निसर्गाच्या गप्पा (भाग १०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 July, 2012 - 14:54

निसर्गाच्या गप्पांचा १० वा भाग सुरु होत आहे हो$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

(मधला हार गुंफलेला फोटो शोभा कडून साभार)

मूलं भुजङ्गै:, शिखरं प्लवङ्गै:
शाखा विहंगै:, कुसुमानि भृङ्गै: |
नास्त्येव तच्चन्दनपादपस्य
यन्नाश्रितं सत्वभरै: समन्तात ||

हे आहे सुगंधी चंदनवृक्षाचं लेकुरवाळं चित्र; त्याच्या मुळांना सर्पाचं वेटोळं आढळतं. खोडाच्या टोकाकडे मर्कटवर्गीयांच्या लीला, पानापानात दडलेले पक्षीगण आणि फुलांवर रुंजी घालणारे भुंगे.

- डॉ. हेमा साने (वृक्ष - एक आधारवड, निसर्गायन, ऑक्टो. २०११)
(शशांक पुरंदरे यांच्याकडून)

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग ९) http://www.maayboli.com/node/35557?page=35

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार.

लेक मजेत आहे. गप्पा चांगल्या रंगल्या आहेत चालू द्या. काही दिवसांत मी पण सामिल होइन.

अनिल आपल्याकडेही शेवग्याची शेती अलिकडेच व्हायला लागली ना ! पण हि छानच माहिती. आम्हाला लहानपणी शेवग्याच्या झाडावर अजिबात चढू दिले जात नसे, कारण ते लाकूड मजबूत नसते. पेरुच्या झाडावर मात्र प्रॉब्लेम नसे.

इथे मात्र शेवग्याची पाने, बकर्‍यांना पण खाऊ घालताना दिसत नाहीत.

आपण सगळे मानव एक आणि आपला उगम पूर्व आफ्रिकेतला असे जरी मी लिहिले असले तरी चायनाला
ते मान्य नाही. त्यांचा तोंडावळा वेगळा असतो हे आपण बघतोच, पण आपण म्हणजे अगदी वेगळाच अंश आहोत, असे चिनी लोकांचे म्हणणे होते आणि त्यांच्या शाळेतदेखील तसेच शिकवले जात असे. आता तसेच
शिकवतात का, ते वर्षू सांगू शकेल.

पण शास्त्रज्ञांना ते मान्य नाही. त्यांचे डोळे बारीक दिसत असले तरी ते बारीक नसतात तर त्यावर पापणीचा एक
जाड पडदा आलेला असतो. बसके नाक आणि सपाट चेहरा, हि आणखी वैशिष्ठे. पण आदीमानवांचा एक गट
शिकार करत करत, सैबेरियामधे गेला. पण नंतर हिमयुग आल्याने ते खाली सरकले व चायना मधे स्थिरावले.
सैबेरियामधले अतिथंड तापमान, त्यांना सवयीचे होते पण त्या थंड हवेचा आणि थंड वार्‍यांचा सामना करता
करता, त्यांचे डोळे बारीक झाले, नाक बसके झाले आणि चेहरा सपाट झाला. ( या विरुद्ध चेहरा असेल तर
थंडीला तोंड देता देता लवकर सुरकुततो.) त्यामूळे ते कुणी वेगळे नाहीत.

चायनामधे काही वेगळ्या आकाराच्या कवट्या सापडल्या असा दावा होता पण दुसर्‍या महायुद्धात त्या गायब झाल्या असेही सांगतात. पण गायब व्हायच्या आधी त्यांचे पी ओ पी चे साचे बनवले होते असाही दावा
केला जातो. आणि एवढे करुनही त्या कवट्या आपल्यापेक्षा खुप वेगळ्या आहेत, असे मात्र दिसत नाही.

आणि अगदी अलिकडे, डि एन ए चाचणीनुसारही, त्यांचा आणि मूळ आफ्रिकन जमातीचा वंश एकच आहे,
हे सिद्ध झाले आहे. त्यांच्या पाठ्यपुस्तकांत त्यांनी बदल केला का, ते मात्र माहित नाही.

