निसर्गाच्या गप्पा (भाग १०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 July, 2012 - 14:54

निसर्गाच्या गप्पांचा १० वा भाग सुरु होत आहे हो$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

(मधला हार गुंफलेला फोटो शोभा कडून साभार)

मूलं भुजङ्गै:, शिखरं प्लवङ्गै:
शाखा विहंगै:, कुसुमानि भृङ्गै: |
नास्त्येव तच्चन्दनपादपस्य
यन्नाश्रितं सत्वभरै: समन्तात ||

हे आहे सुगंधी चंदनवृक्षाचं लेकुरवाळं चित्र; त्याच्या मुळांना सर्पाचं वेटोळं आढळतं. खोडाच्या टोकाकडे मर्कटवर्गीयांच्या लीला, पानापानात दडलेले पक्षीगण आणि फुलांवर रुंजी घालणारे भुंगे.

- डॉ. हेमा साने (वृक्ष - एक आधारवड, निसर्गायन, ऑक्टो. २०११)
(शशांक पुरंदरे यांच्याकडून)

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग ९) http://www.maayboli.com/node/35557?page=35

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षू ...........रानकस्तूर मस्त नाव आहे.
हं..........दिनेशदांची मजा आहे........किचनगार्डन!

त्या पक्षापेक्षा त्याचे नावच आवडले. Happy

मंडळी, 'मंदार' हे कशाचे संस्कृत नाव आहे? गूगल पांगारा दाखवतोय. रुईला पण मंदार म्हणतात असे दाखवतोय. माझ्या माहितीत मंदार हा वृक्ष असतो.

श्वेत रुई म्हणजे कुठले फूल असते? हे का हे का अजून तिसरेच?

किती सुंदर नाव आहे, काल मी पण एक सुंदर पक्षी बघितला इथे. फोटो नाही पण वर्णन करु शकतो.

आकाराने मुनियाएवढाच. पोट, मान वगैरे झळाळत्या आकाशी रंगाची ( नेमका रंग सांगायचा तर निंबुडा निंबुडा
गाण्यात, ऐश्वर्याच्या ड्रेसचा रंग आहे तो.) पंख आणि शेपटी करड्या रंगाची. डो़ळ्याभोवती आणि डोक्यावर लाल
छटा.
मी अगदी गुंग होऊन बघत बसलो.

दिनेश, अशाच वर्णनाचा पक्षी माझ्या घरासमोर पण येतो बर्‍याच वेळा. पण प्रचंड अस्थिर असतो तो. ३०-४० सेकंदांच्या वर काही तो थांबत नाही.

माधव इथले पक्षी धीट आहेत, आपण त्यांच्याकडे बघत असलो तर ते पण आपल्याकडे बघत बसतात. ( कदाचित माझ्याकडे कोण हा वेगळा प्राणी, अशा नजरेनेही बघत असतील !)

माधव, माझ्या माहेरी एक रूईसारखे झाड होते. त्याला काहीजण मांदार समजत. गणपती ला फूल वाहतात ना मांदारचे , म्हणून तोडायला बघत. पण शेजारच्या आजी हे रूई चं झाड आहे , मांदार नाही असं सांगत. बहुधा पानं सारखी दिसणारी दोन वेगळी झाडं असावीत.

विजयच्या बदलापुर फार्मवर गेले होते तिथे त्यांनी पांढरी रुई दाखवली आणि याला मंदार म्हणतात असे सांगितलेले. बाकीच्या रुयांना रुई म्हणतात, पांढ-या रुईला मंदार म्हणतात असे ते म्हणालेले. मी त्याआधी मंदार फक्त ऐकलेले, कधी पाहिले नव्हते.

साधना, त्या लिंकमधले एक मंदार आहे का? किंवा तुझ्याकडे त्याचा फोटो असेल तर टाक ना इथे.

रावी, तू म्हणतेस ती पण पांढरी रुइच होती का?
रच्याकने, मंदार असा शब्द आहे. मांदार म्हणजे मंदार वृक्षापासून बनलेले / बनवलेले.

