एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माई आज्जी जाम चालु पाताळयंत्री दाखवलीय. राधाने घनाकडे तीच प्रेम व्यक्त केलय हे माहीत असुनही तीने राधाच्या बाबांना, आत्याला सांगीतलच नाहीय. मात्र घना राधाच्या बाबतीत फार हळवा झालाय हे आवर्जुन सांगते. आणि आत्ता राधाची काही चुकी नसताना तीच्या बाबांनासुद्धा तीचा राग येतोय. आणि आता "ध चा मा" करण्यासारख "घना चा अबीर" करायचा प्लान. बिचारया राधाला खेळण बनवुन ठेवलय सगळ्यांनी. आणि समजा ही माई आजी मध्येच गचकली तर मग प्लॅन च काय? बरय आपल्या खरया आयुष्यात असले भयानक प्रकार घडत नाहीत ते.

अरे काय त्या कुहु आणि अबिर च्या कवितेच्या भेंड्या.. जाम पकाउ.. काय चाल्लय काय Uhoh
माई आज्जी तर निर्धाssस्त आहेत.. मला फक्त विनय आपटेची चिडचिड नॅचरल वाटली आजच्या भागातली.

बाकीच्या मालिका फार वाईट आहेत म्हणुन ही मालिका चांगली आहे म्हणण्यात काय अर्थ आहे? हे म्हणजे वासरात लंगडी गाय शहाणी असे होतेय.
जरा पुर्वीच्या अर्थपुर्ण मालिका आठवून पहा बरे. अशीच एकत्र कुटुम्ब असलेली 'प्रपंच' कीती छान होती. ते खरे खुरे कुटुम्ब वाटायचे.

मारुतीराय प्रभु रामचंद्रांसमोर हात जोडून उभे होते. पण रामचन्द्र आपल्याकडे असे टक लावून का पहात आहेत हे मात्र त्यांच्या ध्यानी येत नव्हतं.

थोड्या वेळाने रामचंद्रांनीच शांततेचा भंग केला. 'तुझ्या कानातली ही कुंडलं फार छान आहेत रे' त्यांनी सहज म्हटलं.

मारुतीरायांचा हात आपोआप स्वतःच्या कुंडलांकडे गेला. आणि मग ते एकदम विचारात पडले.

'कसला विचार करतो आहेस?' रामचन्द्रांनी विचारलं.

"प्रभू, मी विचार करत होतो की हेच घनामाऊलीने राधामाऊलीला काल सांगितलं असतं तर एव्हढं रामायण झालं नसतं'

अबीर माईआजींकडे 'राधासे प्यारका इजहार' करायची परवानगी मागतो का काय? राधा चांगली निघूनच गेली पाहिजे त्याच्याबरोबर म्हणजे माईआजीची चांगली जिरेल. भारी स्वतःला तिस्मारखा समजते.

बाकी आखडूपणाने बोलल्याबद्दल काल राधाने तो चहा घनाच्या डोंबलावर ओतायला हवा होता. त्याचा 'गव्हाणीतला कुत्रा' झालाय. स्वतः तिच्यावर प्रेम आहे हे कबूल करायचं नाहिये आणि अबीर आला की जळतोय.

घनाच्या आईला आजी व्हायची स्वप्नं पडत आहेत. अरे, आधी हा ठोंब्या घना त्या नोकरीत टिकतो का ते तरी बघा १ महिना.

आजींच्या कटात सध्या कोण कोण सहभागी नाहीये? आजी सोडून सगळे काळे माठ, आणि कुहुच्या सासरचे मल्ल. थोडक्यात ज्यांना डोकं असल्याची शंका आहे ते सगळे! पण सध्या तरी या कारस्थानांमुळे घना- राधा मधल अंतर वाढतच आहे. प्रेम नको, पण अधिकार गाजवायची इच्छा आहे, असं वागण राधा किती काळ सहन करू शकेल? कि आता देसाईंच्या घराचा पर्याय खुला नाही, अशी तिची गोची झाली आहे?

पण कटाचे सगळे धागे फक्त कथा लेखकालाच माहिती आहेत, किंवा ते पण गुंता सोडवण्याच्या प्रयत्नात आहेत.

बंडोपंत , शुभं बोला. असं काही झालं तर पितृ पंधरवड्यात तर्पण केल्याशिवाय काही सिरीयल संपणार नाही. घनाला अमेरिकेला न जायला, आणि कसं एकूण नियती आपल्यावर अन्याय करतीये असं दाखवायला अजून एक कारण मिळेल.

>>काल काय झालं?

१. घनाच्या आईने वल्लीकाकूला घनाला इथेच जॉब मिळाला हे सांगितलं. त्यावरून तिने लगेच पुढची गोड बातमी घनाची आई आज्जी होणार असल्याची मिळेल असं भाकित केलं. मग पुन्हा कुहूचं सासरी कसं होणार ह्यावर (निष्फळ!) चर्चा.

