(ह्या भागाला आपला निसर्गमय आयडी महान छायाचित्रकार जिप्सी ह्याच्या सौजन्याने वरील छायाचित्र मिळाले आहे. )
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
इन्डीगो चेरीचे फोटो टाका इथे.
इन्डीगो चेरीचे फोटो टाका इथे.
कसले दिसताहेत रायाअवळे! मला
कसले दिसताहेत रायाअवळे! मला पण हवेत!
राणीच्या बागेतले फोटो सही आहेत.
खायला हे आवळे आणि औषधाला ते
खायला हे आवळे आणि औषधाला ते आवळे ! आपण दोन्ही फळांना आवळे म्हणतो
खरे पण दोन्ही अगदी वेगवेगळी झाडे आहेत. म्हणजे वेगवेगळ्या कूळातली.
आमच्याकडे झाडे आहेत याची, पण बाजारात नसतात.
(मुद्दाम लिहावेसे वाटतेय, मायबोलीकर नलिनीने घरी केलेली आवळासुपारी मी आज ३ वर्षे खातोय.)
इन्डीगो, तिथे अनेक माहितीपट आहेत. आफ्रिकेतल्या रिफ्ट व्हॅलीवर पण छान माहितीपट आहे.
हो बरोबर क्लाईनहावियाच.
हो बरोबर क्लाईनहावियाच.
दिनेश, माधवने टाकलेले ते दुसरे गुलाबी फुल आम्ही खुप शोधले राणी बागेत पण मिळाले नाही.
ते Gustavia augusta तर नाही ना? राणीबागेत आम्ही जे पाहिले (मागच्या पानावर जिप्सीने दिलेले) ते पांढरे गुलबट होते. आणि त्याचे नाव Majestic Heaven Lotus असे फ्लॉवर्सऑफ इन्डीयावर दिलेय ते अगदी सार्थ आहे, कारण खालुन ते फुल अगदी कमळासारखे दिसते.
कुंडीतील पुदीना
कुंडीतील पुदीना
उजु त्यापेक्षा तु ये
उजु त्यापेक्षा तु ये माझ्याकडे खायला अगदी झाडावरून काढून.
सोबत जिप्सी पाहिजे.. चढायला
वॉव!!! राणीबागेची वर्चुअल टूर
वॉव!!! राणीबागेची वर्चुअल टूर झाली की आमचीही ..
जिपस्या तुझे १५ वे फुल 'पिवळा
जिपस्या तुझे १५ वे फुल 'पिवळा करमळ'च आहे. अधिकृत सूत्रांकडून खात्री करून घेतली.
जिप्सीने दिलेली पांढरट पिवळसर फुले - Gustavia Augusta
मी दिलेले नं.२ Gustavia gracillima
हे टेंभुर्णी आहे का ? काल
हे टेंभुर्णी आहे का ? काल जिप्स्याने दिलेल्या फोटोत अशीच फुले होती फक्त मधला भाग पांढरा होता ह्याचा काळा आहे.
जागू, या फोटोतली पाने जाड
जागू, या फोटोतली पाने जाड वाटताहेत. टेभुर्णीची जरा वेगळी आणि गडद रंगाची असतात. शिवाय कोवळी पाने लालभडक असतात.
आत्ता जीव भांड्यात पडला माझा.
आत्ता जीव भांड्यात पडला माझा. जवळ जवळ सर्वच फूलांची नाव समजली, पण ते १ नं च्या प्रचितल कोण आहे बर?
साधनातै तेच ग ते फूल जे आपल्याला बूचासारखे वाटलेले ,त्याच नाव काय आहे?
कोणी तरी सांगा ना!! बी. पी. टी. गार्डनला कधी जायच? ह्या रविवारी?
ईशू तय्यार आहे एका पायावर.
जिप्सी , ईशूने आज मान्य केल की योगेशमामा छान फोटो काढतो ते.(जेव्हा तू त्या पोपटाचे आणी खारुताईचे फोटो ईथे डकवलेस ना तेव्हा.)
ईशूने आज मान्य केल की
ईशूने आज मान्य केल की योगेशमामा छान फोटो काढतो ते
जिप्सीने ईशुचा काढला की नाही???????? काढला नसेल तर इतका गोड चेहरा त्याच्या कॅमे-यातुन सुटल्याबद्दल त्याचा त्रिवार निषेध.........
सर्व प्रचि आणि फोटो छान आहेत
सर्व प्रचि आणि फोटो छान आहेत !
जिप्सी,
टेंभुर्णी आणि अशोक यांच्या बिया पहिल्यांदाच पाहायला मिळाल्या ...
