निसर्गाच्या गप्पांच्या धाग्याचा ६ वा भाग चालू होत आहे. त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
२८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) स्मित
दिनेशदा चालेल आता ऋतूचक्रची
दिनेशदा चालेल आता ऋतूचक्रची ऑर्डर देते.
धनेश, उंबरे आवडीने खातो. पण
धनेश, उंबरे आवडीने खातो. पण छोटे सरडे, अंडी वगैरे पण खातो. त्याच्या लांब
चोचीमूळे ते सहज शक्य होते त्याला. खास करुन ज्यावेळी तो मादी आणि पिल्लांसाठी
चारा नेत असतो, त्यावेळी त्याला भरपूर व्हरायटी न्यावी लागते. त्याच्या राणीने, ढोलीला लिंपण करुन आत पिल्लासोबत स्वतःला कोंडून घेतलेले असते ना ?
परवा फ्रर्ग्यूसनच्या टिमनी
परवा फ्रर्ग्यूसनच्या टिमनी केलेलं "झाडं लावणारा माणूस" हे नाटक पाहिलं. चांगल केलं होतं.
एलिझार बुफिए नावाच्या माणसाची गोष्ट होती. लाखाच्यावर एकट्याने झाडं लावली होती. ग्रेट माणूस.
जो एस - छान माहिती - एलिझार
जो एस - छान माहिती - एलिझार बुफिए विषयी अजून सांगाल का ?
अरे हे काय मी टायपो पर्यंत
अरे हे काय मी टायपो पर्यंत उत्तरे आली पण
आमच्या येथील शेवग्याच्या फुलांवर सकाळी चिमणीएवढा पक्षी त्याची न्याहारी करतो. तो सनबर्ड का? खालुन पाहिला तर दिसणार नाही नीट. वरुन (टेरेसवरुन) खुपच लांबुन दिसतोये कसा ओळखायचा. रंग डार्क आहे, पण काळा आहे का ते सांगता येत नाही.
मोनाली तो सनबर्डच. डार्क
मोनाली तो सनबर्डच. डार्क चॉकलेटी रंग असतो. ओळखायची खूण म्हणजे छोटीशी तरी बांकदार चोच.
धन्स दिनेशदा हा म. नि. उ.
धन्स दिनेशदा
हा म. नि. उ. (धारावी) गटगचा फायदा. तेथे पाहिलेला म्हणुन अंदाज बांधला. चोच अगदी कळत नाहिये पण हो बहुदा बाकदार आहे.
शशांक http://en.wikipedia.org
शशांक
http://en.wikipedia.org/wiki/The_Man_Who_Planted_Trees
ही लिंक पहा. आणि "The Man Who Planted Trees" हे सर्च केलं तर भरपुर माहिती आहे.
मला आज पहिल्यांदा मोहाची फुलं
मला आज पहिल्यांदा मोहाची फुलं बघायला मिळाली... मैत्रिणीला काल मोहाचं झाड सापडलं.. डेक्कन कॉर्नरवरुन एफसी रोड ला वळलं की डाव्या हाताला आहे.. तिने ते आज दाखवायला आणलं..
मोहाच्या झाडाचे २ प्रकार असतात म्हणे.. उत्तरी/दक्षिणी??? जाणकार यावर अजुन माहिती देतीलच...
सुप्रभात.
सुप्रभात.
वा !! एकदम सुंदर रंग आहेत
वा !! एकदम सुंदर रंग आहेत
वा तिरंगी गुलाब, मस्तच
वा तिरंगी गुलाब, मस्तच
चिमुरी ,डेक्कन कॉर्नरवरुन
चिमुरी ,डेक्कन कॉर्नरवरुन एफसी रोड ला वळलं की डाव्या हाताला आहे.. म्हणजे नक्की कुठे आहे ? प्रयाग हॉस्पिटल समोरच्या बाजुला का. मला पण बघायचे आहे.
@माधव पवईच्या बागेत अंजनी
@माधव
पवईच्या बागेत अंजनी फुलायला लागला आहे.
कालच बघुन आलो. बहुतेक या आठवड्याअखेरीच भरभरून फुलेल.
मलाही घ्या ना वर्गात.. आजवर
मलाही घ्या ना वर्गात..
आजवर कुंपणावर बसूनच सगळा आस्वाद.घेणं चाललंय...!!
हेम
हेम
पूण्यात एवढ्या भररस्त्यावर
पूण्यात एवढ्या भररस्त्यावर मोहाचे झाड फुललेय आणि टिकलेय.. हेच नवल.
