निसर्गाच्या गप्पा (भाग १०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 July, 2012 - 14:54

निसर्गाच्या गप्पांचा १० वा भाग सुरु होत आहे हो$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

(मधला हार गुंफलेला फोटो शोभा कडून साभार)

मूलं भुजङ्गै:, शिखरं प्लवङ्गै:
शाखा विहंगै:, कुसुमानि भृङ्गै: |
नास्त्येव तच्चन्दनपादपस्य
यन्नाश्रितं सत्वभरै: समन्तात ||

हे आहे सुगंधी चंदनवृक्षाचं लेकुरवाळं चित्र; त्याच्या मुळांना सर्पाचं वेटोळं आढळतं. खोडाच्या टोकाकडे मर्कटवर्गीयांच्या लीला, पानापानात दडलेले पक्षीगण आणि फुलांवर रुंजी घालणारे भुंगे.

- डॉ. हेमा साने (वृक्ष - एक आधारवड, निसर्गायन, ऑक्टो. २०११)
(शशांक पुरंदरे यांच्याकडून)

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग ९) http://www.maayboli.com/node/35557?page=35

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'अशिष्याय न देयम्' हे पक्के मनावर बिंबवले गेल्याने (एकार्थी बरोबरही होते ते) बरेच ज्ञान लुप्त झाले.

अशिष्याय न देयं असे केल्याने ज्ञान कसे नष्ट होईल ? सगळ्या भारतात अशिष्यच तयार झाले काय?

शेळी, मुद्दाही बरोबर आहे.
पण (जास्त करुन वनौषधींचे ) ज्ञान कुणाला दिले तर औषधांचा प्रभाव पडत नाही, अशी विचित्र समजूत आहे, खरी.

ज्ञानाचा दुरुपयोग व्हायची भिती, कायम होती आणि त्या औषधांचा व्यापार करुन, लोकांना लुबाडण्यात येईल, अशीही भिती होती.
यातून मग हळदीचे वगैरे वाद होतात !!

'दिनेशदा, अनिल, माधव, शशांक सगळेच खूप इंटरेस्टिंग माहिती देता'.. +१०००
जिप्स्या..छानच रे.. लौकर जा आणी माहिती ,फोटोज टाक इथे..
बांबूपुराण सुप्पर्ब!! मज्जा वाटली वाचताना..
ते कोंबाचे लोणचे मीही खाल्लंय ..ओडिसात..
पोकळ बांबूत फ्राईड राईस बेक केलेला ही मस्त लागतो. कोरिया,चायना त बनवतात असा भात. बांबूचा मंद सुवास लागतो भाताला..

बांबू - जगातील सर्वात उंच गवत आहे - असं कुठे तरी वाचलं होतं - खरं आहे का हे ??>>>>>>> होय (चला काहितरी माहिती असल्याचं समाधान मिळालं Wink )

बांबूवरची माहिती खूपच छान.

मी इथे कम्बोडिया, ईन्डोनेशिया ह्या दोन गरीब देशात फिरलो तेंव्हा ही लोक बांबूचा उपयोग जितका विविधरित्या करतात तेवढा उपयोग इतर कुठेही मी पाहिला नाही. कम्बोडियामधले बाम्बू व्यासानी इतके मोठे आहे की एक आडवी चीर दिली की मोठी बिसलरीची बाटली मावेल तेवढे पाणी त्यात बसते. ही लोक बांबूचेच आतून पोकळ असलेले भाग वापरुन त्याच्या व्यवहारयुक्त गोष्टी तयार करतात.

मी इथे कम्बोडिया, ईन्डोनेशिया ह्या दोन गरीब देशात फिरलो तेंव्हा ही लोक बांबूचा उपयोग जितका विविधरित्या करतात तेवढा उपयोग इतर कुठेही मी पाहिला नाही. >>> काही फोटो / माहिती द्या ना इथे - सगळ्यांनाच कळेल...

बी, आणखी उपयोग सांग.

पुर्वी आपल्याकडे, मनिप्लांट लावायला अशी बांबूची कुंडी वापरत असत. होडीसारखा आकार असे.

०००००

काल मी अंगोलामधला पहिला आंबा खाल्ला. हो सध्या इथे सिझन आहे आंब्याचा. आमच्या ऑफिसच्या आवारातच बरीच झाडे आहेत. पश्चिम आफ्रिकेत कुणीही कच्ची फळे खात नाहीत. मी एकदा कैरी तोडली,
तर आम्ची कूक मला म्हणाली, अजून पिकायचे आहेत. पिकला कि पहिला आंबा, तूला देईन. त्यानुसार तिने
पहिला आंबा मला आणून दिला.