इतर सर्व देशात जी अश्मयुगीन हत्यारे सापडली ( हि ओमानच्या वर उल्लेख केलेल्या किनार्‍यावर ढिगाने आहेत.) ती साधारण एकाच प्रकारची म्हणजे एकाबाजूने धारदार अशी आहेत. चायनामधे मात्र, जी अश्मयुगीन
हत्यारे सापडली ती ओबडधोबड पण जड आहेत. त्यांना धार नाही... याचे कारण निसर्गानेच दिले.

हि हत्यारे मूळात मांस कापण्यासाठी नव्हतीच. ती होती बांबू तोडण्यासाठी. चायनात सगळीकडे भरपूर बांबू
आहे. त्याच्या तळाशी जर जड दगडाने ठोकले तर तो सहज आडवा करता येतो. आणि मग तो तासून त्याला
हवा तसा आकार दिला जातो.
बांबू लवचिक असला तरी त्यातले धागे चिवट असतात. कारण त्यात सिलिका असते. बांबूचा डोळा एका आवरणाखाली असतो आणि ते आवरण बाजूला केले तर आत एक क्षार असतो. अगदी कणभरच असतो,
पण ते एक आयुर्वेदीक औषध आहे. वंशलोचन असे त्याचे नाव. ( वंश - बांस - बांसुरी - बांबू )
या बांबूचा उपयोग करुन आपल्याकडे रोवळ्या, सुप, टोपल्या, डाली असे अनेक प्रकार विणले जातात. आणि
ते वर्षानुवर्षे टिकतात ते त्यातल्या बांबूच्या चिवटपणामूळेच.

बांबूपासून आजही हत्यारे करता येतात आणि त्यांनी कोंबडी वगैरे कापता येते. चायनात त्या काळात मोठे
प्राणी नव्हते, निदान मानवाच्या खाण्यात तरी नव्हते, छोटे प्राणी / पक्षी कापायला बांबू चालत होता.
म्हणजे त्याकाळी चायनामधे बांबूची हत्यारे वापरात होती. ती अर्थातच काळाच्या ओघात टिकली नाहीत.
पण बांबूचे महत्व आजही आहेच.

डॉ. अ‍ॅलिस रॉबर्ट्स अशी गूढ कोडी, सोडवून दाखवतात त्यावेळी, अचंबित होण्याला पर्यायच नसतो.

माझ्याकडे ना जिप्सि ना कॅमेराचा चार्जर. >> Lol

अनिल, शेवग्याची माहिती मस्तच. पण ती झाडे अगदी सहज मोडतात ना? मग त्यांचा बांधकामात कसा उपयोग होतो?

दिनेश दा मस्त मस्त माहिती सांगताय..
'त्यांच्या पाठ्यपुस्तकांत त्यांनी बदल केला का''= या प्रश्नाचं उत्तर मी माझ्या काही चिल्ल्यापिल्ल्यांशी बोलून कळवेन लौकरंच!! Happy
अनिल, खूपच इन्टरेस्टिन्ग माहिती दिलीस..
माझ्याकडे ना जिप्सि ना कॅमेराचा चार्जर. .. Rofl
पण बहारें फिर आयेंगीच.. Happy

माधव,
खरं आहे ,ही सहज मोडतात, पण ४-५ वर्षे वाढलेली झाडे , ही मुख्य आधार (खांबासारखी) म्हणुन नाही तर दोन खांबामध्ये सलग उभी करुन भिंतीसाठी/आडोसा म्हणुन वापरतात,

मस्त रंगल्या आहेत गप्पा!

दिनेशदा, मस्त माहिती! खूप छान वाटलं वाचून.

नितीन, तुमचे फोटो जागूची कसर भरून काढताहेत अगदी!!

माझ्याकडे ना जिप्सि ना कॅमेराचा चार्जर. .. हसून हसून गडबडा लोळण
पण बहारें फिर आयेंगीच.

दिनेशदा,
मस्त !

