निसर्गाच्या गप्पांचा १० वा भाग सुरु होत आहे हो$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
(मधला हार गुंफलेला फोटो शोभा कडून साभार)
मूलं भुजङ्गै:, शिखरं प्लवङ्गै:
शाखा विहंगै:, कुसुमानि भृङ्गै: |
नास्त्येव तच्चन्दनपादपस्य
यन्नाश्रितं सत्वभरै: समन्तात ||
हे आहे सुगंधी चंदनवृक्षाचं लेकुरवाळं चित्र; त्याच्या मुळांना सर्पाचं वेटोळं आढळतं. खोडाच्या टोकाकडे मर्कटवर्गीयांच्या लीला, पानापानात दडलेले पक्षीगण आणि फुलांवर रुंजी घालणारे भुंगे.
- डॉ. हेमा साने (वृक्ष - एक आधारवड, निसर्गायन, ऑक्टो. २०११)
(शशांक पुरंदरे यांच्याकडून)
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग ९) http://www.maayboli.com/node/35557?page=35
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf
डेंटिस्ट काय म्हणतो आम्ही
डेंटिस्ट काय म्हणतो
आम्ही डेंटिस्टला घाबरतो, त्याच्या वा-यालाही उभे राहाय्चे टाळतो. म्हणुन तर अगदी कडक प्लाक गोळा झालाय.
डेंटिस्ट काय म्हणतो आम्ही
डेंटिस्ट काय म्हणतो
आम्ही डेंटिस्टला घाबरतो, त्याच्या वा-यालाही उभे राहाय्चे टाळतो. म्हणुन तर अगदी कडक प्लाक गोळा झालाय.
पण खरच असे ज्ञान वाढत असताना
पण खरच असे ज्ञान वाढत असताना तुमचा तो प्रश्ण दाताखाली खडा आल्यासारखा लागतो >>> व्हेरी व्हेरी सॉरी....
... कधीकाळी प्राध्यापकी केली होती मी ....त्याची आठवण येऊन तसेच इथेही लोकांना बोअर तर करत नाही ना असे वाटत रहाते झालं...
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> इतकी छान माहीती मिळताना बोअर होत नाही आणि या तर गप्पा आहेत. कशाही वळणारया, वाढणारया, चालणारया....
"वरुन कॅल्शिअम लावणे">>>
"वरुन कॅल्शिअम लावणे">>> म्हणजे फ्लोराईड ट्रिटमेन्ट का?
पण ती तर फक्त ६-८ वर्षापर्यंतच्या मुलांनाच देतात ना
छान माहीती मिळताना बोअर होत
छान माहीती मिळताना बोअर होत नाही आणि या तर गप्पा आहेत. कशाही वळणारया, वाढणारया, चालणारया....>>> +१
आफ्रिकन लोकांत दात मजबूत
आफ्रिकन लोकांत दात मजबूत असण्याचे कारण नेमके मला सांगता येणार नाही पण त्यांच्या आहारात तेल आणि मसाले खुप कमी असतात. ते लोक भरपूर श्रम करतात.
त्यांना फार मऊ पदार्थ खायला आवडत नाहीत ( ते जसे मक्याचे कणीस किंवा ऊस खातात, तसे खाणे आपल्याला शक्यच नाही. )
खाण्यात मका, कसावा, भाजलेले मांस वगैरे जास्त. केनयात दूध आणि फळेही जास्त. तिथे साधारणपणे एक व्यक्ती दिवसातून २/३ फळे आणि अर्धा लिटर दूध पिते आणि २/३ तास भरभर चालते.
सुप्रभात
सुप्रभात
मोनाली आणि मधुरा>>>>+१ शशांक
मोनाली आणि मधुरा>>>>+१
शशांक माहिती देतच रहा.
