एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या आजीच्या शब्दात सांगायचं तर 'माळरानावर उन फुकट जातंय' म्हणून काळजी करणारा हा 'चिंतातुर जंतू' आहे.
>>>>>>>>>>>>

अच्छा, म्हणजे स्वप्नाचे वन्समोर - टांगा पल्टी गोडे फरार डायलॉग्ज हे तिच्या आजीची देणगी आहे तर Proud

चल स्वप्ना आता पटकन डोक्यावर एक पाटी चिकटवून टाक "आजी तुझा आशीर्वाद" Wink

भुंग्या सध्या कुहू चे लग्न होई पर्यंत बोअर्च होनार डोळा मारा
>>
छे छे
त्याला त्या नंतर बोअर होईल

कुहु मोड ऑन
गहिवरून वैगेरे येईल
म्हणजे ना असे उमाळे दाटतील
मह्णजे अस तुटून गेल्यासारखं वाटेल
पौर्णिमेच्या रात्री चंद्रच उगवला नाही तर आकाश जस दिसेल ना तसं होईल त्याचं मन
कुहू मोड ऑफ

Proud

पौर्णिमेच्या रात्री चंद्रच उगवला नाही तर आकाश जस दिसेल ना तसं होईल त्याचं मन
>>>>>>>>>

आकाशात चंद्र नसला तरी तळ्यात कमळ आहे हो रीया Proud Rofl असो. Wink

सॉफ्टवेअरमध्ये असलेल्या लोकांना कविता आवडत नाहीत. KLOC, For Loop, NULL, Bugs, Waterfall model ह्यापलीकडे जाऊन बाकी काही विषयांत त्यांना इन्टरेस्ट नसतो हा निष्कर्ष घनाच्या आत्याने ठोंब्या घनाकडे बघून काढलाय का? कैच्या कै जनरलायझेशन का करतात? ही मालिका संपल्यावर राजवाडेमाऊलीला एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीत सहा महिने इन्टर्नशिप करायला पाठवलं पाहिजे. Angry

घनाचा 'अंगद कश्यप' नावाचा बॉस 'हिन्दी' अ‍ॅक्सेन्टमध्ये 'मराठी' बोलायच्या ऐवजी 'मराठी' अ‍ॅक्सेन्टमध्ये 'हिन्दी' बोलतोय. आज तर आपल्या कुटुंबाबद्दल सांगताना 'माझे भाऊ, त्यांच्या बहिणी' असं म्हणाला. हे म्हणजे 'भाईयो और उनकी बहनो' असं काहीसं वाटलं.

भारतातल्या ऑफिसच्या बिल्डिंगचं नाव 'न्यूयॉर्क'? मग न्यू यॉर्कच्या ऑफिसच्या बिल्डिंगचं नाव काय आहे? हिन्जेवाडी? का 'महापे'? अरे, मी घनाच्या आईवडिलांच्या जागी असते तर आमच्या इन्टेलिजन्सचा अपमान केला म्हणून त्याच्या कानाखाली जाळ काढला असता.

चला, घनाच्या आईला राधाने साडी लवकर का निवडली ह्याची चिंता नको करायला आता. घना अमेरिकेला जाणार हा एक नवा विषय मिळाला.

दिग्याकाका आणि सुप्रियाकाकूच्या भोचकपणाचा मात्र वैताग आला. घरात चाललेली एखादी गोष्ट माहित नसली म्हणून आकाश कोसळणार आहे का? दुसर्‍याच्या भानगडीत एव्हढं लक्ष घालायला वेळ कुठून मिळतो?

कुहू आणि ज्ञानाचा प्रसंग छान दाखवला. आता रक्षाबंधन स्पेशल एपिसोड असेलच.

>>>>>हा कसला अंगद कश्यप. छ ह पह रीही.

