एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्ना... Happy
बिचारा अबीर.. त्याला राधा मनापासुन आवडते पण त्याला ती आवडतेय हे नाटक रंगवावे लागतेय.
मुर्ख घना.. त्याला राधा मनापासुन आवडते तरीही ती अजिबात आवडत नाहीय हे नाटक रंगवतोय.

अबीर बिचारा यासाठी की आपले मन मृगजळामागे धावतेय हे माहित असुनही तो नाटकातला त्याचा पार्ट निभावतोय, घना मुर्ख इतक्यासाठी की त्याच्या हातात सर्वकाही असुनही तो मृगजळाच्या मागे धावतोय... तकदीर का फसाना, जाकर किसे सुनाये?????????

मला माईआजींची कमाल वाटत्येय. त्यांनी आपल्या मुलांना/सुनांना/नातवंडांना इतके आचरट का बरे ठेवले? का त्यांना थोडीफार अक्कल दिली नाही?? कुहू अजुन कॉलेजात शिकतेय आणि इकडे काय बाया नाचताहेत लग्नघर लग्नघर करत? आणि मुलीची आई वरमाई?? देवा, थोडी अक्कल दे रे बाबा.... उद्या लग्न झाल्याझाल्या त्यांना कुहूच्या पिल्लांची चिवचिव ऐकायची घाई लागेल.. घनापेक्षा हे कुहू प्रकरण जास्त तापदायक झाले.

अबीर शेवटचा धक्का देणार म्हणजे राधाला माझं तुझ्यावर प्रेम आहे असं तिला सांगणार बहुतेक

तोही धक्का फुकट जाणार.. त्याने घनासमोर हातात माईक घेऊन राधाला सांगितले तरी घना 'माझी काही हरकत नाही, आमचे इतरांसारखे थोडेच आहे' असे हज्जारदा चाचरत बोलेल आणि मग वेंधळ्यासारखा चेहरा करुन दोघांकडे पाहात बसेल.

आणि मुलीची आई वरमाई>>>>>>>> काहीही!
आणि हो माईंना तरूणपणी आपल्या मुलीचं लग्न नाही वाचवता आलं म्हणून आता नातवाचं वाचवायची खटपट करताहेत.

आपल्या घरच्यांना राधाची गरज आहे म्हणून तिला अमेरीकेला न्यायचे नाही हा मात्र स्वार्थीपणा.

<< पण हे वाक्य मुळात चुकिचय," घरच्यांना" राधाची गरज' आहे ऐवजी स्वप्नील ने असं म्हणायला हवं होतं कि "राधाला" तिच्या पपांची आणि घनाच्या कुटुंबाची (स्वप्नील पेक्षा )जास्तं गरज आहे Proud
तिच्या कॅरॅक्टर वरून हेच दिसतय सध्या कि स्वप्नील पेक्षा राधाला खरच कुहु-आयडी-बाबा-सुप्रिया काकु आणि इतर कुटुंबिय जास्तं आवडतायेत घनोबा पेक्षा Proud
फारच राडा केलाय या लोकांनी घनाचय कॅरॅक्टर चा Uhoh

आजचा भाग मस्तच वाटला.घना-राधा यांच्यावरच जास्त फोकस होता आजच्या भागात. चला निदान आजच्या भागात गोगलगाईच्या स्पीडने का होईना काहीतरी कथानक पूढे सरकल अस तरी वाटल. राधाने घनाला अशीच ट्रीट्मेंट काही दिवसतरी दिली पाहीजे म्हणजे भाग बघताना जरा टाईम पास होईल.
आता अबीरने शेवटचा धक्का म्हणुन राधाला प्रपोज केल नाही म्हणजे मिळवली. नाहीतर प्रेमाचा चौकोन व्हायचा (घना-राधा-मानव-अबीर).
बाकी घनाचे अमेरीकेच्या जॉबबद्दलचे संवाद एका कानाने ऐकुन दुसरया कानाने सोडुन देतो हल्ली त्यामुळे जास्त त्रास होत नाही मालीका बघताना. Happy

बंडुपंत >>>>>> +१
बाकी राजवाड्यांना या चौकोनाची आवडंच दिसतेय हां ! इथे राधा आणि ३ इच्छुक--- घना, अबीर आणि मानव
आणि तिकडे बदाम राणी गुलाम चोर मधेही निवडीला तिघं ! कमाल आहे !