त्यांना फार मऊ पदार्थ खायला
त्यांना फार मऊ पदार्थ खायला आवडत नाहीत ( ते जसे मक्याचे कणीस किंवा ऊस खातात, तसे खाणे आपल्याला शक्यच नाही. )
मला अचानक पु.ल. आठवले... 'दातातली शक्ती मऊ पदार्थ खाल्ल्याने नष्ट होते, भातसुद्धा आमच्याकडे अर्धाच शिजलेला असतो. ऐकताऐकता मी चुकुन अडकित्याने शंकरपाळी कातरायला लागलो :)' - बटाट्याची चाळ
नितीन, फुलांचा फोटो बघून,
नितीन, फुलांचा फोटो बघून, मला वाटलं जागूच आली कि काय !
साधना, शेवटी आपण दोघेच उरतो ना अशा सहलींना !
अगदी आताचे दिवस गोव्याच्या ट्रिपसाठी चांगले आहेत. गणपतिला वेळ असल्याने निवांत असेल तिथे, पावसाचा भर पण कमी झालाय, भात खाचरे हिरवीगार असतील, तामडी सुर्लाच्या नदीला पाणी असेल, साखळीच्या घाटावर,
तिलारीच्या धरणात, हणजूणेच्या धरणात..... भरपूर पाणी असेल.
आज सकाळपासून सलग ६ - ७ पोस्ट
आज सकाळपासून सलग ६ - ७ पोस्ट लिहिता लिहिता नेटने दगा दिला.....
आता काय काय लिहिलं होतं हे सगळं आठवून लिहायचं म्हणजे प्रॉब्लेमच आहे...
आम्ही डेंटिस्टला घाबरतो, त्याच्या वा-यालाही उभे राहाय्चे टाळतो. म्हणुन तर अगदी कडक प्लाक गोळा झालाय. >>> अरेरे असं कसं चालेल, वाटल्यास चांगला डेंटिस्ट गाठा पण टाळू नका अजिबात.....
पूर्वी डेंटिस्ट फक्त किडलेले दात काढायचा, फारच काम म्हणजे कवळी बसवणे....
पण सध्या - रुट कॅनलिंग, सगळे दात खराब झाले किंवा गमावले तरी संपूर्ण कृत्रिम दात प्लांट करणे, फटी बुजवणे, ब्रिजिंग करणे, कॉस्मॅटिक डेंटिस्ट्री, कॅल्शिअमची कमतरता भरुन काढणे व असे अजून बरेच काही डेंटिस्ट करत असतो जे आपल्या हिताचेच असते.
माझी मुलगीही आधी डेंटिस्टला जाम घाबरायची - पण १-२ डेंटिस्ट बदलून एक नवीन जो मिळालाय तो खूप चांगला आहे - सविस्तर माहिती देतो - दातांची काही ट्रिटमेंट करत असताना दुखणार नाही याची काळजी घेतो - अँटिबायॉटिक ही पोट बिघडणार नाही (किंवा कमी बिघडेल) असे देतो....
पण डेंटिस्ट इज मस्ट..... त्याला पर्यायच नाही - किंवा पुढचा जन्म आफ्रिकेतला मागणे..
,<<< त्यांना फार मऊ पदार्थ खायला आवडत नाहीत ( ते जसे मक्याचे कणीस किंवा ऊस खातात, तसे खाणे आपल्याला शक्यच नाही. ) >>>>
"वरुन कॅल्शिअम लावणे">>>
"वरुन कॅल्शिअम लावणे">>> म्हणजे फ्लोराईड ट्रिटमेन्ट का?
