एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भुंग्या काही म्हन्ला की तुटुन पडले तेच्यावर स्वोता काही रुल काड्तात तेंव्हा नै दिसत कै.
मंजुडी तुला वाहत्या बिबिवरचे पन खटकते (बॉस) म्हनुन तुझे असे म्हनने झाले असेन.

कथेत काहीही विशेष होत नसलं की असं होतं बघा......

काँट्रॅक्ट मॅरेजपायी आता काँट्रॅक्ट मंगळागौर...... त्यात आता मंगळागौर मंडळ पण कॉंट्रॅक्टवर बोलावणार >>>>

है शाब्बास भुंग्या! आता कशी मस्त अनुमोदनीय पोस्ट लिहिलीस Proud

अहो अश्विनीमामी, विनय आपटे सिंगल पेरेंट कसा? आत्याबाई नाहीयेत का त्याच्या जोडीला? Proud

विनय आपटे सिंगल पेरेंट कसा?????
>>>>>>>>>>>>>>>

मग तसे बरेच सिंगल आहेत सिर्यलीत ह्या...... Proud

विनय आपटे, आसावरी जोशी...... आणि साक्षात माईआज्जी सुध्दा Light 1

आहो डी,आत्याबया ला संसार आहे ना तिचा. कधीकधी पतीस डाट्त असते फोन करून ते? आणि ती आत्ता आली. मुलीस विनयनेच वाढवले आहे कि. क्या यार. शिरेअलीतला हा ट्रॅक आणि उलकी जमले आहेत.

आत्याबया ला संसार आहे ना तिचा.>> पण तो फोनवरूनच सुखाने होतोय की....

आणि ती आत्ता आली.>> आपल्याला कै माहीत आत्ताच आली की आधीपासून येतेय ते Uhoh उरलेसुरले संस्कार ती राधावर करतच असते की सारखीच...

आपल्याला काय माहीत आत्ताच आली ते?>> हे तर फारच रिअ‍ॅलिस्टिक झालं. Happy पण कधी राधा कडूनही ऐकलं नाही. लहानपणच्या आईबाबांच्याच आठवणी असतात तिच्या नॅरेशन मध्ये. आत्या ती आत्या. बाबा तो बाबा Happy

आता सगळ्या मालिकांमधे मंगळागौरीचा सिझन की काय? ऊंमाझो मधेही रमेची मंगौ होती ना?

तसे बघायला गेलं तर मलिका एका भागातही संपू शकते. घनाने फक्त निर्णय द्यायचा बाकी आहे, हो किंवा नाही. बाकिच्यांच्या श्टोरी मधे कुणालाही रस नाही आहे. एक भाग घधाशिवाय दाखवला तर सगळे कोपले Happy

ती कुहू सारखी हसते आणि आढ्याकडे/वर कुठेतरी बघत बोलते. ती लग्न करणार म्हटल्यावर मलाही वल्लभ काकांसारखा प्रश्न पडला होता, 'कुहू खरच मोठी झाली आहे का?' पण त्यांच्या प्रश्नाचा अर्थ वेगळा होता.......'कुहू इतकी मोठी झाली?'
ती फक्त अबीरशी बोलतानाच नॉर्मल दाखवली आहे. त्याच्याशी नीट, व्यवस्थित बोलायची आणि प्रभातशी बोलताना त्याच्या उलट.

इथे समोर दिस्ते आहे नवरा/ सासू काळजीत आहे तरीही इला काकूंनी पिडले क्वाऑय होते आहे तुम्हाला ऑस्स्स का बॉलताय.>>अश्विनीमामी अगदी अगदी. जो दिसेल त्याला काय झालं? अं? काय झालं? असे उदास का दिसताय? काय चालले आहे घरात? कसलं टेन्शन? कारण काय? अं? कशामुळे? मला सांगणार नाही का? कोड्यात का बोलताय?
घरातल्या लोकांनाही काही कळत नाही ती आपली आपल्या कामात मग्न असते तर उगा तिला पिन मारुन निघून जातात. मग ती बसते सगळ्या जगाची काळजी करत.

ती राधा अजुन घनाची वाट बघत आहे. 'लग्नाचा वाढदिवस हा लग्न मोडण्याचा मुहूर्त नाही ना असू शकत'...मग हिला लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा आहे का?