२. राधाची आत्या भेसळयुक्त मराठीत नवर्‍याशी फोनवर भांडत होती. मग राधाच्या बाबांनी तिला परत इंदोरला जायला सुचवलं. तर ती नाही म्हणाली. मग त्यांनी राधाने कॉनट्रॅक्ट मॅरेज केल्याबद्दल (परत!) चिडचिड केली.

३. राधा आरश्यासमोर केस विंचरत असताना घनाने 'तू सुंदर दिसते आहेस' ह्या एका वाक्यसाठी नमनाला घडाभर तेल घातलं. राधाने 'तुला मी कॉम्प्लिमेन्ट हेल्थीली घेणार नाही असं वाटत असेल तर देऊ नको' असं खडसावल्यावर घनामाऊली सुतासारखी सरळ आली आणि कॉम्प्लिमेन्ट दिली.

४. अबीर आणि कुहूच्या शीघ्रकवितेच्या भेंड्या. अधिक माहितीसाठी भुंग्याशी संपर्क साधावा. Happy

५. अबिर घनासमोर राधाला तिच्या कानातल्याबद्दल कॉम्प्लिमेन्ट देतो. राधा म्हणते 'अरे जुनेच अहेत. आज घातले. नोटीस करणारा पहिला तूच'. घनामाऊलीचा चेहेरा पाहण्यालायक.

६. अबिर राधाकडे ट्रीट मागतो पण ती ऑफिसला जायच्या गडबडीत. मग एका चहावर मांडवली होते. रधा घनाला तुला चहा हवा का विचारते तेव्हा तो जास्त चहाने मला अ‍ॅसिडीटी होते असं सांगतो. चहा करायला राधा किचनमधे जाते. अबिर घनाच्या अमेरिकेच्या पॅशनला 'खूळ' असं संबोधतो. घनामाऊली त्याला घरातल्या इतरांना भेटून यायला सुचवते. राधा चहा घेऊन येते तर अबिर गायब. तो कुठे आहे ह्या प्रश्नाला घनामाऊलीचं 'मला माहित नाही'हे उत्तर. त्यावरून दोघांची मायनर खडाजंगी.

७. अबिर माईकडे जाऊन म्हणतो की लुटूपुटूचा का होईना पण राधाच्या आयुष्यात दुसरा कोणी यायला तुम्ही परवानगी दिलीत त्यामुळे तुम्ही मॉडर्न विचाराच्या आहात म्हणून मी तुम्हाला एक कल्पना सांगतो. माईआजी विचारात.

बाकीच्या मालिका फार वाईट आहेत म्हणुन ही मालिका चांगली आहे म्हणण्यात काय अर्थ आहे? हे म्हणजे वासरात लंगडी गाय शहाणी असे होतेय.
जरा पुर्वीच्या अर्थपुर्ण मालिका आठवून पहा बरे. अशीच एकत्र कुटुम्ब असलेली 'प्रपंच' कीती छान होती. ते खरे खुरे कुटुम्ब वाटायचे.

गेले ते दिन गेले.. मालिका बनवणा-या हल्लीच्या मंडळींची आवड नी आवाका लक्षात घेता त्या पहिल्यासारख्या मालिका आता बनणे निव्वळ अशक्य.

बाकीच्या कांता चोरघे आणि कंपुच्या गराड्यात ही मालिका उठुन दिसते. निवडुंगाच्या जंगलात एखादी कोरांटी उगवली तर तिचे गुलाबासारखे कौतुक होणारच.. तेच गुलाबांच्या बनात जर ती उगवली असती तर तण म्हणुन बाहेर फेकली असती.

दिल की तसल्ली के लिये ये खयाल अच्छा है... Happy


मात्र घना राधाच्या बाबतीत फार हळवा झालाय हे आवर्जुन सांगते
.

हे घनालाच अजुन कळलेलं नाहीय, ते तिला कधी दिसलं?? घनाने त्याला शक्य तितका अलिप्ततावाद अंगी बाणवला आहे.

राधाचे वाईट वाटतेय.. Sad

अबीर आणि कुहूच्या शीघ्रकवितेच्या भेंड्या.

काल घाबरलेच मी, म्हटले आता पुढ्ची १० मिनिटे यातच घालवणार की काय??
बाकी अबीरला फ्लर्टींग करायचा भरपुर अनुभव आहे आणि तो मनापासुन ते एन्जॉय करतो हे तो राधा सोडुन इतर बायांशी बोलायला लागला की लगेच लक्षात येते.

सगळ्यांना माऊली म्हणणं पण डोक्यात जातं. ह्या कुटुंबाने अल कायदाबाबत चर्चा केली असती तर साधारण असं काहीसं म्ह्टलं असतं 'ओबामा माऊलीने कारवाई करून ओसामा माऊलीला संपवलं'....

