोधकांनी काही मर्यादित जमातीतीलच सँपल्स घेतली.... सर्वच्या सर्व जमाती नाही...
त्यांच्याकडून प्रत्यक्ष शिकणं
त्यांच्याकडून प्रत्यक्ष शिकणं म्हणजे भाग्यवानच तुम्ही ! >>> नक्कीच ...कारण बॉटनी विषयावर इतके प्रेम असणार्या व्यक्ति अतिशय दुर्मिळ व त्यांची शिकवण्याची हातोटी काही औरच.... (पण माझा मुख्य विषय बॉटनी नसल्याने आम्ही मंडळी "मार्क्स"वादी होतो बॉटनीबाबत....)
एवढ्या मोठ्या फळ्यावर मॅडम आकृत्या काढायच्या त्या अगदी प्रमाणबद्ध, अक्षरही सुरेख, आवाज तर १००-१२५ पोरांना सहज ऐकू जाईल असा व बॉटनी विषयातील त्यांची गती लक्षात घेता शिकवण्यात येणारी एक अतिशय सहजता....
शशांक, आम्हाला तशाच प्रा
शशांक, आम्हाला तशाच प्रा सुंनंदा नेने नाथन, कमर्शियल जिओग्राफी शिकवायला होत्या. मराठी मूलांवर खास प्रेम होते त्यांचे त्यामूळे त्या मिश्र भाषिक वर्गात सरळ मराठीत बोलायच्या. त्याकाळात नॅशनल जिऑग्राफिक मासिक होते फक्त पण चॅनेल्स वगैरे नव्हते तरीही त्या पुस्तकाबाहेरची इतकी माहिती आणि तिही रंजक रुपात सांगत असत कि आज, ३२ वर्षांनी पण मी त्यांचे शब्द विसरलेलो नाही. कॉलेज सोडल्यावर १८ वर्षांनी मी त्यांना भेटून त्यांचे हे ऋण मान्य केले होते. त्यावेळीदेखील त्या माझ्या भाचीला, तोच विषय शिकवत होत्या.
००००००००
उजळ कांती हवी वर हे लिहायचा मोह होत होता. आपण सगळे आफ्रिकन त्यामूळे मूळात काळेच होतो. पण जे उत्तरेकडे म्हणजे सैबेरियाच्या दिशेने गेले त्यांना सूर्यप्रकाश कमी मिळाला आणि अर्थातच डी जीवनसत्वदेखील. त्यामूळे त्यांचा वर्ण उजळ झाला आणि तो टिकला.
०००००००००
इनक्रेडिबल ह्यूमन जर्नीज या मालिकेतल्या शेवटच्या भागात, निव्वळ बांबूचा तराफा करुन, आजच्या इंडोनेशियामधून आजच्या ऑस्ट्रेलियात केलेला प्रवास दाखवला आहे. या तराफ्याला वार्याचा आधार नव्हता. केवळ समुद्री प्रवाहाचा आधार घेत, हा प्रवास आजही शक्य आहे. त्यामूळे दक्षिण भारतात, मादागास्कार, माले असा प्रवास करत मानव आला असेल. मला नेहमी वाटत आलेय कि रामायणातले हनुमान आणि त्याचे भाईबंद, हे असेच वेगळ्या वंशाचे लोक असावेत. त्यांना वानर म्हणणे, मला पटत नाही. त्या सदृष्य काही प्राण्यांचे अवशेष, मलेशियात सापडले आहेत.
रच्याकडे रुणुझुणूच्या मालदीवमधल्या स्थानिक लोकांच्या वंशाबाबत पण खात्रीने सांगता येत नाही.
इनक्रेडिबल ह्यूमन जर्नीज या
इनक्रेडिबल ह्यूमन जर्नीज या मालिकेतल्या शेवटच्या भागात, निव्वळ बांबूचा तराफा करुन, आजच्या इंडोनेशियामधून आजच्या ऑस्ट्रेलियात केलेला प्रवास दाखवला आहे. >>>> कालच (१९ सप्टे.) मी व अंजूने पाहिला हा भाग .... दिनेशदा - तुमची आठवण काढत .........
शशांक, पुढच्या भारतभेटीत
शशांक, पुढच्या भारतभेटीत सगळ्या क्लीप्स कॉपी करुन देतो.