जागु,दिनेशदा
रायाआवळ्याची झाडे गावाकडे खुप दिसतात पण पुण्यात खुप कमी,इथे ती गोल आवळे दिसली, पण त्यांना देशी कि जंगली म्हणायच ? आवळ्याचे प्रकार दोनच ना ?
अहाहा, जागू रायआवळ्याचे झाड
अहाहा, जागू रायआवळ्याचे झाड पाहून माहेरच्या आठवणी आल्या एकदम.
आम्ही सांताकृझला रहायला गेलो तेंव्हा माझ्या वडीलांनी आंबा, फणस, जांभूळ , रायआवळे , पेरू, सीताफळ, नारळ, शेवगा वगैरे कितीतरी झाडे लावली होती. रायआवळे असेच भरभरून यायचे आमच्या झाडांना पण.
आज दिवसभर येता आले नाही.
आज दिवसभर येता आले नाही. आता झाल्या सगळ्या पोस्टी वाचून
माधव पहिले प्रचि ट्रम्पेट ना?
जिप्स्या तुझे १५ वे फुल 'पिवळा करमळ'च आहे. अधिकृत सूत्रांकडून खात्री करून घेतली. >>>>हा पण करमळच आहे. "पिवळा करमळ" असेल तर मग ह्या अडाण्याला एक डाव माफी करावी.
धन्स उजु काढला नसेल तर इतका
धन्स उजु
काढला नसेल तर इतका गोड चेहरा त्याच्या कॅमे-यातुन सुटल्याबद्दल त्याचा त्रिवार निषेध.......>>>>>अस्सं होईल का??
गोरखचिंचेच्या प्रवेशद्वारातुन
गोरखचिंचेच्या प्रवेशद्वारातुन पुढे गेले की लगेच्च आहे ते झाड कोणते? त्यालाही फुले आलेली. पाने गुलमोहरासारखी संयुक्त असतात. फुले बहुतेक अगदी लहान गुलाबी होती.>>>>>
साधना, याची पाने गुलमोहरासारखी नाहीत.
फुले
फुले पानांसहित
फुले फळांसहित
हाच मोठा करमळ. या फोटोचा कोन
हाच मोठा करमळ. या फोटोचा कोन बघता, तू बहुतेक जमिनीवर आडवा पडून
काढला असशील !
आपण करमळं खातो (स्टारफ़्रुट) त्याची फुले अगदी
लहान, फ़क्त २ मिमी आकाराची आणि जांभळ्या रंगाची असतात.
माझा काही दिवसांत चिरनेरच्या
माझा काही दिवसांत चिरनेरच्या जंगलात जायचा विचार आहे. बघु घरातले ओरडले नाहीत आणि नवर्याने हट्ट पुरवला तर :स्मितः
ह्या घ्या कैर्या.
आज काही बकर्या चरायला
आज काही बकर्या चरायला न्यायच्या होत्या, त्यांना मारायला या शेंगा, तोडून घेतल्या होत्या.>>>>>>>:हहगलो:
जागू, अगं तू टाकलेला फोटो टेंभुर्णीचा नाही; टेंभुर्णीच्या पानांची रचना (फांदीवरची अरेंजमेंट) वेगळी असते. तो बहुधा बोखाडा असावा.(Casearia graveolens य नावाने सर्च करून बघ बरं तसंच वाटतंय का ते झाड.मला फुलं तशी वाटली.)
दिनेशदा, जिप्सीने दिलेल्या फोटोंत एक जॅक्विनिया आहे पण राणीबागेतल्या फुलांच्या लीस्टमधे ते नाव नाही. (मी हेच झाड पुणे युनी. च्या बोटॅनिकल गार्डनमधे आत्ता फेब्रूच्या शेवटच्या आठवड्यात बघितलं होतं.)
जागू, रायाआवळ्याचे आणि कैर्यांचे फोटो टाकून कुफेहेपा?.....(असो; तुला जाहीर माफी!!)
जिप्सी, ही बघ ती अधिकृत
जिप्सी, ही बघ ती अधिकृत सूत्रांची लिंक. यात सगळे करमळ आहेत - मोठा करमळ, पिवळा करमळ, खायचा आंबटचिंबट करमळ आणि एक मी कधीच न बघितलेला करमळ.
लिंकबद्दल धन्स माधव
लिंकबद्दल धन्स माधव
जागु , त्या रायआवळ्यांचा फोटो
जागु , त्या रायआवळ्यांचा फोटो काय जबरदस्त आहे गं. पोस्ट टाकल्याशिवाय रहावेना मला. तिखट मीठ लावून आत्ताच्या आत्ता खायला मिळाले पाहिजेत.
