(ह्या भागाला आपला निसर्गमय आयडी महान छायाचित्रकार जिप्सी ह्याच्या सौजन्याने वरील छायाचित्र मिळाले आहे. )
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
साधना, काय गंमत करतिएस की
साधना, काय गंमत करतिएस की काय?
दिनेशदा, छान माहिती. मलाही
दिनेशदा, छान माहिती. मलाही बीबीसीच्या Documentaries फार आवडतात. तुम्ही YouTube वरची ती लिंक पण द्यायची असती. मी नक्की बघेन.
अगं तो लाल म्हणाला आणि
अगं तो लाल म्हणाला आणि कृष्णकमळही म्हणाला म्हणुन मला गंमत वाटली. आता कृष्णकमळ हे निळेच असणार ना... लाल पॅशन्फ्लॉवर म्हटले तर एक वेळ चालेल पण लाल कृष्णकमळ????
जिप्स्या अरे कुठल्यातरी नि.ग.
जिप्स्या अरे कुठल्यातरी नि.ग. च्या धाग्याच्या मेन पेजवरच मी कृष्ण्कमळ टाकलाय ना.
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=e2dfmry3Vmo
या लिन्कवर व्हाईट लायन नावाचा अप्रतिम चित्रपट आहे.
लाल आणि जांभळे कृष्णकमळ पण असते.
सिंह्गडाच्या पायथ्याशी जिथून एस टी बसेस सुटतात तिथे एका टपरीवर त्याची माजलेली वेल
बघितली होती. सिंगापूरला जिथून सेंटोसा आयलंडवर जायला हवाई पाळणे सूटतात, तिथल्या
बस स्टॉपवर ती बघितली होती.
जांभळे कृष्णकमळ पण असते. त्याचा फोटो टाकतो १/२ दिवसात.
दिनेशदा, तुम्ही दिलेल्या
दिनेशदा, तुम्ही दिलेल्या लिंकवरचा हिमालयावरचा माहितीपट बघताना सारखा सारखा ती फिल्म बंद पडण्याचा प्रॉब्लेम येतोय; सलगपणे बघताच येत नाहीये. आम्ही २/३ वेळा प्रयत्न केला पण सलग बघता येत नसल्याने नाद सोडून दिला. आणि हा प्रॉब्लेम यू ट्यूब वरची कुठलीही लिंक किंवा फिल्म बघताना येतो. हा फक्त आम्हालाच येतो की इतरांना पण येतो? (किंवा मग कदचित आमच्या घरच्या पीसी ला काहीतरी प्रॉब्लेम असेल!)
सुप्रभात:)
सुप्रभात:)
सुप्रभात.
सुप्रभात.
हे काय असू शकेल ? आता एवढ्यात
हे काय असू शकेल ? आता एवढ्यात काढलेला फोटो आहे - पुण्याच्या आसपास -
जिप्स्या हे बघ कृष्णकमळाचे
जिप्स्या हे बघ कृष्णकमळाचे फुल. माझ्याकडे मी मागच्या वर्षी लावलेली वेल खुपच वाढलेय पण सावली असल्याने अजुन फुले आली नाहीत त्याला.
शशांक अशीच फळे आमच्या उरणच्या
शशांक अशीच फळे आमच्या उरणच्या एका रस्त्यावर आहेत. रोज फोटो काढायला जाईन म्हणते पण योग अजुन येत नाही. झाडाची पाने सप्तपर्णी सारखी आहेत त्याची.
दिनेश, मला पण तुमच्या सारखेच
दिनेश, मला पण तुमच्या सारखेच वाटत होते की शेवंती हे मराठी नावच आहे. तुमच्या पोस्टमुळे जरा गुगलून बघितले तर अनेक भारतीय भाषांत तो शब्द आहे - गुजराथी, बंगाली, मल्याळम, ओरिया, पंजाबी, तामिळ, तेलुगू.
दिनेशनी दिलेला दुवा म्हणजे अलिबाबाची गुहा आहे. मालुताईंचे गाणे इतके सहज आणि सुंदर असते की शास्त्रीय गायन न आवडणारा पण मान डोलवतोच. अत्यंत साधे रहाणीमान, वागण्यात कसलाही नखरा नाही, आणि इतकी महान कला असूनही अत्यंत नम्र. अशा दोनच कलाकारा मला माहित आहेत - सुलोचना चव्हाण आणि मालिनी राजुरकर.
