एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालः

१. दिग्याकाकाने माऊलीकडून काय कट शिजतोय ह्याचा छडा लावायचा असफल प्रयत्न केला.
२. राधाने घनाला सांगितलं की अबीरने त्याच्या वाढदिवसाला बोलावलंय. घनाने मला जायला जमणार नाही म्हणून सांगितलं. राधा म्हणाली 'ठीक आहे'. बोलायच्या ओघात पूर्वाचा फोटो कपाटात मिळाल्याचं राधाने घनाला सांगितलं.
३. राधा माहेरी गेली. तिथे तिचे पपा गाल फुगवून बसले होते. पण अबीरने 'तू छान दिसते आहेस' वगैरे म्हणत तिचं स्वागत केलं.
४. घनाच्या बॉसने घनाच्या घरून डब्यात दिलेलं 'वालाचं बिरडं' चापलं. घनाने ते आईने केलं असावं असं म्हटलं. आमच्या आईसाहेबांना वाटतंय ते रधाने केलं असावं. बॉसने स्वतःला जेवणासाठी घनाच्या घरी इन्व्हाईट करून घेतलंय.

आता घनाच्या घरी त्याची बायको पाहून बॉस उडणार, किंवा घना राधाला 'तू तात्पूरते बाहेर जा माझा बॉस येणार आहे आणि त्याला माझं लग्न झालेलं माहित नाहीये' असे काहीसे सांगणार आणि राधाला रडण्याची अजून एक संधी !! Proud

ते बॉस प्रकरण जरा अतिच दाखवलय्...ह्याचा बॉस इतके दिवस ह्याच्या कंपनीसाठीच थांबला होता का? त्याला स्वत:चा ग्रुप नाही का? अमेरीकेत आहे असे दाखवले असते तरी एकवेळ समजू शकलो असतो की बाबा खुप दिवसांनी आपल्याकडचं कोणी भेटलय म्हणून. एकूण इथे तुम्ही सगळे म्हणताय तसं हा बॉससुद्धा कटात सामिल दिसतोय.

बाकी अबीर हे सगळं मुद्दाम करतोय हे त्याच्या कालच्या वागण्यातून जाणवत होतं.

मालिकेपेक्षा इकडेच जास्त धमाल सुरु आहे.
बॉस पण भारी आहे, २ दिवसाच्या ओळखीवर स्वत:ला invite करून घेतलं आहे डिनर साठी.
पण राधाला जरी बाहेर जा संगितले तरी आयडी आणि काकू कंपनी लाडक्या सुनेचा उल्लेख कसा टाळतील? आणि घना त्यांन कुठे सांगू शकणार आहे, राधा आणि लग्नाबद्दल बॉसला सांगू नका म्हणून. सगळ्यांना अटॅक येइल नं!

बॉस पण घनाच्या लेव्हलचाच आहे. ते सबऑर्डिनेट समोर बोटे चाटून खाणे काय. शोनाहो.
घनाचा कालचा शर्ट छान पण राधाने दोन तीन पँट्स पण शिवावयास टाकायला हव्या होत्या.
अगदी कंडक्टर ची प्यांट वाट्त होती. ( बस कंडक्टर! ऑपेरा नव्हें)
लिस्सन-दिग्याचा आजचा प्रसंग मजेशीर होता. ते चष्मा वगैरे.

एपिसोड जरासादेखील गंभीर होतोय असा संशय आला की राजवाडे आणि मंडळी एक तर दिग्याकाका आणि सुप्रियाकाकूला आणतात नाहीतर वल्लीकाकू आणि वल्लभकाकाला. वल्लीकाकूचं 'कसं होणार आहे ह्या मुलीचं. मला ना टेन्शन आलंय' हे ऐकून कान विटले.

काल बॉस घनाशी इतक्या प्रेमाने वागत होता की मला 'घनाकी इज्जत खतरेमे' चा नारा द्यावासा वाटू लागला. हा येडचाप बसून हसत होता त्याच्यासमोर.

घनाच्या बॉसचं बोटं चाटणं पाहून पुलंचं 'दुर्गादेवीच्या दुष्काळातून आल्यासारखा गिळत होता' हे वाक्य आठवलं. Happy बाकी राधा आणि घना दोघांचेही बॉसेस जास्तच इनफॉर्मल दाखवलेत. रच्याकने, घनाचं डेसिग्नेशन काय आहे?

भारतात विचारतात मॅरीटल स्टेटस एकदम पहिल्या मुलाखतीतच. फिदीफिदी >> हो विचार्तात म्हण्जे मला विचारलं होत माझ्या कंपनीमध्ये आणि नवरा कुठे, कसली नोकरी कर्तो, तिथे त्याचा हुद्दा काय वगैरे तोंडी माहिती माझ्या बॉसने विचारली होती नि याशिवाय घरात कोण-कोण आहे नि ते काय करतात ही माहिती कंपनीने तोंडी-लेखी घेतली होती.. Uhoh असो..

