निसर्गाच्या गप्पांचा १० वा भाग सुरु होत आहे हो$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
(मधला हार गुंफलेला फोटो शोभा कडून साभार)
मूलं भुजङ्गै:, शिखरं प्लवङ्गै:
शाखा विहंगै:, कुसुमानि भृङ्गै: |
नास्त्येव तच्चन्दनपादपस्य
यन्नाश्रितं सत्वभरै: समन्तात ||
हे आहे सुगंधी चंदनवृक्षाचं लेकुरवाळं चित्र; त्याच्या मुळांना सर्पाचं वेटोळं आढळतं. खोडाच्या टोकाकडे मर्कटवर्गीयांच्या लीला, पानापानात दडलेले पक्षीगण आणि फुलांवर रुंजी घालणारे भुंगे.
- डॉ. हेमा साने (वृक्ष - एक आधारवड, निसर्गायन, ऑक्टो. २०११)
(शशांक पुरंदरे यांच्याकडून)
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग ९) http://www.maayboli.com/node/35557?page=35
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf
शांकली खुप
शांकली खुप दिवसांनी...
कबुतरांची घराकडे परतायची ओढ प्रचंड असते. त्यांच्या या कौशल्यांचा उपयोग करुनच, पुर्वी त्यांचा संदेशवाहनासाठी वापर केला गेला. G I JOE हे एका कबुतराचे नाव होते.. पण त्याचेच अतिलाड झाल्याने, (कबुतरखाने वगैरे ) त्यांची संख्या प्रचंड वाढलीय आणि ते माणसांना जुमानेसे झालेत.
सुदुपार. आज इतक्या दिवसांनी
सुदुपार.
आज इतक्या दिवसांनी फोटो टाकताना खुप छान वाटत आहे. काल बेबि १ महिन्याची झाली.
साधना मागच्या गणपतींना मी तुझ्याकडे आले होते ती मला आठवण झाली होती.
जागू, ११ वा भाग तूझ्याच हस्ते
जागू, ११ वा भाग तूझ्याच हस्ते बरं का !
आमच्या सोसायटीमध्ये अगदी
आमच्या सोसायटीमध्ये अगदी पहिल्या मजल्यापासून जाणवतोय हा उपद्रव. कुणीतरी त्यांना खायला घालतं, त्यामुळे बेसुमार वाढलीय त्यांची प्रजा. आणि बंद घरांच्या टेरेस म्हणजे तर त्यांच्या हक्काच्या जागाच.
काल माझ्या डोळ्यासमोर त्याने झाडाची नासधूस केल्यामुळे फारच चिडचिड झाली. नेहेमी नासधूस होतंच असते, पण इतकी नजरेसमोर नाही.
दिनेशदा, ती निरोपाच्या देवाणघेवाणीची कबूतरं पांढरी असतात असा माझा (बॉलीवूडमुळे) समज होता. त्यांची संख्या जरा मर्यादेत वाटते. पारवे सुद्धा वापरायचे का निरोप पाठवायला?
जागुतै, मस्तंय फोटो!
सर्व निसर्ग प्रेमींना नमस्कार
सर्व निसर्ग प्रेमींना नमस्कार !!
सर्वांना गणेश चतुर्थीच्या अनेक शुभेच्छा !!
हो गौरी पारवेसुद्धा. एका
हो गौरी पारवेसुद्धा.
एका ठिकाणी दूरवर व्हाईट वॉटर राफ्टींग आहे. तिथे एक स्त्री फोटो काढते, तो रोल ती कबुतराच्या पाठीवर बांधते, आणि स्पर्धक मूळ ठिकाणी येईपर्यंत ते फोटो तयारही असतात... हे सगळे यू ट्यूबवरच्या एका माहितीपटात आहे.
एक्स्ट्रा ऑर्डिनरी बर्डस.. असेच काहीतरी टायटल आहे त्या माहितीपटाचे.
मलाही नेमकी तेव्हा तुझीच आठवण
मलाही नेमकी तेव्हा तुझीच आठवण आलेली
पुढच्या आठवड्यात असेल ना तुझ्याकडे साखरचौथीचा गणपती??
एकुणच मस्त रंगली आहे चर्चा.
एकुणच मस्त रंगली आहे चर्चा.
बर्याच दिवसांनी यायला मिळाले माबोवर.
चालुद्या मी मधे मधे येऊन अपडेट घेउन जाईन.
जिप्सी, तुला फेबु वर मी लिंक पाठवल्या होत्या त्या देना येथे.
ह्म्म्म... आत्ता सगळं संपवलं
ह्म्म्म... आत्ता सगळं संपवलं वाचून..
वा! शशांक पुरंदरे तुमचा
वा! शशांक पुरंदरे तुमचा दिनेशदा होतो आहे इतके छान लिहित आहात.
अरे जर तू नळी वर लिंका असतील तर द्या ना बघायला.
सुप्रभात ...........वाचतीये
सुप्रभात ...........वाचतीये !
शशांक पुरंदरे तुमचा दिनेशदा होतो आहे>>>>>>>>>>> बी +१००
जागुले..................मग १ महिन्याचा बड्डे कसा केला?...........तिला झाडातून फिरवून वगैरे आणलंस का?
...............घरात मुंगळे झालेत. गणपतीच्या समोरच्या गुळखोबरं फळं इ. वरही संचार चालू आहे.
काय करावं? घराचं पेस्ट कंट्रोल करायचंय पण एवढ्यात नाही.
