एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालचं राधाचं घनाला 'आपले संबंध संपले तरी माझे घरच्यांशी असलेले नाते संपणार नाहीये' हे अत्यंत संयमाने पण तितक्याच ठामपणे सांगणे लय भारी होते. घनाला त्याची चिडचिड राधाच्या शांत वागण्यामुळे बाहेरही काढता येत नाहीये.

मुक्ताने मस्तच केला तो भाग पण फक्त तेवढ्याच भागापुरती स्पृहा राधा व्हायला हवी होती असे खूप वाटले. तिला मस्तच जमते आणि शोभते असले बेअरींग घेणे.

कालचा भाग आवडला.

प्रेक्षकांना मालिकेतल्या एका पात्राला थपडा लगावाव्याशा वाटतात, याचाच अर्थ ते पात्र उत्तमरीत्या लिहिलं आणि रंगवलं गेलं आहे !!

>>अबिरच घनावर प्रेम? मग घना आणि अबिरला अमेरिकेला जावं लागेल. आणि इथले सगळे प्रश्न एका झटक्यात सुटतील! पण मग तो राधाला का नेतोय गाणी ऐकायला?

अलबत घनाला जळवायला Proud पण हे असलं काही दाखवणार नाहीत.

काल घनाची आई राधाला त्याने इथेच जॉब्साठी अप्लाय केलंय असं सांगते तेव्हा घना अगदी 'आपण केव्हढं मोठं काम केलंय' अश्या थाटात स्तुतीच्या अपेक्षेने बसला होता. बरं झालं राधाने जास्त भाव दिला नाही. घनाला सांगायला हवं की 'बाबा रे, तुझी आयडीतुझ्याभोवती फिरत असली तरी पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तुझ्याभोवती नाही'.

राधाने म्युजिक कन्सर्टला जायला हवं होतं. घनाच्या भ्रमाचा भोपळा जमेल तितका फोडायला हवा.

भरत मयेकर | 18 July, 2012 - 10:32नवीन

प्रेक्षकांना घनाचा अधिकाधिक राग येतोय म्हणजे दिग्दर्शकीय चमूचा उद्देश साध्य झालेला आहे.>>>
अगदी १००% खरं आहे

काल पिवळ्या कुर्त्यामध्ये राधा मस्तच दिसत होती.. तिचे पाणावलेले टपोरे डोळे वेड लावतात

--(मुक्ताचा फुल स्पीड पंखा ) प्रसन्न

म्युझिक कॉन्सर्ट हा काय प्रकार असतो? नाव, गाव , घराणे हा प्रकार नसतो का? वेस्टर्न क्लासिकलचा असला तर कंपोझरचे नाव इतर.?
Happy

हे म्हणजे त्या हमाहैको मधल्या सुप्रसिद्ध 'कंप्युटर्स' सारखे इरिटेटिंग आहे.

हआहैको मध्ये जेंव्हा माधुरी 'कंप्युटर्स' म्हणते तेंव्हा असले कुठलेही प्रश्न डोक्यात येत नाहीत. इरिटेटिंग तर अजीबातच वाटत नाही Proud

माधव Happy

मला कमाल वाटते ती टाईम मॅनेजमेन्टची! ऑफिसनंतर कॉन्सर्टला जाणार. म्हणजे कमीतकमी सहा नंतर. मुंबईत वर्किंग डेला अशा ऑड वेळेला कोण कार्यक्रम ठेवतो? बर ठेवला. तरी मूळ प्लॅननुसार कॉन्सर्टनंतर घरी जेवायला येणार?????? किती वाजता? झोपणार कधी? झोपायच्या आधी त्यांच्यात 'आपलं लग्न' ह्याबद्दल चर्चाही असतात! बर उद्या लवकर उठून जॉगिंगलाही जायचं असतं. कसं काय झेपतं लोकांना? मला घड्याळातले तास लिहून सांगा बरं कध कधी काय काय करणार ते! इकडे वीकडेला जास्तीची भाजी आणायची झाली तरी टाईम मॅनेजमेन्ट बोंबलते माझी! Proud

अरे नका रे इतका कीस काढू...
आपल खरखुर आयुष्य दाखवल तर आपली रोजची घिसीपिटी जिंदगी आणि त्या मालिका यात काय फरक राहणार.
ह्या हिशोबाने चित्रपट तर बादच करायला हवेत.. तरी आपण बघतो..
मनोरंजन म्हत्वाचे (ते होत नाही हि बाब अलाहिदा. .असो ) लॉजिक नव्हे

ऑफीस कुठे आहे त्यावर अवलंबून आहे.
उदाहरण घ्या, ऑफीस माझगाव मध्ये आहे, कन्सर्ट चर्चेगेटला.. मुंबईचा पाउस कसाही असला तरी अर्ध्या तासात पोहोचुच्(नवीन माहीती नुसार).

५:३० निघाले लोकं तरी ६ ला बरोबर हॉलच्या दारात. ६- ९ कन्सर्ट. ९:३० ला घरी. जेवून १०:३० लग्नाच्या चर्चा. अदखळत बोलणं Proud

मनोरंजन म्हत्वाचे (ते होत नाही हि बाब अलाहिदा. .>> करेक्ट. ते होत नाहीये म्हणूनच कीस! असो, टीपी होता. दिव्यात वाचा Happy

हो खरंय प्रसन्न. मनोरंजन होते आहे. तेव्हा गप्प बसावे हे उत्तम. Happy

बस्के- वोईच.

नीधप+१

डीजे- काही नजर वगैरे लागली नाहीये. व्यवस्थित सुरु आहे. तो 'लोद्या'च (साभारः अश्विनीमामी) होता की सुरवातीपासुन.

