एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे मायबोलीवर आता राजवाड्यांनी 'एका लग्नाची दुसरी गोष्ट - अजून चालूच' असा तिसरा धागा काढायला नाही लावला म्हणजे मिळवलं...>> Lol आणि मंसो, पहिल्या धाग्यावर तूच लिहीलं होतंस- मालिका संपणार आहे, कशाला नवीन धागा? Proud लोकांना मन मोकळं करायला जागा लागते अगं! Wink तिसरा धागा तूच काढशील बघ! Proud

मला तरी असे वाटते, राजवाडे शेवट असा करतील... अबिर आणि राधा एकत्र येतील आणि मग घना आणि मानव दोगे एकत्र अमेरिकेला जातील Wink

तूच लिहीलं होतंस- मालिका संपणार आहे, कशाला नवीन धागा?>>>>>>>>> Blush मला वाटलं, विसरले असतील सगळे एव्हाना माझं ते बोलणं. Blush

लोकांना मन मोकळं करायला जागा लागते अगं!>>>>>>>>>> Lol हे बाकी पटलं एकदम, इथे येऊन एकदा कालच्या एपिसोड वर भडास काढली/वाचली की दिवस निवांत जातो मग, पोरांवर चिडचिड होत नाही

पोरांवर चिडचिड होत नाही>>> मालिका बघू नका, कशाला उगीच पोरांचे हाल करवता? Proud
आणि बघावी लागत असेल तर त्या वेळात एखादं छान पुस्तक वाचा, कारण 'पुस्तके हाच सर्वश्रेष्ठ गुरू' Proud

इतका ध्येयवादी म्हणून घनाबद्दल असलेला आदर आज नष्ट झाला. संगीतामुळे झाडं चांगली वाढतात? तो अमेरीकेला जावा हेच उत्तम. नाही, नको, तिकडेच राहिलेला बरा ...

संगीतामुळे झाडं चांगली वाढतात>> बिचारा घना, इन्सिक्योर झाला की तिसर्‍याच विष्यावर बोलत बसतो... पपांना पण न्या म्हणे सोबत... Lol
राधाचा आताचा स्टँड सहीये.. जरा अलिप्त, फ्रिकींग आऊट.. विदऑट बॉदरिंग अबाऊट येडा घना Wink Proud

स्वप्ना,

अबिरच घनावर प्रेम? मग घना आणि अबिरला अमेरिकेला जावं लागेल. आणि इथले सगळे प्रश्न एका झटक्यात सुटतील! पण मग तो राधाला का नेतोय गाणी ऐकायला?

पण मराठी 'कौटुंबिक' सिरीयलांमध्ये असलं 'काही तरी भलतं' दाखवतील असं वाटत नाही.

अबिर घनावर आपलं प्रेम असल्याचं सांगेल हाही धक्का असू शकतो हं>>>>> स्वप्ने सिरियसली लिहिलयस काय ग??? कारण असा धक्का माईआज्जी काय कांता चोरघेला पण सहन होणार नाही. Proud

>>>>पोरांवर चिडचिड होत नाही >>>>
स्वप्निल जोशीच्या फॅन पेजवर ही मालिका आयुष्यभर चालु राहावी अस बरयाच जणांनी लिहीलय. या लोकांना अस वाटण्यामागच गुढ/अतार्कीक कोड आत्ता उमगल ! Happy Proud

शुम्पी काही विषेश झालं नाही
तेच ते सासरेबुवांचं सुनेला तुम्ही फिरुन याल असं मला वचन द्या म्हणणं, कुहुचं रडणं, राधाचं तिला समजावणं मग अति शांतपणे घनाला समजावणं ( ही इतकी शांत कशी झाली? मी असते तर दोन दिल्या असत्या ठेवून काय रे चिड चिड करतोयेस म्हणत), राधाने अबिरसोबत बाहेर जायचा प्लॅन बनवणं, मग टिपीकल नेहमी सारखंच तिला अति काम असल्याने तिने न जाणं, ती गेली नाहिये हे घनाला माहित नसणं, त्याने चिड चिड करणं,घनाच्या आईने " ए राधा अग हा इथेच जॉब जॉईन करतोय, जा हं बाळा! पहिलाच जॉब ना तुझा वैगेरे म्हणणं ( रच्याकने हा घनाचा पहिलाच जॉब कसा? की माझ्या ऐकण्यात चुक झालिये? )
याच्या व्यतिरिक्त काहीही झालेलं नाहिये

रीया आधीचा त्याचा कंप्युटर फॉर्मॅट करायचा वगैरे बिझनेस असतो गं.. Happy
राधा बेस्ट वागतीय. असंच तंगव जरा त्या ढेरपोट्याला! कळूदे जरा किंमत! Angry

राधा खरं तर अजूनही सौजन्यानेच वागतेय त्याच्याशी. आता एवढे एपिसोड्स अजून बाकी आहेत म्हणजे अजून काही दिवसांनी तिचा कडेलोट झालेला दाखवतीलच. काहीतरी भयंकर नाट्यमय झाल्याशिवाय मालिका संपू शकत नाही.

