एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते आईडी संबोधन खरंच काहीही वाटतं. तायडी हे संबोधन ऐकलं होतं. हे नविनच आणि ऑडच आहे. आज जर त्याचा ओव्हरडोस असेल तर मी पण तो सीन फॉरवर्ड करून पाहीन.

स्वप्नील जोशीनी एका मुलाखतीत सांगितलं की तो त्याच्या स्वतःच्या आईला 'आयडी' म्हणतो.

(अगदी सुरुवातीचे एपिसोडस बघा. मोहन जोशी असताना ......आई च म्हणत होता.)

'आय डी' ही नंतरची त्याची अ‍ॅडिशन आहे.

बाकी आजचा "अबीर" बघून याचं आणि राधाचंच जमायला पाहिजे असं आवर्जून वाटलं.
<<<<< नको,अबीर ला सुट अशी कोणीही सिरियल मधे Proud
राधा रडे तर नकोच नको त्याला..

बुवा Proud
तोपर्यंत खरच आवडायचा स्वप्नील, आन मीन अ‍ॅक्टिंग त्याचं आणि घधाची केमिस्ट्री !
अता काहीही उरलं नाहीये त्यातलं.. उगीच ते चिचुंद्री सारख्या किनर्‍या आवाजातलं भंपक गाणं 'तुझ्या विना' वाजतं जरा एका मेकां कडे बघायला लागले तर Biggrin

आजचा लाड्डिक सीन बघायलाच हवा तुम्ही, "आयडी आयडी आयडी" करत शाळेत न आलेल्या पोरां सारखा हा ऑफिस मधून आला , आईचे गालगुच्चे घेत मिठ्या मारत नाचायला लागला, ए आयडी..बिरडं कित्ती छान झालं !
(Btw, हे 'बिरडं आणि आयडी प्रकरण' म्हणजे राजवाडेंनी हिंदी सिनेमाच्या 'गाजर का हलवा आणि मां ' प्रकाराला दिलेलं प्रति उत्तर बरका Proud )

आईडी, वहिनुडी आणि प्रभुड्या मेल्या राजवाड्या!!!! >>> Lol आत्ती राहिलं की आणि ह्यात. मी ही मध्ये मुद्दाम मागचे एपिसोड्स बघितले. सुरुवातीला आत्याच म्हणायची राधाही. खरं तर आत्याशी तिची एवढी जवळीक असेल असंही अजिबात वाटलं नव्हतं सुरुवातीला.

मला तर आता ही सिरीयल कधी संपतेय असं झालंय, कंटाळा आला तेच तेच ऐकून. सोडा एकमेकांना आणि आम्हांला सुद्धा. Proud

संपदे,
असंभव घेतलीये गं बघायला Proud
शेवट जवळ आला कि राडा नाहीये ना त्यात ?
बर, ती सध्याची शुभ्रा 'मनसी साळवी' बदलून नवी शुभ्रा 'उर्मिला कानिटकर' कुठल्या एपिसोड नंतर येणार ?
मला ती मानसी साळवी अजिबात नाही आवडत, उर्मिला कानिटकर सही आहे पण.
अबिर-उर्मिला पेअर पण चांगली दिसेल :).

माझे असंभवचे पहिले काही एपिसोड्स मिस झाले होते ते मी सध्या बघत आहे. मानसी साळवी बदलली ते फार बरे झाले. उर्मिला कानेटकर मृदु, सात्विक शुभ्रा म्हणून परफेक्ट शोभली होती. नंतर नंतर त्यातही फार अंत पाहिला होता राजवाड्यांनी. पण डीजे तुझ्याकडे फॉर्वर्डचे बटण आहेच त्यामुळे ठीक आहे. कथा मस्त होती त्याची. 'गुंतता' किंवा 'एलदुगो' पेक्षा खूप गुंतागुंतीची कथा होती.