काळ्यांच्या घराचा आकार आणि स्वरूप बघता ते मीरा-भायंदर-वसई-विरार इकडचे असावेत असे वाटते.
>>>>>>>>>>>>>

मढ आयलंड Wink

आणखी थोडासा कीस...म्युझिक कॉन्सर्टला बोलवायचं, तर कोणता कलाकार गाणार/वाजवणार ते सांगणे मस्ट. मनस्विनीबाईंचे पेमेंट वेळेवर होत नसावे. त्यामुळे त्यांनी वल्लीकाकूंची वरमाय करून टाकली.

प्रभातला बघताना मला ब्रह्मचारीतल्या मास्टर विनायकांची आठवण येते. (हा चित्रपट आताच्या काळातही दूरदर्शनवर बघायला मिळतो.)

ऑफिस नरीमन पॉईन्टला आणि कॉन्सर्ट NCPA ला... ऑफिस सुटल्यावर पाच मिन्टात हॉलात पोचणार. साडेपाचाला ऑफिस सुटल्यावर राधा रांगत रांगत गेली तरी पावणेसहाला NCPA ला पोचेल, आणि खरंतर अभीर तिला घ्यायला येणार आहे म्हणजे अगदी दोन मिन्टात हॉलात पोचतील ते. कॉन्सर्ट तीन तास रंगणार असं जरी गृहित धरलं तरी नऊ वाजता कॉन्सर्ट संपल्यावर अभीर तिला चर्चगेट स्टेशनात सोडणार मग ती ट्रेन पकडून अगदी विरारला जरी गेली तरी पावणेअकरापर्यंत पोचणार. बरं, ह्या लोकांसाठी रीक्शावाले तयारच असतात, आमच्यासारखी वणवण करावी लागत नाही. खरंतर अभीर तिला घ्यायला येणार आहे म्हणजे सोडायलाही जाणारच आणि घनाला जळवण्यासाठी त्याने जाणंच जाणं आहे. त्यामुळे अकरापर्यंत घरात ती पोचणारच. जेवायला किती वेळ लागतोय? ह्यांना काय आवरासावर, झाकपाकही करायची नसते त्यामुळे साडेअकरापर्यंत जेवून बिवून सुप्रसिद्ध नाईटड्रेस घालून घनाशी गप्पा मारायला राधा तय्यार... अर्धा तास बास झाला 'आपलं लग्न' विषयावर बोलायला.. वाजले बारा! तसाही मुंबईकर माणूस रात्री बारा वाजताच झोपतो.

कोण कलाकार, गाणार/वाजवणार काय करायचे आहे? आता घनाला जळवायलाच अभीरबरोबर जायचे आहे त्यामुळे डिडिएलजे मधे 'रुक जा ओ दिलदिवाने' गाण्याआधी ती बाई रडत गाते तश्या प्रकारच्या कॉन्सर्टलाही राधा-अभीरला पाठवतील.

मनस्विनीबाईंचे पेमेंट वेळेवर होत नसावे. त्यामुळे त्यांनी वल्लीकाकूंची वरमाय करून टाकली.
>>> हे मात्र खरं.

मनस्विनीबाईंचे पेमेंट वेळेवर होत नसावे. त्यामुळे त्यांनी वल्लीकाकूंची वरमाय करून टाकली. >> अगदीच काही चुकल्या नाहीत मनस्विनीबाई. वल्लीकाकू एका भावी वराची आई आहेच की. फक्त तो भावी प्रसंग वर्तमानात येण्याएवढी मालिका लांबू नये अशी इच्छा ! Happy

काळेंचं घर किंवा राधाच्या पपांचं घर मुंबईत असून इतकं प्रशस्त आहे..
(प्रत्येकाला स्वतंत्र खोली, पाहुण्यांसाठी वेगळी वैगरे..)
ही गोष्ट पुण्यातली असती तर पटलं असतं,
पण मुंबई सारख्या ठिकाणी घरातल्या बहुतांशी लोकांचा रिकामटेकडेपणा (दोन्ही काकांकडे पहाता) परवडेबल नसतोच..
Happy

जाऊ देत गं सारू, कथा वगैरे असली की अतिरंजितपणा यायचाच.. बाकी काल त्या दोघांनी मस्त अ‍ॅक्तींग केलीये, लाईव्ह नाटक पाहतोय की काय असा जरासा फील आला.. Happy

काळेंचं घर किंवा राधाच्या पपांचं घर मुंबईत असून इतकं प्रशस्त आहे..>>> मुंबईला परळ/दादर/ वांद्रे/ जुहू/ सांताक्रुज इत्यादी ठिकाणी खूप आतल्या भागात अजूनही 'वाडी' प्रकार अस्तित्वात आहे, तिथे अशीच प्रशस्त घरं आहेत. वांद्र्याला बँड स्टँडला जाताना अशी टिपीकल ख्रिश्चनांची घरं दिसतात. इतके दिवस बघितली नसतील तर आता पुन्हा जाला तेव्हा चौकस नजरेने पाहून घ्या. आता कदाचित थोडा काळच राहतील, रीडेव्हलपमेंटला जायच्या आत पाहून घ्या.

मला तर आता राधाची दया यायला लागली आहे. पप्पांची काळजी, कुहुची "काय झाले बाळा" म्हणून समजूत घालणे, देवकीचे लाडेलाडे बोलणे आणि प्रत्येक गोष्टीतला भोचकपणा, त्या ठोंब्या खडुस घनावर प्रेम आणि हपिसातले काम. Sad

She needs a break.

Pages