ही शेवंती सिझन गेला तरी अजुन
ही शेवंती सिझन गेला तरी अजुन माझ्याकडे फुलतेय.
शांकली, भारतात बहुतेक
शांकली,
भारतात बहुतेक कनेक्शनचा प्रॉब्लेम असणार. रात्री उशीरा किंवा पहाटे, कदाचित
वेग चांगला मिळेल. यापैकी बहुतेक माहितीपट मी एफ. एल. व्ही. फॉरमॅट मधे
रेकॉर्ड केलेले आहेत. पुढच्या वेळी देईनच. हा एफ. एल. व्ही. प्लेयर नेटवर उपलब्ध आहे. तो वापरुन अशा फिल्म्स बघता येतात.
कृष्णकमळाचे पॅसिफ्लोरा कूळ हे तसे मोठे आहे. त्यात अनेक रंग आहेत. माझ्याकडचे
फोटो रात्री टाकतोच.
दिनेशनी दिलेला दुवा म्हणजे
दिनेशनी दिलेला दुवा म्हणजे अलिबाबाची गुहा आहे. मालुताईंचे गाणे इतके सहज आणि सुंदर असते की शास्त्रीय गायन न आवडणारा पण मान डोलवतोच. अत्यंत साधे रहाणीमान, वागण्यात कसलाही नखरा नाही, आणि इतकी महान कला असूनही अत्यंत नम्र.>>>>> माधव अगदी खरं - काल माझी (व अंजूची) संध्याकाळ या दुव्यामुळे इतकी श्रवणीय झाली की बस्स.. - वा वा वा काय सुरांशी एकरुप होउन गातात.....
वर टाकलेल्या फोटोसंबंधात - <<<शशांक अशीच फळे आमच्या उरणच्या एका रस्त्यावर आहेत. रोज फोटो काढायला जाईन म्हणते पण योग अजुन येत नाही. झाडाची पाने सप्तपर्णी सारखी आहेत त्याची.>>> या झाडाला एकही पान नव्हते - पण या फळांवरुन अंजूने मात्र लगेच ओळखले........ थोडक्यात अंजूच्या जिवावर मी मिजास मारतोय - ओळखा म्हणून... (या झाडांच्या नावाबाबत, ओळखण्याबाबत मी, बालवाडी काय बोबडे बोल तरी जाणतो का नाही देव जाणे...)
तो जंगली बदाम असावा का ?
तो जंगली बदाम असावा का ?
हे फळ नाही ओळखता आले मला.
हे फळ नाही ओळखता आले मला. आमच्याकडे अशी फळे येणारे जे झाड आहे, त्यातल्या बिया अगदी कडक असतात. साल चामट असते पण सहज सोलता येते.
फळे पक्षी वगैरे खाताना दिसत नाहीत.
----
माझ्या पाहण्यात आपल्याकडे पांढरी, पिवळी, (या दोन्ही रंगात बटण प्रकार असतो.) गुलाबी, किरमीजी लाल (यात पिवळ्या पाकळ्या पण असतात.) बघितलेत.
शेवंतीच्या पानांचा आकार आणि वासही मला आवडतो.
कछुआ छाप मच्छर अगरबत्ती ज्या झाडाच्या पानापासून करतात ते पायरेथ्रम झाड पण याच कूळातले. त्याला पण अशीच पांढरी फुले येतात. त्याची इथे मोठ्या प्रमाणावर शेती होते.
पाने अशी आहेत का जागू - तू
पाने अशी आहेत का जागू - तू पाहिलेल्या झाडाची (सप्तपर्णीसारखी) - (जंगली बदाम नाहीये हा)
यावरुन तू किंवा दिनेशदा नक्कीच ओळखू शकाल.....
सुप्रभात. आज सकाळी काढलेला
सुप्रभात.
आज सकाळी काढलेला फोटो.
शोभा, तू नक्कीच चांगली काळजी
शोभा, तू नक्कीच चांगली काळजी घेत आहेस या रोपांची......>>>>>>>>>>मी नाही, माझे वडील. याचा रंग अजून गडद आहे म्हणे. पण पांढर्या लिलीबरोबर लावल्यामुळे थोडा फिकट झालाय अस समजलं. कालच्याच फुलांचा आज रंग किती फिकट झालाय पहा.
