एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शूम्पी + २

पण त्याचा तो ऑफीसमधला प्रसंग त्यातील background मुळे आवडला. उंच इमारतीत वरच्या मजल्यावर, काचेच्याच भिंती असलेले ऑफीस वाटत होते. मराठी मालिकात प्रत्यक्षात अशा ठीकाणी जाऊन शूटींग केल्याचा अनुभव नाही. तसे शूटींग केले असेल तर ठीक आहे पण जर background ला चित्र लाऊन जर तसा आभास निर्माण केला असेल तर कॅमेरामनला हॅट्स ऑफ! ही शक्यता जास्त वाटतेय कारण खूप टाइट फ्रेमिंग (background कमीतकमी दिसेल) होते त्या प्रसंगात.

पण त्याचा तो ऑफीसमधला प्रसंग त्यातील background मुळे आवडला. उंच इमारतीत वरच्या मजल्यावर, काचेच्याच भिंती असलेले ऑफीस वाटत होते. मराठी मालिकात प्रत्यक्षात अशा ठीकाणी जाऊन शूटींग केल्याचा अनुभव नाही. तसे शूटींग केले असेल तर ठीक आहे पण जर background ला चित्र लाऊन जर तसा आभास निर्माण केला असेल तर कॅमेरामनला हॅट्स ऑफ! ही शक्यता जास्त वाटतेय कारण खूप टाइट फ्रेमिंग (background कमीतकमी दिसेल) होते त्या प्रसंगात.>>>>>>>>>
माधव .......+१०० ..........अगदी हीच चर्चा आम्ही केली काल.

स्पृहा जोशी ..ही एलदुगो मधल्या कविता लिहित नाही....... त्यासगळ्या कविता मनस्वनी नावाची मालिकेची लेखिका लिहिते....... हे स्पृहा ने स्वतः सांगितले Happy

बापरे तुम्ही सगळेजण किती उत्साह उत्साहानी लिहिता Happy मी तर हि मालिका रोज बघत नाही पण या धाग्यावर सगळी मालिका बघायला मिळते Happy

काल घनाच्या कोडगेपणाची चीड आली. म्हणे 'तुला मला डिव्होर्स द्यायची घाई झाली आहे'. ह्याला म्हणतात 'चोराच्या उलट्या....'. हा काय अमेरिकेला जाणार्‍या विमानात बसेतो राधाने थांबावं अशी ह्याची अपेक्षा आहे की काय? असल्या स्वार्थी माणसाचं प्रेम जरी असलं तरी त्याचा काय उपयोग? तो नेह्मी स्वतःचाच विचार करणार. बरं झालं राधाने त्याला डिव्होर्स पेपरचा ड्राफ्ट दिला ते.

घना म्हणतो 'मला स्वतःचं सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं आहे'. ऑ? मग हे स्वतःच्या कंपनीत नसतं का करता आलं? नोकरी करताना स्वतःचं नाही तर क्लायन्टला हवं तसं सॉफ्टवेअर बनवावं लागतं. Uhoh

त्यासगळ्या कविता मनस्वनी नावाची मालिकेची लेखिका लिहिते >> त्या 'पात्रा'ला साजेशाच आहेत की कविता. कोणीही का लिहिल्या असेनात! Happy

अबिरच्या तोंडी असलेल्या कविता कोण लिहिते हा खरा प्रश्न आहे Happy उ.का. जबरी सादर करतो त्या. 'नक्षत्रांचे देणे' मधले शांता शेळके, महानोर, गदिमा अशा भागात तो असायला हवा होता. (आणखी) मजा आली असति.

नोकरी करताना स्वतःचं नाही तर क्लायन्टला हवं तसं सॉफ्टवेअर बनवावं लागतं >>> Lol

कालचे ते घनाचे हापिसातले संवाद ऐकताना मला वाटलंच होतं, की आज इथे त्यावर मॅक्झिमम टिप्पणी येणार Lol

तो बॉस छपरी वाटला अगदी. आणि नव्या एंप्लॉईशी इतके पर्सनल कोण बोलेल, मॅरिटल स्टेट्स वगैरे.
वैताग असतात असले लोक्स.

बॉस ला 'घनुकल्या' आवडला म्हणून मॅरिटल स्टेटस विचारण्या मागचा बॉस चा हेतु लक्षात घ्या !
तो बॉस -घना-अबिर असा प्रेमाचा त्रिकोण होणार बहुदा अचानक Proud

काल घनाच्या कोडगेपणाची चीड आली. म्हणे 'तुला मला डिव्होर्स द्यायची घाई झाली आहे'. ह्याला म्हणतात 'चोराच्या उलट्या....'. हा काय अमेरिकेला जाणार्‍या विमानात बसेतो राधाने थांबावं अशी ह्याची अपेक्षा आहे की काय? असल्या स्वार्थी माणसाचं प्रेम जरी असलं तरी त्याचा काय उपयोग? तो नेह्मी स्वतःचाच विचार करणार. बरं झालं राधाने त्याला डिव्होर्स पेपरचा ड्राफ्ट दिला ते.