पण ती तर फक्त ६-८ वर्षापर्यंतच्या मुलांनाच देतात ना >>>>
कॅल्शिअम ट्रिटमेन्ट वेगळी आहे - माझी मुलगी १७-१८ वर्षाची आहे, तिच्या दातात कॅल्शिअमची कमतरता आहे - तिला आता ही ट्रिटमेन्ट सुरु करणार आहोत - तिच्या दोन्ही बाजूच्या (वरचे व खालचे) दाताचे साचे डेंटिस्टने घेतले आहे (अल्जिनेट वापरुन) - आता तो काही द्रावण (पेस्ट) देईल जी दररोज रात्री झोपायच्या आधी १०-१२ मिनिटे त्या साच्यात घालून दातावर लावून ठेवायचे - डेंटिस्टच्या म्हणण्यानुसार त्या पेस्टमधील कॅल्शिअम आपले दात शोषून घेतील -काही आठवडे (किंवा काही महिने) लागतील या प्रक्रियेला - मग डेंटिस्ट सांगेल केव्हा हे थांबवायचे ते -त्याच्या म्हणण्यानुसार हे एकदा केले की पुढे १५-२० वर्षे तरी काही प्रॉब्लेम येऊ नये. मला तरी त्याचे म्हणणे (थेअरी) पटले आहे - ही ट्रिटमेंट पूर्ण झाली की लिहिनंच मी आठवणीने - कितपत ही ट्रिटमेंट यशस्वी झाली ते.
ओह असे आहे होए. धन्स शशांक
ओह असे आहे होए. धन्स शशांक
२५ ऑगस्ट २०१२, "सिटी वॉक",
२५ ऑगस्ट २०१२, "सिटी वॉक", नॅशनल पार्क, बोरिवली.
"climbing fern" हे नेचे प्रकारातील आहे, पण झाड नसून वेल आहे. सुरवातीला पाने साधीच असतात (दुसरया चित्रासारखी), नंतर त्याला फ्रिल येते.
सोबत कांचन ही दिसत आहे.
मी पण फार घाबरायचो
मी पण फार घाबरायचो डेंटीस्टकडे जायला, पण गोव्याच्या डॉ प्रिती वळवईकर यांनी इतके सुंदर काम केले, कि माझी भिती पार गेली. पण आता परत जायची गरज नाही उरली. रुटीन चेकप साठीच जातो.
प्राण्यांमधे उंदीर आणि त्या वर्गातले प्राणी, दाताच्या बाबतीत लकी, त्यांचे दात कायम वाढतच असतात. ते झिजावेत म्हणून त्यांना सतत काहीतरी कुरतडत रहावे लागते, शार्कला तर लाटांप्रमाणे नवे नवे दात येत असतात.
मधु,
नेचे आणि सूचीप्रणी झाडे हि वनस्पति सृष्टीतली आदीमानव. त्यांची जी काय पुनरुत्पादन करायची खास पद्धत आहे, ती लाखो वर्षांनी देखील, आजही यशस्वी ठरलीय.
एका वर्षी मीही गेले होते
एका वर्षी मीही गेले होते नेचरवॉकसाठी सिलोंड्याच्या जंगलात मुंबइ विद्यापिठाबरोबर.
दिनेश जेव्हा जाल गोव्याला तेव्हा हाक मारा तुमच्याबरोबर फिरायला मजा येईल. तुम्हाला खुपच माहिती आहे तिथली. नुस्ते फिरण्यात मजा नाही, सोबत त्या विषयाची रुची असलेले लोक पाहिजेत.
एप्रिलमध्ये लेकिची परिक्षा संपली की ८ दिवस गाडी घेऊन कर्नाटक फिरायचा बेत आखतेय मनातल्या मनात. देवा.. तथास्तु बोलत राहा रे बाबा...
ईनमीतीन, छान
ईनमीतीन,
छान फोटो.
शशांकजी,
तुम्ही देत असलेल्या अशी माहिती आमच्यासारख्या नवशिक्यांना तर खुप उपयुक्त ठरत असते,चांगलं जगण्यासाठी उपयोगी पडते.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/37499 ...जागूच्या दोन्ही लेकींसाठी....
प्राण्यांमधे उंदीर आणि त्या
प्राण्यांमधे उंदीर आणि त्या वर्गातले प्राणी, दाताच्या बाबतीत लकी, त्यांचे दात कायम वाढतच असतात. >>>> नागासारख्या विषारी सापांचे दात जर काढून टाकले तर सहा महिन्यात परत येतात.
