निसर्गाच्या गप्पा (भाग - ६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 February, 2012 - 01:28

निसर्गाच्या गप्पांच्या धाग्याचा ६ वा भाग चालू होत आहे. त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
२८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) स्मित

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, काल मोहाच्या झाडावर खूप वटवाघळं दिसली. त्यांनी त्या फुलांवर अगदी ताव मारला होता. पण अशी कुठल्याच पक्ष्याची हजेरी मला रोहितकाच्या झाडावर दिसली नाही.

शांकली, खूप दिवसांनी निग व आले आहे. ऑफिसमध्ये नेटवर जाता येत नव्हतं आणि घरी वेळच नव्हता. त्यामुळे मोठ्ठा बॅकलॉग आहे Happy
त्या झाडाखाली अश्याच बियांचा सडा पडाला होता खाली. आणि लाल रंगामुळे त्या उठून दिसत होत्या.

पक्ष्यांमध्ये रोहित पक्षी म्हणजेच फ्लेमिंगो ना? या बिया रोहित पक्ष्यांसारख्या लाल आहेत म्हणून या वृक्षाला हे नाव पडलं असणार.

शांकली, याचे साधे सोपे आडाखे असतात.
लाल भडक रंगाच्या बिया, उकलणारी फळे (जी बिया तयार झाल्याशिवाय उकलत नाहीत), मोठ्या पक्ष्यांना आरामात बसता येईल अशी मजबूत फांदी, (पोपट सोडल्यास बाकी पक्ष्यांना चोचीने लटकता येत नाही.), पक्ष्यांना सहज लपता येतील अशी दाट पाने... हे सगळे पक्षी बीजवाहक असल्याचे आडाखे.
झाडाखाली इतक्या बिया पाडून, झाडाला फारसा उपयोग नाही. कदाचित माकडे यावर येत असतील. पण ती बियाच चावून टाकतील, त्याचा झाडाला उपयोग नाही.

हं दिनेशदा, ही सगळी वैशिष्ठ्ये रोहितकात आहेत. गर्द आणि दाट हिरवी पाने, पेरू सारख्या चिवट फांद्या, यांमुळे बरेच पक्षी बिया-फळे खायला येत असतील. जरा नीट निरिक्षण केले पाहिजे.

जागू, तू मागच्या भागात एका झाडाचा फोटो दिला होतास. त्याचे नाव कदाचित बोखाडा असू शकेल. तुला ब वरून काहीतरी नाव आहे असे आठवत होते. बिबळा (बीजा) ची फुलं पिवळी असतात आणि बिया तपकिरी रंगाच्या पंखधारी असतात. त्यामुळे कदाचित ते झाड बोखाडाचे असेल.

शांकलि मी परत जर तिथे गेले तर नक्की त्या झाडाचे नाव विचारेन तिथल्या माणसांना. तोपर्यंत आपण त्याला बोखाडाच म्हणू. कदाचीत तेच असेल.

मोह आणि विषवल्ली मस्तच. मोह चिकुच्या झाडा-फुलासारखा वाटतोय.

जिप्सि महादेवाचे छान दर्शन घडवलेस.

दिनेशदा सापांची माहीती मस्तच.

आमच्याकडे प्राजक्ताच्या झाडावर रात्री पक्षी बसुन कुठलीतरी फळे खाऊन बिया टाकतात. बिया जांभळासारख्या असतात. उद्या फोटोच टाकते.

वा शांकली मस्त फोटो.
सोनचाफ्याच्या बिया पण अशाच पण कमी लालसर दिसतात, लांबून छोट्या शेंगदाण्यासारख्या वाटतात.

मित्रांनो हे पहा , पक्षी विश्व जाणण्याची पर्वणी
http://72.78.249.107/Sakal/21Feb2012/Normal/PuneCity/page3.htm

शांकली, पुण्यात कवठ (कपित्थ) फळाचे झाड मी नक्कीच बघितले आहे, पण नेमके कुठे ते आठवत नाही. संस्कृतमधे हे झाड, फळांपेक्षा फुलांसाठी वाखाणले आहे.
पण मला कधी फुलांचा फोटो नाही काढता आला. (आता तर फळांचाही सिझन संपत आला असेल.)

हि फळे रात्री किंचीत चमकतात. त्यामूळे रात्रीदेखील ते झाड देखणे दिसते. हि झाडे कोकणात नाहीतच, त्यामूळे तिथे हे फळही माहित नाही. पण नरसोबाची वाडी (कोल्हापूर), नेवासे (नगर), नाशिक, पुणे, बडोदा इथेच बघितलीत मी.

याची चटणी, सरबत माझे खुप आवडते. यालाच वुड अ‍ॅपल असाही शब्द वापरतात.

चला मंडळी... काही दिवसांपुरती तुमची रजा घेतो.. सुट्टीवर असल्याने फार ओन्लाईन येणे होत नाही. अधून मधून चक्कर मरीन आणि हो रोमात असीनच.. Happy

काही कार्यक्रम ठरत असतील तर मला कळवायला विसरू नका... Happy

म्हणजे सेनापती आता घरच्या सैन्यात असणार तर.

साधना काल मी कमळांच्या शोधात गेले होते. आमच्याइथे एक साईबाबांचे देऊळ आहे. त्याच्या पाठी त्यांनी छोटा हौद करुन कमळे लावली आहेत. मी तिथल्या सगळ्या पानांना निरखुन पाहील पण कुठल्याच पानाला मुळ नव्हत. असच पान तोडून आणल तर जगेल का ?