हो साधना तोच मंदार, गणेशाला प्रिय असणारा. अष्टविनायकांपैकी काही देवळांच्या आवारात मुद्दाम जोपासलाय.
जागू आम्ही मजेत. लेक काय म्हणतेय ?

००००००००००००००००
ऋतूचक्र मधे मी शेवग्याच्या फ़ुलांवर आलेल्या भुंग्यांबद्दल वाचल्याचे आठवतेय.
इथे मी किचनमधे असलो कि समोरच मोठे शेवग्याचे झाड दिसते, आणि अगदी
सकाळपासून त्या फ़ुलांवर मोठे मोठे काळे भुंगे आलेले दिसतात. शेवग्याचे परागीवहन
तेच करत असावेत. छोटी पांढरी पिवळी फ़ुलपाखरेही भरपूर दिसली, पण त्यांचे दिवस
थोडे होते. सूर्यपक्षी असतात. म्हणजे शेवग्याने बरेच पगारी नोकर ठेवेलेले दिसतात.

फुलपाखरे आणि पक्षी, फ़ुलांच्या रंगावर आकर्षित होत असावेत, पण भुंग्यांच्या बाबतीत
मात्र काहीचे प्रश्न मनात आले. भुंग्याना आकर्षित करेल असा काही गंध या फ़ुलांना
असतो का ?

तसे माझेही नाक तिखट आहे, पण मला कधीही या फ़ुलांचा, अगदी पुसटसाही गंध
जाणवला नाही. पांढऱ्या पाकळ्या आणि फ़िकट पिवळे पुंकेसर असे आपल्या नजरेला
दिसणारे रंग, भुंग्याना आणखी वेगळे दिसत असतील का ?

या फ़ुलांची भाजी करताना, ती उकडून पाणी फ़ेकावे लागते कारण ती कडसर असतात,
मग एवढ्या मंडळींना आकर्षित करणारा, गोडवा कुठे असतो. मला वाटते, परागीवहनाचे
काम झाले कि, फ़ुले तो कारखाना बंद करत असावेत. नाहीतरी आपण सहसा गळून
गेलेली, फ़ुलेच भाजीसाठी घेतो.

आणि तो पहिला प्रश्न आहेच, हि माणसे शेंगा अजिबात खात नाहीत तर इतक्या संखेने,
अगदी मुद्दाम लावल्यासारखी हि झाडे का आहेत इथे. पाने, फ़ुले, शेंगा, गोंद या सगळ्याचाच
आपण उपयोग करतो. दक्षिण भारतात तर मूळेही खातात, तामिळ लोकांचे सांबार आणि केरळी
लोकांचे, अवियल, या शेंगांशिवाय होत नाही.
उत्तरेकडे सहजन कि फ़ली म्हणून ती लोकप्रिय आहेच. उलट सहजन म्हणजे सामान्य माणसाला, ती
विनासायास आणि फुकट उपलब्ध व्हावी, म्हणून तिची शेती करता, ती केवळ बांधावर लावावी, असा
संकेत आहे.

खाण्याशिवाय सावलीसाठी किंवा लाकडासाठी या झाडाचा उपयोग नाही, मग या देशी ती का लावली असावीत ?

माधव, हा मंदार / पांढर्‍या रुईच्या फुलाचा फोटो :

दिनेशदा, ती शेवग्याची झाडं मुद्दाम लावलेली आहेत का?