माधव, ते पिवळ्या फुलाचे झाड
माधव, ते पिवळ्या फुलाचे झाड गेली अनेक वर्षे मला कोड्यात टाकतय. बाकीच्या
करमळांची फळे आंबट आणि खाद्य असतात. पण जा झाडाची फळे अनोखीच असतात.
गुलाबी पांढरी नक्षी असणारे ते एक उमललेले फुलच वाटते. शिवाय आत लाल बियांची नक्षी असते.
शांकली, गेल्या काही वर्षात तिथे काही झाडे नव्याने लावली आहेत. तरीपण त्यांची
अधिकृत यादी, उपलब्ध नाहीच.
वनस्पति उद्यान हि संकल्पना ब्रिटीशांनी अनेक देशांत रावबली. त्याचे काही नमुने मी बघितले आहेत. मुंबईत त्यांना तेवढी मोकळी जागा मिळाली नसेल. पण भारतातलेच
अनेक वृक्ष तिथे जोपासणे, हे कौतुकास्पदच आहे. यातील अनेक झाडे मुंबईत बाकी
कुठेच दिसत नाहीत.
वनस्पति उद्यान हि संकल्पना
वनस्पति उद्यान हि संकल्पना ब्रिटीशांनी अनेक देशांत रावबली
ब्रिटीश इथे आले नसते तर कितीतरी चांगल्या गोष्टींना आपण मुकलो असतो. राणीबाग नसती, मुंबईतल्या जुन्या इमारती ज्या अजुनही मजबुत आहेत आणि अजुनही रस्त्यावरुन घाईत चालतानाही जर चुकुन त्यांच्याकडे तर नजरबंदी होते अशा सुंदर स्थापत्याने नटलेल्या इमारती.. अजुन कित्येक गोष्टी ज्या आजही परत तयार करण्यासाठीची साधनसामग्री आपल्याकडे भरपुर आहे पण नजर मात्र अजिबात नाहीय...
सुप्रभात. आणि ही माझी
सुप्रभात.
आणि ही माझी कलाकुसर.
शांकली बघते ते झाड सर्च करून. माझ पाप फेडाय्ला तुला आवळे आणि कैर्या खायला माझ्या घरी यावे लागेल सीमा तुलाही.
साधना, तुझ्या पोस्टला अनुमोदन
साधना, तुझ्या पोस्टला अनुमोदन देताना लाज वाटतेय पण मुंबइच्या बाबतीत ते मान्य करावेच लागते. कोणी छ.शि.ट.च्या इमारतीतले जाणकार आहेत का? मला बघायची आहे ती पूर्ण इमारत - निवांतपणे. काळा घोडा महोत्सवात जागा कधी मिळतच नाही त्याकरता.
वरची राणीबाग लिस्ट पाहताना
वरची राणीबाग लिस्ट पाहताना ब्राझिलीयन रस्टी पॉड अणि कॉपरपॉड अशी दोन नावे दिसली ज्यांचे कुळ बहुतेक एकच आहे पण जरा वेगळे. नेटवर गुगलुन पाहिले, या दोन्हि सोनमोहोरांमधला फरक ओळखणे महाकठीण आहे..
माधव.. खरेतर त्या दिवशी
माधव.. खरेतर त्या दिवशी राणीबाग फिरताना आमचा हाच विषय चाललेला की इंग्रज चांगले होते हे म्हणायला जीवावर येते पण कुठेतरी आतुन जाणवते की ते होते तेव्हा परिस्थिती बरीच बरी होती. निसर्गाचे म्हटले तर त्यांनी जी हिल् स्टेशन्स शोधली त्यांची वाट लावायचेच काम आपण केले. नविन शोध दुर, आहेत त्यांचेही संवर्धन आपल्याला जमले नाही.
आज जर संधी मिळाली तर एका दिवसात राणीबाग सफाचट होईल आणि करोडो रुपयांचे फ्लॅट्स तिथे उभे राहतील.. आहे इथे कोणाला झाडांबद्दल्/प्राण्यांबद्दल.. किंवा आपण स्वतः सोडुन इतर माणसांबद्द्ल प्रेम?? सगळेजण इतके अंध झालेत की ते त्यांचे स्वतःचेही नुकसान करताहेत ते लक्षातच येत नाहीय.
वाहव्वा! पुदिना तर मस्त
वाहव्वा! पुदिना तर मस्त आलाय.
अरे कुणीतरी टप्पोर्या कळ्यांनी भरुन गेलेल्या मोगर्याचा फोटो टाका राव! जीव आसुसलाय नुसता...असा मोगरा बघायला.
Pages