एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

(४) वाढीव म्हणजेच नवा सीझन
आता नव्याने विवाहबद्ध झालेले राधा-उका काळ्यांच्याच घरात पेईंग गेस्ट म्हणून राहण्याचा आग्रह धरतात
त्याला घना-आणि त्याची 'ती मुलगी' मान्यता देतात.
घरात गदारोळ.
गेले आणखी सहा महिने.
अ.री.क.सु.सं. (??)

Wink

शेवटी उका विनय आपट्यांकडे पेईंग गेस्ट म्हणुन येतोय. आत्ताच एक प्रोमो पाहीला. हुश्श!! Happy

आजचे आई घनाची समजुत काढतानाचे संवाद सही वाटाले.....आईने घनाला मोजक्या वाक्यांत घना-राधा मधल्या नात्याची जाणीव करुन दिली.....तसच राध्याच्या वडीलांनी त्यांची होणारी तळमळ सुद्धा नेमक्या शव्दांत राधाला पटावुन दीली......छान होता आजचा भाग.

मीलनाच्या वेळी हिंदी गाणी आणि विरहाग्नीत होरपळताना मराठी गाणी.
>>>>>>>>>>

हा देखील या धाग्याचाच परिणाम की काय Proud लगेच हिंदीवरुन मराठीवर आले.

त्या दोघांचे स्वप्न / काल्पनिक द्रुष्य पण छान होते. ती त्याला सांगते घरातले सर्व तुझ्यावर प्रेमकरतात म्हणून ते रागवतात. मग तो लगेच म्हणतो मग तू का रागावतेस. ती मग त्याला उत्तर देते इत्यादी. मुक्ता मॅथ्स टीचर सारखी दिसते असे मुलीचे मत. आत्ता ग बया. Happy

खरच कालचा घनाला राधाचा भास होतो तो सीन मस्त जमलाय. इभा डोक्यात न जाता कालचा प्रसंग वेल एक्झिक्युटेड! उका येण्याची वाट पाहतेय. राधाची उकाशी वाढती जवळीक पाहून घना राधाला घरी आणणार तर... Happy

काळे सदन पाहताना मला सतत असंभवमधले वसईचे घर आठवत राहते. प्रवेशद्वार सोडल्यास आतला सगळा सेट, अगदी भिंतीवरच्या रंगासकट तोच आहे, फर्निचर जरा नविन आहे, अगदी पलंगही तोच जुन्या काळातला आहे.

राधा माहेरी गेल्यावर काळ्यांकडच्या कपबश्या बदलल्यात हे किती जणांच्या लक्षात आले? आताचे कप पारदर्शक आहेत. आधीचा सेट राधा माहेरी घेऊन गेली का?

उका आल्यावर राधा त्याला पळवून लावायचा प्रयत्न करेल (हा कोण माझ्या घरातली माझी जागा घेणारा?), त्याच्याकडे सरकेल (शक्यता नगण्य), की त्याच्यामुळे इरिटेट होऊन पुन्हा घनाकडे येईल?
घनाच्या आत्याचे एक्स या प्रकरणाची कोंडी फोडताना दाखवले ना कालच्या भागाच्या शेवटी ?

काल सकाळी ७.३० वाजता लागलेला भाग पुन्हा रात्री ८.३० वाजता पहायला मिळाला. म्हणजे वरीजनल भाग सकाळी लावतात, बहुतेक.

काल सकाळी ७.३० वाजता लागलेला भाग पुन्हा रात्री ८.३० वाजता पहायला मिळाला. म्हणजे वरीजनल भाग सकाळी लावतात, बहुतेक.

>>
हो काय?
माझे बाबा पण म्हणत होते हे!
मी उगाच तुम्हाला काही कळत नाही म्हणुन शांत बसवलं त्यांना

'असंभवमधले वसईचे घर' >> हो हो, अगदी..मी सुद्धा आईला तेच म्हटले. पण एक बरं आहे, उका आला की 'मानव' नावाच्या प्राण्याला कमी दाखवतील. Happy

उका PG म्हणून आणलाय महेशरावांनी ..
आता उका हा अगदी शिस्तप्रिय, काटेकोर, स्वावलंबी एवंगुणविशिष्ठ असणार..
आणि मग रॉधाला साक्षात्कार होणार की ते वेडंगबाळं, लाडावलेलं ध्यानच तिला आवडतय...
>> अवनी +१

अरे तो साडेसात चा भाग मी काल रात्री पण परत पाहिला अन आज सकाळी पण परत तोच. नवे भाग नाहीत काय? एकूणात तीन टाइम इलाबाई प्रेम म्हणजे जग भर एकच अस्तं वैगरे. मला नाही तुझ्यावर फार रागावता येत वगैरे. डायलोग पाठ झाले माझेच. Happy

आजच्या भागात विनय आपटेंचा अभिनय चटका लावणारा होता. विनय आपटे या भागात मी हवालदिल झालोय म्हणाले ते अगदी अभिनयातुन जाणवत होते.

विनय आपटे, खरोखर धमाल.
काल स्वप्नीलने अस्वस्थता पण मस्त दाखवली..

आता उका हा अगदी शिस्तप्रिय, काटेकोर, स्वावलंबी एवंगुणविशिष्ठ असणार..
आणि मग रॉधाला साक्षात्कार होणार की ते वेडंगबाळं, लाडावलेलं ध्यानच तिला आवडतय... >>>
हा फार ट्रॅडिशनल विचार झाला किती मुळमुळीत गुळगुळीत रस्त्यावरुन जाईल कथा मग. मालिका जरा हटके होवु दे की. उका भेटल्यावर मुक्ताचा शोध संपेल आणि तिला गमावल्यावर मग स्वप्नील शहाणा मुलगा होइल असं दाखवलं तर?

>>> अरे, मने, काय सॉल्लिड प्रॅक्टीकल एन्ड चा विचार केलास.. सही Happy
मग समजेल कदाचित स्वप्नीलला, मी आणि माझं भलं, माझ्याच इच्छा, महत्त्वाकांक्षा प्राप्त झाल्यावर 'आपलं' असं कुणीही नसेल तर त्या सर्व इच्छापूर्तींना फारसं महत्त्व नाही Happy

Pages