एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटतं अबीर मुद्दाम करत असणार. भिजत घोंगडं पडलंय ते वाळवायला. आत्तापर्यंत सगळं आडूनआडून चाललंय. आता काही दिवसांत सगळे आखाड्यात उतरतील Happy

>>गेले ते दिन गेले....<<

(हे अगदी साहेबाच्या काळात... सारखे आहे..)

पुर्वीच्या काळच्या सिरियल्सची सर आता नाही कशाला...(. एक मोठा हुंदका.)
साध्या, सरळ आणि संथ असल्या तरी जवळच्या वाटणार्‍या...
हि माझी आवडती होती... खास काहीच नाही पण आवडायची. (हिंदी आहे.. उजव्या हाताच्या सर्वच पहायची आवडीने).. घ्या आनंद...

माहीतीय बाफ चुकीचा आहे.. पण जुन्या सिरियलचा विषय निघाला की होते असे.. Proud
http://www.youtube.com/watch?v=oCPv8l_tIYI

अबिर ला व्हिलन नाही केलय, माई अज्जीच व्हिलन वाट्टेय मला !
तेजाब मधल्या मोहिनीचा डॉयलॉग फिट्ट आहे अत्ताच्या माई आज्जींना Proud ' हो गई छुट्टी माई आज्जी, अब बद्रिनाथ जाके भजन करो भजन'

घनाच्या बाबांची मान सरळ करून मिळेल का? सतत आपली ४५ अंशाच्या कोनातच असते.

माईआज्जीला ह्या वयात सिरिअलच्या शुटींगचा ताण तरी कसा काय झेपतो ? तिला पाहीले की घना राधापेक्षा तिचीच काळजी वाटते.

अवांतर्...मागे आदेशभाउजींच्या वहिनी वहिनी कार्यक्रमात एका गिरगावच्या माउलीने ओसामाचा भाउ ओबामा असे उत्तर दिले होते. आणि दुसर्‍या एका माउलीने पॅसिफिक, अटलांटीक व ऑलींपिक असे ३ खंड सांगितले होते.

मला वाटतं अबीर मुद्दाम करत असणार. भिजत घोंगडं पडलंय ते वाळवायला>>>असच असु दे.
घनाचा शहाणपणा बघता तो आतापर्यंत राधाच्या मनातून उतरायला हवा. किती ते त्याच्या मागेमागे करायचे.
आता अमेरिकेला जायचे ठरले आहे ना त्याचे मग परत नोकरी मिळाल्याचे सांगून घरच्या लोकांना का आशा लावली आहे याने :रागः
त्याची आई तर कित्ती आनंदी झाली आहे! त्याने अंगनातच त्याचे ऑफिस थाटायला हवे...त्यांनी मग रोजच दिवाळी साजरी केली असती...घना आता कुठे-कुठे जाणार नाही म्हणून.

आता अमेरिकेला जायचे ठरले आहे ना त्याचे मग परत नोकरी मिळाल्याचे सांगून घरच्या लोकांना का आशा लावली >>>> बहुधा या कंपनीतर्फेच जाणार आहे तो अमेरिकेला.

मला वाटतं अबीर मुद्दाम करत असणार. भिजत घोंगडं पडलंय ते वाळवायला>>>> +१

काल अबीर आवडला नाही... उगीचच आगावूपणा... प्ण तो नाटक करतोय, जरी त्याला राधा आवडत असली तरीही सध्या जे करतोय ते नाटक आहे. राधासारख्या मुलीने स्वतःचे असे बॅडमिंटनचे फुल करुन घेणे बरोबर नाही. मुळात घनाच्या प्रेमात पडण्यासारखे तिने त्याच्यात काय पाहिले हेच मला कळत नाही.

पण माईआज्जी नी माऊलीने जो यु-टर्न घेतला ते पाहुन धक्का बसला... लगेच आडवे मांजर, ब्याद वगैरे वगैरे..... किती कृतध्न आहेत लोक.....