भारतात, वसंताचे आगमन झालेच म्हणायचे आता. पाडवा आला.
दिनेशदा, हाच का धनेश? १. २.
दिनेशदा, हाच का धनेश?
१.
२.
जागू, मस्त आहे ग गुलाब.
जागू, मस्त आहे ग गुलाब.
चिमुरी ,डेक्कन कॉर्नरवरुन एफसी रोड ला वळलं की डाव्या हाताला आहे.. म्हणजे नक्की कुठे आहे ? प्रयाग हॉस्पिटल समोरच्या बाजुला का. मला पण बघायचे आहे.>>>>मलाही बघायचे आहे.
शोभा हा सनबर्ड, धनेश जागु कडे
शोभा हा सनबर्ड, धनेश जागु कडे आहे तिने पाळलेला
स_सा, धन्यवाद. मी काही
स_सा, धन्यवाद. मी काही दिवसांपूर्वी, काही उंबराचे फ़ोटो टाकले होते, तेव्हाच दिनेशदा मला म्हणाले होते, की "सनबर्ड पण येत असेल". हा तेव्हाच काढलेला फ़ोटो. पण नीट आला नाही. म्हणून इथे डकवला नव्हता.
हे ते फ़ोटो. http://www.maayboli.com/node/32002
जागू, जरा धनेशचा फ़ोटो दे बर.
साधने, तुझ्या लिस्ट मध्ये किती पक्षी नालायक आहेत ग? आणि कशाला ना लायक?
जागु, प्रचि मस्तच मी झाडा
जागु, प्रचि मस्तच
मी झाडा पत्ता थोड्यावेळाने टाकते...
शोभा तुझी विपु बघ जरा
शोभा, धनेश हे कोकणातले नाव.
शोभा, धनेश हे कोकणातले नाव. त्याचे इंग्रजी नाव हॉर्न बिल. त्याचे दोन तीन प्रकार दिसतात आपल्याकडे. भली मोठी चोच आणि डोक्यावर मुकुट असे रुप असते.
वेंगुर्ला, मालवण, गोवा भागात दिसतो.
चिमुरी, विपू. कधीच पाहिली. अग
चिमुरी, विपू. कधीच पाहिली. अग रविवारी रोहन कॉर्नरच्या इथूनच फिरायला गेले. पण लक्षातच राहील नाही.
(कुणी स्मरणशक्ती देता का स्मरणशक्ती?)
तू कुठे रहातेस? संपर्कातून कळव. म्हणजे आपण जोडीने जाऊन अनेक झाडे पाहू.
दिनेशदा, आठवला धनेश. तुम्ही वर्णनच इतक छान करता की, धनेश डोळ्यासमोर उभाच राहिला.
मोहाच्या झाडाचा पत्ता:
मोहाच्या झाडाचा पत्ता:
डेक्कन कॉर्नरवरुन एफसी रोडला जाताना त्या पुलावरुन खाली उतरल्या उतरल्या डाव्या बाजुला, चितळेंच्या समोर, श्रीयश हॉस्पीटलच्या इथेच आहे मोहाचं झाड... रस्त्यावरुन झाड ओळखु येत नाही म्हणे.. हॉस्पीटलच्या दुसर्या मजल्यावरुन फुलं दिसतील, असं कळलं आहे...
शोभा
म्हणजे फुलं हाती लागायच्या
म्हणजे फुलं हाती लागायच्या आधीच हॉस्पिटल?
रोजच या धाग्यावर चक्कर
रोजच या धाग्यावर चक्कर मारायची सवय लागलीये..
मस्त माहिती आणी फोटो पाहायला मिळतात..
जागु..काय छान रंग आहे गुलाबाचा..
हे फूल कसचं आहे? फेब मधे नेवर्क मधे जेंव्हा आसपासची मोठाली झाडं स्नो मुळे निष्पर्ण आणी काळवंलेली होती तेंव्हा ही फुलं अतिशय फ्रेश दिसत होती..
वर्षु, छान आहे फुल.. रंग पण
वर्षु, छान आहे फुल.. रंग पण एकदम सहीच..
हो ना..पण नाव माहित नाही..
हो ना..पण नाव माहित नाही.. इथे जाणकार लोकांपैकी कुणीतरी नक्कीच सांगू शकेल..
मी सुद्धा हे फुल पाहिले आहे
मी सुद्धा हे फुल पाहिले आहे नाव माहित नाही , सोलापुर रस्त्यावरील नर्सरी वाल्याकडे होती ही रोपे.
Pages