त्याच्या दोन कानाखाली द्यायला पाहिजेत.

आणि महत्वाचे हे की तिने वडलांना स्पष्ट सांगायला हवे की तुम्हाला, याला, त्याला वाटते म्हणुन मी लग्न करायचे हे (निदान आतातरी) चालणार नाही. मला जेव्हा हवे तेव्हाच करेन दुसरे लग्न.

देवा...
अहो नाव आहे ते त्याचं...

डिजे, Lol
मला तर तू इथे लिहिल्यापासून घना-अबिर असा संशय कधीचा येऊन राह्यलाय.. Wink

अहो राया भावे देखणा आहे की.. छपरी काय

हाये... सुबोध भावे हाय की काय?? मी पाहिला नाही कालच्चा एपिसोड......

आरारा.. राया भावे. मला वाटले सुबोध. बघेन आज..

>बॉस ला 'घनुकल्या' आवडला म्हणून मॅरिटल स्टेटस विचारण्या मागचा बॉस चा हेतु लक्षात घ्या !

अगदी अगदी हेच लिहायला आले होते.....:फिदी:

'दोस्ताना' मधे बोमन इराणी(बॉस)-जॉन-अभिषेक आणि गोरा इमिग्रेशन ऑफिसर यांचा सीन होता ना 'बीडी जलायले' वर डान्स पार्टी, मग किरन खेर ची एंट्री 'मा दा लाडला बिगड गया'.
तसाच मला इथे सीन डोळ्या समोर येतोय " घना-अबिर-बॉस " यांची पार्टी , बरोबर मानव आणि मग इला भाटेंची एंट्री, 'अरे घना, हे काय हे तुझं वागणं म्हणायचं"

त्याचं खरं नाव काहीतरी वेगळं आहे पण ते फारसं माहितीचं नाही. टि ए वाल्यांच्यात तरी तो राया भावे म्हणूनच माहिती आहे.
जसा दिग्याकाका हा सुनील अभ्यंकर पेक्षा राया अभ्यंकर म्हणूनच माहितीये.

सुबोध हा रोल कशाला करेल आत्ता?

तेच तर.. तो तर हिरो आहे, साईडची भुमिका कशाला करेल इतक्यात.

'राया' मलाही माहित नाहीय. बघितला असेन पण नाव पहिल्यांदा ऐकले. मी पण माधवसारखेच 'अहो राया' हे संबोधन म्हणुन वाचले. Happy सॉरी गं....

लोक्स, 'राजवाडे इन गैर' पद्धतीने हा बॉस, ही कंपनी, हे प्रोजेक्ट, ह्या प्रोजेक्टमुळे साकार होणारं घनाचं अमेरिकन ड्रीम हा स ग ळा च एक ड्रामा असू शकतो असं नाही वाटलं का कोणाला?

कंपनीतर्फे अमेरिकेला जायची फ्लाईट चार तासांवर आलेली असता, घटस्फोटाच्या कागदांवर सह्या केलेल्या असताना जेव्हा घनाला प्रेमाचा साक्षात्कार होईल आणि तो अम्रिकेऐवजी राधाची निवड करेल, तेव्हा राया भावे म्हणतील 'अरे ही कंपनी अस्तित्वातच नाहीये, तुला प्रेमाची महती कळावी म्हणून आम्ही नाटक केलं! मी किनई राधाच्या बाबांचा काही उद्योग नसलेला एक मित्र आहे फक्त!' Proud राजवाडेंच्या राज्यात काहीही होऊ शकतं बाबा!

पण राया भावेंचे डोळे खलास करतात! Happy

पौतै, राया भावे हे एकेकाळी उदयविहारी अनेकदा असत. तेव्हा तरूण असल्याने अजून देखणे असत.

मला अबिर, राया या दोघांची काहीतरी गेम आहे असं वाटतंय. Happy

'अरे ही कंपनी अस्तित्वातच नाहीये, तुला प्रेमाची महती कळावी म्हणून आम्ही नाटक केलं! >> मलही काल तसं वाटलं होतं. पण मग वाटले त्या एका घनाकरता किती जणांनी नाटकं रचायची? म्हणून मग त्या विचाराला डीवोर्सची नोटीस देऊन टाकली Happy

पूनम Biggrin
खरच, 'गैर ' केल्यावर ते काहीही करु शकतात Proud

मी ती जुनी "असंभव" मालिका आपली मराठीने लोड करायला घेतलीये म्हणून नुकतीच बघायला घेतलीये, तिथेही आई इला भाटे आणि तिचं मुलानी पोरगा अमेरिकेला जाउ नये असे वाटणे इथपासूनच सुरवात झालीये , तिथे घना अमेरिकेला, असंभग मधे अबिर चाल्ला अमेरिकेला !
ही सिरियल बघतेय का ती, माझं तर डोकं गरगरायला लागलय .. आता माझी सटकली Biggrin
ती नीलम शिर्के का कोण आहे ती कसली फनी दिसते, तिच्या कपाळावरची एक छोटीशी बट सुध्दा कर्ल करून टाकतात, अशी का हेअरस्टाइल Uhoh

Pages