..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ३)

Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....

नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

००३/३३: मामीचा मानसपुत्र - तो वानीवाला बनिया हो - जेंव्हा वादळात सापडला होता तेंव्हा त्याने देवाला प्रार्थना केली होती 'मोठी अक्षरे असणार्‍या केळेवाल्या तू मोठी अक्षरे बनव पण माझी नौका पैलतीरी लाव'

जिप्सीच्या कोड्याचं उत्तर. फक्त ती बोरं जरा मुसुंब्यांएवढी मोठी दिसताहेत. Proud

कोडे ००३/०३२
बंगली के पीधे तेरी बेरी के नीचे ... काटा लगा

मामी, माधव बरोब्बर Happy Happy
ती बोरं तुम्हाला माझ्याकडुन सप्रेम भेट Happy

कोडे ००३/०३२
बंगले के पीछे तेरी बेरी के नीचे ... काटा लगा

००३-३३:
बिगडी (बिग डी) बनानेवाले बिगडी बना दे
नैया हमारी पार लगा दे >>>>> Lol झक्कास होतं हे कोडं. बिग डी Biggrin
श्रद्धा तुझीही कमाल आहे.

हायला इतक्या लौकर उत्तर हजर - श्रद्धाला एक किलो केळी बक्षीस Happy

००३-३३: मामीचा मानसपुत्र - तो वानीवाला बनिया हो - जेंव्हा वादळात सापडला होता तेंव्हा त्याने देवाला प्रार्थना केली होती 'मोठी अक्षरे असणार्‍या केळेवाल्या तू मोठी अक्षरे बनव पण माझी नौका पैलतीरी लाव'

बिग डी बनाने वाले बिग डी बना दे
नैया हमारी पार लगा दे

कोडं क्र. ००३/३५
हृदयसिंग पवार मोठा मेहनती शेतकरी. त्याच्या घरी बरीच गुरंढोरं असतात. पण त्याचं विशेष प्रेम असतं त्याच्या बैलांच्या जोडीवर. त्यांची नावंही ते ज्या महिन्यात जन्मले असतात त्यावरून त्याच्या बायकोनी ठेवलेली असतात. एकदा तो लांबच्या प्रवासाला जातो. त्याची बायको घरचं सगळं सांभाळत असते. पण बैल आजारी पडतात, त्यांना पराकोटीची अ‍ॅसिडिटी झालेली असते. इतकं की ते काही खाऊही शकत नाहीत. हृदयसिंग घरी येतो ते आपल्या लाडक्या बैलांकरता हिरव्यागार गवताचे दोन भारे घेऊन. तर त्याची हिंदी भाषिक बायको घरची परिस्थिती त्याला कशी समजावून देईल.

जिप्सीचं चित्रकोडं ००३/३५
उत्तरः
दो रंग दुनिया के और दो रास्ते
जीवन के दो रूप है जीने के वास्ते

बब्बो अक्षरी, काय बदामाची खीर खाल्लीस का काय सकाळच्या न्याहरीला? धन्य आहे बाई तुझी. Happy

जिप्सीनं कोडंही सही बनवलंय. या कोड्याबद्दल जिप्सीला _____/\_____

अक्षरी Happy

जिप्सीचं चित्रकोडं ००३/३५
उत्तरः
दो रंग दुनिया के और दो रास्ते
दो रूप जीवन के जीने के वास्ते

या अक्षरीला थोड्या वेळ बॅन करा रे. Proud Wink

सह्ही स्निग्धा. Happy

कोडं क्र. ००३/३५ उत्तर
बे (म्हणजे २) चारा (गवत) दिल (नवर्‍याला उद्देशून) क्या करे? सावन जले भादो जले (अ‍ॅसिडिटीनं जळतायत.)

बेचारा दिल क्या करे, सावन जले भादो जले

नाही दिनेशदा.
हे उत्तर आहे:
दो रंग दुनिया के और दो रास्ते
दो रूप जीवन के जीने के वास्ते

अक्षरीने ओळखलं बरोबर Happy

या दिवसातल हे शेवटचे चित्रकोडे Happy (उद्या अजुन घेऊन येईल Happy )
(चित्रकोड्यात वापरलेली सगळी चित्रे गुगलवर सर्च करून घेतलेली होती. Happy )

चित्रकोडं ००३/३७

कोडं क्रम ००३/३८ : एका कुटुंबाची पुण्यात फर्गसन रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी प्रॉपर्टी असते. बिल्डरने लाख प्रयत्न करूनही ते दाद देत नसल्याने तो त्यांच्यात फूट पाडायचं ठरवतो. एक एक करून सही घ्यायचा त्याचा मनसुबा असतो. तो सर्वांना एका खोलीत सोडतो आणि त्याच खोलीत मोठ्या संख्येने कोंबडीची पिल्लही सोडतो . त्या पिल्लात एक पिल्ली रोबोट असतं आणि ते बॉम्ब असतं. त्याचा कुणाच्या पायाशी संपर्क झाला तर ते एक्स्प्लोड होणार असतं. त्यामुळं त्यांची तारांबळ उडते. बिल्डर म्हणतो कि जो सही करायला तयार असेल त्याला मी बाहेर काढीन. त्याला जीवदान मिळेल...

त्या प्रसगातही ते ठरवतात कि आपली एकजूट बिल्डरला दिसली पाहीजे. ते सगळे हातात हात घेऊन मरणाला सामोरे जायला तयार होतात. आम्ही एकमेकांसाठी मरू शकतो हा संदेश त्यांना द्यायचा असतो तर ते कुठलं गाणं म्हणतील ?

कोडं क्र. ०३/०३९
चंबळमधल्या डाकुंच्या टोळीत एक मराठी डाकू असतो - प्रेम. चंबळमध्ये राहून राहून तो हिंदी बोलायला शिकतो खरा पण कधी कधी त्याच्या बोलण्यात मराठी शब्दही येत असतात. एकदा त्याला एका कामगिरीवर पाठवतात. एका कुटुंबातल्या दोन पुरूषांना आणि दोन स्त्रियांना मारायची. तो जाऊन दोन्ही पुरूषांना जाळतो. मात्र दोन्ही बायका पळून जायचा प्रयत्न करतात. त्यातल्या फक्त एकीला तो बागेत पकडून मारतो. हे तो सरदाराला गाण्यातून कसं सांगेल?

Pages