सध्या माझ्या ‘किचन गार्डन’मध्ये चार पिवळ्या मूगाचे वेल आहेत, आणि आलं आणि लसूण मागच्याच आठवड्यात लावलेलं आहे. मुगाला आता कोवळ्या शेंगा येताहेत - वर लव असणार्‍या. मागे असाच लाल चवळीचा प्रयोग केला होता Happy

http://mokale-aakash.blogspot.in/2010/11/blog-post.html

थोड्या जागेत, कमी वेळात आणि किमान देखभाल घेऊन येणारं (म्हणजे सर्वाधिक रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट) किचन गार्डनमधलं झाड माझ्या मते पुदिना आणि पालकाचं असेल.पालक निवडतांना मुळासकट असणारे दोन - तीन देठ कुंडीत लावले, तरी लगेच येतात, आणि घरच्या पालकाची कोशिंबीर दर आठवड्याला खायला मिळते!

हो गौरी, घराच्या आवारातच लावलेली झाडे आहेत.
आणि पालकाप्रमाणे लाल बीट पण चांगला उगवतो, ती पाने पण सलाद मधे वापरता येतात. लाल देठामूळे दिसतातही छान.
भारतात सहसा पालेभाजी मूळासकटच मिळते, पाने काढून घेऊन, त्या कांड्या खोचल्या तर २/३ आठवड्यात भरपूर पाने येतात.

दुबईहून मुंबईला येणे माझे अनेकवेळा होते, त्यावेळी मी मुद्दाम ओमान दिसेल अशी खिडकी मागून घेतो.
मस्कत, सूर वगैरे गावांशी माझे मानसिक नाते आहे. विमान भारताच्या दिशेने सरकले कि, ओमानचा किनारा
धूसर दिसू लागतो. पण ओमान देशाचा पूर्ण उत्तर दक्षिण प्रवास मी रस्त्याने केलेला आहे. मस्कतच्या दक्षिणेला
धोफार नावाची डोंगररांग आहे. आपल्या मोसमी पावसाची एक शाखा तिथेही जाते आणि ती डोंगररांग हिरवीगार करुन टाकते. अनेक नैसर्गिक नद्या आणि झर्‍यांनी तो भाग समृद्ध केलाय. सलालाह त्याच्या दक्षिणेला आहे आणि ते तर थंड हवेचे ठिकाण आहे. पण मस्कत ते सलालाह यांच्या मधला भूभाग आणि तो समुद्रकिनारा
अतिरुक्ष आहे. तिथे आजही मानवी वस्ती नाही. पण या किनार्‍यासंदर्भात काल मला एक नवीनच माहिती
कळली.

अतिप्राचिन असा मानवी स्त्रीचा सांगाडा, इथिओपियातील एका नदीच्या खोर्‍यात मिळाला हे आपण जाणतोच,
( दुर्दैवाने त्या जागेवर आज कसलीही खूण नाही, तिथे जाणेही तेवढे सोपे नाही.) त्यापेक्षा जूना सांगाडा, जगात
कुठेही मिळालेला नाही. हे एक कारण आहेच आणि मानववंशशास्त्रज्ञांनी केलेल्या जगभरातील व्यक्तींच्या
डि एन ए च्या अभ्यासानुसार, आपण सर्व अंशाने हा होईना, त्या अवशेषाशी निगडीत आहोत. त्यामूळे
त्या स्त्रीला ( तिचे नाव ल्यूसी असे ठेवलेय) आदीमाया संबोधले पाहिजे.

आता प्रश्न असा होता कि जर मानव आफ्रिकेत निर्माण झाला, तर तो जगभर कसा पोहोचला.
आजचा आफ्रिकाखंडाचा नकाशा बघितला तर केवळ वरच्या दिशेने, त्याला काही भूभाग जवळचे आहेत, बाकी
बाजूंने अथांग सागर आहेत.
वरच्या बाजूने पोर्तूगाल आणि इटाली ( सिसिली ) तसे जवळ दिसतात पण ते सागरी अंतर फार आहे. कुठल्याही साधनाशिवाय ते पार करणे अशक्य. सुएझ कालव्याने आफ्रिका खंड, अरेबिया पासून वेगळे झालेय
हे खरे असले तरी तो मानवनिर्मित आहे. पुर्वी तो भाग सलग होता. त्या मार्गाने आफ्रिकेबाहेर जाता येणे
शक्य होते आणि तसे काही मानव गेलेही. जेरुसलेम मधे ते अवशेष सापडलेत पण ती मानवशाखा पुढे नष्ट झाली. ते पुढे युरपमधे पोहोचू शकले नाहीत. नंतर सहारा वाळवंटाचा विस्तार वाढला. त्यामूळे ते पार करणे
अशक्यच झाले.