मला तर फोटो शिवाय अशी माहिती देताना खुप चुकल्यासारख वाटतयं,..
पण लवकरच कैमेरा येईल आणि बहारें फिर आयेगी !

शेवग्याच्या झाडांबद्दल अजुन थोडेस्से.
शेवगा हा परदेशात मोरिंगा म्हणुन संबोधला जातो. मोरिंगा हे हेल्थी रहाण्यासाठी, दिर्घायुषी रहाण्यासाठी चांगले असे मानले जाते. अमेरिकेतल्या काही कंपन्या मोरिंगापासुन बनवलेली हेल्थड्रींक्स जगभरात विकतात / विकण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठीचा मोरिंगा ते वेगवेगळ्या ठिकाणाहुन घेतात असे ऐकले आहे. तिथला शेवगा हा अशाच काही हेल्थड्रिंक्स साठी लावलेला असु शकतो.

एकंदर चायनातच नव्हे पण वांशिक ओळख सांगणार्‍या चेहरेपट्ट्या आता दुर्मिळ होत चालल्या आहेत.
१९९४ साली ज्यावेळी रवांडामधे वांशिक दंगली सुरु होत्या त्यावेळी मी केनयात होतो. नुसत्या चेहर्‍यावरुन एखाद्याची वांशिक ओळख कशी पटू शकते याचे मला नवल वाटायचे, मला सगळे आफ्रिकन चेहरे सारखेच दिसायचे. पण माझ्या चालकाने मला ते शिकवले. मग आम्ही बाहेर जाताना, समोरुन येणार्‍या माणसाचा वंश
मी अंदाजाने सांगून टाकत असे, आणि तो बर्‍याचवेळा बरोबर असे. पण आता मात्र तसे सांगणे अवघड होत चाललेय. याचे कारण अर्थातच मिश्र विवाह.. पण हे सगळे तूम्हाला अनोळखी. आपल्या ओळखीच्या चित्रपट
अभिनेत्रींकडे वळू या.
तनूजा आणि नूतनची आई, शोभना समर्थ आणि सुमति गुप्ते या खास सीकेपी चेहर्‍यांच्या होत्या. तनूजा आणि नूतनच्या चेहर्‍यात ती ओळख क्षीण झाली. काजोल आणि मोहनीशच्या चेहर्‍यात तर ती अजिबात नाही.

श्यामची आई साकार करणार्‍या वनमाला, आणि सुहास जोशी या दोघी टिपिकल कोकणस्थ ब्राम्हण चेहर्‍याच्या. त्यामूळे त्या त्या भुमिकात त्या फिट्ट बसल्या.

पुर्वी दाक्षिणात्य म्हणून एक चेहरा टाईप असायचा. पद्मिनी, रागिणी, वैजयंतीमाला, जमुना, बी सरोजादेवी, मधु या सगळ्या त्या साच्यातल्या. पण हेमामालिनी किंचीत वेगळ्या चेहर्‍याची. श्रीदेवी आणि जयाप्रदा तर
फारच वेगळ्या. आता तर हि ओळख पुसलीच गेली आहे.

सुचित्रा सेन चा चेहरा खास बंगाली, एकेकाळी दूर्गापूजेतल्या मूर्तीचा चेहरा तिच्यासारखा असे. मुनमुन सेन पर्यंत हि ओळख होती. रिमा आणि रायमा कडे मात्र तो चेहरा नाही.

आता सुश्मिता, ऐश्वर्या, कतरीना, प्रियांका यांच्याकडे ते प्रादेशिक चेहरेच नाहीत. आजकालच्या सौंदर्य स्पर्धेत सगळ्या मुली कशा, एका साच्यातून काढलेल्या दिसतात.... म्हणजे आपण सगळे एकाच वंशाकडे परत
जात आहोत का ?

ओके माधव, बदल केलाय.

माधव, यू ट्यूब वरुन डाऊनलोड करायचा एक नवा मार्ग सापड्लाय.

यू आर एल मधे, www. नंतर पण youtube च्या आधी PWN असे टाईप करायचे. आणि एंटर दाबायचे. मग एक गंमत होते.