Through Sristi, GIAN and NIF,
Through Sristi, GIAN and NIF, Dr. Anil Gupta is opening opportunities for barefoot inventors.
Dr.Anil Kumar Gupta, a professor at the Indian Institute of Management, Ahmedabad has been championing the cause of thousands of faceless creative individuals scattered all over India. Because most of them are far removed from the modern organised world of business, they are unaware of their own worth, rights and the opportunities that await them. Now with Gupta's initiative they find new doors opening for them.
वर नमूद केलेल्या डॉ सुब्बाराव यांच्या व्याख्यानाबरोबरच या डॉ अनिल कुमार गुप्ता यांचे व्याख्यानही ऐकायचा योग आला. हे डॉ गुप्ता फारच भारी व्यक्तिमत्व आहे. इतर सर्व शास्त्रज्ञ तिथे सुटाबुटात (किंवा शर्ट - पँट) आले असताना हे गुप्ता साध्या झब्बा-लेंगा व जाकिट अशा वेषात होते व यांचे व्याख्यान असले प्रभावी होते की ते व्याख्यान संपल्याबरोबर सर्वांनी त्यांना उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात मानवंदना दिली - उत्स्फूर्तपणे.....
ते थ्री इडियटमधील शेवटचा सीन आहे ना अमिर उर्फ रांचोला हे तिघे भेटायला जातात तो - तिथे ज्या काही अभिनव क्लुप्त्या दाखवल्या त्या सर्व याच गुप्ता महाशयांच्या संस्थेतील आहेत.
आंतरजालावर डॉ अनिलकुमार गुप्ता आय आय एम असे टाइपले की भरपूर वाचता येईल यांच्यासंबंधित - फारच ग्रेट व्यक्तिमत्व आहे हे.......
आली आली माळशेज घाट परीसराची
आली आली माळशेज घाट परीसराची रिक्षा
http://www.maayboli.com/node/38062
(जाहिरात आहे तेंव्हा रिक्षा फिरवणे मस्टच )
अराऊंड द वर्ल्ड इन ८०
अराऊंड द वर्ल्ड इन ८० गार्डन्स, नावाची एक माहितीपट मालिका यू ट्यूबवर आहे, त्यातल्या भारतीय बागांच्या भागातला, एक उल्लेख महत्वाचा वाटला ( मला हे माहित नव्हते ) आपल्या मसाल्यातील मिरीच्या फुलांचे परागीवहन, कुठल्याही किटकामार्फत न होता, चक्क पावसाच्या पाण्यामूळे होते.
या भागात भारतीय बागा दाखवताना मोगल आणि इंग्रज यांचा प्रभाव दाखवला. पण भारतीय बाग म्हणून एका देवळाचा परिसर दाखवला. देवळाच्या आवारात लावलेली पिंपळासारखी झाडे, देवाच्या पूजेसाठी फुलझाडे, तूळस वगैरे या बागेचाच भाग. मुंबईतील देवळात मला हे कुठे जाणवले नाही, पण गोव्यातील देवळाभोवती मात्र बागा
आहेतच. त्यांची निगादेखील छान राखली जाते. केनयामधील देवळातही हे प्रकर्षाने जाणवते.
पण यापेक्षा आपल्या जून्या काव्यात वर्णन आहे तशी सरोवरे, पुष्पावाटीका वगैरे असणारी बाग, कुठे आहे
का ? मुंबईतल्या ज्या बागा आहेत त्या बहुतेक ब्रिटीशांनी तयार करवून घेतलेल्या आहेत. त्या सुंदर आहेत पण
त्या तशा वाटत नाहीत !
आमच्या घरातुन दिसलेला
आमच्या घरातुन दिसलेला सुर्योदयानंतरचा सुर्य. ढगाळ हवेमुळे बिचा-याच्या असा चंद्र झाला.
जगातली एक सजीवांची प्रजात
जगातली एक सजीवांची प्रजात नष्ट करायची मला संधी असेल तर मी सगळी कबूतरं संपून जावीत असं म्हणेन इतका वैताग आलाय.
कुंडीतली शेंगा लागलेली मुगाची रोपटी माझ्या नजरेसमोर उपटून टाकली आहेत त्यांनी ... एकाने तर मुगावर फराळ करण्यासाठी एका संध्याकाळी आमच्या गॅलरीतच मुक्काम ठोकला. रात्री घरी आल्यावर बघितलं, तर हे उडायलाच तयार नाही. नवर्याला तर वाटलं की ते जखमी असावं. अगदी पक्षीमित्रांचा नंबर वगैरे शोधला त्याने. सकाळी उजाडल्यावर उडून गेलं कबूतर - सगळ्या गच्चीत घाण करून.
