निसर्गाच्या गप्पा (भाग-७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 April, 2012 - 00:54


(ह्या भागाला आपला निसर्गमय आयडी महान छायाचित्रकार जिप्सी ह्याच्या सौजन्याने वरील छायाचित्र मिळाले आहे. )

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उजू, राणीच्या बागेत गेलात तर रुद्राक्षाचे झाड शोधून त्याला फुले आलीत का ते बघा आणि रक्तचंदनाचे पण झाड बघा.
तिथे झाडावर पाट्या नाहीत, पण सगळ्या अनोळखी झाडांची नोंद करुन ठेवा. माहिती मग शोधू.

अगं आता आमच्याकडे (म्हणजे ऑफिसमधे) स्टॅच्युटरी ऑडिट सुरु झालंय. शिवाय सेंट्रल ऑडिट चालूच आहे. त्यामुळे प्रत्येक रविवारी मी ऑफीसला जातीये. आणि असं अजून एक महिना करावं लागणार आहे. आज खूप दिवसांनी गुड फ्रायडेची सुट्टी मिळून मी घरी आहे. त्यामुळे राणीची बाग बघणं हे बहुधा पुढच्या वर्षीच! किंवा दिवाळी नंतर! (मुंबैतल्या पावसाची.......)

हा भुईचाफा नाही, हे अ‍ॅडेनियमच आहे. व्हेरिगेटेड म्हणजे एका रंगाच्या दोन छटा असलेले.:स्मित:

७ व्या भागाबद्द्ल सगळ्यांचे खुप खुप अभिनंदन ..:)
२ दिवसांत १५० च्या वर पोस्ट गेल्या पण... सगळ्यांनी खुप खुप मस्त मस्त फोटो
टाकले आहेत...
खरचं हा धागा म्हणजे अनेक नवनवीन माहीतींचा , फोटोंचा खजिनाच आहे... जागुला
ह्याबद्द्ल किती धन्यवाद दिले पाहिजेत असे वाटते.. निसर्गाची नवी नवी रुपे बघायला मिळतातं..

मग भुईचाफा असेल तर टाक.

वर मी अननसाचे झाड पाहिले. ईंडोनेशिया मधे बांडुंग नावाचे एक फार मोठे शहर आहे. तिथे 'हनी पाईनॅपल' मिळते. कारण हे अननस कापले की त्यातून मधमाशा बाहेर पडतात. ही अननसे विकण्याची तर्‍हापण मला फार आवडली. अननसाचे घडच्या घड टांगून ठेवलेले असतात. हे बघा प्रचि:
ananas.jpg

ही गुलाबी फुले की पाने कळत नाही:

anaamik.jpg

हा सिंगापुरातील अशोक. आत्ता मस्त फुलला आहे.
Ashok.jpg

बी, अननस उलटा टांगला कि देठाकडचा गोडवा शेंड्याकडे जातो, नाहीतर देठ गोड आणि शेंडा
आंबट लागतो.
ती गुलाबी पानेच वाटताहेत.

बी, माझ्याकडे भुईचाफा नाहीये. पण जमेल तेव्हा नक्की फोटो देईन.
सगळे फोटो छान. ते गुलाबी फूल पेट्रीया सारखं वाटतंय पण दिनेशदा नक्की सांगू शकतील. सीता अशोकाचा सध्या सगळीकडेच फुलण्याचा हंगाम दिसतोय.

Kaempferia rotunda भुई चाफा, भूमी चम्पा (आंतरजालावरुन -गुगलकृपेकरुन)

Kaempferia rotunda03.jpgbhui chafa.JPG

दिनेशदांचा सगळ्या झाडांचा हिशोब म्हणजे कोणतं झाड नक्की कुठे, कुठल्या झाडानंतर त्याचा नं आहे हे अगदी तोंडपाठ आहे
अगदी !
एखादा त्याच भागात राहणारा अस्सल निसर्गप्रेमी मुंबईकर देखील तिथली बागांची माहिती अडखळत सांगेल किंवा कित्येकांना तर काहीच माहीती नसेल पण तुम्ही मात्र अगदी परफेक्ट सेव केल आहे.

वा भुईचाफा..

वेरिगेटेड हा शब्द प्रामुख्याने पानांसाठी वापरलेल मी ऐकलाय. पानांमध्ये हिरव्यात पांढरा किंवा क्रिम कलर असतो ती वेरीगेटेड वरायटी असे शिकवलेले. पण फुलंच्या बाबतीत मात्र कधी ऐकल नाही.