होय गं.. Happy एकदा गो ग्रीन मध्ये नक्की चक्कर मारणार आहे. मी बरेचदा पठारे नर्सरी कल्याण येथेच जातो पण ह्यावेळी गो ग्रीन.. Happy

पोपट हा एकमेव पक्षी चोचीने फांदीला लटकू शकतो असे दिनेशदांनी वर म्हटले आहे त्यावरुन सहज गुगलून बघताना ही एक छान साईट मिळाली - www.biologyjunction.com

या चित्रात पक्ष्यांच्या वेगवेगळ्या चोची व त्या चोचींचे उपयोग किती छान दिलेत -

beak1.jpgbeak2.jpgbeak3.jpg

सेनापती नक्कीच जा. आता तिथे आजूबाजूला अजून बर्‍याच नर्सरीज झाल्या आहेत. तो परीसरही छान आहे. तिथेच बाजूला युसुफ मेहेराली सेंटर आहे. तिथेही भेट द्या म्हणजे तुमची पिकनीकच होईल. त्या सेंटरमध्येच शांकली म्हणते ते झाड कुंभारकामच्या समोरच आहे. प्लिज त्या झाडाचे नावही विचारून या. मागच्या पानावर ते झाड आहे.

कवठाचे झाड माझ्या आजोळी नगरला होते.. मस्त डेरेदार.. त्याच्या सावलीतच बैल बांधायचे.. भरपुर कवठं खाल्ली आहेत या झाडाची.. पण आता ते वठलं आहे.. लहानपणी काहीच अक्कल नसल्याने फुलं कशी असतात वगैरे प्रश्न पडलेच नाहीत..

बाकी माहिती नेहमीप्रमाणे छानच..

चला मंडळी... काही दिवसांपुरती तुमची रजा घेतो.. सुट्टीवर असल्याने फार ओन्लाईन येणे होत नाही. अधून मधून चक्कर मरीन आणि हो रोमात असीनच.. स्मित>>>>> सेनापती - "पानिपत"ची जबाबदारी कोण घेणार मग ?

शशांक, माणसाला पण असे वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळे हात असायला पाहिजे होते नाही. म्हणजे हातमोज्यापासून-- वाघनख्यांपर्यंत साधने लागली नसती.

काही शतकांनी असे होईल का ? कि प्रखर उन्हात, वाळूत, बर्फात राहणार्‍या लोकांच्या डोळ्यात असे बदल होतील, कि गॉगल्स वगैरे लावावे लागणार नाहीत.

वाळवंटात राहणार्‍या लोकांच्या अंगात पाणी साठवायची क्षमता येईल, तर बर्फाळ प्रदेशांतील लोकांच्या अंगावर दाट केस येतील !! स्वप्नरंजन आहे सध्या, पण अगदीच अशक्य नाही !!

हुश्श झाले वाचुन. Happy

मागे येथे कोणीतरी, लाल चपटी फळे व आत असलेल्या काळ्या बीयांच्या रांगांचे फोटो दिले होते. ते झाड मी बडोद्याला सयाजी पार्कात मेन गेटच्या आत उजवीकडे पाहिले. पण कंपाउंड वॉलच्या बाहेर असल्याने फळ मिळाले नाही. सेक्युरिटीवाला म्हणाला ते आपले ईथले झाड नाही. व त्याचा काही उपयोग पण नाही.

(त्याची लिंक देईल का कोणी). परत पाहायचे आहे.

माणसाला पण असे वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळे हात असायला पाहिजे होते नाही. म्हणजे हातमोज्यापासून-- वाघनख्यांपर्यंत साधने लागली नसती.

काही शतकांनी असे होईल का ? कि प्रखर उन्हात, वाळूत, बर्फात राहणार्‍या लोकांच्या डोळ्यात असे बदल होतील, कि गॉगल्स वगैरे लावावे लागणार नाहीत.

वाळवंटात राहणार्‍या लोकांच्या अंगात पाणी साठवायची क्षमता येईल, तर बर्फाळ प्रदेशांतील लोकांच्या अंगावर दाट केस येतील !! > दिनेशदा कल्पना सही आहे एकदम! उत्क्रांती ची प्रोसेस निसर्गात चालुच असेल अजुनही !

काही शतकांनी असे होईल का ? कि प्रखर उन्हात, वाळूत, बर्फात राहणार्‍या लोकांच्या डोळ्यात असे बदल होतील, कि गॉगल्स वगैरे लावावे लागणार नाहीत.
वाळवंटात राहणार्‍या लोकांच्या अंगात पाणी साठवायची क्षमता येईल, तर बर्फाळ प्रदेशांतील लोकांच्या अंगावर दाट केस येतील !! > >>>>>>>>>> मला नाही वाटत असं काही होइल म्हणुन.. सध्या आपण इतकी साधनं वापरतो की त्यामुळे अशी उत्क्रांती होण्याची गरजच पडणार नाही..

माधव धन्स. पण मोठे क्न्फुजन झालया जनु.

मी म्हणते ते लाल चपटे, अर्धचंद्राकार फळ (काजुच्या बीसारखा आकार), उघडले की गोल दिसते, त्यात काळ्या ३-४ / ३-४ बीया दोन्ही बाजुने मांडलेल्या. अगदी जणु पेंडन्ट. (अरे देवा मला सांगता येतेय का?)

चिमुरी, मला पण आता असेच वाटायला लागलेय कि या साधनांमुळे आपल्या क्षमता कमीच होत जातील.

माझी आजी अगदी अंधूक प्रकाशातही, व्यवस्थित जेवण शिजवायची. बाहेर जरा कुठे खुट्ट झाले कि तिला बरोबर ऐकू यायचे. पायात साध्या वहाणा घालून ती विशाळगडाहून, राजापूरपर्यंत चालत जायची ---- यातले काहीच आमच्या पिढीपर्यंत राहिले नाही.

Pages