कोणीतरी मला सांगेल का ब्ल्यॅकबेरी आणि टचस्क्रिनवाले स्मार्टफोन वापरणार्‍या सगळ्यांच्याच रिंगटोन्स नोकिया ३३१० च्या का Angry

का? का? का? (सचिन खेडेकर इश्टाइल)

फारच राडा केलाय या लोकांनी घनाचय कॅरॅक्टर चा >> अगदी. पण सगळ्यात गंडलय ते त्याचे अमेरिका वेड.

नाहीतर प्रेमाचा चौकोन व्हायचा (घना-राधा-मानव-अबीर). >> ही स्टार टोपॉलॉजी झाली. Happy

आणि तिकडे बदाम राणी गुलाम चोर मधेही निवडीला तिघं ! कमाल आहे !<<<
शुगोल, माकडाच्या हाती शॅम्पेन नावाचं एक नाटक आलं होतं. जे प्रायोगिक आणि व्यावसायिक पातळीवरही गाजलं होतं. त्या नाटकावर आधारित हा सिनेमा आहे. 'निवडीला तिघं' असा नाटकाचा प्लॉट नक्कीच नाहीये.

'वरमाय'चा टायपो (;)) काल माझ्याही लक्षात आला लगेच Lol

अबीरचा शेवटचा धक्का काय असणारे हे कळतंच आहे; तरीही मला अशीही बारीकशी शंका येते आहे, की सर्व काही आलबेल झाल्यावर शेवटी अबीरची बायको किंवा गर्ल फ्रेंड पाहुणी कलाकार म्हणून आणतील. ('लगे रहो मुन्नाभाई' किंवा 'दिवाना मस्ताना'मधल्या अभिषेक बच्चनप्रमाणे)
"हिची साथ होती म्हणूनच मी हे सगळं करू शकलो" - असं काहीतरी अबीर सर्वांना सांगेल. Proud

'बदाम राणी गुलाम चोर' आणि या मालिकेत प्लॉटमधील साम्यस्थळं शोधणे म्हणजे कॅय च्या कॅय, बरं का !!!

'वरमाय'चा टायपो << मराठी नाटकसिनेमाच्या जगात याला(फंबल होण्याला) डेलि वाटणे असे म्हणतात Happy

आपली मराठी वर सिने घडामोडी मध्ये या सिनेमाची जाहिरात बघा. तिघां पैकी कोणाच्या प्रेमाचा विजय होतो .... वगैरे वगैरे
नाटक न बघितलेल्या, व त्याबद्द्ल फारशी माहिती नसणार्‍यांची व्यवस्थित दिशाभूल होऊ शकते की सिनेमात पण तिच्यावर मरणारे तिघं आहेत की काय ? राजवाड्यांच्या दिग्दर्शनाबद्द्ल मला आदर आहे. मी त्यांनी दिग्दर्शित केलेले दोन सिनेमे आणि ही मालिका एवढंच पाहिलेलं. तेव्हा तसं काही साम्य नसेल तर चांगलंच आहे की !!!
( मुळात एलदुगो मधे तरी तिच्यावर मरणारे तिघं हा प्लॉट कुठे आहे ? कथेच्या ओघात तसं आलं आहे एवढंच !) असो. अज्ञान दूर केल्याबद्द्ल सर्वांना धन्यवाद.

अबिर घनावर आपलं प्रेम असल्याचं सांगेल हाही धक्का असू शकतो हं. मग माईआजींची कांताबाई होईल. Proud

लग्नघर आहे म्हणून ह्या बाया एव्हढ्या का हरखल्या आहेत? खरं तर त्या कुहूचे कान उपटून तिला आधी शिक्षण पूर्ण कर आणि मग लग्न कर असं खडसावायला पाहिजे. Uhoh

काल सुप्रियाकाकूही अडखळल्या. 'ज्ञाना तुझ्यासमोर एक मुलगी आणून उभी करेल आणि म्हणेल ही बघ तुझी नियोजित वधू' असं आधी म्हणाल्या त्या. आणि मग 'नियोजित सून' अशी दुरुस्ती केली.

