एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटतं थोडी गफलत होतेय ....... अरे त्या भागात फक्त त्यांचा कंफर्ट लेव्हल सुधारत चाललाय कळत्-नकळत आणि त्याची चाहूल त्यांना लागते इतकंच दाखवलय.

अजून ते खर्‍या (तश्या) अर्थाने एकत्र येणं अजिबात अपेक्षित नसावं लेखिकेला........ घोडा मैदान अजून दूर आहे........... आणि शिवाय हे "बडे" नाहिये (सोनी चॅनल) ....... अजूनही मराठी चॅनल्स "छोटे अच्छे लगते है" पर्यंतच पोचलय...... Happy

अजून ते खर्‍या (तश्या) अर्थाने एकत्र येणं अजिबात अपेक्षित नसावं लेखिकेला.

कोणालाच अपेक्षीत नाहीच रे ते...पण नुसतेच लाजणं, झुरणं आणि अवघडलेपण यावरून गाडी एकदाची पुढे सरकली म्हणून मी अगदी सहज बोललो....मी तश्या एकत्र येण्याबद्दल नव्हतो बोलत पण त्यातून तो अर्थ निघू शकतो म्हणून पुढचे वाक्य टाकले होते...जाऊद्या

अरे मंदार, आता त्यात जरातरी हळूवारपणा नको का रे...... डायरेक्ट धबधब्याखाली काय

कदाचित हा सीन घनाला स्वप्नात दिसतोय असं दाखवलं असतं तर बरा चान्स होता..... म्हणजे घना स्वप्नात राधाबरोबर धबधब्याखाली उभा असल्याचा सीन बघतोय आणि त्याला उठवायला राधा त्याच्या तोंडावर पाण्याचा भरलेला तांब्या ओततेय

चिंब भिजलेले रूप सजलेले........ बरसूनी आले रंग प्रीतीचे..........
>>>>>>>>>>>>>>

Rofl
Lol
Biggrin

तो कविता वाल अभाग कुठला, त्याची लिंक देता का, लिंक? कोणी लिंक देता का?( घर देता का ह्या चालीवर वाचले तरी उडेल).. Proud

पण त्याच भागाची लिंक द्या.. आपल्यात पेशन्स नाहीय. फक्त टिका करायला बघायचाय भाग व इथे हातभार लावायचाय. Proud

"आम्ही फक्त टीका करायला अश्या सिरियल्स बघतो"

( एवढी सिरीयल आवडत नाही तरी कशाला बघता असे फालतु प्रश्ण कोणी विचारु नये.) Wink

पण त्याच भागाची लिंक द्या.. आपल्यात पेशन्स नाहीय. फक्त टिका करायला बघायचाय भाग व इथे हातभार लावायचाय. फिदीफिदी

"आम्ही फक्त टीका करायला अश्या सिरियल्स बघतो">>>> Proud
हि घे लिंक...
http://www.umovietv.com/Movies/show_details.aspx?i=866&s=24-May&p=0

सोनालीस, धन्यवाद!

स्वगतः वायरस यायची भिती असली तरी बघेन कारण वरची चर्चा पाहून मी का मागे राहू टीका करायला आँ ? Proud

आरामात बघून मग टाकते इथे लिहून....

>>>>अजून ते खर्‍या (तश्या) अर्थाने एकत्र येणं अजिबात अपेक्षित नसावं लेखिकेला.<<<<

छ्या! इतक्या लवकर एकत्र आले तर संपली ना मग सिरियल. ... मग काय उरणार? Proud

अवांतरः
मग दिग्दर्शकाला हिंदी सिरियल सारखे करावे लागेल, नायकाला मेमरी लॉस, जुळे अवतार अवतरणे, (नायक/नायिका)एकाला कोणाला तरी वेड लागणे अपघात होवून, इला भाटेचा लग्नाआधीचा मुलगा अवतरणं, पुर्नविवाह होणं वगैरे( पक्षी: यहा मै घर घर खेली... राजश्रीची नवी पंच लाईनः "आम्ही अचाट सिरियल बनवून देतो व एकताला मागे काढतो.) Proud

काल रात्री या प्रेमळ भागाची २-३ पारायणे झाली (अजून चुका शोधण्यासाठी आणि राधाची एक्स्प्रेशनस पाहण्यासाठी Happy ). तेव्हा कुहुची कविता पाठच झाली. ती कुहुप्रेमींसाठी इथे डकवत आहे. (भुंग्या, वाचतोयेस ना!!! Light 1 )
विस्तीर्ण नभाच्याखाली धरती निजलेली शांत
मी अवघडले बावरले तू घेता हाती हात
मी काजळ भरले डोळा अस्फुट अंधुकशा रेषा
बोललो जरी ना काही डोळ्यांची कळली भाषा
तो पहिला स्पर्श अनामिक तो पहिला श्वासही ओला
मन माझे मोहरले हे अन ऊर धपापून आला
मी उंच उंच जाताना तू धरला माझा हात
मी फिरून आले खाली मिठीच्या या विळख्यात
दाटून काहीसे येते का दूर दूर जाताना
मी फिरून येईन तेव्हा तू असाच असशील पुन्हा

काही चुकले असल्यास क्षमस्व.