जगातली एक सजीवांची प्रजात
जगातली एक सजीवांची प्रजात नष्ट करायची मला संधी असेल तर मी सगळी कबूतरं संपून जावीत असं म्हणेन इतका वैताग आलाय.>>>>>गौरी साधनाला घे सोबतीला ती तयारच असेल बघ.
हो रे ... तिला नक्की समजेल हा
हो रे ... तिला नक्की समजेल हा वैताग.
नमस्कार लोक्स!! गौरी, कबुतरं
नमस्कार लोक्स!!
गौरी, कबुतरं त्रास देतात किंवा त्यांचा त्रास होतो हे खरंय पण एक गोष्ट अशी आहे की हा पक्षी मुळात उंच कपारींवर रहाणारा आहे. जोपर्यंत १/२ मजली इमारती होत्या तेव्हा कबुतरं इतकी त्रासदायक नव्हती. काही माणसं कबुतरं पाळत असत आणि घराच्या छपरावर,गच्चीत मोठा थवा बाळगत असत. त्यांच्याकडे एक भलीमोठी लांब काठी आणि तिच्या टोकाला एक फडकं गुंडाळलेलं असायची. ती काठी हलवून ते तो थवा कंट्रोल करायचे (अर्थात थवा उडत असताना.) कबुतरांची रहाण्याची जागा उंच ठिकाण असल्याने स्वाभाविकरित्या ती साधारणत: ३/४ मजली उंच इमारतींच्या अवतीभवती जास्त संख्येने दिसतात. मुळात हा पक्षी कुठल्याही बदला बरोबर स्वत:ला जुळवून घेतो आणि त्यांची पिल्लं वाढण्याची क्षमताही खूप जास्त आहे. या सर्वच गोष्टींमुळे ३ र्या ४ थ्या मजल्यांपासून वर रहाणार्या माणसांना ह्यांचा त्रास जास्त होतो.
दिनेशदा, सगळी माहिती मस्त!! ३/४ दिवसांपूर्वी बीबीसी एन्टर्टेनमेंटवर हा शेवटचा लघुपट बघितला आणि तुम्ही केलेलं सगळं वर्णन प्रत्यक्ष बघायला मिळालं.
या सर्वच गोष्टींमुळे ३ र्या
या सर्वच गोष्टींमुळे ३ र्या ४ थ्या मजल्यांपासून वर रहाणार्या माणसांना ह्यांचा त्रास जास्त होतो.
नाही गं.. कबुतरे आता शाणी झालीत. मी पहिल्या मजल्यावर राहते, जमिनी पासुन फक्त १० फुट वर. आणि तरीही कबुतरे जाम त्रास देतात.
आमचा एस आल्यापासुन मात्र कबुतरांचा त्रास बंद झाला. तो जरी दिवसभर झोपलेला असला तरी त्याचा एक डोळा कोण येतंय जातंय यावर असतोच असतो.
गौरी एखादे मांजर बघ पाळायला मिळतेय का ते.. अर्थात त्याचा त्रास वेगळा होतोच.. आमच्या एसला रोज नवी कुंडी लागते सकाळचे विधी आटोपायला. आता पावसाळ्यानंतर कुंड्या साफ करायच्यात एकदा पण त्यांना हात लावायचे माझ्या जीवावर आलेय... काय करणार. एक त्रास संपवायचा तर दुसरा सुरू करावा लागतो.
(कोल्हटकरांचे बंडुतात्या का कोणी होते ते आठवले. बुद्धिबळाचे व्यसन सोडवण्यासाठी घरचे त्यांना दुसरे व्यसन लावतात. नविन व्यसनाच्या नादात जुने व्यसन विसरले जाते )
आणि त्यांची पिल्लं वाढण्याची क्षमताही खूप जास्त आहे
कसं जमवतात माहित नाही, घरटी तर कधीच बांधत नाहीत. माझ्या छज्ज्यावर ४ अंडी होती, नुसती काँक्रिटवर घातलेली. त्यांची कबुतरे झाली की नाही त्यांनाच माहित.
Pages