निसर्गाच्या गप्पांच्या धाग्याचा ६ वा भाग चालू होत आहे. त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
२८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) स्मित
शोभा, या फुलांना युफोर्बिया
शोभा, या फुलांना युफोर्बिया म्हणतात, आणि या झुडपाचा कुठलाही भाग तोडला की पांढरा चीक येतो. पण सावधान हं... कारण हा चीक जरा विषारी असतो. त्यामुळे ही फुलं हाताळली आहेस, पण सांभळून हं.. चुकूनही डोळ्यांना वगैरे हात लावू नकोस. युफोर्बिया फॅमिलीतली तसेच चाफ्याच्या कुळातली बरीचशी मंडळी आपल्याला थोडी विषारी असू शकतात.
मस्तच फुलं आहेत ही शोभा.
मस्तच फुलं आहेत ही शोभा.
साधना, तुझ्याकडच्या कमळांना
साधना, तुझ्याकडच्या कमळांना अजून फुलं आली असतील ना? बातमीची वाट बघतोय आम्ही!
शोभा, सुंदर आहेत फुले, रंगही
शोभा, सुंदर आहेत फुले, रंगही छान आहे... पण याला देठ नसतो का?
तुम्हा सर्वांना एवढी सर्व माहिती कशी, आणि एवढी सर्व झाडे, फुले पाहायला तरि कुठे मिळतात? लकी आहात तुम्ही सर्व.
दिनेशदा... बरोबर आहे तुमचे..मोहाचे झाड पाहण्यापेक्शा त्याचा गंध अनुभवायला पाहीजे....
शोभा, मस्त फुलं
शोभा, मस्त फुलं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अगं अजुन एक कमळ फुलले परवा.
अगं अजुन एक कमळ फुलले परवा. मी अजुनेक बारीक कळी पाहिलेली, तीही वर येईल दोनचार दिवसात. एकदा कळी पाण्याबाहेर आली की खुप झपाट्याने वाढ होते. कमळ पहिल्यांदा साधारण दुपारी १२ ला फुलते आणि संध्याकाळी ५.३० पर्यंत बंद होते. त्यानंतर ते कोमेजेपर्यंत रोज फुलत आणि बंद होत राहते. मोठे भांडे लवकरच घ्यायला पाहिजे मला. पानांना जागा पुरत नाहीय.
काश साधना मै तुम्हारे नजदीक
काश साधना मै तुम्हारे नजदीक रहती......
तर, मी नक्कीच ती पानं चोरली असती. (पण मला खात्री आहे, मला ती चोरावीच लागली नसती! तू आपणहूनच दिली असतीस.)
चोरायला नकोच., पानांना मुळे
चोरायला नकोच., पानांना मुळे फुटली की मी वाटप सुरू करणार आहेच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मेरा नंबर कब आयेगा? और कैसे
मेरा नंबर कब आयेगा? और कैसे आयेगा? क्युंकी मै पूना में हूं ना!
माझं हिंदी वाचून तुला चक्कर येईल. जाऊंदे, मराठी कसं मस्त!
शोभा ती युफोर्बियाची फुले
शोभा ती युफोर्बियाची फुले माझ्या माहेरी आहेत. येत्या पावसाळ्यात त्याची फांदी आणून लावणार आहे.
झकरांदा मस्तच.
मी म्हणाले होते की आमच्या प्राजक्ताच्या झाडावर पक्षी बसुन काही बिया टाकतात त्या ह्या. कसल्या आहेत ह्या ?
![](https://lh6.googleusercontent.com/-VyZV5F-Of0U/T0pP9U922lI/AAAAAAAABq0/3R_C5ulIC6g/s640/IMG_3678.JPG)
सांगणं अवघड आहे गं जागू, मी
सांगणं अवघड आहे गं जागू, मी प्रथमच पाहिल्या ह्या बिया.
आज संध्याकाळी ठाण्याला गेलो
आज संध्याकाळी ठाण्याला गेलो होतो. वाटेत ट्रेनमधुनच नाहूर आणि मुलुंडच्या मध्ये एका ठिकाणी चक्क जॅकरांदा फुललेला दिसलांय (हुर्रे!!!!!!!
) आणि रेल्वे ठाणे स्टेशनमध्ये शिरताना पांढरा टॅबेबुयासारखी फुले दिसली. ठाणा स्टेशनवर मित्र बाईक घेऊन उभा होता त्याला तडक घेऊन गेलो आणि पाहिलं तर खरंच पांढरा टॅबेबुया फुललाय. ठाणे पूर्व गावदेवी मंदिराच्या बाजुलाच हे झाड आहे.