अनेक विषयांवरचे हिंदी, इंग्लिश भाषेतील विविध ब्लॉग वाचल्यावर 'मायबोली' ची माहिती मिळाली. काही कथा, कविता, आठवणी वाचल्या खूप छान होत्या. मायबोलीमधून काही वाचायला मिळाले त्यामुळे रस वाढत गेला. 'एलदुगो' हे सूत्र वाचेपर्यंत सुखी होतो. मला खटकणाऱ्या गोष्टी इथे मांडतो कुणाला वाईट वाटल्यास नाईलाज आहे.

- ठराविक कंपू सोडून इतरांच्या मताला इथे किंमत नाही.

- आपल्या कंपूतील कोणीही भिकार मतप्रदर्शन केले तरी त्याची वाहवा करायची.

- आपणच सुरु केलेल्या सूत्रावर आपण वा आपल्या कंपूतील कोणीही टीका केली तरी चालेल इतर कुणी केली तर झोडून काढणे.

- नवीन कुणाला शिरकाव करू न देणे त्याला/तिला पूर्ण दुर्लक्षित करणे.

सामान्यपणे अशा ब्लॉग वर नवीन मित्र-मैत्रिणी जोडले जातात जरी मत भिन्न असली तरी. पण इथे ठराविक सभासदच एकमेकांना प्रतिसाद देत असतात. चर्चा टाळण्याकडेच कल जास्त असतो. आपल्याबरोबर इतरांना सामावून घेणे इथे दिसत नाही. चर्चा, वादविवाद उत्तम पद्धतीने केल्यास सगळ्यांनाच फायदा होतो. एकीकडे मालिकेवर टीका करायची आणि दुसरीकडे तिचीच पारायणे करायची आणि त्याला इतरांनी अनुमोदन द्यायचे हे इथेच पाहिले. ह्या मायबोलीनेच २-३ कथाकारांना वाव दिला आणि त्यांची स्कीट टीव्हीवर दाखवली गेली. त्या कथाकारांना जर इतर सभासदांनी प्रतिसाद दिला नसता तर त्यांना एवढे यश मिळाले असते का? जी व्यक्ती सूत्र सुरु करते त्याने तरी ह्या गोष्टींचा विचार करायला हवा, का पोस्टी २००० -३००० झाल्या की नाही हेच त्यांना बघायचं? म्हणजे संख्यात्मक वाढच व्हायला पाहिजे. 'मायबोलीचे' जे प्रवर्तक, सूत्रधार असतील त्यांनी जरा लक्ष घालावे. एकतर मराठीत चांगले ब्लॉग कमी आहेत, आपल्याकडे लिहिणारे ही दर्जेदार आहेत त्यांना जर चांगला प्रतिसाद मिळाला, कंपूशाहीतून वाव मिळाला तर खूप चांगले वाचायला मिळेल. नाहीतर .... आपण मराठी माणसे प्रसिद्ध आहोतच एकमेकांचे पाय ओढण्यासाठी!

बाप रे .. मंगळागौर (ती चालीत न बसणारी मंगळागौरीची आरती), राधा सेलिब्रेशन च्या मुड मधे नसतान उगीच ते नथ नौवारी वगैरे नटणं , खेळ , लाजून नाव घेणे ... अ श क्य अतिरेक झाला आज Uhoh

कुहूची आई काल "सत्यनारायण घालूया" म्हणाली..... अ ओ, आता काय करायचं

मला वाटलं आता साड्यांमध्ये पण एखादा "सत्यनारायण पॅटर्न" आला की काय >>>>>>>>>>> तुमच्यात फुगडी प्याटर्न साड्या आता आऊट ऑफ फॅशन झाल्या असतील नाही का?

काल मला राधाचा खूप राग आला. "मी घरच्याना सोडून जाऊन त्यांना खूप दुखावणार आहे' म्हणजे काय? ती स्वतःची चूक असल्यासारखी का वागतेय? आणि पुढे त्यांना दुखावणार आहे म्हणून आता त्यांना आनंदाचे क्षण मिळवून द्यायचे हे काय लॉजिक आहे? उलट शक्य तितक्या लवकर त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिली तर बरं नाही का? मंगळागौर झाली म्हणून बिघडत नाही पण असल्या वागण्याने घना सोकावतोय त्याचं काय? घरात काही लोकांना ही बाब माहित झाली आहे ना? मग घनाच्या आईबाबांना सांगून टाकावं तिने आणि माहेरी निघून जावं. घरात ही गोष्ट आपल्याला सगळ्यात शेवटी कळली आहे ते घनाच्या आईबाबांना समजेल तेव्हा त्यांना किती वाईट वाटेल ह्याचा विचार केलाय का तिने?