राणीबाग सकाळी ९ ला उघडते. तेव्हा तिथे गेटवर जमुया. माझा नंबर आहे तुझ्यकडे उजु. मला फोन कर... मलाह दुपारी मामाकडे जायचेय त्यामुळॅ लवकर कलटी मारावी लगणार. (माझा कीबोर्ड मेल वाटते Sad

राणीच्या बागेत जाणार आहात तर 'हिरवाई'मधे डॉ.डहाणूकरांनी वर्णन केलेला पचीरा पण बघून या नं.. आणि जिप्सीकडे फोटोची मागणी.... याची पानं सावरीसारखी असतात आणि रबरी पोताची असतात असं म्हटलंय या पुस्तकात. आणि सोललेल्या मोठ्या केळ्यासारखं,भरगच्च लाल पुंकेसर असलेलं मोठ्ठं फूल असतं असंही वर्णन केलंय.

आणि दिनेशदांनी वर सांगितलंय त्या स्टॉकिंग्ज ट्री (पायमोज्याच्या झाडाजवळच)जवळच, बेरीया कॉर्डिफोलीया आहे.. शंभर पावलांवर! खूप उंचच उंच आणि भिरभिर्‍यासारखी दिसणारी रक्तचंदनी रंगाची झुबक्याने येणारे फुलं! (हे वर्णन आणि पत्ताही हिरवाई मधलाच!) हाही बघून आणि फोटो काढून या नं... प्लीज.

कुणाकडे सोनटक्का आणि अबोली यांचे फोटो आहेत का? मला त्यांची आठवण येतेय्....सोनटक्क्याचा वास नाहीतर निदान फोटू....

हो दिनेशदा शोधू आम्ही रुद्राक्षाचे आणि रक्तचंदनाचे झाड. माझ्याकडे आजीनी दिलेली रक्तचंदनाची बाहूली आहे अजून हि, ती मी कधिच उगाळत नाही. जपून ठेवली आहे आजीची आठवण म्हणून.
शांकली, वोक्के वोक्के. नेक्स्ट टाईम.
साधनातै,प्लीज$$$$$$$$$ अ‍ॅडेनियमच्या बीया असतील तर माझ्यासाठी आण.मी फोन करेलच ऊद्या.
बी ,शोभा१२३, छान फोटो.भुईचाफा पण मस्तच.

स्टॉकिंग ट्री मी बघितलेय. अजून असावे तिथे. पण त्याचा नेटवर पण फोटो दिसत नाही.
अगदी पायमोजेच लटकताहेत असे वाटते.

उजू, नक्की अबोलीच आहे का? कारण कोरंटी ही जांभळी असते. दुरुन तीही अबोली वाटू शकते. फोटो काढून इथे आम्हाला पण दाखव मग.

मराठी लोकाना देवगड, रत्नागिरी हापूसचा अभिमान वाटणे सहाजिकच आहे. त्या
चवीचा आंबा जगात कुठेच मिळत नाही (मी ऑस्ट्रेलिया, मलेशिया, पाकिस्तान, ओमान, नायजेरिया, केनया, दक्षिण आफ्रिका या देशातले आंबे चाखलेले आहेत.)
पण तसा आंबा भारतभर होतो. ते तसे चवदारही असतात अपवाद फक्त ईशान्य भारत.

त्या राज्यांत मात्र आंबे होत नाहीत. म्हणजे आंब्यांची झाडे आहेत, त्यांना मोहोर येतो,
आंबेही लागतात. पण पिकायला लागले कि सगळेच्या सगळे सडून जातात.

अविनाश बिनीवाले यांनी एक मजेदार लोककथा सांगितली आहे.
परशुराम एकदा मिझोरामला गेला (कोकण सोडून तिथे कसा गेला असेल ? ) तिथे
त्याला भूक लागली. एका शेतकर्‍याचा अंगणात आंब्याचा ढीग होता. परशुरामाने
त्यातले काही आंबे मागितले. शेतकरी म्हणाला, सगळे सडले आहेत. परशुराम म्हणाला, तथास्तु. तेव्हापासून तिथले सर्वच आंबे सडून जातात.

त्या राज्यांत इतर सर्व पिके त्यात चहा, बांबू, भात, मश्रुम, अननस, फणस होत असली तरी आंबा मात्र नाही. याबाबतीत शास्त्रीय कारण काहि असेल का ? किंवा एखादा रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव असेल. पण त्याबाबत काही माहिती नाही.

Pages