आपला गावठी आंबा जसा लागतो, अगदी तसाच लागला. आता भरपूर खाणार.

लोक, अमूक इतक्या गावाचे पाणी प्यायलोय म्हणून बढाई मारतात. मी पण बढाई मारतो..

आजवर ऑस्ट्रेलिया, थायलंड, भारत, पाकिस्तान, केनया, नायजेरिया, अंगोला आणि ओमान या ८ देशातले आंबे मी खाल्ले आहेत... भारत, केनया, नायजेरिया, ओमान आणि अंगोलात तर झाडावरुन हाताने तोडून खाल्ले आहेत.

भारत, केनया, नायजेरिया, ओमान आणि अंगोलात तर झाडावरुन हाताने तोडून खाल्ले आहेत

नशिबवान आहात, मी वाट पाहातेय मला हे नशिब कधी लाभेल याचे. झाडावर पिकलेल्या आंब्याची चवच न्यारी.

आपल्यासारख्या ग्राहकांचा प्रदुषणातील सहभाग याबद्दल बोलताना फुकुओका म्हणतातः

ग्राहक म्हणतो मला ऑर्गॅनिक फळं हवित. पण तोच ग्राहक हंगामाआधी येणार्‍या फळांना अव्वाच्या सव्वा किंमत मोजायला तयार असतो. परत फळं आकाराने मोठी, रंगाने आकर्षक, चमकदार, चविला गोड असतिल तर ग्राहक त्याला जास्त किंमत मोजायला तयार असतो. मग शेतकरी किंवा व्यापारी (बहुतेक वेळा व्यापारीच) फळांना कृत्रिम रितीने रंग 'चढवतात'. आता ते फळ पिकलेले दिसते पण खरोखर पिकलेले मात्र नसते. मग रासायनिक स्विटनर्स वापरून त्यात गोडी 'भरली' जाते. मग जास्त काळ टिकण्यासाठी त्यावर प्रिसर्वेटिव फवारली जातात. त्यानंतर चकचकीत दिसण्यासाठी मेणाचे पॉलिश केले जाते. अशा रितीने फळ तोडल्यापासून आपल्या हाती पडेपर्यंत त्यावर सरासरी ३-४ रसायने मारली जातात.

माधव आत्ताचे नाही, अगदी माझ्या लहानपणापासूनचे आहे हे, सिझनमधे बाजारात सर्वात आधी येणार्‍या
आंब्याला, खुप जास्त किंमत द्यावी लागते. अर्थातच बाजारात आपला माल, आधी जावा यासाठी बागाईतदार
प्रयत्न करतातच.

अतिसंपन्नतेमूळे, उत्सुकता जिज्ञासा नव्हती ?
दिनेशदा,
तुम्ही दिलेलं वरील कारण खरं असेल अस वाटतं....

पुर्वी भारतात इतकी सुबत्ता असेल कि कुणी काम-धंद्यासाठी दुसर्‍या देशात कमीच गेले असतील..
कुठेतरी वाचलं होतं,१९४०-५० च्या दरम्यान जगातील एकुण अन्नधान्य उत्पादनामध्ये (फक्त) भारत आणि चीन यांचा वाटा ६०% होता.

बांबुबद्दल इतकी सविस्तर,बारीक्-सारीक माहिती तुमच्यामुळे मिळाली,गावी ओढ्याकाठी शिल्लक असलेले काही बेट पाहत आलोय पण इतकीशी माहिती नव्हती,पुर्ण वाढ झालेल्या बांबुच्या बेटातुन वार्‍यामुळे बांबु एकमेकांवर घासुन होणारा, ऐन दुपारी येणारा कर्-कर असा आवाज तेवढा आठवतो.

दिनेशदा,
एखाद्या अनुभवी,अस्सल,जुन्या-जाणत्या शेतकर्‍याला देखील लाजवेल अशी शेतीबद्दलची भन्नाट, अजब, अभ्यासपुर्ण माहिती तुमच्याकडे आहे..यात वाद नाही.

मला वाटतं, सध्याचे (मुख्यतः आजकालचे तरुण) शेतकरी अनेक पिके करतात,झाडे लावतात (?) पण त्याबद्दलची पुर्ण माहिती खुपदा नसते/मर्यादित असते,कारण शिक्षण कमी,वाचन कमी, जुन्या (म्हातार्‍या) लोकांशी झालेला कमी संवाद,तसेच जुन्या लोकांना असलेली माहिती ७०% माहिती ते पुढच्या पिढीपर्यंत/ इतरांपर्यंत कमी पोहोचत आहे,त्यांना इतरांना स्वता:हुन सांगावस वाटलच नसावं,(कोतेपणा/अहंकार हेही एक कारण आहेच),दुसर म्हणजे सध्याच्या तरुणांना शेतीबद्दल,झाडांबद्दल एकुण जिज्ञासा तशी कमी होत चाललेली आहे,पण हे पुर्ण सत्य नसाव असही वाटतं..