मंगळागौरीत फारसाउत्साह दिसला नाही. मधे मध्ये नेट स्लो होतं तशी राधा ब्लँक होत होती बहुतेक.
त्यामानाने रमेची मंगौ जास्त ऑथेंटिक चित्रिकरण होते. राधाला स्वतःला त्रास होतो आहे त्याचे काय?
मला ही कसे तरी झाले तिची धडपड बघून.

घनाने काल काही जबरी कोड/ प्रॉग्रामिग सद्रुश्य संवाद म्हटले. तो अमेरिकेत गेला तर नक्की गूगल/ फेसबुक टेक ओवर करणार असा एकंदरीत आत्मविश्वास होता.

घनाने काल काही जबरी कोड/ प्रॉग्रामिग सद्रुश्य संवाद म्हटले. तो अमेरिकेत गेला तर नक्की गूगल/ फेसबुक टेक ओवर करणार असा एकंदरीत आत्मविश्वास होता.
>. ते का ही ही होते..
आय टी बॉस ला कोण सर म्हणत का?
कोड मेल कशाला करायचा? रिपॉझिटरी नाहि का?

घनाने काल काही जबरी कोड/ प्रॉग्रामिग सद्रुश्य संवाद म्हटले. तो अमेरिकेत गेला तर नक्की गूगल/ फेसबुक टेक ओवर करणार असा एकंदरीत आत्मविश्वास होता.

ख्याक
मेलो
खपलो
वारलो
गच्कलो
चचलो
महा निर्वाणलो =)) =))

'फुगडी प्याटर्न साड्या' बाऊन्सर गेलाय अनेकांना, वैद्यबुवा !
बाकी तुमचे चष्मा पॅटर्न साड्यांबद्दल काय मत आहे, हे कळवल्यास आनंद होईल. Wink

इला भाटे मोड ऑनः

ऑरे ऑसं काय करतोय हा प्रसन्ना. कॉय झालंय ह्याला. तुम्हीच बघा मंजे झालं. ऑता कुहुचा साखरपुडा, झालंस्तर अमेरिकेची निवडणूक, मंगळावर उतर्लेल्या क्युरिऑसिटीची गौर, कार्ल्याची भाजी करायची आहे. उत्साह कसा तो नाही. कॉय रे हे.

घना मोडः असं नै ना होत नेहमी.
राधा मोडः मी ऑफिसला जातेय मला उशीर होतोय.
कुहु मोडः खिदि फिदी हसू लाजू. प्र. स. न्न. अय्या.....
ज्ञाना मोडः ह्यावर विचार करण्याची गरज आहे. एका माणसास इतके काय होते?
वल्ली लिस्सन मोडः चल्ला. शॉपिन्ग ला जाउया. असं काय करताय तुम्ही भावजी.
आजी मोडः येताना चॉकोलेट आईसक्रीम आणा. तोंड फार आंबट झाले आहे.

अमा, मी ही -
ख्याक
मेलो
खपलो
वारलो
गच्कलो
चचलो
महा निर्वाणलो Biggrin

काय होते संवाद ??
प्लिज सांगा
मी मिसलय Sad

आय टी बॉस ला कोण सर म्हणत का?
>>>>
अगदी अगदी! मी सगळ्यात आधी हेच म्हणाली घरात.आणि त्याने "मला अंगद म्हण" म्हणल्यावर हा म्हणे नको सरच ठिक आहे Uhoh

>>घनाने काल काही जबरी कोड/ प्रॉग्रामिग सद्रुश्य संवाद म्हटले

अरेरे! हे मी मिसलं. प्रसन्न, अश्विनीमामी Proud

हे मिसलं>>ऑसं कंसं मिसलं आम्ही तर रेकॉर्ड करून मग रिवाइंड करून बघिटले. तेव्हा कळले. राधा उशीवर हात ठेवून स्वत:शीच वैतागत बसलेली असते तेव्हा हे घनामाउली अंगद माउलीशी फोन वर बोलत येत असतात तेव्हाची दोन वाक्ये आहेत ती. तेव्हा ल्यापटॉपही काही कोड सुचलेच तर असावे म्हणोन उघडून तयार होता. मग क्यामेरा राधावर गेला. राधा घनष्याम काळे असे म्हणते तेव्हा घना चमकून वर बघतो. पहिल्यांदाच लक्षात आले असल्यासारखे.

Pages