Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28
कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एलदुगो रात्री साडेदहाला गेली
एलदुगो रात्री साडेदहाला गेली तर १० वाजता मला Desperate Housewives चा सिझन फिनाले नाही बघता येणार
घना आपल्या सगळ्या
घना आपल्या सगळ्या कुटुंबकबिल्याला 'आमच्या दोघांत काही प्रॉब्लेम्स आहेत. ते आमच्या दोघांतच राहिले तर सुटतील. उलट त्यात जितकी जास्त माणसं इन्व्हॉल्व्ह होतील तितके ते वाढत जातील' असं ठणकावून सांगणार आहे.
Desperate Housewives
Desperate Housewives >>>>>>>> मंदार काय हे....
हो ना, आता संस्कृतीरक्षण कोणी
हो ना, आता संस्कृतीरक्षण कोणी करायचं?
सोज्वळ मराठी मालिकांना नावे ठेवून विंग्रजी मालिका बघता? शोनाहो
भरत रच्याकने, लग्न करुन
भरत
रच्याकने, लग्न करुन कुटुंबियांना अंधारात ठेउन सहा महिन्यांनी वेगळं व्हायचं ठरवणं ही सोज्ज्वळपणाची पराकाष्ठाच
डे हा पुढे काहीही सोज्वळच
डे हा पुढे काहीही सोज्वळच ठरेल बरंका.
Desperate Housewives मीही
Desperate Housewives मीही बघते. काय म्हणणं आहे?
येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
मी पण बघते डे. हा. त्यातील
मी पण बघते डे. हा. त्यातील शेवटाचे विवेचन ( एका बाईच्या आवाजात ) ते छान असते.
मी पण बघते डे. हा. त्यातील
मी पण बघते डे. हा. त्यातील शेवटाचे विवेचन ( एका बाईच्या आवाजात ) ते छान असते. >>> ते त्यांच्या ज्या मैत्रिणीनं आत्महत्या केलीय नां तिचं असतं बहुतेक. मी २ सिझन्स पाहीले पण मग त्या 'हा' पेक्षा नुसत्या 'डे' आहेतसे जाणवु लागले मग पहावसं नाही वाटलं.
घना, राधा, तिचे बाबा, कुहू आणि ज्ञाना सहीयेत. पण आता मालिका फार ताणली जाऊ नये असं वाटतय.
> ते त्यांच्या ज्या
> ते त्यांच्या ज्या मैत्रिणीनं आत्महत्या केलीय नां तिचं असतं बहुतेक. >>
बरोबर आहे.
मी पण बघते पण म्हणजे काय ते
मी पण बघते पण म्हणजे काय ते सोज्वळ थोडीच आहे
सोज्वळ नाहीच्चे गं. पण मस्त
सोज्वळ नाहीच्चे गं. पण मस्त आहे. इरसाल पात्रं आहेत एकेक. कंटेंट जबराट आहे. अजिबात कंटाळा येत नाही.
स्वप्नील जोशी झिंदाबाद
स्वप्नील जोशी झिंदाबाद !
दुसरा कोणी नाय पायजेल..
इथे वाचूनच उमेश कामतबद्दल
इथे वाचूनच उमेश कामतबद्दल कळलं. सुरुवातीला त्याला घनाच्या भूमिकेत बघायला थोडं विचित्र वाटेल पण दोनचार दिवसांतच सवय होईल असं वाटलं.
ह्याचा अर्थ मला उमेश कामतही स्वप्निलइतकाच आवडतो किंवा सिरियलमधली प्लॅस्टिक सर्जरी फारच अंगवळणी पडली आहे
>>>>>>सिरियलमधली प्लॅस्टिक
>>>>>>सिरियलमधली प्लॅस्टिक सर्जरी >>>>>> जामच आवडलं हे.
मला राधा-घना जोडी हीच पाहिजे. खरं तर स्व. जो. खूप नव्हता आवडत आधी. पण आता लईच आवडतो. उ. का प्रमोशन साठीच यावा आणि जावा.
धनश्री +१
धनश्री +१
मी पण इथले वाचून सिरियल
मी पण इथले वाचून सिरियल पाहिली आपली मराठीवर
शूम्पी + १.. मी पण रोजच्या
शूम्पी + १..
मी पण रोजच्या रोज इथे भरभरुन वाहूणार्या पोस्टी पाहून मागच्या महीन्यात बघितले २-३ भाग.. मग सोडून दिले .. मग आत्ता कालचा की परवाचा तो रैनानी इंद्रधनुशी भाव आहेत म्हणाल्याने बघितला. इथले वाचून स्टोरी बर्यापैकी कळलीच होती, त्यामुळे समजले ते.. खरंच मुक्ताची आणि कधी नव्हे ती स्वप्निल जोशी ची अॅक्टींग खूपच आवडली.