कॅमेरा सोबत नव्हता. ![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
आज सायंकाळी आमच्या घराजवळच
आज सायंकाळी आमच्या घराजवळच बागूल बाग आहे तिथे जायचा योग आला. आणि अहो काय आश्चर्य! तिथे मोहाची ४/५, शिवाय पिवळा बहाव्याची ५/६, १ सीता अशोक, २ पिवळा तबेबुया, २ गुलाबी बहावा इत्यादी वृक्ष होते. आणखीन नवलाईचे वृक्ष जे मी प्रत्यक्षात पहिल्यांदाच बघत होते ते बघून काय वाटलं ते शब्दांत नाही सांगू शकत....
त्यांपैकी काहींची ही झलक!
हा क्रायसोफायलम! हा इथे आहे हे मला आजच कळालं! याच्या पानांची पाठ सोनेरी रंगाची असते. आणि याच्या फळांना स्टार अॅपल म्हणतात. ते ह्याचे प्रचलित नाव पण आहे.
हा जंगली बदाम! आत्ता हा फुलावर होता... जरासा Late Latif!
ही हळदवेल किंवा माधवी लता. ही मी पहिल्यांदाच बघितली.
आणि ही तिची पानं..
पळस पण होता आणि भरभरून फुलला होता. त्याच्या फुलाचा फोटो काढायचा मोह आवरला नाही.
हे बहुधा पीच अॅपल असावे. मला नक्की माहीत नाही. याच्या फुलांचा सीझन आत्ता नाहीये. याची पानं थोडी फणसाच्या पानांसारखी असतात.
पॉप्लारचे जवळ जवळ ७ वृक्ष आहेत तिथे. हे झाड पण मी पहिल्यांदाच बघितले. त्याचे खोड वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यावर उभ्या कोरल्या सारख्या भेगा(चिरा) असतात.
आणि ही पाने... पिंपळ पानांसारखी दिसणारी...
लाल आणि गुलाबी पावडर पफ माहिती होते; पण पांढरे सुद्धा असते हे ह्या बागेतच कळाले....
सीता अशोकाची कोवळी पालवी....कोवळीक म्हणजे काय ह्याचं उत्तरच जणू....
आणि हे ट्रंपेट फ्लॉवर. याला गुलाबी तिकोमा असं पण म्हणतात. हे तबेबुयाच्याच प्रकारातलं आहे. पण तबेबुयाची आणि याची पानं थोडी वेगळी असतात.
आणि ही याची पानं.....
क्रायसोफायलम इथे भेटेल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. काय सुवर्णमंडित पानं दिसतात ह्याची. सूर्यास्त होत होता; आणि ती किरणं यावर पडली होती. त्यात हे झाड किती उजळून दिसत असेल तुम्ही कल्पना करा. फारच देखणा नजारा होता. आजचा दिवस सोनेरी झाला. सर्वार्थाने!
जिप्सी, परत गेलास की नक्की
जिप्सी, परत गेलास की नक्की फोटो काढ या पांढर्या तबेबुयाचे.
मस्त फोटो आणि माहिती शांकली.
मस्त फोटो आणि माहिती शांकली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हा क्रायसोफायलम!>>>>>म्हणजेच सुवर्णपत्र ना?
बर्रोबर जिप्सी. यालाच
बर्रोबर जिप्सी. यालाच सुवर्णपत्र म्हणतात. डॉ. डहाणूकरांच्या हिरवाई या पुस्तकात याचं खूप बहारदार वर्णन केलंय.
मीही काल राणीबागेत पाहुन आलो
मीही काल राणीबागेत पाहुन आलो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हा घे क्रायसोफायलमला माझा झब्बु
हे त्याचे फळ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![](https://lh5.googleusercontent.com/-NcOxMxg3cfU/T0py1xAPwBI/AAAAAAAAChk/ZBZZ--yf_68/s640/IMG_7672%2520copy.jpg)
जागूने टाकलेले फ्टो मला दिसत
जागूने टाकलेले फ्टो मला दिसत नाहीत, मग बघतो.
शांकली छान फोटो. हळदवेल सुरेखच. पांढर्या पावडर पफची झाडे इथे दिसतात.
जिप्स्या, सुवर्णपत्राचे पिकून किरमीजी झालेले फळ खाता येते. ताडगोळ्यासारखे लागते.
जिप्सी झब्बू मस्तच!
जिप्सी झब्बू मस्तच!
राणीबागेत अजून बरेच दुर्मिळ वृक्ष आहेत. दिनेशदांबरोबर एकदा तिथे जायचंय वृक्ष परिचयासाठी!
बागूल बागेतल्या क्रायसोफायलमला दोन फळं लागलेली दिसत होती, त्याचे फोटोही काढलेत. आणि त्या माळ्याला १/२ दिवसात भेटून विचारेन ते फळ पिकलं की मला द्याल का म्हणून.