वरती मी बांबूचा उल्लेख केला, आणि तो किती तर्‍हेने आपल्याकडे वापरला जातो, ते आठवले.
कोकण भागात तो भरपूर होतो. तिलारी घाटात तर मोठमोठी बने आहेत. माझ्या आजोळी ( कोल्हापूर जिल्हा)
घराच्या मागेच मोठे बन आहे. तो बांबू घेराला जरा कमी असतो आणि त्याला तिथे चिवं म्हणतात. त्याच्या
बेटाला चिवारीचे बन म्हणतात. त्याचे अनेक उपयोग असले तरी त्याचे कोंब खाण्यासाठी वापरत नाहीत.

खरे तर बांबूचे कोंब आपणच काय कुठल्याही प्राण्यांने खाऊ नयेत, अशी निसर्गाची अपेक्षा आहे. त्याच्या कोंबात सायनाईडचा विखार असतो आणि हत्तीसारख्या प्राण्यालाही ते माहित असते. एरवी बाभळीचे रोप आणि पालाच काय, अख्खे झाड करणारा हत्ती, बांबूच्या कोंबाच्या वाटेला मात्र जात नाही.

हा विखार घालवायचा ऊपाय, मानवाला मात्र माहीत आहे. या कोंबाचे ( यालाच वासोते म्हणतात ) बारीक काप
करुन ते पाण्यात १ त २ दिवस भिजत ठेवले, कि त्यातला बिखार पाण्यात उतरतो. मग ते पाणी टाकून, ते काप
स्वच्छ धुवून घेतले, कि खाण्यायोग्य होतात.

आपल्याकडे बांबुचे कोंब, कापायला आणि विकायला सरकारी बंदी आहे. पण तरीही ते बाजारात दिसतातच.
गोव्यातही आवडीने खाल्ले जातात. गोव्याच्या पद्धतीची (अर्थातच खोबर्‍याचे वाटण लावलेली) आणि आजरा
पद्धतीची ( चण्याची डाळ घालून केलेली) भाजी मी खाल्ली आहे. याशिवाय कुर्गी पद्धतीचे आणि आसामी
पद्धतीचे लोणचेही खाल्ले आहे.

थेट खाण्यासाठी नसला तरी अनेकही उपयोग आहेतच. या बांबूतच केरळमधे पुट्टू ( बहुतेक) या नावाचा प्रकार
शिजवतात. याचेच चाळणीसारखेउअपकरण करुन त्यात मोमो वाफवतात.
कोकणात रोवळी नावाचे एक बहूपयोगी उपकरण असते. त्याचा मान एवढा कि लग्नात देखील करवलीच्या
हाती ती असते. यात धान्य ठेवता येते तसेच तांदूळ, भाज्या खास करुन पालेभाज्या घुता येतात.
तळाशी चौकोनी आणि वर गोल होत जाणारी हि रोवळी, टिकाऊदेखील असते.

आणि सुपं. त्याचा आकारही खासच. धान्य पाखडण्यासाठी, निवडण्यासाठी त्याचा उपयोग होतोच.
पण धान्यातले भुसकट काढण्यासाठी, वारा घालण्यासाठी पण ते वापरतात. त्याचे आणखी काही मजेशीर
उपयोग करतात. पापड लाटून झाले कि तात्पुरते ते सुपावर वाळत घालतात. शेकोटीला वारा देण्यासाठी,
पण सुप वापरतात.

बांबूच्या कामट्या म्हणजेच पातळ पट्ट्या करुन, बुरुड लोक ज्या टोपल्या विणतात, ते अगदी बघण्यासारखे
असते. आधी रुंद पट्ट्यांचे एक चक्र करुन त्यात बारिक कामट्यांनी विणकाम करत, सुंदर आकार देतात.
आमच्याकडे गरम चपात्या / भाकर्‍या ठेवायला टोपलीच असते. यात भाज्या आणि फळेही चांगली
राहतात. गावाकडे आठवडी बाजारात बायका टोपल्याच घेऊन येतात. मजबूत तरीही हलकी असते ती.
कोंबड्याच काय बकरीची पिल्लेदेखील रात्रीची झाकायला टोपल्या असतात. आजोळी आमच्यासमोर एक
आजोबा रहात असत. निव्वळ हौस म्हणून त्यांनी आईला एक कांदे बटाटे ठेवायचे शिंकाळे विणून दिले होते.
ते बरीच वर्षे आम्ही वापरत होतो.