अनिल, शेकर्‍यांच्या अनुभवाला आणि त्यांच्या ज्ञानाला तोड नसते रे. नुसते आभाळाकडे बघून ते पाऊस पडणार कि नाही, ते सांगू शकत. हातात बियाणे धरुन त्याची प्रत सांगू शकत. पण तरुण पिढ्यांपर्यंत ते ज्ञान आले नाही.

शेतीमालाला उठाव नाही असे कसे होईल, फक्त मधले दलाल वाढले ( वाढले म्हणजे संखेनेही आणि पैश्यानेही)
आजच लोकसत्तामधे वाचले, एकट्या वर्धा जिल्ह्यात ८०० च्या वर आत्महत्या झाल्या.

००००००००००

व्यापाराचे म्हणशील तर प्राचीन भारताचा व्यापार रोमपर्यंत होता, हे खरे आहे. पण व्यापारी मात्र अरबी आणि
युरोपीयन होते. आपले मसाले, आपले ग्रंथ त्यांनी तिथे नेले. आणि नफाही त्यांनीच कमावला.

काल मी डॉ अ‍ॅलिस रॉबर्ट्स यांचा, ऑस्ट्रेलिया वरचा भाग बघितला. आदीमानव तिथे पोहोचला तर तो भारताच्या मार्गेच, असा कयास आहे, पण तसे नेमके पुरावे मिळत नाहीत. गुजराथ ते केरळ या संपुर्ण किनारपट्टीवर, तसे काही आढळत नाही. पुढे मलेशिया - बोर्नियो वगैरे भाग आता समुद्राने अलग केले असले तरी त्याकाळी, तिथे समुद्र नव्हता. त्यामूळे बरेचसे पुरावे समुद्राच्या पोटात असण्याची शक्यता आहे.

या कार्यक्रमात आंध्रमधल्या ज्वालापुरमचा उल्लेख आहे. तिथले चित्रीकरणही आहे. साधारण ७८,००० वर्षांपुर्वी, आताच्या दक्षिण पूर्व आशिया भागात एक मोठा ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. त्यात उसळलेली राख, भारताच्या या भागात येऊन पडली होती. आज या राखेचा २ मीटर उंचीचा थर तिथे आहे. स्थानिक लोक ती उकरून, कारखान्यांना विकतात. ( इथे काही जीवाश्म सापडतील, अशी शक्यता भारताला वाटली नाही का ? कारण इथे संशोधन करताना एक गोराच दाखवला.)

या थराखाली काही अश्मयुगीन हत्यारे सापडली, आणि या थराच्या वरही.. या साध्या पुराव्यावरुन किती निष्कर्श काढता येतात ते बघा.
त्या काळापुर्वी तिथे मानव वस्ती होती, ते हत्यारे बनवत होते. एवढा उद्रेक झाल्यावर त्यातील अनेक जण दगावले असतील, पण तरीही अनेक जण वाचलेही असतील. दोन्ही थरातली हत्यारे, साधारण सारखीच असल्याने, ते लोक त्याच गटातले असण्याची शक्यता आहे. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यावर, पळणे अशक्य होते, त्यामूळे त्यापुर्वी मोठ्या भूभागावर त्यांचे वास्तव्य होते, त्यांचा एकमेकांशी संपर्क ( व्यापार ?! ) होता.
ज्वालापुरमचा गट गाडला गेल्यावर, दुसर्‍या ठिकाणाहून लोक तिथे आले..... फक्त उणीव एवढीच कि तिथे अजून मानवी अवशेष सापडलेले नाहीत.

हो हो टाकेन चित्र तो तर माझा आवडता छंद आहे!

शेतकर्‍यांना केवढी तरी माहिती असते पण आपण त्यांच्या सानिध्यात राहत नाही. माझी बहिण सासरची शेतकरीन आहे. तिला अनेक व्याख्या माहिती आहेत शेतीबद्दलच्या.

क्वांटिटी सर्व्हेयर हे एक प्रोफेशन आहे पण अनेक बाबतीत, शेतकरी नुसत्या नजरेने अचूक अंदाज वर्तवतात.
ऊभ्या पिकाकडे बघून, धान्य किती निघेल याचा अंदाज येतो त्यांना. बारा आणे , चौदा आणे ( सोळा आण्यांपैकी ) अशा शब्दात ते सांगतात. धान्याचा ढीग बघून, त्याचे वजन किती असेल ( किंवा मापी किती असेल ) ते सांगू शकतात.