मंडळींना हल्ली अर्धा तास भरून काढणं फारच जड जातंय.
काल कुहू की अबीर कोणीतरी कविता 'उन्मळून ' येते असं म्हणाल्यासारखं वाटलं. उद्या मळंमळून येते असंही म्हणतील.

>>काल घाबरलेच मी, म्हटले आता पुढ्ची १० मिनिटे यातच घालवणार की काय??>>
हो असच वाटल. ते बघताना, वेलकम चित्रपटातल्या नाना पाटेकर सारखी अवस्था झाली होती "कंट्रोल उदय कंट्रोल" Angry

>>ओबामा माऊलीने कारवाई करून ओसामा माऊलीला संपवलं >> Lol

ओबामा माऊलीने कारवाई करून ओसामा माऊलीला संपवलं'>:हहगलो:
माऊली सारखंच मला घनाच्या आत्याचा 'रॅशनल' हा शब्द डोक्यात जातो.

काल कुहू की अबीर कोणीतरी कविता 'उन्मळून ' येते असं म्हणाल्यासारखं वाटलं.
>>>>>>>>>>>>>>>>>>>

अगदी अगदी भरत........ मला पण अबीरचं ते वाक्य खटकलच..... "उन्मळून" ... किमान "उचंबळून" म्हटलं असतं तर ठीक होतं...... Sad आता लेखिकेने नीट लिहिलेय पण अबीरने सीनमध्ये माती खाल्ली, की लेखिकेनेच माती खाल्लीये कसं ब्वा कळणार....... Proud

माऊली सारखंच मला घनाच्या आत्याचा 'रॅशनल' हा शब्द डोक्यात जातो.
>>>>>>>>>>>>>>>>>

काळेवाडीतल्या रेशन दुकानावर नेहमी रांगेत उभी असायची म्हणे Rofl

आता अबीरला पार खलनायक करुन टाकलाय. माईआज्जीच्या प्लॅनचा पचका!!
राधासाठी घन:श्याम ऐवजी तो स्वत: कसा अनुरुप आहे, हे माईआज्जीला सांगणेही ठिक होते. पण त्याला कोडगेपणा, आगाऊपणाचा रंग दिल्याने त्याच्यावर फुली.

माऊली सारखंच मला घनाच्या आत्याचा 'रॅशनल' हा शब्द डोक्यात जातो.>>माझ्याही.
माऊली : माऊली, माऊली
घनाची आत्या : रॅशनल, रॅशनल
घना : अमेरिका-पॅशन, अमेरिका-पॅशन
राधाची आत्या : जमाईबापू, जमाईबापू
घनाचा काका : माऊ, माऊऊऊ, ए माऊ
कुहु : लाजणे अन फिदी फिदी
घनाचे बाबा : चहा/कॉफी अन पेपर.......यादी वाढतच चालली आहे Sad

हो ना माई आजीला खराच हार्ट अ‍ॅटॅक यायचा आता....
>>
तसही इथे कोणीतरी म्हणलंच होतं ती मध्येच टपली तर काय म्हणुन Lol

आता जाम बोरींग झालीय मालिका. उगीच काहीही घुसडवायच म्हणुन घुसडवतायत. बिचारया राधालाच का सेकंड हँड प्रेम मिळाव? घनाला निदान पहिल प्रेम व्यक्त करता नाही आल पण अबीरला तर चक्क मुलीने चांगला लाथाडलय. अबीरच आता जास्तच अती दाखवलय. पण बहुतेक तो हे मूद्दामसुद्धा करत असेल. मागे त्याचा एक संवाद होता की शेवटचा धक्का देऊन exit घेणार म्हणुन. राधाचा स्टँड आवडला अबीर बाबातीत. आत्ता राधाच अबीरला वठणीवर आणेल. अश्यात मानवनेसुद्धा धाडसकरुन राधाला त्याच्या प्रेमाबद्दल कबुली दिली तर अमानवीय मज्जा यईल. Biggrin

>>काल कुहू की अबीर कोणीतरी कविता 'उन्मळून ' येते असं म्हणाल्यासारखं वाटलं.
फार जोरात कविता होत असताना, नुसतं "कविता पडली" च्या ऐवजी "कविता उन्मळून पडली" असं म्हणायचं असेल Proud
आत्याच्या रॅशनल बद्दल अनुमोदन. तिनी आजतागायत ३०० शब्द बोलले असतील तर त्यातले १५० "रॅशनल" हा शब्द असेल.
राधाची सध्याची अ‍ॅटीट्युड आवडली. आता त्यानी "मी अमेरिकेला नाही जात. आपण डिवोर्स न घेता आनंदानी राहू" वगैरे म्हटलं तरी राधानी "हो" म्हटलेलं बघायला मला आवडणार नाही. घनाच्या घरचे सगळे चांगले आहेत, पण हा घना कुठल्याच अँगलनी राधाला सुटेबल वाटत नाही. बायदवे अ‍ॅटिट्युड स्त्रीलिंगी का पुल्लिंगी?

Pages