सध्या एलदुगोमध्ये पाणी घातलेच आहे तर मग ह्या धाग्यावरही विषयांतर चालेल Wink

बाकी आजचा "अबीर" बघून याचं आणि राधाचंच जमायला पाहिजे असं आवर्जून वाटलं. +१
आईडी, वहिनुडी आणि प्रभुड्या मेल्या राजवाड्या!!!!>> Lol

आजचा मुक्ताचा अभिनय क्लास होता.हुंदका दाटल्याने होणारा आवाजातला बदल वगैरे किती बारकावे त्यात....

आज राधा एकदम बिचारी वाटली, जेव्हा ती अबीरला सांगते की ती आणि घना नवरा-बायको म्हणुन कायम राहावेत म्हणुन देवाकडे प्रार्थना कर. जितक राधाच कॅरॅक्टर समंजस्/जबाबदार दाखवलय त्यापेक्षा दुप्पट बालीश घनाच कॅरॅक्टर झालय. ज्या स्लोपणे मालिका चाललीय त्यावरुन डायरेक्ट शेवटच्या एपिसोडमध्येच राधा-घना डिओर्स घेणार नाहीत हे दाखवतील हे मात्र नक्की.

त्या राधाचा कपडेपट काय भयंकर आहे. पटियाला टाईप सलवारवर ओव्हरसाइझ्ड तोकडा शर्ट, त्यांचे भयानक रंग, अजून तिसर्‍याच रंगाची (हिरवीगार) बॅग, कधीकधी चकाकणारी सलवार... गबाळी दिसते ती! त्यापेक्षा त्या सोन्या आणि उल्काआत्याच्या साड्याही बर्‍या आहेत.

श्र +१
बेकार कपडे असतात तिचे , आय मीन पटीयाला सुट्स मधे चांगल्या फॅशन्स करता येउ शकतात पण सगळच ढगळ अजागळ दिसतं जे राधा घालते ते!
जोकरा सारखे कपडे देतात तिला!

बकवास कपडे दिलेत राधाला. ह्याच्या आधीच्या बाफवर आम्ही स्क्रीन शॉट्स वगैरे देऊन शिव्या घातल्यात Proud

डिजे, असंभव बरीच मोठी मालिका आहे, अजून मानसी साळवीचे एपिसोड्स म्हणजे सुरुवातच आहे. उर्मिला आणि उमेश कामत जोडी छान दिसते. मधे मधे कंटाळा येईलच, तेव्हा फॉरवर्ड कर. हा का ना का Happy

संपदा
मी फक्त पहिले १४ भाग पाहिलेयेत त्या वरून 'भुलभुलैय्या' ची आठवण येतेय , त्या शुभ्राचा पुअर्जन्म हिरोचाच सुड घेण्या साठी आणि जी नीलम शिर्के सुरचातीला व्हिलन वाट्टेय तिच्याच अनुकुल पत्रिकेमुळे हिरो वाचणार आणि शेवटी त्या दोघांचच लग्न Happy , जस्ट गेस !

बुवा मी इतकी हसले कीकॉफी सांडली कि हो.
श्रद्धा तुला समजले बघ. लाल पतियाला, आखुड कुडता निळा लाल ओढणी आणि हिरवी पर्स. शिवाय त्याच सीन मध्ये अबीरचा शर्ट पण लाल. अरे आर्ट डायरेक्टर घ्या कि.

ही आयडी ब्लॉक करणे लायक आहे. सकाळी पाहिले तर कुहुचे गुर्‍हाळ चालू होते. हे काय गं मुलींनीच काय सासरी जायचे वगैरे.