'''''''''''

बांबूच्या एका उपयोगाबद्दल लिहायचे राहिले. धान्य साठवायच्या कणग्या पण बांबूच्याच विणलेल्या असत.
त्याला शेणाने सारवलेले असे. ८/१० फूट उंच कणग्या आमच्या घरीच होत्या. वर्षभराचे धान्य त्यात सुरक्षित राही.
काही कणग्यांना, तळाशी एक झडप असे ( तिचे नेमके डिझाईन आता आठवत नाही ) पण वरून न काढता, तळाच्या झडपेतून धान्य बाहेर, काढता येत असे.

ह्या बांबुच्या कणग्या आम्ही पण पाहिल्यात. शिवाय सुपं, रोवळ्या (धान्य धुण्यासाठी) पण पाहिलेत.

प्रज्ञा, आपल्या कोकणाबाबत परशुरामाचे नाव घेतले जाते. समुद्रापासून परशुरामाने हि जमीन मागून / जिंकून घेतली असा उल्लेख असतो. म्हणजे अतिप्राचीनकाळी बहुदा तिथे लोकवस्ती नसावी. किंवा तो भाग पाण्याखाली
असावा. आजही आपण घाटाच्या पायथ्याशी असलो कि माथ्यावरची गावे, बर्‍याच ऊंचावर असल्याचे दिसते.
आता आपल्याला गाडीवाटांनी चढणे अवघड वाटत नाही, पण त्याकाळात या वाटा नक्कीच अवघड असणार.

दिनेशदा, आम्ही चक्क लपछपी खेळताना (अर्थात लहान असताना :)) त्या कणग्यांच्या मागे मस्त लपत असू.
खूप वर्षांनी हे मला आज आठवलं.

कणगी म्हटलं कि मला हमखास श्यामची आई आठवलं.
पोहायला न जाणारा शाम त्या कणगीमागे लपलेला असतो, नंतर आईने बदडुन काढते, आणि पोहायला शिकल्यानंतर आई प्रेमाने खाऊ भरवते. Happy Happy

मला कुठला हिंदी चित्रपट ते आठवत नाही, पण त्यात अगदी पहिल्याच दॄश्यात नऊवारी साडी नेसलेली, निरुपा रॉय, ( बहुतेकच) कणगीच्या झडपेतून धान्य काढताना दाखवलीय.

खूप दिवसांनी मायबोली वर लिहित आहे , नियमित वाचतो तर आहेच .. माझा एक अनुभव share करतो
एका ठिकाणी वाचले होते आफ्रिके मध्ये लोकांना झाड कापायचे असल्यास ते झाडा जवळ जाऊन त्या खूप शिव्या देतात , त्याच्या बद्दल वाईट बोलतात , आणि ते झाड काही दिवसात अपोआप मारून जाते , ती लोक त्या नंतर ते झाड कापतात .

माझ्या बाल्कनी मध्ये ७-८ वर्षांचे एक बोगनवेल आहे , खूप मोठ वाढले, हात एवेढे जाड आहे , कुंडी जमिनी वर असल्याने मुळे जमिनी गेली आहेत , आणि झाडाची growth कंट्रोल च्या बाहेर गेली , म्हणून मी त्या झाडास कापून दुसरे झाड जे बाल्कनीत ग्रील वर चढवता येईल आणि growth manageable असेल असे लावायचे ठरवले .. पण झाडाचे कटिंग करताना जीवावर यायचे , पण हे विचार मी बऱ्याच वेळा केले ... ( झाडा जवळ उभे असतानाच) पण कापणे काही कधी झाले नाही ( गेले ३-४ आठवडे ) ... आणि काय आश्चर्य आज सकाळी बघतो तर एवढ्या मजबूत झाडाची पाने कोमेजून गेली होती आणि फांद्यात जीव नव्हता , आज . संध्याकाळी जाऊन बघतो काय status आहे ते ....बोगनवेल कापून , तोडून सहसा मारत नाही ..........आता फार वाईट वाटत आहे ..... कारण काय असेल ???
जाणकार ह्याच्यावर प्रकाश टाकतीलच

सगळ्यांना नमस्कार. आमच्याकडे ह्यावर्षी गणेश चतुर्थिलाच गणपती आहे. साखरचौथीला नाही. म्हणून सगळ्यांनी दर्शनाला यावे.

Pages