एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे बायकोने व मुलाने माझ्याकडे बघून काल एक अर्थपूर्ण कटाक्ष टाकला व जोरात हसायला सुरुवात केली.>>> आता पुस्तकाची किंमत कर "...आणि पुन्हा असं करू नकोस" Lol

Lol

"...पण पुन्हा असं करू नकोस">>>> मला त्या ज्ञानाचे सीन जेव्हा सुरु असतात तेव्हाच पार्श्वसंगीत ऐकलकी हसू आवरतच नाही. मधेच ते तबल्याचे बोल वगैरे बोलले असतात ते.. >> अगदी अगदी!!

कपडे लटकवायचे हँगर हे स्त्रीधन मानलं जातं का? कारण यांनी हँगर नेले तर बाकीच्यांनी कसे लटकवायचे कपडे?>> Lol मंदारचं आपलं काहीतरीच!!

अरे ते मुलगी, नारळ, आणि हँगर्स एवढंच घेत असतील मुलीच्या माहेराहून! आणि मुलीलाही सौम्य सूड उगवायची संधी... दात ओठ खात... "पडूदेत मेल्यांचे कपडे धूळ खात..." !!! घनासारख्याला विशेष फरक पडणार नाही ती वेगळी गोष्ट!!

ती इला माऊली तर भिंगरीगत फिरतच असते... भूलभूलैय्यात अडकल्यासारखी! अन ते कन्फ्यूजचे भाव चेहर्‍यावर डकवून! एवढी कन्फ्यूज तर मी माझ्या स्वयंपाकघरात पण नसते!!!
आणि ती आत्या तर एक रत्नच आहे... काल राधाची आत्या मधेच ढेकूण चावल्यासारखी मराठी अ‍ॅक्सेन्टमध्ये हिंदी शब्द वापरत होती. लोक हिंदी वाक्यात मराठी शब्द दडपतात. ही उलटं करतेय. >> अगदी अगदी गो स्वप्ने!

भुंग्या तू स्टार प्रवाहच्या मालिका बघतोस? आय मीन बघाव्या लागतात... मनापासून सिंपथी तुला!! आरारारारा... पुढचं पाऊल काल पाह्यलं काय प्रक्रण आहे ते... त्यात ती हर्शदा खानविलकर कोणातरी माणसाला गळ्यात पट्टा अडकवून कुत्र्यासारखं फिरवत होती.... नी ती कळ्ळलं???? ची टेप अधूनमधून!! मध्येच त्याला ढकलून देतं कोणतरी तर पायर्‍यांवरून घरंगळत येतं ते धूड... अघोरी! देवा....
आणि ते देवयानी... त्यात सासरा त्याच्या बायकोची जीभ अडकित्याने सुपारीसारखी कातरायला बघत होता... मी घाबरून चॅनेलच बदललं काय अघोरी मालिका आहेत त्या!!!

काल राधा चा घरातून निघतानाचा सीन मस्त जमला होता..
मुक्ता तिच्या डोळ्यांमुळेच भाव खाऊन जाते Happy
स्वप्नील जोशी पण मस्त

काल आणि परवाचे दोन्ही भाग मी मिसले Sad आणि नंतर उमेश कामतची जाहिरात पहिली.. Uhoh
मला तो प्रचंड आवडतो..पण नक्की घडणार काय आहे..!!??

हो ना.. उमेश कामतला का आणलंय.. उगाच आता प्रेमत्रिकोण वगैरे नको प्लीज....
(बाकी काल जाहिरातीत काय खतरनाक दिसत होता तो! Happy )

aparnas>> कंसातल्या वाक्यासाठी +१००००००००० Happy

बहुतेक स्वप्नीलच्या जागी उमेश येईलसे वाटते.

हायला, इथे मालिका संपवायची वेळ आलीये आणि हे लोक पात्रबदल करुन काय पाण्याचा पाईपच लावताहेत की काय मालिकेच्या कथानकाला???????????/

उमेश आला तरी बहुतेक त्याच्या "धागेदोरे" या नव्या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी येईल Happy

कथानकात उमेशचं काही स्थान असेल असं अजिबात वाटत नाही Wink

साधनातै>>हो ना तेच..
भुंगा(जी)>> असं होय..मग ठीके.. कसे आहात? Happy

स्वप्निल किती गोड काम करतो Happy उमेश कामतचे काही काम नाही इथे. आणि प्रिबाचे तर त्याहून नाही. लांब रहा! कृपया.

बहुतेक उकाची नवी मालिका येते आहे, एलदुगो रात्री साडेदहाच्या स्लॉटला जातेय अशी ऐकीव बातमी आहे.

<< एलदुगो रात्री साडेदहाच्या स्लॉटला जातेय

मालिका बंद होण्यापेक्षा / स्वप्निलच्या जागी उमेश येण्यापेक्षा चांगले.

आता यातलं नक्की खरं काय सतिश राजवाडेच जाणे म्हणा Proud

पौर्णिमा Lol

स्वप्नीलच्या जागी उमेश? हे होणे नाहि. त्यापेक्षा मुग्धाच्याजागी आणला तरी चालेल पण स्वप्नील तिथेच हवा. त्याच्याचसाठी तर हि मालिका बघते मी Happy

मी उकाचे प्रोमोज पाहिले नाहीयेत. पण कदाचित, उमेशच्या येण्यामुळे असुरक्षित वाटून होऊन घना राधाकडे प्रेमाची कबूली देतो, असाही ट्रॅक असू शकतो. Happy

त्यापेक्षा मुग्धाच्याजागी आणला तरी चालेल पण स्वप्नील तिथेच हवा. >>> मुक्ता म्हणायचंय का? आणि मुक्ताच्या जागी उ का कसा चालेल? Uhoh मग ती 'तिसरी' गोष्ट नाही का होणार? Lol

प्राची, तसंच हवं Wink नाहीतर उका त्याच्या सीरियलच्या प्रमोशनसाठी येऊ दे Happy ( तो सुद्धा आवडतोच म्हणा :फिदी:) , पण घनाची रिप्लेसमेंट म्हणून नको Happy

तेचकी भान Wink
सिरियसली, मुक्ताच्याही जागी अजून कोणीच चालणार नाही. दोघेही पर्फेक्ट आहेत.

साडेदहा चालेल की. झोपायच्या आधी काहीतरी हलकेफुलके!

उमेश कामतची नवीन मालिकाही चालेल. पण तो एकटाच, पॅकेजसहित नको! Uhoh

उकाची निराळी मालिका येणार असेल, तर तो 'एका लग्नाची दुसरी गोष्ट...' असं म्हणत प्रेक्षकांकडे पाहून सूचक हास्य कशाला करेल?

हो हो प्राची ,मुक्ता. माझ्यासाठी स्वप्नीलला रीप्लेस करायच्या ऐवजी बाकि कुणालाहि केलं तरी चालेल. अगदी मुक्तालाहि Proud

अगदी मुक्तालाहि>>

मुक्ताला रिप्लेस???? बिग नो नो. तिच्याइतकी चांगली ही भूमिका कोणीच करू शकणार नाही.

पण तो एकटाच, पॅकेजसहित नको! >>

पूनम + १०००००००००००० (कोणी कोणाशी लग्न करावं ही अती वैयक्तिक बाब असली तरी उकाने प्रिबाशी लग्न केल्याचं कळल्यावर मला लईईईईईई वाईट वाटलं)

Pages