एव्हढी सरळ स्टोरी नाहीये असंभवची :). उर्मिला आणि उमेशचे लग्न होईल लवकरच. सुलेखा सूड घ्यायला काय काय करेल ते बघ. सुलेखा परकायाप्रवेश करून बर्‍याचजणांना मारते, उर्मिलाला भास होत असतात. तिचा , उमेशचा आणि नीलमचा हा पुनर्जन्म आहे. प्रथमेश म्हणून उमेशचा पुतण्या आहे, त्याचा सुद्धा हा पुनर्जन्म आहे. मागच्या जन्मात अर्धवट राहिलेली सूडकथा ह्या जन्मात ऑल्मोस्ट पूर्‍ण होते Happy ( विथ अ ट्विस्ट Wink )

गेले कित्येक भाग चुकलेत....... धाग्यावर १४२ पोस्टी नव्या दिसल्या, पण यावेळी पोस्टी वाचताना तितकीशी मजा नाही आली......

काल शेवटका भाग पाहायला मिळाला...... त्यात राधाचा अभिनय अप्रतिम होता.....

पण राधासारखं स्ट्राँग कॅरॅक्टर अगदी हतबल होऊन अबीरला "जर एखाद्या देवावर विश्वास असेल तर प्लीज प्रार्थना कर की पुढच्या वेळी परत भेटशील तेंव्हा मी आणि घनश्याम तुला नवरा-बायको म्हणून एकत्र भेटू" असं म्हणताना पाहून अगदीच वाईट वाटलं. Sad

प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल म्हणून स्ट्राँगली वावरणार्‍या सगळ्याच "राधा" आतून इतक्याच हळव्या असतात का Uhoh Happy

(टीपः वरील पोस्ट वाचताना बॅग्राऊंडला "तुझ्याविना" चा आलाप ऐकावा Proud Wink )

कालचा अबीर-राधाचा सीन छान जमला होता. मुक्ता बर्वे आवाजातले चढ-उतार आणि चेहर्‍यावरचे हावभाव किती बारकाईनं दाखवते !!

उगीच ते चिचुंद्री सारख्या किनर्‍या आवाजातलं भंपक गाणं 'तुझ्या विना' वाजतं जरा एका मेकां कडे बघायला लागले तर >>> डीजे............अगदी अगदी

आईडी, वहिनुडी आणि प्रभुड्या मेल्या राजवाड्या!!!! >>>>>>>>> पोरीं अगदी सुटल्यात.
खरंच आता अगदी पकवताहेत!

>>>>>>>>>>>>>>>पण राधासारखं स्ट्राँग कॅरॅक्टर अगदी हतबल होऊन अबीरला "जर एखाद्या देवावर विश्वास असेल तर प्लीज प्रार्थना कर की पुढच्या वेळी परत भेटशील तेंव्हा मी आणि घनश्याम तुला नवरा-बायको म्>>>>>>>>>>>>>>><<<

अरेरे... एवढी वेळ येवून ठेपली का प्रेमात? कसे होणार खंबीर, स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेल्या मुलींचे अश्याने. अश्या सिरीयली पाहून त्याही हेच बरोबर म्हणतील. हरे राम, हरे कृष्ण!! Proud

मूळात खोटे लग्न करतानाच इतके मेंगळट माणूस पण सहन होणे अशक्य आहे जितकी खंबीर ती सुरुवातीला दाखवलीय. मग तो मानवने काय घोडे मारले होते. Wink

हि लिंक कोणीतरी द्या ,, राजवाडेना आठवण करून द्या की नक्की काय म्हणून राधा चे "पात्र" सुरुवातीला होते.
आता फक्त ते खरोखरचे "पात्र" च झालेय. Wink

तिचे ७० मधल्या राजेश खन्नावर फिदा होणारर्‍या मुलीसार्कहे झालेय.. खुळचट पोरी म्हणे रक्ताने पत्र लिहित..

