Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28
कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बॅगेत तेही कपडे हँगरसकट >>
बॅगेत तेही कपडे हँगरसकट >> आम्हीही गेलो असतो हो, पण मेले सर्व कपडे टेचात बॅगेत भरायचीच मारामार.
(बहुतेक मंगला गोडबोलेंचा जोक आहे.)
(No subject)
कपडे लटकवायचे हँगर हे
कपडे लटकवायचे हँगर हे स्त्रीधन मानलं जातं का? ए.भा.प्र.
कारण यांनी हँगर नेले तर बाकीच्यांनी कसे लटकवायचे कपडे?
>>>>>>>>>>>>>
हा अगदी जेन्युईन कॉमन मॅनचा प्रश्न विचारलाय मंदारने
कपडे लटकवायचे हँगर हे
कपडे लटकवायचे हँगर हे स्त्रीधन मानलं जातं का? ए.भा.प्र.
कारण यांनी हँगर नेले तर बाकीच्यांनी कसे लटकवायचे कपडे?
>>>>>>>>>>>>>
हा अगदी जेन्युईन कॉमन मॅनचा प्रश्न विचारलाय मंदारने फिदीफिदी>> अगदी अगदी....
मंदार अतिप्रचंड आवरा.........
आता सिरिअलच "आवरा" गटात मोडते
आता सिरिअलच "आवरा" गटात मोडते म्हटल्यावर............
भुंगा ,मंदार आनि
भुंगा ,मंदार आनि रिया>>>>>>>>>>> तुम्ही प्रंचड बोअर करता...नविन अस दिसल्यावर ह्या धाग्यावर अपेक्षेने याव तर एलदुगो सोडुन काहीतरी भलतच असत..
आता घडून गेलेल्या भागावर किती
आता घडून गेलेल्या भागावर किती ते चर्वण करायचं.... म्हणून इतरांचं जनरल नॉलेज वाढवायची जबाबदारी आम्ही घेतलीये......
मी तर कित्येक दिवसांनी फिरकलो हल्ली.......
वाटतो धागा नवा वाटते नवी गल्ली....... ("कुहू" ईफेक्ट )
पण आता त्यांना
पण आता त्यांना 'एकमेकांबद्दलचे वाढते आकर्षण' ही पायरी सतावू लागली आहे, त्यामुळे सध्या राधाने माहेरी रहावे अशी टुम निघाली आहे.
अच्चा म्हणुन ती माहेरी जातेय.. ठिकाय .. आज टिवीवाला आयसी घेऊन येणार आहे त्यामुळे बघायला मिळेल कदाचित....
भुंग्या अनुडे कस्च कस्च
भुंग्या
अनुडे कस्च कस्च
वाटतो धागा नवा वाटते नवी
वाटतो धागा नवा वाटते नवी गल्ली
गल्लीत कंटाळलो आता गाठू दिल्ली
पर्यायी शेर देण्याचा
पर्यायी शेर देण्याचा संसर्गजन्य रोग माबोवर चांगलाच फैलावलाय
वाटतो धागा नवा वाटते नवी
वाटतो धागा नवा वाटते नवी गल्ली
कुहूच्या (एकाच) लग्नाची काळजी करते माता वल्ली.........
मी तर कित्येक दिवसांनी फिरकलो
मी तर कित्येक दिवसांनी फिरकलो हल्ली.......
वाटतो धागा नवा वाटते नवी गल्ली.......
वाटतो धागा नवा वाटते नवी गल्ली
गल्लीत कंटाळलो आता गाठू दिल्ली
गल्लीत कंटाळलो आता गाठु दिल्ली
जन्मले हे एक काव्य, चार अक्षरे जसी जुळली
.......................
....................... संवेदनशील ...........असल्याने ............संपादीत केली..............:हाहा:
आवरा
आवरा
अरे, त्या घनाची पाठ बरी झाली
अरे, त्या घनाची पाठ बरी झाली का? आता 'राधा का घर सोडून गेली' म्हणून सगळे हात धुवून त्याच्या पाठी लागतील ना
काल काय झाले?