मलाही शेवंतीच्या पानांचा
मलाही शेवंतीच्या पानांचा सुगंध आवडतो. पुर्वी मे महिन्यात आम्ही शेतातली ठेप काढुन शेवंतीच्या आसपास पसरायचो. बटण शेवंती होती तेंव्हा आमच्याकडे. पाऊस पडला की ही ठेप मऊ पडायची आणि शेवंतीलाही बोके फुटायचे. मग हे बोके जरा तयार झाले की ते तोडून आम्हि त्या मऊ झालेल्या ठेपळांमध्ये रोवायचो. हे बोके तोडताना इतका सुगंध यायचा तो अजुन माझ्या मनात आहे.
गेले कित्तेक दिवस ह्या
गेले कित्तेक दिवस ह्या झुडुपाचे नाव आठवण्याचा प्रयत्न करतेय पण आठवतच नाही. प्लिज हेल्प करा.
हो शशांकजी अशीच पाने आहेत.
शोभा फिक्कट झाले तरी फुलाचे सौंदर्य काही कमी झाले नाही.
हे झुडूप जनावरे खात नाहीत. ह्याच्या फांद्या कोळणी आपल्या टोपलीत ठेवतात त्यामुळे त्यांचा धंदा म्हणे जोरात होतो. त्याचा उपयोग त्या माश्या हकलायलाही करतात
आमच्या कुंपणालाच आहेत ही सध्या अशी पक्षांसारखी फुले आली आहेत. पान तोडल्यावर त्यातुन चिक येत.
गावाला माझ्याकडे आहे हे रोप..
गावाला माझ्याकडे आहे हे रोप.. नाव मलाही माहित नाही. फ्लॉवर्स ऑफ इंडिया वर शोध. माझ्याकडे बॅन आहे
माझी कोकण रेल्वे.
माझी कोकण रेल्वे.
http://www.maayboli.com/node/34209
आता काहीच अडचण येणार नाही ते
आता काहीच अडचण येणार नाही ते वरचे फळ ओळखायला.......
पिवळी काटेसावर!
पिवळी काटेसावर!
जागुतै, कोलाज आवडला
जागुतै, कोलाज आवडला
जागू त्याला आम्ही आरश्याचे
जागू त्याला आम्ही आरश्याचे झाड म्हणतो. पान मधोमध चिरले तरी त्यातला पापुद्रा
तसाच राहतो.
शशांक, कात्रज परिसरातला फोटो आहे का ?
त्या कोळणींच्या माश्या वारण्यावरुन एक किस्सा आठवला. केनयात दुपारी
काही भाजीवाल्या माझ्या घरी यायच्या. नवीन दिसणारी कुठलीही भाजी घेऊन
या, असे मी त्यांना सांगितले होते. कधी कधी त्या उगाचच काही पाला / शेंगा
घेऊन यायच्या. असेच एकदा शेवग्याच्या शेंगा घेऊन आल्या. मी त्या आनंदाने
घेतल्या. तर त्या तिघीजणी खो खो हसायलाच लागल्या.
मला खात्री होती कि त्या शेवग्याच्याच शेंगा आहेत. तरी हसता का ? असे विचारल्यावर म्हणाल्या. आमची पैज लागली होती कि हा मझूंगू मलिबू (माझे
त्यांनी ठेवलेले नाव. अर्थ : गोरा शिक्षक ) नक्की हे खात असणार. मग मी विचारले,
तूम्हाला माहीत नाही का ? तूम्ही खात नाही का ? तर त्या म्हणाल्या, छे. आज काही
बकर्या चरायला न्यायच्या होत्या, त्यांना मारायला या शेंगा, तोडून घेतल्या होत्या.
मलाही शेवंतीच्या पानांचा वास
मलाही शेवंतीच्या पानांचा वास आवडतो. मी एकतरी पान नेहमी चुरगाळतोच शेवंती भेटली की.. किंवा पानाचे एखादे टोक तरी चुरगाळतो. काल जी रक्तशेवंतीचे फुल मी इथे अपलोडले त्याच्या पानांचा वासही शेवंतीच्या पानांसारखाच येतो. देवळाच्या पायथ्याशी फुल विकणार्या स्त्रिया ह्या रक्तशेवंतीला शेवंती असेच म्हणतात. बादवे, रक्तशेवंती हे नाव मी दिलेले आहे. कळत नाही दरवेळा काय उल्लेख करावा ह्या फुलांचा.
इथे सारखे भुकंपाचे हलके हलके धक्के बसत आहेत. लिहायला भिती वाटते आहे.
शशांक ती सोनसावर आहे ना?
शशांक ती सोनसावर आहे ना?
Pages