आता शेवटचा पर्याय होता तो दक्षिण येमेनमधे, लाल समुद्र ओलांडुन जायचा. तो समुद्र शांत असला तरी आज
ते अंतर ३० किमी आहे. ते आजच्या स्थितीत पार करणे अशक्य आहे ( तिथे शार्क मासेही आहेत.)

पण त्या काळात समुद्राची पातळी खुपच खाली होती. आणि ते सागरी अंतर साधारण ११ किमी होते. एवढे अंतर पोहून किंवा लाकडी ओंडक्यांच्या सहाय्याने पार करणे सोपे होते. आणि काही शेकडो आदीमांवानी ( हजारो नाहीत) ते पार केले असावे.

येमेनमधे आल्यावर पुढे ओमान आणि मग सध्याचा इराण म्हणजेच पर्शिया पर्यंत तो पोहोचला. पण आज
ते शक्य झाले नसते कारण मधे गोड्या पाण्याची सोय नाही, आणि गोड्या पाण्याशिवाय हा प्रवास अशक्य होता.

मग त्यांना गोडे पाणी कुठे मिळाले ?

तर त्याचे उत्तर असे. आजही तिथे समुद्राखाली गोड्या पाण्याचे झरे आहेत. समुद्राच्या तळाशी हे गोडे पाणी
इतक्या जोरात उफाळून येत असते कि, तिथे उलटे भांडे धरले तर ते गोड्या पाण्याने भरून घेता येते. त्या
काळात समुद्राची पातळी खाली असल्याने, ते झरे किनार्‍यावर होते आणि ते पाणी वापरत, आदीमानव पुढे
म्हणजे मस्कतच्या मार्गे, पर्शियाकडे गेले.

आपण सर्व या काही शेकडो आदीमानवांचे अंशज आहोत.

समुद्राखाली गोड्या पाण्याचे झरे! कधी कल्पनाही केली नव्हती असं वास्तव आहे हे. दिनेशदा, तुमच्याकडून अश्या माहितीचा खजिना इथे मिळतोय.

गौरी, अँतोनिओ बंडेरासचा, कातारमधे चित्रीत झालेला, ब्लॅक गोल्ड चित्रपट बघितला का ? त्यात असे झरे दाखवलेत.

जिप्स्या तुझ्या फोटोंना प्रतिसाद देणे बंद केलय. प्रत्येक वेळेला 'सुंदर' करता नविन शब्द कुठून आणणार? Happy

पण वरच्या कुर्डूला प्रतिसाद दिल्यावाचून रहावत नाही - अप्रतिम.

दिनेश, मस्त माहिती.

>>जिप्स्या तुझ्या फोटोंना प्रतिसाद देणे बंद केलय. प्रत्येक वेळेला 'सुंदर' करता नविन शब्द कुठून आणणार? Happy + १

जिप्सी, कुर्डू चा फोटो नेहमीप्रमाणे छान.

श्रावण महीन्याच्या कथांमधे केनी-कुर्डूच्या भाजीचा उल्लेख असायचा. त्यातीलच हा कुर्डू. पालेभाजी पावसाळ्यात खाल्ली जाते. फुले दसरयाच्या तोरणातसुद्धा असतात.

मला इथे आल्यापासून वेगळीच रानफुले बघायला मिळताहेत, पण माझ्याकडे ना जिप्सि ना कॅमेराचा चार्जर.

बहारे फिर भी आती है, बहारे फिरभी आयेंगी ! या आशेवर आहे.