काल काय झाले?
घर सोडुन गेली
घर सोडुन गेली राधा.....................
काल इला भाटेनी 'मी छोट्या
काल इला भाटेनी 'मी छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन घेते मला माहित आहे' असं म्हटल्यावर मला असंभवमधला त्यांचा रोल आठवला. तिथेही तेच करायच्या त्या.
काल राधाची आत्या मधेच ढेकूण चावल्यासारखी मराठी अॅक्सेन्टमध्ये हिंदी शब्द वापरत होती. लोक हिंदी वाक्यात मराठी शब्द दडपतात. ही उलटं करतेय. 'तू जमाईराजाला फोन लाव'. काय हे? 'उंच जिनेउपरसे धाडकन पडया' च्या उलटं आहे.
काल खूप कल्ला झाला (शाळेनंतर
काल खूप कल्ला झाला (शाळेनंतर कधी ऐकला नाही तो शब्द आज वापरायला मिळतोय). राधा कुठे गायब म्हणुन तिच्या सासूबाई घरभर भिरभिरत होत्या. तश्या त्या नेहमीच काही ना काही शोधत भिरभिरत असतात म्हणून सगळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते. मग त्यांना कोणीतरी राधाचा पत्ता घनाला विचार अशी अवॉर्ड विनिंग आयडिया दिली. सगळा मोर्चा घनाकडे वळला.
राधाने घरी पोचल्यावर आधी घनाला फोन केला. तेव्हा घना म्हणे की आता इथे बाँब फुटणार. तर अशा प्रकारे फोनने डिटोनेट होणारे बाँबस घरगुती मराठी सिरियलीतही आले. तिकडे तिने आणलेल्या बॅगा पाहून तिचे बाबा आणि आत्याबाईंनी कल्ला सुरू केला. आपलाच दाम खोटा तेव्हा जावयालाच विचारू काय झाले ते म्हणून त्यांनीही घनाला फोन लावला. घना या सगळ्यांना एकटाच बाजीप्रभू देशपांडेंसारखे तोंड देत होता. (तोफांच्या आवाजाप्रमाणे राधाने केलेल्या फोनची रिंग हा संकेतही होता).
राधाच्या चेहर्यावर अंखियोंको रहने दे अंखियों के आसपास हे गाणे लिहिलेले होते.
ढेकूण चावल्यासारखी >> अगदीच
ढेकूण चावल्यासारखी >> अगदीच गो स्वप्ने! परफेक्ट उपमा...
काल पुन्यांदा ज्ञाना, लई भारी, त्याला म्हणतो, "...पण पुन्हा असं करू नकोस"
राधाबाईनी बॅगा उचलल्या आणि
राधाबाईनी बॅगा उचलल्या आणि जायची तयारी केली. पण पाय निघत नव्हता. मग बरंच भवति ना भवति होऊन शेवटी निघाल्या. मला भीती वाटत होती की घना रिक्शापर्यंत सोडायला जातो आणि शाहरुख स्टाईलमध्ये राधा त्याला आत खेचून घेते की काय. पण राधा एकटीच गेली. तिने वडिलांना मी एकटीच येतेय असं सांगितलं. तिथे संशयकल्लोळ सुरु झाला. आत्याने तर युध्द सुरु झाल्याचा पवित्रा घेतलाय. मग इथे भाटेकाकू सुनेला शोधत होत्या. हे 'काळ्यांचं घर' आहे का 'व्हाईट हाऊस'? शोधताहेत आपल्या घरभर. मग शेवटी घनाला विचारलं का असं काकांनी विचारताच त्याला विचारायला आल्या. त्याने ती माहेरी निघून गेली आहे असं सांगितलं. तिथे राधा घरी पोचताच बाबा आणि आत्याने तिचं इन्र्टॉगेशन चालू केलं. पण तिने काही सांगितलं नाही. बाबांनी घनाला फोन केला. बॅकग्राउन्डला माऊली, भाटेकाकू आणि ते वल्लभकाका ह्यांचा मासळीबाजार. आता घनाने फोन बंद केलाय आणि घरच्यांना राधा का गेली ते सांगणार आहे.