गावाला छपरावर चढायला जिना क्वचितच असतो पण घरोघरी शिडी मात्र असते. कणसे, वाळवण घालायला, कौले शाकारायला वर चढावेच लागते. बेगमीसाठी केलेल्या गवताच्या गंज्यापण, बांबूच्याच
आधाराने रचलेल्या असतात.
अगदी शहरातदेखील, इमारतीचे बांधकाम करताना, बाहेरुन प्लास्टर / रंगकाम करायला बांबूच्याच पराती
असतात. गणपतीचे मंडप, लग्नाचे मांडव या शुभकार्यालाच काय शेवटच्या यात्रेला पण बांबूच लागतो.

बांसरी आणि इतरही काही वाद्यांसाठी हा लागतोच. बांबूला किड्यांनी भोक पाडले असेल आणि त्या बनातून
वारा वहात असेल, तर बांबूतून शिट्टीसारखा आवाजही येतो.

बांबूच्या बिया खाता येतात. त्याचा भात किंवा खीर करता येते. फुलोरा आल्यावर बांबू मरतो पण त्या काळात उंदराची भरमसाठ पैदास होते. त्या उंदराना पकडायला देखील बांबूचेच पिंजरे करतात. बांबूच्या टोकाला चिणून,
त्यांनी मासे / खेकडे पकडायचे एक साधन करतात. अश्याच साधनानी, झाडावरची फळेदेखील अलगद, उतरवता येतात.
( हि दुर्मिळ फुले मला मुंबईत, फोर्ट युनिव्हर्सिटीच्या आवारात दिसली होती, त्याचा फोटो पण मी इथे टाकला होता.)

अनिल / बी याहून जास्त लिहू शकतील. पण आणखी एक मजेशीर उपयोग, माझ्या आठवणीतला, लिहावासा
वाटतोय.
बांबू आतून पोकळ असतो ( कधी कधी त्यात पाणी असते आणि ते पिण्यायोग्य असते ) याचा उपयोग करत
माझ्या आजोळी त्याच्या, रंगपंचमीला पिचकार्‍या बनवतात. नळी, दट्ट्या आणि हँडल, सगळेच बांबूचे. अगदी
मस्त लांब पिचकारी मारता येते त्याने. ( आई सांगते याच साधनाचा उपयोग करुन, ते त्यात काही बिया
भरुन, एक वाद्य बनवत असत. बांबुचे खुळखुळे आणि इतर खेळणीपण असत.)

ग्रीन अंब्रेला (NGO) चा ओनर विक्रम येंडे याच्याशी काल फोनवर बोलणं झालं. कॉमर्स बॅकग्राउंड असलेला आणि बॉटनीच जराही ज्ञान नसलेल्या विक्रमला झाडाविषयी कमालीची आत्मियता आहे. त्याने कळव्याला नक्षत्र बाग बनवली आहे. दुर्मिळ झाड वाढवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. उर्वशीचे एक रोप सध्या त्याच्याकडे, वरूण/वायवर्णचीही रोपे त्याने वाढवली आहे. विक्रम बरोबर बोलताना का कुणास ठावूक पण दिनेशदा तुमची आठवण येत होती. तुम्ही जे राणीबाग आणि इतर दुर्मिळ वृक्षाबद्दल जे बोलत असता नेमकं तेच तो बोलत होता. त्याला आपल्या निसर्गाच्या गप्पांविषयी,दिनेशदा,शशांक/शांकली, साधना, जागू, माधव आणि इतर सर्व मंडळींबद्दल सांगितले आहे. सध्या विक्रम एकटाच हा सारा पसारा सांभाळत आहे. येत्या शनिवारी मी त्याच्या नक्षत्र बागेला आणि ग्रीन अंब्रेलाबद्दल जाणुन घेण्यास जाणार आहे.