रीया आधीचा त्याचा कंप्युटर फॉर्मॅट करायचा वगैरे बिझनेस असतो गं..
>>>
बाप्रे याचा अर्थ तो बरेच दिवस आधी इंजिनिअरींग पुर्ण केलेला अनुभवशुन्य ( फ्रेशर) आहे
तरी त्याला अमेरिकेत नोकरी हवीये???
देवा.....
मी किती मागसलेली आहे म्हणजे. दिड वर्ष होऊनही ( कंप्युटर फॉर्मॅट करता येत असुनही) अजुनही अमेरिका वैगेरेची स्वप्न पाहिली नाहीत
छे! एकदंर घनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा लागणारेय मला आता

बस्के, रीया, मालिकेत घनाची छोटी सॉफ्टवेअर फर्म दाखवलीय आणि त्याचे क्लायंट डोमेस्टीक दाखवलेयत. बरेचवेळा छोट्या फर्ममध्ये हार्ड्वेअर, नेटवर्कींग, फ्रेमवर्क डिझाईन, कोड डेव्हलप्कोड, क्लायंटकडे सॉफ्टवेअर ईंस्टॉलमेंट अस सगळ कराव लागत. बरेचवेळा एखाद्या उत्तम डेव्हलपरलासुद्धा हार्ड डिस्क फॉरमॅटींग, नेटवर्क असली थातुरमातुर काम करावी लागतात. आणि बरेच लोक कंम्प्युटरमधे ऊत्तम डोक चालत असेल तर एखादा कोर्सकरुन स्वतःची छोटी फर्म काढण्याच धाडस करतात आणि चांगल यशसुद्धा मिळवतात. या मालिकेत घनाच कॅरेक्टर असच दाखवायचय त्या राजवाडेला परंतु सॉफ्टवेरबद्द्ल, अमेरीकेतल्या संधीविषयी लिमिटेड ज्ञान असल्यामुळे (हो हो काळे कुटुंबात "ज्ञाना" असुनही Happy ) घनाच्या तोंडचे त्याच्या जॉबबद्दलचे, अमेरीकेसंबंधीचे संवाद फसलेय. पण ही मालिका बघणारया ८०% लोकांना एवढ डिटेल माहीत नसल्याने त्यांना त्याच काही वाटत नाही. बाकी सॉफ्टवेअर मध्ये, अमेरीकेत असलेल्यांना ते पावलोपावली खटकत राहत. घनाने सुरुवातीपसुनच स्वतःची सॉफ्टवेअर फर्म काढलीय आणि म्हणुन त्याचा हा पहीला जॉब अस त्याच्या आईला म्हणायचय. मात्र स्वतःची कंपनी असणारे लोक जबरदस्त आत्मविश्वासु आणि मेहनती असतात मोस्टली आणि बरेच लोक १८-२० तास कामातच अडकुन असतात. त्यामानाने घना जरा जास्तच फ्री (रीकामटेकडा) दाखवलाय. पण घनाच वरीलप्रमाणे असेल अस गॄहीत धरुन मालिका बघीतली तर डोक्याला शॉट नाही होत जास्त. Happy

बंडूपंत, मी जी काही उपरोधाने लिहीले ते केवळ घना या कॅरॅक्टर बद्दल होते, बाकी तुम्ही नमूद केलेल्या गोष्टी मी पण केलेल्या आहेत, त्यामुळे ओव्हरऑल त्या कम्युनिटीबद्दल मी मूळीच काही म्हणत नाहिये. Happy
घनश्याम हे पात्र(व त्याच्या कामासंबंधीत डायलॉग्स्,सिचुएशन) इथे फसले आहे मेजर. किंवा ते लुझरच दाखवायचे असेल.

बंडोपंत +१.
माधव- खरंय. सोडली एकदाची ती मालिका. उमाझो. भयाण.... पाहवेना. त्या मानाने ही मालिका म्हणजे कलाकृती वाटते.
अगो, बस्के +१
आशिष मालिका पाहतायेत? ऐ. ते. न. Proud
मंजिरी Lol

भुंग्या काल घनोबाने तुझ्या कुहूडीला (एलदुगोचा परिणाम) रडवलं, दे २-४ ठोसे ठेऊन त्याला Proud आणि राधा एवढी सौजन्याने वागतेय, त्याच्या घरच्यांशी चांगलं वागतेय, तरी उगाच स्वतः सेपरेट होण्याबाबत खुप फर्म (त्याच्या भाषेत फोकस्ड) जे तो खरं तर नाहीच्चे, असल्यासारखा आव आणल्याबद्दल माझ्याकडून पण दोन तीन झापडा लगाव! राधाच्या जागी एखादी उर्मट मुलगी असती तर म्हणाली असती की , ''मला काय देणं घेणं याच्या घरच्यांशी?? '' म्हणे आयडीला त्रास होईल पुढे. अन ह्याच्या नसत्या कारणासाठी अमेरीकेत जायचा हट्ट धरण्याने काय याची आयडी गावभर उड्या मारत पेढे वाटणारे होय??????

'' म्हणे आयडीला त्रास होईल पुढे. अन ह्याच्या नसत्या कारणासाठी अमेरीकेत जायचा हट्ट धरण्याने काय याची आयडी गावभर उड्या मारत पेढे वाटणारे होय??????>> +१
टोके भारीच ! मला पण असेच वाटले ..माझ्या पण २,३ थपडा! Happy

>>मात्र स्वतःची कंपनी असणारे लोक जबरदस्त आत्मविश्वासु आणि मेहनती असतात मोस्टली आणि बरेच लोक १८-२० तास कामातच अडकुन असतात. त्यामानाने घना जरा जास्तच फ्री (रीकामटेकडा) दाखवलाय.

अगदी अगदी अगदी Happy

Pages