उंच माझा झोका

Submitted by सानी on 13 March, 2012 - 05:59

ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया. Happy

Uncha Maza Zoka-Promo.jpgUncha Maza Zoka-News.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोडी मेलोड्रामॅटिक असली आणि तांत्रिक बाबीतील त्रुटी वगळल्यातर सासूसुनाच्या मूर्ख मालिकांपेक्षा कितीतरी उजवी आहे. एकदा कौटुम्बिक वातावरणातून बाहेर पडली व सामाजिक सुधारणांची पार्श्वभूमी सुरू झाली की अधिक रंगतदार होईल असे वाटते...

थोडी मेलोड्रामॅटिक असली आणि तांत्रिक बाबीतील त्रुटी वगळल्यातर सासूसुनाच्या मूर्ख मालिकांपेक्षा कितीतरी उजवी आहे> अगदी खरे.

अहिल्येचे काम करणारी मुलगी अनुबन्ध मालिकेमध्ये होती...तिने .सुहास परान्जपेच्या मुलीचे काम केले होते...

बाळू जोशी, अगदी मनातलं बोललात... नाही म्हणायला मध्यंतरीच्या काळात ही मालिकाही सासू-सूनवाल्या आणि नळावरचे भांडण टाईप वळणावर गेली होती, पण वीरेनने ती सावरली. रानडेंचे सामाजिक कार्य, इतर कार्यकर्त्यांसोबतचे त्यांचे संवाद, देशदौर्‍यावर जाण्यामागची भूमिका, नुकतेच वासूदेव बळवंत फडक्यांचे पात्र आणले, तेंव्हा जहाल आणि मवाळांची वैचारिक दिशा यावरील भाष्य, रमेशी ते स्त्रीयांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करत असतांना मांडत असलेली मते, त्याच वेळी सनातनांचा विरोध दाखवत असतांनाच्या त्यांच्याही भूमिका हे सगळं मालिकेत सर्वसामान्यांना समजेल, अशा सोप्या भाषेत मांडून मालिका छान गुंफत आहेत हल्ली. जीव लावून संवाद लेखनही करत आहेत, हे जाणवते... पाट्या टाकणे अजूनतरी इकडे सुरु झालेले नाहीये, हे नशीब.

अहिल्येचे काम करणारी मुलगी अनुबन्ध मालिकेमध्ये होती...तिने .सुहास परान्जपेच्या मुलीचे काम केले होते...>>> धन्स साधो, मी विचारच करत होते, या मुलीला आधी कुठे पाहिलं होतं याचा... लहान होती तेंव्हा ती. बरीच उंच झाली की आता!

वासुदेव बळवंत फडक्यांच्या भुमिकेत किरण करमरकरला बघुन आश्चर्य वाटले!!!! तो तर हिंदी वाला..... पण तो शोभत मात्र होता.....( आम्ही एकाच कॉलेजात एकाच ग्रुप मधे होतो)

चला त्या निमित्ताने चांगले कलाकार ह्या मालिके कडे वळले. स्प्रुहा जोशी जरा अल्लड नाही वाटणार ह्या भुमिकेला? कारण भुमिकेचा स्पॅन खुप मोठा आहे.....

अहिल्येचे काम करणारी मुलगी अनुबन्ध मालिकेमध्ये होती...तिने .सुहास परान्जपेच्या मुलीचे काम केले होते...>>> ती अजून कशात होती का? कारण मी अनुबन्ध पहिलेली नाही. पण तिला कुठेतरी पाहिले आहे.

हो मोकिमी, खुप छान वाटलं त्याला ह्या भुमिकेत पाहून... पण त्याचा गेस्ट रोल असावा, असं वाटतंय. अगदी थोड्या एपिसोड्सपुरता... सुरुवातीला ब्रिटिशही दाखवले होते, (त्यातला त्यांच्या घरी गेला होता, त्या सीनमधला कलाकार एडवर्ड सोनेनब्लिक- वारीवर आधारित गजर सिनेमातही होता.) आता पुन्हा नाही दाखवलं त्यांना कधी. असाच याचाही रोल असेल, असं वाटतं.

( आम्ही एकाच कॉलेजात एकाच ग्रुप मधे होतो)>>> सही!!!

स्प्रुहा जोशी जरा अल्लड नाही वाटणार ह्या भुमिकेला? कारण भुमिकेचा स्पॅन खुप मोठा आहे.....>>> तिच्या एलदुगोमधल्या रोलमुळे तसं वाटतं खरं... पण निभावून नेईल ती, असं वाटतंय...

असंभव मध्ये होती ना ती....सुनील बर्वेची मुलगी झाली होती.>>> हो हो बरोबर!!! बर्‍याच मालिकांमध्ये पाहिलंय म्हणजे तिला...

स्पृहा जोशी उत्तम काम करते, शंकाच नको Happy हे बेअरिंग तर अगदी व्यवस्थित निभावून नेईल.
मी एकही भाग पाहिला नाहीये. सासू-सून जाचातून मालिका बाहेर पडत असेल तर सुरूवात करावी काय? Happy

असंभव मध्ये होती ना ती....सुनील बर्वेची मुलगी झाली होती.>>> हो हो बरोबर!!!

स्पृहा सध्या 'लहानपण देगा देवा' या नवाक्षरी नाटकात आहे. सोबत लीना भागवत (लिसन काकू), शरद पोंक्षे आणि मंगेश कदम.

नाही सस्मित, हा स्पृहाचा पायगुण आहे. Happy या मोठ्या रमाला पहायची खुपच उत्सुकता आहे. पण छोटी जाणार याचंही दु:ख आहेच...

रमाबाईंच्या भुमिकसाठी आधी अमृता सुभाष, उर्मिला कानेटकर ,केतकी माटेगावकर, प्रिया बापट, मृण्मयी देशपांडे यांची नावे चर्चेत होती म्हणे -इति आजचा पुणे टाइम्स!

बरं झालं छोट्या रमेचं काम संपल ते! मला ती खूपच आवडते पण आता मोठ्या रमाबाईंवर कथा यायला हवी. तिची खरी शाळा आणि अभ्यास यावरही परिणाम होत असणार असे वाटायचे. तेजश्री वालावलकरची आठवण येत राहणार. स्पृहा येतीये म्हणून उत्सुकता आहे. त्यात कुहूचा भासही न होवो. Happy

खरचं छोटी रमा आता मोठी होणार...... खुप वाईट वाट्तयं Sad
पण ही माहिती खरी आहे का की..स्पृहा जोशी मोठी रमा म्ह्णुन येतेयं....
स्पृहाला या रोल मधे बघायला मजा येणार तर....... Happy

परवा ती अज्ञ मुलगी पाणी वगैरे घेऊन नवर्‍याच्या खोलीत जाताना बघायचा प्रयत्न केला. बघवले नाही. फडक्यांचा प्रवेश पाहिला. आता स्पृहा येणार असेल तर नक्की परत बघणे चालू करणार.

परवाच्या मटा मध्ये होत. अजुन बर्‍याच जणींची नाव होती. पण स्पृहाच नाव फायनल झाल मोठी रमाबई म्हणुन.
मला वाटत रविवारी एंट्री होइल तिची.

कोणी पाहीला की नाही एपीसोड?? >>>> मी पाहीला. स्पृहा खुप छान दिसत होती. पण......
कुहू काही केल्या डोक्यातून जाईना Happy

Pages