अमा, थोडा काळा असता तर त्याला जांबुवंत नाव तरी ठेवता आलं असतं ... Proud

सॉफ्टवेअरमध्ये असलेल्या लोकांना कविता आवडत नाहीत. KLOC, For Loop, NULL, Bugs, Waterfall model ह्यापलीकडे जाऊन बाकी काही विषयांत त्यांना इन्टरेस्ट नसतो हा निष्कर्ष घनाच्या आत्याने ठोंब्या घनाकडे बघून काढलाय का? कैच्या कै जनरलायझेशन का करतात? ही मालिका संपल्यावर राजवाडेमाऊलीला एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीत सहा महिने इन्टर्नशिप करायला पाठवलं पाहिजे.
>>
तर काय
बावळटपणा नुसता Angry

विवेक लागूंच्या तोंडचे वाक्यकाय फनी होते. एक्झॅक्ट नाही आठवत. असे काहिसे - "आपण आपल्या घरी अगदी पाहिजे तेव्हा या आपलेच घर समजून" Lol

प्रश्नः
एक पोपट असतो, तो हत्तीवर पडतो आणि ह्त्ती मरतो, का ?
उत्तरः
कारण तो 'पोपट' नावाचा हत्ती असतो जो 'हत्ती' नावाच्या पोपटावर पडतो.

हे घनाचा माठ्याचं ते बिल्डिग चं नाव "न्युयॉर्क " सांगणे हा नक्कीच भुसन्याच्या जोक चा परिणाम असणार!
एवढच नाही तर शेवटी घन्ना जाणारच न्युयॉर्क ला, आय मीन 'न्युयॉर्क' नावाच्या बिल्डिंग मधे .. घन्ना खुष आणि घरचेही खुष, वर पूर्वा माउलीही खुष !
अशा रितीने घना अमेरिकेला कसा जाणार हा प्रश्न सोडवलाय राजुवाडु नी Proud

ऑफिसच्या बिल्डिंगच नाव न्युयॉर्क Happy काय च्या काय डायलॉग Rofl
कुहु आणि ज्ञानाचा सिन आवडला एकदम ईमोशनल वाटल त्यात रक्षाबंधनसुद्धा आहे २ दिवसांवर.
पुढच्या भागातला घनाच्या नाकावरचा अमेरीकेचा तोरा परत बघावा लागणारसा दिसतोय म्हणजे पुन्हा डोक्याला शॉट Angry

<<<ही मालिका संपल्यावर राजवाडेमाऊलीला एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीत सहा महिने इन्टर्नशिप करायला पाठवलं पाहिजे.
ंमनःस्विनी लता रविंद्रला गं, तीच संवाद लिहिते ना Proud

उल्का आणि अंगदचं जमणार तर.......

फॉर अ चेंज ते बॉस आलेले असताना काका-काकू दुक्कल, लिंबूटिंबू पब्लिक गायब होतं

काल इतका बोर झाला...........

कुहु-ज्ञाना ओढुन ताणुन आणलेला प्रसंग वाटला, तसे हल्ली सगळेच प्रसंग ओढुन-ताणुन आणलेले असतात म्हणा... उल्का-अंगद प्रसंगही अगदी तस्सेच... आता शेवटच्या भागात दोघेही येतील सांगत आमचेही जमलेय सांगत.. घरातल्या काकु मंडळींना नक्की कोणाच्या लग्नासाठीचा गोंधळ घालावा कळणार नाही.

ते न्युयॉर्क प्रकरणही जाम डोक्यात गेलं. घना स्वःच्या आईबाबांनाही स्वतःसारखेच समजतोय. खानदानी बिमारी आहे.

माऊ 'मी घटस्फोट द्यायला तयार आहे' असे म्हणते तेव्हा दिग्यानेही खानदानी बिमारी दाखवली. Happy बिचारी माऊ.....

त्यातल्या त्यात मानवने काल मजा आणली. आता खरे तर राजवाडेनेच नर्मदा परिक्रमेवर गेलेले बरे... मार्तंड परिक्रमेवर गेला तर अत्युत्तम.!!!!!!!!!!!

राजवाडे भयानक पकाऊ माणूस आहे, इथे वाचून मी १० वर्षानंतर पहिल्यांदा मालिका पाहणे चालू केले २ महिन्यापूर्वी, पण सध्या सगळा आनंदी-आनंद चालू आहे. मालिकेमध्ये, एका लग्नाच्या दुसर्या गोष्टीत, बर्याच गोष्टी(कुहू चे लग्न, त्या मेक-अप च्या दुकानाचे लग्न) राजवाडे खपवाताहेत. एका लग्नावर आणखी २ लग्न मोफत.
इथे वाचून कळले की, मालिका सुद्धा लोक बारकाईने बघतात.
आवरा राजवाडे आवरा...

Pages