Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53
एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मंजू, न.पॉ.-एनसीपीए वगैरे
मंजू, न.पॉ.-एनसीपीए वगैरे
तुझी पोस्ट वाचून एखाद्या विरारला राहणारीला आणि न.पॉ.ला ऑफिस असणारीला वर्किंग-डेला सिनेमा पाहून घरी जाण्याची प्रेरणा मिळू शकते
मंजूडी
मंजूडी
अरे देवा काय कीस काढता
अरे देवा काय कीस काढता तुम्ही.....
मला वाटतं एलदुगो वाले हा बाफ वाचत असतील तर पुढचे भाग तुम्हीच लिहा असे म्हणतील.
(एका अर्थी ते बेस्ट होईल म्हणा :))
अफाट चालू आहे बरं का.......
अफाट चालू आहे बरं का....... मालिका नाही..... हा धागाच.......:P
मंजुडी......
खरे तर मालिकेऐवजी हा धागाच रोज २० मिनिटे वाचून दाखवला तर जास्त मनोरंजन होईल.
बादवे, मुलामुलीच्या स्टिरिओटाईपकडे मालिका झुकायला लागली तिथेच कंटाळा यायला सुरुवात झाली होती. आता गुंडाळा कसा करतात ते पळवत पळवत पाहायचे.
घना चीडचीड करत असतो, आणि राधा
घना चीडचीड करत असतो, आणि राधा त्याला विचारते, " तू खाल्ल नाही आहेस का काही? भूक लागली आहे का तुला?
माझी ६ वर्षाची मुलगी अगदी असच वागते. वेळेवर खात नाही, आणि मग चीडचीड ! त्यामुळे हा संवाद ऐकून ती एकदम खुश!
जास्त पोस्टी टाकू नका. एका
जास्त पोस्टी टाकू नका. एका लग्नाची दुसरी गोष्ट " आता पुरे " असा धागा काढायची वेळ येईल.
संपदा
संपदा
> आशिष मालिका पाहतायेत? ऐ.
> आशिष मालिका पाहतायेत? ऐ. ते. न.
सध्या तिर्थरूप आले आहेत ...
पण राधा-घना स्क्रीनवर असतांना नक्कीच पाहणेबल असते त्यांच्या चांगल्या अॅक्टींग मुळे (त्याची नोकरी कोणती आहे ते समजो न समजो).
खरे तर मालिकेऐवजी हा धागाच
खरे तर मालिकेऐवजी हा धागाच रोज २० मिनिटे वाचून दाखवला तर जास्त मनोरंजन होईल. डोळा मारा >> हे मात्र खरे!
मंजुडी मागील २ पोस्ट +१ बाकी
मंजुडी मागील २ पोस्ट +१
बाकी काळेंच घर हे १००% मुंबईतल्या एखाद्या स्ट्डुयोमधला घराचा सेट आहे. (आरे कॉलनी वैगेरे). कारण आसपासच परीसर अजीबात गजबजलेला नाहीय. + बरयाच भागांत मागुन BEST बसेस जाताना दिसल्या. बरयाच बसेस अशा स्ट्डुयोच्या परीसरातुन जातात. देसायांच घर हे खर घर आहे २-३ बेडरुमच.
मी आता भागच बघत नाही. ती बेबी
मी आता भागच बघत नाही. ती बेबी आत्या. उर्फ सुकु काय जाडी झालीये... वजन का मेंटेन ठेवत कळत नाहे..
.
.
सुकन्या मोने नाव सार्थ करतेय
सुकन्या मोने नाव सार्थ करतेय -सुमो (सुकन्या मोने) फॅन्सनी दिवे घ्याच.
झंपी, वजन मेंटेन न ठेवता
झंपी, वजन मेंटेन न ठेवता येण्यासाठी बरीच अपरिहार्य कारणंही असू शकतात.
आजचा भाग पाहुन मीच कंफ्युज
आजचा भाग पाहुन मीच कंफ्युज झाले. इतके दिवस घना प्रेमात पडल्यासारखा दिसत होता. आज चक्क त्याने त्याचे डोके त्याच्या खोलीसारखे नीट आवरलेय आणि काहितरी ठोस विचार तो करतोय असे वाटले.