"...पण पुन्हा असं करू
"...पण पुन्हा असं करू नकोस">>>> मला त्या ज्ञानाचे सीन जेव्हा सुरु असतात तेव्हाच पार्श्वसंगीत ऐकलकी हसू आवरतच नाही. मधेच ते तबल्याचे बोल वगैरे बोलले असतात ते..
कशाला ती हिंदी बोलते कळत
कशाला ती हिंदी बोलते कळत नाही, नॉनमराठीशी लग्न केल्यावर काय असले बोलतात का काय?
शेवटी ती जाताना घना मागे वळून
शेवटी ती जाताना घना मागे वळून बघू नकोस असं म्हणतो तेव्हा मला 'वाट इथे स्वप्नातील संपली जणू, थांबवितो धारांनी सावळा घनू' आठवलं.
मधेच ते तबल्याचे बोल वगैरे
मधेच ते तबल्याचे बोल वगैरे बोलले असतात ते.. >> अगदी अगदी! पण ते सिचुएशन ला परफेक्ट साजेसं असतं, काल जामच हसलेय
म्हणे, "पुस्तकांची किंमत तुमच्यासारख्या अतिसामान्यांना काय कळणार?" त्यावर स्वप्निलचे एक्स्प्रेशन्सही धम्म्माल
<<<<<<<<<<<<<रीया, एक घर
<<<<<<<<<<<<<रीया, एक घर आहे....... घरात आई आहे........ ती घरीच असते....... विरंगुळा काय दुसरा असं म्हणून बर्यापैकी ७ ते १० वेळातल्या मालिका बघते....... चॅनल बदलले तर जळजळीत कटाक्ष टाकते....... किंवा भावनातिरेकाने आम्ही कुठे इतर काय विरंगुळ्यासाठी करतो असा काळजाला हात घालते....... पुस्तकं वाचायला म्हटलं तर वाचनाची आवड नाही म्हणते...... पोथीवाचन वगैरे सकाळच्या वेळात झालेलं असतं...... आणि मग किचनमध्ये काम करत सिरिअल पाहण्यात आपला जीव रमवते.........
असा सीन ज्या ज्या घरात घरात असतो त्या घरातल्या मुलांना पुन्हा असे प्रश्न विचारू नकोस>>>>>>>>>>>>
भुंग्या + १ रे +१ . फरक एवढाच की घरात नवर्याची आई आहे. बाकी सगळ डीट्टोच.
पण तरीही ही देवयानी कोण ते मला माहीत नाही. एक होती आधी कुलवधु वाली. नाव कुल वधु पण अज्जिबात कुल नव्हती. ती स्वतः पण नी मालिका पण . आता देवयानी नवीन कोणेय रे??
"पुस्तकांची किंमत
"पुस्तकांची किंमत तुमच्यासारख्या अतिसामान्यांना काय कळणार?" >>>> इथे बायकोने व मुलाने माझ्याकडे बघून काल एक अर्थपूर्ण कटाक्ष टाकला व जोरात हसायला सुरुवात केली.
कपडे लटकवायचे हँगर हे
कपडे लटकवायचे हँगर हे स्त्रीधन मानलं जातं का? ए.भा.प्र.
कारण यांनी हँगर नेले तर बाकीच्यांनी कसे लटकवायचे कपडे?
कालचा इपिसोड पण छान होता.
काल घना आणि राधा दोघांचाही
काल घना आणि राधा दोघांचाही अभिनय अ प्र ति म बघायला जाम मजा येतेय.
Pages