मी हाफकिन इन्स्टिट्यूटमधे वर्षभर (१९८०) असताना तिथे विषारी सापांविषयी, विंचवाच्या विषासंबंधित खूप गमती जमती तर काही हृदयद्रावक गोष्टी समजल्या.
१] हाफकिनमधे त्या वेळेस सर्प दंशावरची लस बनवायचे - त्याकरता अनेक जण त्यांना विषारी साप आणून द्यायचे (नाग, घोणस, फुरसे व मण्यार). जी मंडळी ही विषारी साप आणून द्यायची त्यांना पैसे कसे देत असतील - सापाची लांबी मोजून - जास्त लांब साप तर जास्त पैसे...
२] मुंबईत त्यावेळेस अजगरांच्या कातडीपासून अनेक वस्तू (बेल्ट, पर्सेस, इ.) बनवायचे - अर्थातच बेकायदेशीर त्यामुळे अजगरांना वाढती मागणी होती - पण त्यांची कातडी काढायची पद्धत फारच अमानुष होती - जिवंत अजगराला एका उभ्या लाकडी प्लॅटफॉर्मवर डोक्यात एक खिळा ठोकून टांगत व सरळ त्याची कातडी सोलून काढत (हे हाफकिनमधे करत नसत पण तिथे जी मंडळी विषारी साप आणून देत त्यांच्याकडून हे समजले)
आपल्या हव्यासापायी माणूस कुठल्या थराला जाईल काही सांगता येत नाही...
३] गारुडी मंडळीही पैशाकरता काय करायचे तर - नागाच्या तोंडात दाभणीने काही केसांचे पुंजके घालून त्याचे तोंड शिवून टाकायचे - असे साप मिरवत लोकांकडून पैसे उकळायचे - लोकही असे हुशार की मिशावाला साप म्हणून जास्त पैसे देणार- काही दिवस तो नाग जगायचा पण तोंडच शिवल्यावर बिचारा तडफडून मरायचा - तो मेला की दुसरा पकडून त्यावर असलेच उद्योग... माणसाइतकी क्रूरता कुठेच नसेल...
(इथे मला माणसाच्या क्रूरतेचे दर्शन घडवायचे नसून -चुकून आपणही असे प्राण्यांपासून तयार केलेल्या गोष्टी तर वापरत नाही ना याची जाणीव करुन द्यायचीये..... काही शूर वीर गळ्यात हे मोठं सोन्याचं लॉकेट घालून मिरवतात - काय आहे त्या लॉकेटमधे तर "वाघनख"- वा वा वा काय ती शूरता????)
ते डिस्कव्हरी वगैरे चॅनेलवर ते जंगली प्राणी कारण नसताना केवळ आपल्याला (प्रेक्षकांना) दाखवायला हाताळतात त्याचाही मला प्रचंड राग येतो - त्याचे नुसते शूटिंग घ्याना, त्याला हाताळायचे कशाला???
इथे मला माणसाच्या क्रूरतेचे
इथे मला माणसाच्या क्रूरतेचे दर्शन घडवायचे नसून >> चूक दाखवून तर द्यायला हवीच ना शशांक? तुमच्याशी १००% सहमत या बाबतीत.
३] गारुडी मंडळीही पैशाकरता
३] गारुडी मंडळीही पैशाकरता काय करायचे >>>>>
१०-११ वर्षांपूर्वी, नागपंचमीच्या दुसरया दिवशी नॅशनल पार्क, बोरिवली येथे गेलो होतो. तिथे पकडलेल्या साप / नागांचे rescue operation चालू होते. तेव्हाच्या वन-अधिकारयांनी दाखवले की सापांचे तोंड शिवले आहे, फक्त जीभच बाहेर येऊ शकते. गारूड्यांनी सापांना दूध पाजले होते. दूध सापांचे नैसर्गिक अन्न नाही. त्यामुळे साप दगावू शकतात. वन-अधिकारी सापांचे तोंड सोडवणे आणि त्यांना अंड्याचा बलक भरवणे असे जिकरीचे काम करत होते.