आज अबीर डोक्यात गेला माझ्या
आणि आज स्वप्निलचा अभिनय आवडला
एकदम सगळं काही हरलेला, लूजर.. बाबंनी बोलतानाच्या वेळचा मनातली गिल्ट नीट दाखवला त्याने

जरा अबीरचा सहानुभूतीपूर्वक विचार करा लोक्स !
इतका तरुण आणि देखणा युवक .... किती दिवस त्या देसायांचं किचन सांभाळेल ?
राधा-घनाचं दळण काही संपत नाही. आता इस पार नाही तर उस पार
राधा-अबीरची जोडी जमवून या लग्नाची दुसरी गोष्ट संपवावी..
हं, आता काळेवाडीला वाईट वाटेल पण असला बावळट्ट कुलदीपक मिळाल्यावर दुसरं काय होणार ?

अबिर ने त्या विनोद काकाला अंगठि देताना जी हिंट दिली ना कि 'ती व्यक्ती लवकरच काळे वाडी सोडणार आहे' , ते अ‍ॅक्चुअली उल्का आत्या बद्दल आहे Proud
अबिर चा २ लग्न लाऊन ( घधा आणि उल्केश या २ जोड्या जमवून) गायब होण्याचा प्लॅन असणार !

भान | 21 July, 2012 - 14:17 नवीन
कुहुच्या लग्नाची भेट असेल ती अंगठी
<<<
तस असेल तर मग अबिरड्या आणि प्रभुड्या चा वेगळा प्लॅन शिजतोय Proud

अबिरही काही कामधंद्याला जाताना दिसत नाही. Happy
राधाचंही एक पेटंट वाक्य ... "मी निघते, मला ऑफिसला जायला उशीर होतोय"
ऐकून कंटाळा आला.

अबिर ने त्या विनोद काकाला अंगठि देताना जी हिंट दिली ना कि 'ती व्यक्ती लवकरच काळे वाडी सोडणार आहे' , ते अ‍ॅक्चुअली उल्का आत्या बद्दल आहे
अबिर चा २ लग्न लाऊन ( घधा आणि उल्केश या २ जोड्या जमवून) गायब होण्याचा प्लॅन असणार !
>>> हायला, डीज्जे, जबरीच ! हे अजिबात आलं नव्हतं डोक्यात Lol

रच्याकने, कालच्या भागात विनय आपटे आणि अबीर ह्यांचा सीन झाला का ? मला तरी दिसला नाही पण परवाच्या हायलाईट्समध्ये तो दाखवला होता.

>> कालच्या भागात विनय आपटे आणि अबीर ह्यांचा सीन झाला का?>>
काल नाही दाखवल ते. पुढच्या भागात असणार ते. मलापण राधाच्या बाबांचा स्टँड बघायचा होता कारण हायलाईटमधे अबीरला ते स्पष्टपणे ठणकावताना मस्त दाखवल होत.

बाकी आता मात्र घनाची फारच किव येतेय. वाळवंटात पाण्याचा साठा बरोबर असुनही तहानेने व्याकुळ होऊन मृगजळाच्या मागे फिरण्यासारखी त्याचे अवस्था झालीय.
राधाचा घनाच्या बाबतीतला प्रॅक्टीकलपणा आवडला.
अबीरच नाटक वाटतय पण अजुनतरी तो फक्त खंबीर नसणारया लोकांसमोरच डिंग्या मारतोय.

बाकी आता मात्र घनाची फारच किव येतेय. वाळवंटात पाण्याचा साठा बरोबर असुनही तहानेने व्याकुळ होऊन मृगजळाच्या मागे फिरण्यासारखी त्याचे अवस्था झालीय.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

सांडणी आणि सांडणीस्वार डोळ्यासमोर आले Rofl

अबीरच नाटक वाटतय पण अजुनतरी तो फक्त खंबीर नसणारया लोकांसमोरच डिंग्या मारतोय

राधासमोरही बोललाय पण तिने सिरीयसली घेतले नाहीय.

उल्काआत्याच्या भावी जोडीदाराची एंट्री झालेली आहे. घनाचा बॉस Proud

आता घनाच्या बॉसचाही त्याचा निर्णय बदलायला हातभार लागणार असेल तर योगायोगाचा अतिरेकच झाल्यासारखं वाटेल बुवा.

घना ऑफीसात पण चाचरत बोलतो...अनॉयिंग. मला वाटलं की फक्त राधाशी बोलातानाच तसा अवघडलेला असेल पण अरे देवा..

Pages