सिरियलला नाव ठेवत तिच सिरियल पाहत राहने ह्याला काय म्हनावे बरे?
स्वप्ना, तुमचा पन गुडगा दुखतो का बाशिंग बांधुन Wink Proud

>>स्वप्ना, तुमचा पन गुडगा दुखतो का बाशिंग बांधुन

आता काय म्हनावं वो तुमास्नी? तुमाला एक तर गुडगा म्हनजे काय ते ठावं नाय नायतर बाशिंग म्हनजे काय ते कलत न्हाय. मेंदू गुडग्यात हाये जनू Wink Proud

स्वप्ना, तुझी ओबामा-मन्मोहन्सिंग पोस्ट जबरदस्त Lol

वरमाय>>>>> मला वाटलं होतं ही चूक माझ्याच एकटीच्या लक्षात आली Proud

आता परत घनाची 'बर्निंग ट्रेन' सुरू झालेय, अबीरबरोबर म्युझिक कॉन्सर्ट ला चालली राधा, मस्त... आता तिचं वागणं करारी राधाच्या व्यक्तिरेखेला साजेसं आहे Happy

माकडाच्या हाती शॅम्पेन मधे त्रिकोणच आहे चौकोन नाही...

अबिर घनावर आपलं प्रेम असल्याचं सांगेल हाही धक्का असू शकतो हं. मग माईआजींची कांताबाई होईल.
अमेरीकेत नेत असेल तर घना त्यासाठीही कबूल होईल.
भयंकर हसतोय.

अमेरीकात जायच वेड हा विषय जुनाट नाही का वाटत? साधारण १० वर्षांपुर्वी हे ठिक होत.
बर याच क्वालीफिकेशन हा दुबई अबिदाबीला जायच म्हणाला तर पटू शकत कारण तिथे इलेक्ट्रीशन प्लंबर्स ची गरज आहे.

ही सिरीयल मला गुंतता .... सारखी रटाळ होताना दिसतेय.

माकडाच्या हाती शॅम्पेन मधे त्रिकोणच आहे चौकोन नाही...

अबिर घनावर आपलं प्रेम असल्याचं सांगेल हाही धक्का असू शकतो हं. मग माईआजींची कांताबाई होईल.
अमेरीकेत नेत असेल तर घना त्यासाठीही कबूल होईल.
भयंकर हसतोय.

अमेरीकात जायच वेड हा विषय जुनाट नाही का वाटत? साधारण १० वर्षांपुर्वी हे ठिक होत.
बर याच क्वालीफिकेशन हा दुबई अबिदाबीला जायच म्हणाला तर पटू शकत कारण तिथे इलेक्ट्रीशन प्लंबर्स ची गरज आहे.

ही सिरीयल मला गुंतता .... सारखी रटाळ होताना दिसतेय.

खुपते तिथे गुप्ते मधे मुक्ता असा काय 'मॅटर्निटी' टाइप ड्रेस घालून आली होती Biggrin
वर दोन्ही गुप्ते लोक तिच्या ड्रेस ची तारीफ करत होते Uhoh

इथे मायबोलीवर आता राजवाड्यांनी 'एका लग्नाची दुसरी गोष्ट - अजून चालूच' असा तिसरा धागा काढायला नाही लावला म्हणजे मिळवलं... कारण आता या धाग्याच्या पोस्टीही बघता बघता हजारी होऊ घातल्यात. पटापटा उरका काय ते उरलं सुरलं कथानक... पुढील भागात म्हणून जे दाखवतात ते नेक्स्ट एपिसोडच्या एकदम शेवटच्या शॉटमधे दाखवून तिथेच एन्ड करतात तेव्हा टिव्ही फोडावासा वाटतो Sad बाकी सगळे 'वरमाय' छापाचे फिलर Sad

लले, Proud परवडणार्‍या इच्छा नाहीत ना आमच्या... Lol टिव्ही जुना झाल्यावर ही सिरियल रिटेलिकास्ट केली तर कदाचित कार्यवाहीची शक्यता नाकारता येत नाही Wink नाहीतर मग मला तुझ्याकडे येऊन रहावं लागेल इच्छापूर्तीसाठी Proud

'झोका' पाहील्यानंतर ही मालिका सुरू झाल्यावर मला एक उत्तम मालिका बघत असल्यासारखे वाटते Happy मग थोड्यावेळाने 'अरे काही घडतच नाहिये' असा साक्षात्कार होतो.

Pages