चिंब भिजलेले रूप सजलेले........ बरसूनी आले रंग प्रीतीचे..........>> Rofl
भुन्ग्या कहर आहेस. Happy

कुहु हे कॅरेक्टर बेस्ट आहे. कधीच चुकल्यासारखं वागत नाय.
नेहमीच हुकलेलं. Biggrin
पण तरिही आवडत मला. Happy

पाठदुखीसाठी माझ्याही सास-यांनी मला सल्ला दिला होता कि 'चांगला तुडव त्याला' >>>>>> बाप रे सोनाली काय हसले. सर्वांच्याच कमेंटस भारी आहेत.
पण मंडळी नेमका अगदी क्लायमॅक्सच्या वेळीच...खालचे हपिस बंद बघून एक क्लाएंट आपल्या मुलाला घेऊन कामासाठी वर घरात आली. त्यामुळे राधा आणि घना यांचं ऑकवर्ड वाटू नये म्हणून दिवा बंद करण्याचं एकमताने ठरलं आणि मला टीव्ही बंद करावा लागला.(काय पण मुहूर्त गाठला हपिसच्या कामाचा.... वगैरे दात ओठ खात मनातल्या मनात शिव्या देत मीच दार उघडलं.)
तर कृपया हे २ भाग कुठे पहायला मिळतील ते सांगावे! सर्वांच्या पोष्टींवरून साधारण लक्षात आलंय. पण आपल्या राजवाड्यांनी हा प्रसंग कसा फुलवला असेल हे पहाण्याची उत्सुकता होती!

धनश्री खुप खुप धन्यवाद तुझे Happy
कुहु ने भारी म्हट्ली ही कविता...नशीब ती लाजली नाही चेहरा ओंजळीत लपवुन Wink
राधा टिकली लावल्यापासुन मला जरा वेगळीच दिसते .. गोड वाटते....लाजली पण छान...

झकासराव +१

आशु भुंग्या, मंदार :हहगलो:.................अशक्य आहात तुम्ही लोकं...........:हहगलो:

लोक्स... तुम्ही धमाल लिहता.
टिव्ही ऐवजी इथेच 'बघतो' मी ही मालिका... Proud

>>मग दिग्दर्शकाला हिंदी सिरियल सारखे करावे लागेल
हिंदीच कशाला? "स्वप्नांच्या पलीकडले", "सुवासिनी" वगैरे बघत नाही का तुम्ही?
बर्‍याचश्या मराठी सिरिअल्समधे तेच चालू आहे!

लोक्स... तुम्ही धमाल लिहता.>>>>

साक्षात धुंद रवी ने अस लिहण म्हणजे काजव्याने सुर्याला...... वगैरे वगैरे.... हे हे हे

कुहुची कविता आली आणि भुंग्याची एकही कमेंट नाही??????????
अ ओ, आता काय करायचं
कस काय ?????>>>>>त्याला आवडली असेल...कविता कि कुहु ,,, ते माहीत नाही Lol

कालच्या भागा बद्दल एकही कमेंट नाही Uhoh

काल मला घनाचे काम ..राधापेक्षा जास्त आवडले Happy

घनाने................मनाची . घालमेल छान रंगविली त्याने Happy

साक्षात धुंद रवी ने अस लिहण म्हणजे काजव्याने सुर्याला...... वगैरे वगैरे.... हे हे हे >>>>>

तुम्हाला सुर्याने काजव्याला असे म्हणायचे आहे का ?

काजव्याने सुर्याला>> याला वार्‍या वरची वरात चा संदर्भ आहे . अधिक लिहिले तर तुम्हाला वरात पहाताना मजा येणार नाही.

नुकताच या धाग्याची लिंक तिकडे फेसबुकवर चिटकवून आलेलो आहे...

आता त्या मालिकेच्या फ्यानचे हाल पहावणार नाहीत =)) =))

हायला स्पा हे एक मस्त काम केलस बघ तु. =)) =))
पण पियुशा न स्मिता. तुझ काय करतील रे?

हायला स्पा हे एक मस्त काम केलस बघ तु. =)) =))
पण पियुशा न स्मिता. तुझ काय करतील रे?

Pages