घनाचा बॉस >> १. घनाचा बॉस घरी येईल तेव्हा तिथे अबीर असेल नि बॉस मुलाला म्ह्ण्जे अबिरला बघून नि अबिर बॉसला म्हण्जे बापाला बघून दोघेही उडतील.. किंवा
२. घनाचा होणारा आत्तोबा म्हणून यंट्री असावी घरात.. किंवा
३. दोन्ही शक्यता आहेत.. किंवा
४. वरिलपैकी काहीच नसेल बॉस फक्त बॉसच असेल..
Proud

वल्ली काकू जाम गोरी आहे<<
अमा, चष्म्याचा नंबर बदललाय का? ती वल्ली काकू पण चक्कर येऊन पडेल ऐकल्यावर Wink

खरच खुप पकाऊ सुरु आहे मालिका. आधी जेवढी रियलिस्टीक वाटली (म्हणून आवडली) तितकीच जास्त फिल्मी होत चाललीये. ह्या नव्या नोकरीत त्या बॉसचा काय बिनडोकपणा दाखवलाय? गरज आहे का काही?
डबा काय चाटतोय, घरी जेवायला बोलव काय म्हणतोय?
सध्या दिग्या-माऊ जोडी टिपी वाटते बघायला. बाकी सगळं.. जाऊ द्या...
दिग्याचा एक दोन दिवसापुर्वी डायलॉग भारी होता. त्याची माऊ आणि कुहू खिदळत खोलीच्या बाहेर येतात तेव्हा हा समोरुन येऊन " आं, कुठे उडतेय पोपटाची जोडी आं?" Lol

सुयावालं ते अ‍ॅक्युपंक्चर ना मग सगळे प्रेशर आणि पंक्चर आलटून पालटून कसही बोलत होते काल.

सगळे डायलॉग जाम पकाऊच होते म्हणा...

त्या दोघींनी हिरव्या रंगाचे कपडे घातलेले असतात ना...>>> हो का? माझं इतकं लक्ष नव्हतं.
दिग्या मस्त आहे पण. माऊ पण सही.

आज काय घनोबा एवढा लाडात आला होता आईकडे 'बिरडं' छन झालं म्हणून.. महामूर्ख सीन !
मोस्ट इरिटेटिंग सीन ऑफ द सिरिज म्हणून बक्षिस पटकावेल तो 'ए आयडी आयडी आयडी' वाला सीन .. राजवाडेंनी सुरवात चांगली करून धोका दिलाय अता प्रेक्षकांना.. या गुन्ह्याला माफी नाही Proud

कुहु च लग्न ठरवायच्या वेळी तीची सासु कशी नसते? >>> खरंतर असायला पाहिजे. आपल्याप्रमाणे सरांना पण तसं वाटत असेल, पण आता मालिका संपायला आलीय तर उगीच आणखी एका पात्राचा खर्च कशाला ? फारच काटकसरी बुवा सरा !
बाकी आजचा "अबीर" बघून याचं आणि राधाचंच जमायला पाहिजे असं आवर्जून वाटलं.
घना पळपुटे पणा करतोय. त्यांचं बिंग फुट्ल्यावर होणार्‍या घरातल्या हलकल्लोळाला तोंड देणं त्याला नकोय. पण राधानी हे ओळखलं आहे असं वाटतेय. असो. कुहू बदलू घातली आहे असं वाटेपर्यंत मूळपदावर आली.

मोस्ट इरिटेटिंग सीन ऑफ द सिरिज म्हणून बक्षिस पटकावेल >> ते दोघे फ्रेममध्ये आलेले बघताच मी तो सीन स्किप केला डीज्जे. तू उगाच आशावादीपणा केलास आणि भो. आ. क. फ. Happy

अरारारा! मी तर आधीच म्हंटलो होतो डिज्जे, तेव्हा तुच लाडोबा टाईप्स (हे तुझेच शब्द आहेत) कॅरॅक्टर Proud च्या प्रेमात बुडाली होतीस. मला माहित होतं पुढे काय वाढून ठेवलय ते. Proud
आईडी, वहिनुडी आणि प्रभुड्या Lol मेल्या राजवाड्या!!!!

हे लोक्स जर खरच रोमातून माबो वाचतात तर अ‍ॅडमिन करून प्रेरणा घेऊन घनाच्या आयडीला ब्लॉक का नाही करतेत
डोक्यात जाते ती बाई माझ्या

Pages