माधव,
पुर्वी ही पांढर्‍या (निळसर ?) फुलांची रुईची झाडे खुप दिसायची,याचे अनेक उपयोग ही ऐकले होते,पण ही झाडे (त्याचे चीक/दुध) तशी खुप विषारी असल्यामुळे जवळ सहसा जास्त फिरकलो नाही.

ही झाडे ही बहुतेक करुन अस्सल काळ्या जमीनीत जास्त वाढलेली,पसरलेली पाहिली आहेत्,खडकाळ-मुरुमाड जमीनीत झाड पाहिल्याच आठवत नाही.ही झाडे (माणसाने) मुळासकट काढुन टाकणे म्हणजे मोठ कष्टाच काम ,कारण मुळे खुप खोलवर गेलेली,ओलसर/चिवट असतात.
कॉलेजला असतानाचा एक अनुभव...
आमच्या एका नवीन शेतात याची खुप झाडे वाढलेली होती, त्यामुळे पेरणीपुर्वी ती काढण्यासाठी वडीलांनी सुट्टीत मला अगदी विश्वासाने मला बरोबर घेतलं आणि २ दिवस ही झाडे काढली,मला अशी ४-५ झाडे मुळासकट काढताना खुप घाम गाळावा लागला, पावसाळ्यानंतर फक्त मी तोडलेली ती सगळी झाडे पुन्हा छान फुटुन आली,बहरली.वडीलांनी मग माझ्यासारख्या (४ पुस्तके शिकलेल्या) खडे बोल सुनावले.


खाण्याशिवाय सावलीसाठी किंवा लाकडासाठी या झाडाचा उपयोग नाही, मग या देशी ती का लावली असावीत ?

दिनेशदा,
शेवग्याची पानमळ्यात लावण्यात येणारी झाडे ही सरळ वाढवली जातात,अगदी पहिल्या आठवड्यापासुन आजुबाजुला फुटणार्‍या लहान फांद्या हातानी वरचेवर काढ्ल्या जातात,नंतर झाडे (खोड) मोठी झाली की ती कमी उंचीवर सहसा फुटत नाहीत,मग एका ठराविक उंचीवर (सा.२० फुटांवर) खोड/झाड कट केलं जातं, तिथे या फांद्या (फुटवे) वाढु दिल्या जातात,त्यातले काही फुटवे शिल्लक ठेऊन पानांच्या वेलींना आवडतील/मानवतील तेवढ्या वाढु दिल्या जातात,आणि तोडल्या जातात, याचा जनावरांना उत्तम चारा म्हणुन उपयोग होतो,(सोबत शिवरी,पांगरा याची झाडे देखील समान उंचीवर ठेवली जातात) हे चारा काढण्याच काम वर्षभर अगदी रोज करावं लागतं,तेही १५-१८ फुटाची शिडीचा आधार घेऊन,पावसाळ्यात चारा काढताना शेतकर्‍यांचे खुप हाल होतात,झाडांची होत असलेली ही वाढ नेहमी काढावीच लागते, कारण सावली जास्त झाली तर पानांच्या वेलीवर परिणाम होतो, जसा उन्हाळ्यात सावली कमी झाली तर उलट परिणाम होतो.
३-५ वर्षानी हा पानमळा (जुना झाल्यामुळे) सगळी झाडे पांगरा,शिवरी,शेवगा,केळी,पपई,गर्ड (ऊच सरळ वाढणारी कडु लिंबाची झाडे) शिवाय कुंपणात लावलेली तुतु,तरवाडी,एरंडाची वाढलेली झाडे मुळासकट तोडावी लागतात.

शेवग्याची सरळ वाढलेल्या अशा वाळलेल्या झाडांचा उपयोग खुप मोठ्या प्रमाणात जनावरांचा साधा गोठा,शेतमजुरांना,गरीब शेतकार्‍यांना घरे बांधताना चारी बाजुला भिंती उभारण्यासाठी केला जातो,नंतर शेणाने सारवल्यानंतर भक्कम होतात्,किडही लागत नाही

Pages