नमस्कार.
कालच आमच्या बाईंचे ( आमच्या अरविंद देशपांडे सरांच्या पत्नी ) एक पुस्तक वाचनात आलं. "बाग : एक जगणं " - लेखिका सरोज देशपांडे. जरूर वाचा. खुप छान आहे.

जिप्स्या, माझाच अवतार दिसतोय. नक्की भेटायचे आहे. आणि इथे यायचे आमंत्रण दे नक्की. फोटो टाकशीलच.

अवल, नक्की वाचू.

जिप्स्या, माझाच अवतार दिसतोय.>>>अगदी दिनेशदा. त्याच्याशी बोलतानाही मला असंच वाटंल<

जिप्स्या, शनिवारी कधी जाणार आहेस?>>>>माधव तुम्हाला फोन करणारच होतो आज याच संदर्भात. तुम्हाला जमेल का?

वंश - बांस - बांसुरी - बांबू >>>> वंश पुराण अतिशय सुंदर.....

बांबूची सुरुवातीची वाढ अतिशय हळु होते असे ऐकले आहे - हे खरे का ?

ग्रीन अंब्रेला (NGO) चा ओनर विक्रम येंडे याच्याशी काल फोनवर बोलणं झालं. कॉमर्स बॅकग्राउंड असलेला आणि बॉटनीच जराही ज्ञान नसलेल्या विक्रमला झाडाविषयी कमालीची आत्मियता आहे. >>>> बॉटनीत जास्त काम कोणी केले असेल तर नॉन बोटॅनिकल लोकांनीच - इति डॉ हेमा साने.

बहुतेक इंगळहळीकरांच्या पुस्तकात हा उल्लेख आहे की मुंबई-पुणे रेल्वे कामाकरता कुक (बहुतेक थिओडोर) नावाच्या इंजिनिअरची नेमणूक केली होती - बोरघाटातील विविध वनस्पती पाहून तो अतिशय हरखून गेला व त्याने बरोबरीच्या माणसांकरवी बहुतेक सगळ्या वनस्पती गोळा करुन त्याचे वर्गीकरण करायचाही प्रयत्न केला - कॅमेर्‍याअभावी सर्व वनस्पतींच्या विविध भागांची रेखाटने केली (पान, फुल, फळ, इ.), त्या भागांचा आकार, रंग वगैरे सर्व इतके पद्धतशीर लिहून ठेवले आहे की अजूनही त्याने गोळा केलेली माहिती सर्व बोटॅनिस्टही ग्राह्य धरतात. स्वतः इंगळहळीकर इंजिनिअर आहेत तर कासचे निरीक्षण, रक्षण करणारे हे संदीप श्रोत्री हे डॉ आहेत. तर आपल्या इथे दिनेशदा हे कॉमर्सवाले आहेत (बाकीच्यांनी त्यांचे कामाचे क्षेत्र दिले तर कळेल की इथेही नॉन्-बॉटनीवालेच अधिक आहेत)

जिप्सी - या विक्रमला भेटायला आवडेलच - तोपर्यंत त्याची माहिती इथे देत रहा. - विक्रमला आमच्या सर्वांतर्फे हार्दिक शुभेच्छा सांगणे.

आता हे उदार मनाने मान्य करु या, कि नवे प्रदेश, नव्या वनस्पति शोधण्याचे काम युरोपियन, अरबी आणि चिनी
प्रवाश्यांनीच केलेय. आपल्या हिमालयातील वनस्पतिंचेच नमुने गोळा करुन, कीव चे वनस्पति उद्यान सजले आहे. इतकेच नव्हे तर या लोकांनी, आपल्या कामाच्या व्यवस्थित नोंदी देखील ठेवल्या आहेत.