<<< संपदा, असंभवमधे नंतर सगळ्यांचेच पुनर्जन्म झाले

हो नी, सतीश राजवाडेचा सुद्धा Proud ( मगाशी आयफोनावरून टायपत असल्याने जास्त लिहिले नाही Happy )

पण एकूणच सध्या राजवाडे हुकलाच्चे..... अत्यंत भंकस असा 'बदाम राणी गुलाम चोर' त्याने बनवलाय इथेच त्याच्यात काहीतरी केमिकल लोचा व्हायला लागलाय असं वाटायला लागलंच आहे

त्या राधाचं पात्र इतकं कणाहीन का करत चाललेत देव जाणे! त्या घनावर प्रेम असल्याचं तिने थेट सांगितल्यावर त्याने अपमानास्पद वागणूक दिली तिला. अमेरिकेला जायचा आणि घटस्फोटाचा धक्का घरच्यांना एकदमच देऊ अशी त्या माठाने कल्पना मांडली त्याला 'मम' म्हणून हीपण राहतेच आहे तिथे आपली... का नाही ती म्हणत की माझ्याशी संबंधित जेवढं आहे तेवढ्याचा लौकर सोक्षमोक्ष लाव आणि मला मोकळं कर. बाकी अमेरिका, धक्का काय ते तुमचं तुम्ही बघा.

लौकर सोक्षमोक्ष लाव >> तोच तर तगादा लावलाय तिने....लवकर डिवोर्स प्रोसेस इनिशियेट करूयात म्हणून!

आणि राधाच्या कॅरेक्टरबद्दल म्हणाल,
तर प्रेमात पडून, घरच्यांकडून इतकं प्रेम, जिव्हाळा, आपूलकी मिळाल्यानंतर (विशेषतः एकट्या वाढलेल्या मुलीला) एखादा बदलला तर वावगं काय आहे? ती ही व्यक्ती आहे, तिला तिच्या बाबांना सोडून जायचं नव्हतं सासरी, पण त्यांच्या इच्छेखातर तिने केले लग्न, तिच्या बाबांनी वेळोवेळी तिला सासरच्यांनाच महत्त्व देण्यास सुचवले, ती मध्यंतरी काही काळासाठी घरी गेली होती तेव्हा, वडीलांची अवस्था तिलाच बघवली नाही, हे लग्न तिच्या वडीलांसाठीही किती महत्त्वाचे आहे, हे जाणताना ती ही गुंतत गेली सासरी, गैर काहीच नाही, ह्या उलट ज्या नॅचरल पद्धतीने तिचे कॅरेक्टर बदललेय तो फ्लो पाहता राजवाडेचं कौतुक वाटलं! Happy

घनाला त्याच्या "अमेरिका अट्टहासातला" फोलपणा कळत नाही आहे, त्या वेडापायी त्याने त्याला जाणवत असलेलं प्रेम स्वतःपासूनच दूर ठेवलंय, हे स्वप्नीलनेही फार उत्तम वठवलंय... व्यक्तीरेखा अगदीच गंडल्यात असे म्हणता येणार नाही (अर्थात वै म म्हणा) Proud

ह्या उलट ज्या नॅचरल पद्धतीने तिचे कॅरेक्टर बदललेय तो फ्लो पाहता राजवाडेचं कौतुक वाटलं!
>>>>>>>>

इतका अमूलाग्र बदल Sad इतकी असहाय Sad

गुंतता मध्ये पण मृणालचा रोल असाच काहिसा होता... तिला नवरा हवाच असतो पण ती खंबीरपणे पावलं उचलते...... इथे राधा मुळापासून खंबीर दाखवलीय, आणि आता टोकाची अगतिक, हतबल.... Sad

आणि आता टोकाची अगतिक, हतबल.... >> ही हतबलता येऊ शकते... बट नॅचरल!!!
ती येऊनही ती विचारांनी दुबळी दाखवली नाही निदान घनासमोर (अबीरजवळ एक मित्र म्हणून मन मोकळं केलंय तिने), घनाला ती डिवोर्स ईनीशियेट कर असेच म्हणतीये (आता घना, तिला अबीर आवडतोय म्हणून ती डिवोर्स घाईने मागतीये असा पाष्कळ न बोलला म्हणजे मिळवली Wink )

Pages