आता मुंबईत तरी नागपंचमी सापवाले दिसत नाही. पण दिसला साप कि मार असे प्रकार माझ्या कॉलनीतसुद्धा होतात. वाईट वाटते.
मध्यंतरी प्रत्येक चित्रपटात,
मध्यंतरी प्रत्येक चित्रपटात, या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान कुठल्याही प्राण्याला इजा करण्यात आलेली नाही, असा एक फलक दाखवत असत. आता तसे दिसत नाही. लाँग विकेंड सारख्या चित्रपटात तर अनेक प्राणी,
मारतानाच दिसलेत.
.
.
ते डिस्कव्हरी वगैरे चॅनेलवर
ते डिस्कव्हरी वगैरे चॅनेलवर ते जंगली प्राणी कारण नसताना केवळ आपल्याला (प्रेक्षकांना) दाखवायला हाताळतात त्याचाही मला प्रचंड राग येतो - त्याचे नुसते शूटिंग घ्याना, त्याला हाताळायचे कशाला???>>>>>> शशांक अगदी सहमत! आणि वाघनखांबाबतही.
जुन्या मुंबई पुणे रस्त्यावरून बदलापूरला जाताना दिसलेली हिरवाई
सगळ्यांचे मनपुर्वक धन्यवाद.
सगळ्यांचे मनपुर्वक धन्यवाद. आज माझी दुसरी छोटूकली ८ दिवसांची झाली. श्रावणीपण तिचे खुप लाड करते. तिच्या बाल लिला पाहण्यात तिचे बाबा दंग असतात. आमच्या घरात सध्या आनंदी आनंद आहे. तुम्हा सगळ्यांचे आशिर्वाद तर पाठीशी आहेतच. माझा वेळ दोघींच्या भोवतीच जातो. प्ण आता मधून मधून मी येईन इथे. अजून तिचे नाव ठेवले नाही. तुळ रास आणि र शब्द आला आहे. बारसे सावकाश ऑक्टोबर मध्ये करु श्रावणीच्या वाढदिवसाला.
बाकी इथे खुप छान छान फोटो पाहीले माहीती नंतर सावकाश वाचेन.
जागू, एवढी सवड काढलीस त्याने
जागू, एवढी सवड काढलीस त्याने खुप आनंद झाला. वेळ मिळेल तशी येत जा.
अरे वा जागू - खूप छान वाटले
अरे वा जागू - खूप छान वाटले तुला इथे बघून....... तुझी धाकटी जेव्हा बोलायला लागेल ती बहुतेक एकदम बोटॅनिकल नावेच उच्चारेल असे वाटते मला.... तुझ्यामधील निसर्गाची आवड नक्कीच तिच्यात उतरणार..
मी हाफकिन इन्स्टिट्यूटमधे वर्षभर (१९८०) असताना तिथे विषारी सापांविषयी, विंचवाच्या विषासंबंधित खूप गमती जमती तर काही हृदयद्रावक गोष्टी समजल्या. >>>>
हाफकिनमधे तेव्हा विंचवांचे विषही काढत असत - तो प्रकार तेथील लोकांनीच शोधला होता व खूप गमतीशीरही होता....
फार्फार वर्षांपूर्वी जेव्हा रस्त्यांवर सायकलीच सायकली होत्या तेव्हा डायनॅमोच्या सहाय्याने सायकलला दिवा लावला जात असे (एका छोट्या डबीसारख्या उपकरणात एक लोहचुंबक असे - ते उपकरण मागील चाकाला असे लावत की त्या चाकाबरोबर ते मॅग्नेट फिरत असे व सौम्यसा विद्युतप्रवाह तयार होऊन त्यावर तो दिवा लागत असे)
हे सर्व सांगण्याचा इथे संदर्भ असा की विंचवाचे विष काढायला ती मंडळी डायनॅमोचा वापर करीत - सौम्यसा विद्युतप्रवाहाचा झटका त्या विंचवाच्या नांगीला बसला की त्या नांगीच्या टोकावर बारीक थेंबभर विष जमा व्हायचे - असे अनेक विंचवांचे विष काढून त्यापासून हाफकिनमधील मंडळी लस तयार करायची.....विंचूदंशावरील लस...