त्या मुक्ताच्या आत्याबाईला धरुन मारावसं वाटलं.. कस्लं महाबोअर आहे तिचें ते मधूनच हिंदी पचकणं..
मवा, आपण रांगेत आहात . कृपया
मवा, आपण रांगेत आहात . कृपया प्रतीक्षा करा. राधाच्या आत्याला आधीच कुणीतरी मारलेले आहे. त्यांचा हात बरा होईतो वाट पहा.
अरेरेरेरे उमेश कामत घनाच्या
अरेरेरेरे उमेश कामत घनाच्या भूमिकेत ?
किती फिट आहे तो !! किती गुणी बाळ, देखणे लूक आहे त्याचे.
बराचसा खुशालचेंडु, काहीसा अजागळ, स्लॉपी पद्धतीने खाणारा, काहीसा जाडा, त्याबाबत टोकल्यावरच कॉन्शस होणारा, पण मनातून बेफिकीर असणारा, लाडावलेला तरीही likeable, 'बरं बाई तुझंच खरं' म्हणु शकणारा, बिर्याणी खाऊन झोपला म्हणून विमान चुकवणारा, वाढत्या पोटावर लॅपटॉप ठेवून त्यावर गेम खेळत बसणारा असे सगळे सगळे उमेश कामत दिसू शकेल?
'अरे ऊठ, सकाळी उठुन व्यायाम तरी कर' असे म्हणण्यातली मज्जाच निघून जाईल.
पौर्णिमा +१
मुक्ताच्या जागी उमेश? इतका
मुक्ताच्या जागी उमेश? इतका बोल्ड ट्विस्ट मराठी मालिकेला झेपणारा नाही
माईआजी इरसाल आहेत. त्या प्रोमोमध्ये म्हणतात ना 'आता या विषयावर कोणी बोलायचे नाही'. त्यांचा काहीतरी हात असेल उमेशला आणण्यामागे. म्हणजे मग घनाला साक्षात्कार होइल की तो राधावर खरच प्रेम करतोय.
रैना जी +१.. स्व. जो. च्या
रैना जी +१..
स्व. जो. च्या जागी उ. का. नाही च चालनार....
रैना + १००००००००
रैना + १००००००००
रैना, करेक्ट. काल आम्ही घरात
रैना, करेक्ट. काल आम्ही घरात हेच बोललो. उ.का. आंघोळ झाल्यावर ओल्या टॉवेलचा बोळा बेडवर तसाच टाकणारा वाटणार नाही.
रैना, डोके खाजवणे राहिले.
रैना, डोके खाजवणे राहिले.
थोडक्यात स्वप्निल गोड आहे,
थोडक्यात स्वप्निल गोड आहे, एकदम सेन्ट पर्सेन्ट घना आहे
रैना , छान लिहीलंस.
किती फिट आहे तो !! किती गुणी
किती फिट आहे तो !! किती गुणी बाळ, देखणे लूक आहे त्याचे.
बराचसा खुशालचेंडु, काहीसा अजागळ, स्लॉपी पद्धतीने खाणारा, काहीसा जाडा, त्याबाबत टोकल्यावरच कॉन्शस होणारा, पण मनातून बेफिकीर असणारा, लाडावलेला तरीही likeable, 'बरं बाई तुझंच खरं' म्हणु शकणारा, बिर्याणी खाऊन झोपला म्हणून विमान चुकवणारा, वाढत्या पोटावर लॅपटॉप ठेवून त्यावर गेम खेळत बसणारा असे सगळे सगळे उमेश कामत दिसू शकेल?
'अरे ऊठ, सकाळी उठुन व्यायाम तरी कर' असे म्हणण्यातली मज्जाच निघून जाईल.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>+++++++१००००००००००००००००००००००
या सिरीअलमधे मला मराठीत फार
या सिरीअलमधे मला मराठीत फार फार क्वचित असणारी गोष्ट दिसली ती म्हणजे नायक-नायिकेच्या देहबोलीत असणारे सेक्शुअल टेन्शन (याला चपखल मराठी प्रतिशब्द काय?). त्यामुळे त्यांच्यामधली स्पेस एकदम चार्जड, इलेक्ट्रिफाईड वाटते.
देहबोलीमधून जाणवणारे
देहबोलीमधून जाणवणारे एकमेकांबद्दलचे आकर्षण. त्यामुळे ते जेव्हा एकमेकांच्या सान्निध्यात असतात, तेव्हा त्यांच्या भावनांमधून पसरणार्या विद्युतलहरी आपल्यालाही जाणवतात.
(मी गंभीरपणाने प्रयत्न केलाय, पण एकूणात हे ज्ञाना-पद्धतीचे झालेय :खोखो:)
Pages