एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंदार : असु देत रे
आजकाल सगळीकडे ढापाढापीच चाललीये
पण त्यातल्या सगळ्या पात्रांची अ‍ॅक्टिंग जबरी आहे
हे अगदी अगदी मान्यच करायला हवं

एक डाव धोबीपछाड मध्ये तर ती रॉकिंग होती... >>>> अगदी! जबरदस्त अनुमोदन!
मी जितक्या वेळा तो सिनेमा बघते, तितक्या वेळेला त्याच त्याच जोक्स ला पुन्हा पुन्हा हसते>>>अगदी, अगदी. मी, माझा नवरा अन लेकही
रैना,, चांगला , अगं जबरदस्त आहे तो, अगदी नक्की बघ. आपला मूड पार बदलून जातो. आजच बघ Happy

ए डा धो मधे मला सर्वात आवडला तो पुष्कर श्रोत्रीचा सीन!! तो आपल्या पोशाखातून एका मागून एक हत्यारं काढत जातो तेव्हा जाम धमाल येते. सगळ्यात शेवटी तो एक सुई काढतो अन गंभीर पणाने सांगतो " इशारी आहे, टोचली की माणूस मरतो !!" Lol

ए, काल मी अगदी शेवटी टि. व्ही लावला, तेव्हा मुक्ताच्या बॅगा भरून अंगणात वगैरे आणलेल्या होत्या...
अरे, संपले का ६ महिने, म्हणे?

अगदी शब्द न शब्द, प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर येतो नाही का
कडाधोप चा
>>

येस्स्स
मला सुबोध पण आवडला त्यात.
डेंजर भारी सिनेमा आहे तो

एडाधो- चांगलाय? ओके पहायला पाहिजे. >>>> रैने, सिनेमा टाईमपास आहे. सगळ्यांनी भाषेचा बाज मस्त सांभाळलाय. अशोक सराफचा फ्लॅशबॅक नसता तरी चालला असता असा, पण सिनेमा मस्तय. गोष्ट ढापलेली आहे हे बरोबरे पण ती मराठीत झक्कास बुडवुन काढलीय.

लग्नाच्या गोष्टीत काय झाले?? बॅगा भरुन कुठे चाललीय राधा??

एडाधोप एकदम मस्त. मला सुबोध पण आवडलेला त्यात... फक्त तो प्लॅशबॅक बोअर झाला.

लग्नाच्या गोष्टीत काय झाले?? बॅगा भरुन कुठे चाललीय राधा??>> मी ही वर तेच विचारलं, लोक्स सांगा ना जरा, मिसलाय कालचा भाग, शेवटाच्या दोन मिनिटात मुक्ताबैच्या बॅगा तयार दिसल्या, संपलं का कॉन्ट्रॅक्ट त्यांच?

नाही, कॉन्ट्रॅक्ट नाही संपलं अजून. पण आता त्यांना 'एकमेकांबद्दलचे वाढते आकर्षण' ही पायरी सतावू लागली आहे, त्यामुळे सध्या राधाने माहेरी रहावे अशी टुम निघाली आहे.

ओके. थँक्स श्रुती. Happy

भुंग्या लकी ठरणार बहुदा तू... कुहुच्या लग्नाआधीच मालिका बंद होणार अस दिसतय...
बघ तुला अजुन पण फुल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल चान्स आहे
>>>>>>>>>>

Blush

काय कनफ्युजन आहे राव....... इकडे मुक्ता बॅगा भरतेय तिकडे देवयानी पण बॅगा भरतेय....... घरात पाय टाकावा तर कोणी नाकोणी नायिका स्क्रीनवर बॅगाच भरत असते...... तेही कपडे हँगरसकट Proud Biggrin Lol

थॅंक्स रैना Happy

तेही कपडे हँगरसकट >> Biggrin
५ पावलावर माहेर, तेच हॅगरं तिकडे लटकवायला सोपे Wink Lol

काय कनफ्युजन आहे राव....... इकडे मुक्ता बॅगा भरतेय तिकडे देवयानी पण बॅगा भरतेय....... घरात पाय टाकावा तर कोणी नाकोणी नायिका स्क्रीनवर बॅगाच भरत असते...... तेही कपडे हँगरसकट
>>
Rofl

तू या मालिका पहायला चांगलाच तयार झालायेस की रे Proud
मला तर देवयानी कोण ते पण माहित नाही Wink

५ पावलावर माहेर,
>>>>>>>>>>>

उगाच नवरा सप्तपदी चालवतो मग Proud
इथे तर मागचं पाऊल माहेरी आणि पुढचं सासरी अशी गत दिसतेय Wink

तू या मालिका पहायला चांगलाच तयार झालायेस की रे फिदीफिदी
मला तर देवयानी कोण ते पण माहित नाही
>>>>>>>>>>>

रीया, एक घर आहे....... घरात आई आहे........ ती घरीच असते....... विरंगुळा काय दुसरा असं म्हणून बर्‍यापैकी ७ ते १० वेळातल्या मालिका बघते....... चॅनल बदलले तर जळजळीत कटाक्ष टाकते....... किंवा भावनातिरेकाने आम्ही कुठे इतर काय विरंगुळ्यासाठी करतो असा काळजाला हात घालते....... पुस्तकं वाचायला म्हटलं तर वाचनाची आवड नाही म्हणते...... पोथीवाचन वगैरे सकाळच्या वेळात झालेलं असतं...... आणि मग किचनमध्ये काम करत सिरिअल पाहण्यात आपला जीव रमवते.........

असा सीन ज्या ज्या घरात घरात असतो त्या घरातल्या मुलांना पुन्हा असे प्रश्न विचारू नकोस Proud Rofl Wink

रच्याक, देवयानीसाठी वेगळा धागा काढायला हवा Proud

असा सीन ज्या ज्या घरात घरात असतो त्या घरातल्या मुलांना पुन्हा असे प्रश्न विचारू नकोस
>>>>

Rofl
आमच्या घरात ३-३ बायका असुन हा असा सिन नसतो कधी

कपडे लटकवायचे हँगर हे स्त्रीधन मानलं जातं का? ए.भा.प्र.
कारण यांनी हँगर नेले तर बाकीच्यांनी कसे लटकवायचे कपडे?

आमच्या घरात ३-३ बायका असुन हा असा सिन नसतो कधी
>>>>>>>>>>

कारण तू घरात असून नसल्यासारखी असतेस Proud

असो विषयांतर नको नाहीतर मयेकर काका मारतील फटके Wink

Pages