झंपी, वजन मेंटेन न ठेवता
झंपी, वजन मेंटेन न ठेवता येण्यासाठी बरीच अपरिहार्य कारणंही असू शकतात.
<<
+१
सुकन्याच मेडिकल रिझन वाचलं होतं मागे.
घनाच कॅरॅक्टर जाम बोरींग
घनाच कॅरॅक्टर जाम बोरींग झालय. एकदा एक आणि दुसरया वेळी भलतच काहीतरी. त्यात राधावर बॉसिंग करायचा प्रयत्न. फाल्तु एक्स्प्लेनेशन देऊन समोरच्याला पटवायचा प्रयत्न एकदम वैताग आलय घनाचा. राधा मस्त त्याला स्पष्ट, शांत आणि संयमाने घनाला उत्तर देतेय हे छान दाखवलय. वादळापुर्वीची राधाची शांतता असेल तर बर होईल. अबीर च कॅरॅक्टरपण बोरींग वाटत. तसही तो पण नाटकच करतोय पण राधाच्या प्रेमात वैगेरे पडलेला दाखवला तर बीचारया राधाला स्वतःच काही अस्तित्वच नाही अस होईल. बघु आता अबीर शेवटचा असा काय धक्का देणार बघुया.
काय झालं म्हणे आज?
काय झालं म्हणे आज?
घनाच कॅरॅक्टर जाम बोरींग
घनाच कॅरॅक्टर जाम बोरींग झालय. एकदा एक आणि दुसरया वेळी भलतच काहीतरी. त्यात राधावर बॉसिंग करायचा प्रयत्न. फाल्तु एक्स्प्लेनेशन देऊन समोरच्याला पटवायचा प्रयत्न एकदम वैताग आलय घनाचा. राधा मस्त त्याला स्पष्ट, शांत आणि संयमाने घनाला उत्तर देतेय हे छान दाखवलय. वादळापुर्वीची राधाची शांतता असेल तर बर होईल. अबीर च कॅरॅक्टरपण बोरींग वाटत.
<<<
बंडुपंत + १
आजचा भाग मी साडेसहा मिंटात
आजचा भाग मी साडेसहा मिंटात पाहिला. पेढे वाटणे काहीतरी चालू होते. सगळ्यांना आनंद झाला होता. "बशिवला" एकदाचा त्या घनाला भारतातल्या घरात. पुन्हा थोडे दिवसांनी कंपनी ह्याला पाठवणार वै. आहेच. इतक्यावेळेस जाणे, न जाणे याबाबतचे निर्णय बदलले आहेत, बदलणार आहेत की घरातल्यांनी एव्हाना "दिलपे" घेणे सोडून दिले पाहिजे. साधारणपणे नॉर्मल मनुष्याचे तरी असेच होते. एलदुगोवाले भलतेच पेशंन्सवाले आहेत. पुन्हा त्यावेळी रडण्याचे रतीब.
असच फेबु/ई-मेल मधुन
असच फेबु/ई-मेल मधुन आलेल....
दोघांच्या चेहरयातील जास्तीत जास्त साधर्म्य शोधा.
तात्या विंचु "झपाटलेला" आणि स्वप्निल जोशी "(पोट)सुटलेला"
आपल्याला मुंबईत नोकरी मिळालीय
आपल्याला मुंबईत नोकरी मिळालीय असं घना खोटंच सांगतोय ना?
अख्या काळे कुटुम्बाला पाव
अख्या काळे कुटुम्बाला पाव किलो पेढे कसे पुरणार???
हा धागा वाचल्याने मालिका
हा धागा वाचल्याने मालिका बघायचा वेळ वाचतोय
स्मिता तुम्ही चुकीचा समज
स्मिता तुम्ही चुकीचा समज करून घेतला आहे , ही एकाच मालिका आहे जी मुलांबरोबर एकत्र बसून पूर्ण कुटुंबाने पहावी. हसरे खेळते वातावरण, एकत्र कुटुंब पद्धत्ती (काही गोष्टी नाही पटल्या तरी) , भावंडांचे प्रेम चांगले वाटते बघायला . भांडणे , सूड, विवाह बाह्य प्रेम प्रकरणे, कट कारस्थाने नसलेली मला वाटते ही सध्यातरी एकमेव सीरिअल असेल.