मला ( तसेच लेखक अविनाश बिनीवाले यांनादेखील ) असाच प्रश्न पडतो, कि या काळात भारतातील तरूण काय करत होते ? सगळेच काही, शेतीत / नोकरीत / स्वातंत्र्य चळवळीत नव्हते.

समुद्र ओलांडायचा नाही, नदी (पोहून) ओलांडायची नाही, अशी धार्मिक बंधने, हे कारण होते, कि मूळातच अतिसंपन्नतेमूळे, उत्सुकता जिज्ञासा नव्हती ?

बॉटनीत जास्त काम कोणी केले असेल तर नॉन बोटॅनिकल लोकांनीच - इति डॉ हेमा साने.>>>>>शशांक +१००००००००००० Happy

दिनेश, 'बाबा वाक्यं प्रमाणं' या उक्तीनुसार भारतीय समाज चालत होता तेंव्हा. म्हणजे प्राचीन काली आयुर्वेद रचल्यानंतर एक शिथिलता आली भारतीय समाजात. नविन नविन उपयोग शोधायची, lateral thinking करायची गरजच भासेनाशी झाली. शिवाय 'अशिष्याय न देयम्' हे पक्के मनावर बिंबवले गेल्याने (एकार्थी बरोबरही होते ते) बरेच ज्ञान लुप्त झाले. वर्गिकरण, दस्ताऐवजीकरण हे आपल्याकडे फारसे झालेच नाही. ज्ञान सहसा मौकिक पद्धतीने संक्रमित व्हायचे आणि त्याकरता आवश्यक असणारे सूत्ररुपी, श्लोकबद्ध साहित्य निर्माण होत गेले. Taxonomy चा विचार कधी झालाच नाही.

जिप्स्या, तुला संध्याकाळी फोन करतो.

<<<< बांबूची सुरुवातीची वाढ अतिशय हळु होते असे ऐकले आहे - हे खरे का ? >>>>>

असे ऐकले आहे कि, बांबूचे कोवळे कोंब शाकाहारी पशूंनी खाऊ नये म्हणून काही सेंटीमिटर उंचीचा बांबू कोंब रात्रभरात ४-५ फूट वाढतो.

जाणकार सांगतीलच.

बांबूचे कोवळे कोंब एका रात्रीत अनेक फूट वाढतात. अश्या कोंबांवर कैद्यांना झोपवून ठेवण्याची एक क्रूर शिक्षा चीनमध्ये होती असं वाचलं होतं. (बांबूचा कोंब वाढला, की भाल्यासारखा त्यांचं शरीर छेदून बाहेर पडायचा म्हणे)

बांबूची वाढ जलद होते पण मानवी शरीर भेदण्याइतकी नाही. समजा त्यावर कुणी झोपलेच, तर तो पण वर उचलला जाईल !

आणि शाकाहारी प्राण्यांनी तो खाऊ नये म्हणून त्यात सायनाईड असते. ते खाल्ल्याने / टोचल्याने मानवाला नक्कीच अपाय होईल.

माधव, मौखिक परंपरा होती आणि जे ग्रंथ होते ते मोगलांनी जाळले, म्हणजे आपल्याहाती काहीच उरले नाही.

समुद्र ओलांडायचा नाही, नदी (पोहून) ओलांडायची नाही, अशी धार्मिक बंधने, हे कारण होते, कि मूळातच अतिसंपन्नतेमूळे, उत्सुकता जिज्ञासा नव्हती ?

थोडीफार संपन्नता आणि अतीआळस ही दोन कारणे होती, आहेत आणि राहतील. सामाजिक बंधने जास्त होती, ती तोडायचे धाडस नव्हते. ती बंधने युरोपातही होती पण धाडसी वीर तिथे जास्त होते Happy

हं........... मस्त चाललंय! दिनेशदा, अनिल, माधव, शशांक सगळेच खूप इंटरेस्टिंग माहिती देताय.
दिनेशदा विशेषतः चेहेरेपट्टीवरून वंश ओळखण्याबद्दलची माहिती खूपच इंटरेस्टिंग!

Pages