वाचत आहे घरात मुंगळे
वाचत आहे
घरात मुंगळे झालेत.>>>>>>> यावरुन आठवलं.. मायबोलिकर लिंबुटिंबु यांच्या घरी जाण्याचा योग आलेला तेव्हा त्यांनी त्यांच्या घरातला एक मुंगळा दाखवला.. तो बरेच महिने त्यांच्या घरात वास्तव्य करुन होता, अन ठरावीक वेळी तो घरात फिरायचा देखील.. अजुन काहितरी मनोरंजक सांगितलं होतं पण ते आठवत नाहिये
वा! शशांक पुरंदरे तुमचा
वा! शशांक पुरंदरे तुमचा दिनेशदा होतो आहे इतके छान लिहित आहात. >>>> छे, छे, दिनेशदा इज दिनेशदा........ त्यांच्यासम तेच....... त्यांच्याकडे इतक्या गोष्टींचे भांडार आहे की बस्स... ते हिमनगाचे असते ना तसे आहेत ते - आपल्याला तर पाण्याच्या वरचाच भाग दिसतो आहे पाण्याखालील केवढा मोठा भाग झाकलेलाच आहे ....... त्यांचे आणिक एक वैशिष्ट्य म्हणजे - एवढे ज्ञानाचे भांडार असूनही ते अतिशय विनम्र आहेत, समोरच्या व्यक्तिच्या छोट्याशा गुणाचेही कौतुक करतात.... अशाच किती तरी गुणांनी समृद्ध...
मझ्याकडेही या कबुतरांनी आधी
मझ्याकडेही या कबुतरांनी आधी कोरफड आणि आता गुलाबाची वाट लावली.
आज शांकलीचा वाढदिवस---
आज शांकलीचा वाढदिवस--- हार्दिक शुभेच्छा !
( मी काहि वाचलेलं नाही वरचं, बरं का ! )
शांकली वाढदिवसाच्या शुभेच्छा
शांकली वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!!
शांकलीताई वाढदिवसच्या खुप खुप
शांकलीताई वाढदिवसच्या खुप खुप शुभेच्छा
वा. शांकलीला शुभेच्छा....
वा. शांकलीला शुभेच्छा....
शांकलीताईवर शशांकजी कविता
शांकलीताईवर शशांकजी कविता लिहून पोस्टणार आहेत..
शांकली, वाढदिवसाच्या शुभेच्छा
शांकली, वाढदिवसाच्या शुभेच्छा ! पार्टीला कधी, कुठे यायचे ते कळव.
शांकली, वाढदिवसाच्या हार्दिक
शांकली, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!.
शांकली, वाढदिवसाच्या
शांकली, वाढदिवसाच्या शुभेच्छा!
शांकलीस वाढदिवसाच्या हार्दिक
शांकलीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
शांकलीचे नाव अंजली आहे,
शांकलीचे नाव अंजली आहे, शांकलीला शुभेच्छा, म्हणजे दोघांनाही शुभेच्छा !
दिनेशदा, वा ! नविन आणि छान
दिनेशदा,
वा ! नविन आणि छान माहिती मिळाली..
शांकली,
वाढदिवसाच्या शुभेच्छा !
सर्वांना खूप खूप धन्यवाद.
सर्वांना खूप खूप धन्यवाद. शोभा, गौरी आणि जिप्सी फोटो आवडले. गौरी, त्या मन्या कित्ती गोSSSSSड आहेत गं!!
प्रज्ञा, तू म्हणशील तिथे जाऊयात पार्टीला!!
जागू, बाळाला शुभेच्छा..आणि गोड गोड पापा!! फोटो सुंदर आलाय....
अंजली, वाढदिवसाच्या हार्दिक
अंजली,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
जागू, माझ्याकडूनही बाळाला शुभेच्छा..आणि गोड गोड पापा!!
धन्यवाद उजू.. २/३
धन्यवाद उजू..
२/३ दिवसांपूर्वी मी एक गंमत बघितली......आमच्या ऑफिसच्या भोवती नुकतीच काही झाडं लावली आहेत. त्यांतल्या काही झाडांच्या भोवती जी आळी केली आहेत त्यात झेंडूची रोपं उगवली आहेत; आणि आता त्यांना खूप फुलं पण आली आहेत. त्या फुलांवर दुपारच्यावेळी लेमन कलरची बरीच फुलपाखरं बसत होती. पण एक गोष्ट जाणवली ती अशी, की काही फुलांवर फुलपाखरं खूप वेळ बसून त्यांतला रस पीत होती तर काही फुलांवर बसताक्षणीच उठून जात होती. वनस्पती सगळ्या फुलांमधे पुष्परस ठेवत नाहीत. पण फुलपाखराला ही गोष्ट एका क्षणार्धात कशी काय समजत असेल? कारण एखाद्या फुलात रस आहे की नाही हे बघण्यासाठी त्याला त्यात सोंड खुपसल्याशिवाय कळणार नाही आणि इथे तर ते बसल्याक्षणीच उठून जाताना दिसत होते. हा प्रकार बर्याचदा घडला. पण मी विचारात पडले; की कीटकांना वास बीस येतो का काय? किंवा त्यांना अगदी छोट्टंसं नाक असेल तर ते चांगलंच तीक्ष्ण असतं की काय? कोणाला सांगता येईल का?
शांकली वाढदिवसाच्या हार्दिक
शांकली वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जागूडे.... कस्ला सुंदर आहे गं
जागूडे.... कस्ला सुंदर आहे गं सोनटक्का!!.....(ढापायला आलं पायजे..)
Pages