दिवसभर ऑफिस मध्ये काम करून संध्याकाळी हलकी फुलकी ही सीरिअल बघायला मला तरी छान वाटते. गंगाधर टिपरे नन्तर वेळ लक्षात ठेऊन बघितलेली ही सीरिअल
आणि नन्तर मबोकरांची charchaa vachaylaa मजा yete
- वैयक्तिक मत
हलकी फुलकी ही सीरिअल बघायला
हलकी फुलकी ही सीरिअल बघायला मला तरी छान वाटते. गंगाधर टिपरे नन्तर वेळ लक्षात ठेऊन बघितलेली ही सीरिअल >>>>> +१
कालचा भाग मिसला. काय झालं
कालचा भाग मिसला. काय झालं म्हणे?
स्मिता, तू लेकीच्या
स्मिता, तू लेकीच्या मैत्रिणीचा नेमका तोच संवाद तेवढा ऐकलास आणि मालिकेबद्दल काहीएक पूर्वग्रह करून घेतलास असं वाटतं.
माझी अजून एक मैत्रिण आहे, ती ही मालिका किंवा अन्य कुठलीही मराठी मालिका पाहत नाही. एकदा सहज तिनं या मालिकेचा थोडा भाग पाहिला आणि त्यात तिला काँट्रॅक्ट मॅरेजचे संवाद तेवढे ऐकायला मिळाले. तिनं असा ग्रह करून घेतला, की 'मालिकावाले काय वाट्टेल ते दाखवतात, काँट्रॅक्ट मॅरेज हा काय प्रकार असतो, लग्न म्हणजे काय खेळ आहे का, प्रेक्षकांना हे लोक मूर्ख समजतात का' वगैरे वगैरे.
मात्र हे ही खरं, की काही वर्षांपूर्वी (आदित्य ८-१० वर्षांचा असताना) मी ही मालिका नियमित पाहिली नसती आणि तितकी एंजॉयही केली नसती, जितकी आत्ता करते आहे.
स्मिता त म्हणते आजच्या
स्मिता
त म्हणते आजच्या एपीसोडमधे राधा आणि घना एकत्र झोपलेले दाखवणारेत ना मी थक्क, मग ???? >> त्या भागात (आणि या मालिकेच्या कुठच्याच भागात) मुलांना ज्ञानप्राप्ती व्हावी असं काहीही दाखवले नाहीये.
त्या भागात जे काही दाखवले त्यापेक्षा कितीतरी जास्त खास मुलांकरता असलेल्या कार्टून / अॅनिमेशनपटात दाखवतात.
इतर मालिकांतून दिसणारे एका पात्राची ३/४ लग्ने, अति-श्रीमंत रहाणीमान, काही पात्रांचा होणारा अनन्वित छळ आणि त्या पात्राने त्याचा प्रतिकार न करणे असले हिडीस प्रकार तर यात जराही नाहीयेत.
मालिकेची कथा जे सांगायचा प्रयत्न करतेय ते पण चांगलेच आहे की. तुमच्या प्रायॉरीटीज नीट ठरवा, लग्न करणार असाल (आणि कसलाच छळ होत नसेल) तर ते टिकवायचा किमान काही प्रयत्न करा नाही तर तुमच्या बरोबर इतरांचीही फरपट होइल, नाती जोडा आणि जपा असेच सांगतेय मालिका. त्यात काय चुकीचे नाही वाटत मला तरी.
माधव मला असंच काहीसं
माधव मला असंच काहीसं सांगायचं होतं
मी माझ्या त्या दुसर्या मैत्रिणीलाही काही काळ हे सांगायचा प्रयत्न केला होता, की लग्न-संसार हा खेळ नाहीय हेच त्यांना मालिकेतून दाखवायचं आहे. पण ती ते काहीही ऐकून घेण्याच्या पलिकडे गेलेली होती. मग मी तो नाद सोडून दिला.
Pages