निसर्गाच्या गप्पा (भाग - ६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 February, 2012 - 01:28

निसर्गाच्या गप्पांच्या धाग्याचा ६ वा भाग चालू होत आहे. त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
२८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) स्मित

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद शशांक
पण एक काळा व एक हिरवट अशी जोडी असते का?
यातला हिरवट पक्षी फ़्लाइंग स्पॅरोच्या फ़ुलातला मध खायला आलेला पाहिलाय.

अगं तो काळा पक्षी म्हणजे नर पक्षी आणि दुसरी होती ती मादी. पक्ष्यांच्यात नर खूप ब्राईट रंगाचे आणि आकर्षक असतात. तर मादी तितकीशी आकर्षक नसते.

http://www.maayboli.com/node/32913

एका स्वप्ननगरीचे फोटो या लिंकवर आहेत, अवश्य बघा.
माझ्या फेसबुकवर यापेक्षा खुप जास्त फोटो आहेत.

हुश्श.. गेल्या ४ दिवसातील सर्व वाचून इथवर पोचलो... Happy सध्या राणीच्या बागेत प्रदर्शन सुरू आहे ना? कोणी जाणार आहे का? जाऊन आले का? माझा उद्या जायचा विचार आहे.

मित्रहो, माझ्या ऑफीसात केबीनसमोरचे झाड. हा नीलमोहोर आहे का? का दुसरे कोणते झाड आहे?

अरे हा झकरांदा..

त्याला मराठीत नीलमोहोर म्हणतात हे विसरलेच. मला ....मोहोर नावाने संपणारे फुल म्हटले की गुलमोहोरच आठवते. हे नील/पित वगैरे वगैरे सगळे मराठी नावेच नाहीयेत म्हणुन दिलेली नावे. गुलमोहोराची गंमत त्यात नाही.

ओके, दिनेशदा. ऑफीसात जॅकरांडाची दोन झाडे आहेत.
अचानक लक्षात आले की कंपनीच्या मुळ मालकाने आवारात ऑलिव्हची तीन झाडे लावली होती कधी काळी. मागील वर्षी अनावश्यक आणि जास्त कचरा होणारी झाडे काढुन टाकताना ती पण झाडे तोडुन टाकली. Sad

ऑलिव्ह, आपल्याकडे बघितले नाही कुठे. ठेवायला हवी होती ती झाडे.
--
निसर्गपूर्ण पुस्तकात पक्ष्यांच्या संदर्भात, कॅसल रॉक या गावाचा उल्लेख आलाय.
गोव्यातील दूधसागर धबधब्याच्या वरुन जी रेल्वेलाईन जाते, त्या लाईनवर हे स्टेशन आहे. मिरजेतून पण इथे रेल्वेने जाता येते. (मिरज-वास्को अशी रेल्वे आहे.)

तो भाग मस्त हिरवागार दिसतो. पण आपल्यापैकी कुणी तिथे गेल्याचे वा त्या गावाबद्दल इथे वाचल्याचे आठवत नाही. माझेही कधी जाणे झाले नाही. त्या भागातल्या
लोंढा गावी माझी बस थांबली होती एवढेच.

मस्त गं शोभा..

दिनेश, मी गोव्याला ट्रेकसाठी गेले होते तेव्हा दुधसागरवरती असलेल्या स्टेशनात गेले होते. नाव आठवत नाही. तो प्रदेश सगळाच अतिशय सुंदर होता.

गिरीकंद, जॅकरांदाचा फोटो सुंदरच!
बर्‍याचदा अज्ञानामुळेच दुर्मिळ वृक्ष तोडले जातात. पण ऑलीव्हचा वृक्ष आपल्याकडेही वाढवला गेला होता तर.

शांकली, बरोबर. हा बहुतेक बोगनवेलीचाच प्रकार आहे. Happy
साधना, मी या पानाच्या शुभेच्छांबरोबर जो फोटो टाकलाय ना, तो याच फुलांच्या झाडाचा आहे.

हे आणखी काही फोटो.DSCN1906.jpgDSCN1907.jpgDSCN1908.jpgDSCN1921.jpg

शोभाला या फुलांचे पिसे लागलेय !!
गिरिकंद, मला नीट आठवत असेल तर उत्तरेकडे ऑलिव्हची झाडे आहेत. (खात्री नाही पण कदाचित जैतून असा शब्द वापरतात, त्याला.
आपल्याकडे विदेशी झाडे आणताना, ऊपयोग असलेली झाडे आणली तर किती छान होईल.
माझ्या आजोळी एक मोठी नर्सरी आहे. तिथे मी अवाकाडो, रामबुतान, (लाल केसाळ, लिचीच्या चवीचे फळ) गोड चिंच, मँगोस्टीन (कोकमाचा गोड अवतार ) या
झाडांची रोपे बघितली.

न्यू झीलंडला किवीचे वेल इतके माजतात कि फार पसारा होतो म्हणून काढून
टाकतात, आणि आपल्याकडे ते किमान २०/२५ रुपयांना विकतात. माझ्या लेकीच्या
घरी, शेकड्याने किवी लगडलेली वेल, अंधार होतो, म्हणून काढून टाकली होती.
आणि मी ती विस्कटत, त्यात पिकलेले फळ दिसतेय का ते बघत होतो.

शोभा,
ही वेल जिथे आहे त्या कार्निव्होर या जागी, गाय, म्हैस, मगर, झेब्रा, जिराफ, हरण,
शहामृग..... हे सगळे प्राणी....

कापून भाजत ठेवलेले असतात, आणि खास ते खाण्यासाठी लोक तिथे हौसेने जातात.
मग मी कसा जाऊ ?

पण वरी नक्को, पुढच्या महिन्यात फुलांचा फोटोखजिना घेऊन येतोच आहे.

<<<ही वेल जिथे आहे त्या कार्निव्होर या जागी, गाय, म्हैस, मगर, झेब्रा, जिराफ, हरण,
शहामृग..... हे सगळे प्राणी.<<<>>>> दिनेशदा, फक्त फुलांचेच फोटो टाका हं ! Proud

ही वेल जिथे आहे त्या कार्निव्होर या जागी, गाय, म्हैस, मगर, झेब्रा, जिराफ, हरण,
शहामृग..... हे सगळे प्राणी....

कापून भाजत ठेवलेले असतात, आणि खास ते खाण्यासाठी लोक तिथे हौसेने जातात.>>>>>>>>>
वाचून काटाच आला अंगावर.

Pages