लहान बाळाला चाली चाली करत
लहान बाळाला चाली चाली करत पहिले पाऊल टाकायला तूम्ही सर्वानीच मदत केली असेल. तूम्ही हे लक्षात
घेतलेय का, कि बाळाला हाताने वस्तू पकडायला शिकवावे लागत नाही. हाताजवळ वस्तू आली कि ती पकडायची,
हे त्याला बरोबर कळते, मग पावले टाकायला, का बरे प्रयत्न करावा लागतो ?
बॅले नर्तिकांना बघितले असेल तर त्या पायाच्या अंगठ्यावर पुर्ण देहाचा भार संभाळून नाचतात. अर्थातच त्यासाठी खुप सराव करावा लागतो. मुलींना देखील, हाय हिल्स वापरुन, चालायला सहज जमते.
आता मी एक सोपा प्रयोग सांगतो. पायातले बूट किंवा चप्पल काढा. खालच्या दिशेने तूमच्या पायाचा तळवा,
बराच वाकू शकतो. आता तो तळवा, म्हणजेच पाऊल वरच्या दिशेने वळवून बघा ? किती वर येतेय ? अगदी
हाताने ओढलेत तरी २० अंशांपेक्षा जास्त वर येणार नाही ( आणखी जोर लावू नका, अशक्य आहे ते.)
नारळाच्या झाडावर माणसे चढताना बघितलीत ? दोन्ही पाय एका दोरीने एकत्र बांधून झाडाच्या दोन बाजूंना पावलांनी मिठी मारून, वर चढतात ती. आता कल्पना करा जर आपले पाऊल वर आले असते, म्हणजे अंगठा
पायाच्या नडगीला लावता आला असता, तर झाडावर चढणे जरा सोपे गेले असते कि नाही. म्हणजे हाताच्या
पकडीने शरीराला खोडाच्या जवळ न्यायचे आणि पावलांचा जोर लावू, खोडाला दूर लोटायचे.
अगदी सहज चढता आले असते, पण नाही...
चिंपांझिंसारख्या आपल्या पुर्वजांनी, ज्यावेळी झाडावर चढणे सोडून, जमिनीवर पळायला सुरवात केली, त्यावेळी
हि क्षमता आपण गमावली. एकदंरच आपले पाय, कंबर, नितंब हे फक्त जमिनीवर चालण्यासाठीच आहेत.
आता माकडांना झाडावर चढताना बघा... !
ऐ हा>>य ,जागुले.. सध्या तुझा
ऐ हा>>य ,जागुले.. सध्या तुझा वेळ किती बिझी जात असेल त्याची संपूर्ण कल्पना आहे तरी येथे आलीस त्याचा आनंद झाला.. जसा वेळ मिळेल तशी येत जा डोकवायला इकडे!!
शशांक,बाप्रे सापा/ नागांची चांगलीच दुर्दशा होत असेल.. बिच्चारे!! किती यातना सहन करत असतात आणी लोकं त्यांना दूध पाजून त्यांचा आशिर्वाद मागत असतात.. )
आपल्या श्रद्धास्थानी असलेल्या नागदेवाचे चाललेले हाल दिसून येत नाही का त्यांना??
मिडिया ने वारंवार या घटनांचे वारंवार प्रसारण केल्यास गावागावातून या अन्धश्रद्धेला आळा बसेल कदाचित!!..
दातपुराण इंटरेस्टिंग आहे.. शशांक च्या पुढच्या रिपोर्ट ची वाट पाहात आहे..
रोज दहा पंधरा मिनिटे पेस्ट लावून बसायचे म्हंजे लेकीला कसरतच आहे.. होप इट वर्क्स वेल
दिनेश दा..वेरी वेरी
दिनेश दा..वेरी वेरी इंटरेस्टिंग!!!!
Pages