पाहिलं तर खरंच पांढरा
पाहिलं तर खरंच पांढरा टॅबेबुया फुललाय. ठाणे पूर्व गावदेवी मंदिराच्या बाजुलाच हे झाड आहे. कॅमेरा सोबत नव्हता. >>> ते झाड म्हणाले असेल
एकदा काय झाले, मी होतो फुलांनी डवरलेला,
तिकडुन आला जिप्सी त्याने डोकाउन पाहिले,
कॅमेरा नाही आणला म्हणुन फोटो नाही काढले (भ्याआआआआआआअ)
श्रीकांता कमलकांता.......(भ्याआआआआआआअ)
बाकी इकडे सगळी सुंदर सुंदर फुले येत आहेत (फोटोत)
हळदवेल सुरेखच. पांढर्या पावडर पफ पण छान
ती बदके मस्त
>>>मुलुंडच्या मध्ये एका
>>>मुलुंडच्या मध्ये एका ठिकाणी चक्क जॅकरांदा फुललेला दिसलांय
पुण्यात बर्याच ठिकाणी आहे हा,
>>>हा जंगली बदाम! आत्ता हा फुलावर होता... जरासा Late Latif!
शांकली अशा फुलं/फळांची झाडं एम आय टी शाळेच्या (कॉलेज नाही) रस्त्याला आहेत.
हॅरिस ब्रिजच्या पुणे एंडला काही झाडं आहेत त्यानापण अशाच पण लांबट शेंगा/ फळं लागली आहेत. कुणी पाहीली आहेत का? कसली आहेत ती?
मोनाली
मोनाली![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
शांकली मस्तच. पिंपळासारखी
शांकली मस्तच. पिंपळासारखी पाने हजारी मोगर्यासारखी दिसत आहेत. जंगली बदामची पाने सप्तपर्णी सारखी दिसत आहेत. आमच्या येथील बागेतही सुवर्णपत्रीची झाडे आहेत. मी पण काल मुलीला घेउन आमच्या टाउनशिपच्या गार्डन मध्ये गेले होते. तिथे काही फुललेली ही फुले.
बहावा
![](https://lh4.googleusercontent.com/-eJc--gvlOa4/T0pRDFhByhI/AAAAAAAABuM/RVBdmSKqFH4/s640/IMG_3712.JPG)
बहाव्याला लागलेल्या शेंगा.
![](https://lh6.googleusercontent.com/-Q6p1ZXnDW0I/T0pRIhLB1DI/AAAAAAAABuc/HAZe7V7gJD4/s640/IMG_3714.JPG)
पावडर पफ
![](https://lh6.googleusercontent.com/-lyUL2lVrWXU/T0pRKu19UMI/AAAAAAAABuk/FhAshOktW9E/s640/IMG_3715.JPG)
बॉटल ब्रश
![](https://lh5.googleusercontent.com/-tD46qstKSwo/T0pQ7SzVa3I/AAAAAAAABt8/imcYufIUedM/s640/IMG_3710.JPG)
ही गुलाबी फुले पण होती कसली आहेत ही ?
![](https://lh5.googleusercontent.com/-K0oQaHsS5lk/T0pQubfJEdI/AAAAAAAABtc/jlAoAoGe5DM/s640/IMG_3701.JPG)
जागू, आता दिसले फोटो. अनोळखीच
जागू, आता दिसले फोटो. अनोळखीच आहेत बिया. कदाचित पावसाळ्यात रुजतीलही.
पक्षी त्यातले काय खातात, हे पण कळत नाही.
शांकली, पूण्यात एवढी मोहाची झाडे आहेत. पण कुठल्याच लेखात आधी त्याचा
उल्लेख वाचला नव्हता.
आदीवासी लोकांसाठी दैवत असणारे हे झाड, नागरी लोकांसाठी कमी प्रतिष्ठेचे होते
कि काय ? मोह म्हणजे मोहाची दारु, हेच समीकरण होते आधी.
खाण्यासाठी पण उपयोग नव्हता होत वाटतं.
कुणी पाहीली आहेत का? <<<मी
कुणी पाहीली आहेत का? <<<मी पहातो रोज
कसली आहेत ती? << माहीत नाही (शेवरी ?? )
आता त्या बिया मी रुजवून बघते
आता त्या बिया मी रुजवून बघते उगवतात का रोप ते.
जागू बिब्बा आहे का तो?
जागू बिब्बा आहे का तो?
माझ्याकडे अॅडेनियमला शेंगा
माझ्याकडे अॅडेनियमला शेंगा येऊन त्यातुन आता म्हातार्या बाहेर पडत आहेत.
![](https://lh4.googleusercontent.com/-10vMOX0JAk4/T0pRPbmMBiI/AAAAAAAABu0/sX4T4JXd01Y/s640/IMG_3718.JPG)
नाही ग बिब्बा नाही.
नाही ग बिब्बा नाही.
आता ऑफिसला येताना रस्त्याच्या
आता ऑफिसला येताना रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी "कदंब" बहरलेला पाहिला.
खरंतर हा सीझन कदंब बहरण्याचा नाही, पण तरीही ४-५ झाडे सोडली तर इतर सगळीच अगदी भरभरून फुललीयं.
Pages