निसर्गाच्या गप्पांच्या धाग्याचा ६ वा भाग चालू होत आहे. त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
२८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) स्मित
अगंबाई, त्यांना संभाळ,
अगंबाई, त्यांना संभाळ, त्यातुनच नवीन बाळे तयार होणार आहेत.
जिप्सी, कधीतरी जमिनीवरही हिरवळही पाहात जा रे... कायमचे डोळे वर झाडांनाच लावून चालणारेस का????????/
निसर्गचक्र बदलतेय बहुतेक. २०१२ येण्यापुर्वी आपण शक्य तितकी झाडे पाहुन घेऊया.
वर पुस्तकांच्या यादीत 'गोईण' हे नाव पाहिले की याचा अर्थ काय हा विचार येतो डोक्यात.. काय अर्थ आहे?
२०१२ येण्यापुर्वी आपण शक्य
२०१२ येण्यापुर्वी आपण शक्य तितकी झाडे पाहुन घेऊया. >>>> म्हणजे ?
साधना पण त्यातल्या बिया मला
साधना पण त्यातल्या बिया मला नाही दिसत ग.
होय दिनेशदा, खरंतर माझ्या
होय दिनेशदा, खरंतर माझ्या घराजवळच्या बागेत एवढ्या संख्येने ही मंडळी असतील हेच मला माहिती नव्हते. त्यामुळे; अनंत हस्ते कमलावराने...... असंच झालं माझं! आणि माहीतीच नस्ल्यामुळे मी त्यांचा उल्लेख केला नाही.
डॉ.डहाणूकरांनी क्रायसोफायलमवरच्या लेखात म्हटल्या प्रमाणे दीवार फिल्म मधल्या सारखं आता मी म्हणणार..'मेरे पास................ है!' त्या गाळलेल्या जागांमधे किती बरं नावं येतील वृक्षांची?
जागू, बॉटलब्रश नंतरच्या फोटोतला तो गुलाबी बहावा आहे.
जिप्सी, कदंब काही ठिकाणी दोनदा फुलतो. एकदा वसंतऋतूत आणि नंतर पावसाळ्यात! पण सगळ्या कदंबांचं असं गणित नसतं.
अगं दिसत नाही काय?? दोन
अगं दिसत नाही काय?? दोन म्हाता-यांना जोडणारा दांडा दिसतोय ना, क्रिम कलर, १ सेमी आकाराचा?? तेच बी आहे. ते टाक कुंडीत आणि बघ कसे रुजून येते ते.
२०१२ येण्यापुर्वी आपण शक्य तितकी झाडे पाहुन घेऊया. >>>> म्हणजे ?
अगं जगबुडी येणार आहे ना २०१२ मध्ये?
अगं गोईण म्हणजे मैत्रीण.
अगं गोईण म्हणजे मैत्रीण.
साधना, गोईण म्हणजे मैत्रिण.
साधना, गोईण म्हणजे मैत्रिण. तिथल्या वनवासी बायकांच्या गप्पांतून, डॉ. राणी बंग
यांना झालेली झाडांची ओळख असे स्वरुप आहे, त्या पुस्तकाचे. पण पुस्तकात फोटो किंवा चित्र नाहीत.
शांकली, पुणे-सातारा रस्ता रुंदीकरणात किमान १००/१५० वडाच्या झाडांची कत्तल झाली होती. आता तर त्याचा मागमूसही नसेल. नवीन झाडे लावून, तेवढी वाढेपर्यंत
किमान १०० वर्षे जातील... अर्थात झाडे लावली तर ना ?
पुण्यात जे एम्प्रेस गार्डन आहे (जिथे फुलांचे प्रदर्शन भरते ) तिथे पण मी झाडांवर राक्षसी वेली बघितल्या होत्या. जर त्या भीमाच्या वेली असतील, तर त्यांना दिवाळीत
मोठी पांढरी फुले येतील.
आणि साधना, जगबुडी यायच्या आधी आकाशातल्या बापाला शरण गेलीस तर वाचशील बरं नक्की. नाहीतर अंबोलीला जाऊन रहा, कशी !!
साधनाताई आपण आत्ता २०१२ मधेच
साधनाताई आपण आत्ता २०१२ मधेच आहोत ग. आणि आली जगबुडी तर येईना का, जे सगळ्यांच होईल तेच आपलं होईल...... असो आता यांच नावं सांगा.
असो आता यांच नावं
असो आता यांच नावं सांगा>>>>>हि करंजाची फुले आहेत ना?
त्याचीचं ही पानं.
त्याचीचं ही पानं.
No idea...
No idea...
हे गिरीपुष्प आहेत नां ??
हे गिरीपुष्प आहेत नां ??
झाङावर असे गुच्छ होते.
झाङावर असे गुच्छ होते.
ससा, बरोबर ही गिरीपुष्पाची
ससा, बरोबर ही गिरीपुष्पाची फुलं!
स्निग्धा, सध्या ही बरीच फुलली आहेत. पर्वती पायथ्याला खूप बघायला मिळतात.
यालाच उंदीरमारी असं पण नाव आहे.
उंदीरमारी, ह्म्म्म, बघतो. मला
उंदीरमारी, ह्म्म्म, बघतो. मला पण रोडच्या कडेने अशीच काही फुले फुललेली दिसतायत. पण फक्त फुले, झुबक्याने, पाने नाहीयेत झाडावर.
पाने नाहीयेत झाडावर.<< हो
पाने नाहीयेत झाडावर.<< हो सध्या याचा हंगाम सुरू आहे, ज्या ठिकाणी पाणी मिळते तेथेच झाडांना पाने दिसतील
हो पानावरून कळल कि उंदिरमारी
हो पानावरून कळल कि उंदिरमारी फुलं मात्र करंजासारखी वाटली.
पुणे सातारा रोडवरच्या वडाच्या
पुणे सातारा रोडवरच्या वडाच्या झाडांबद्दल बोलायचं म्हणजे; ९१ ते ९७ मी रोज भोर-पुणे अपडाऊन करत होते. त्यात ही वडाची झाडं म्हणजे आमचा हिरवा दिलासा होती. आम्ही अपडाऊन करणारे सर्वचजण मनाने या प्रवासात भेटणार्या सर्व झाडं, पक्षी, डोंगर, शेतं या सगळ्यांशी इतके बांधले गेलो होतो की जेव्हा रस्तारुंदीकरणात ही झाडं तोडली तेव्हा अक्षरश: आमच्या डोळ्यांत पाणी आलं.
सगळ्या ऋतूंमधे मी ह्या रोडवरील निसर्गाचा अनुभव घेतलाय. इंच न इंच ओळखीचा झाला होता.....
पण घाटात मात्र अजूनही बर्यापैकी जंगल टिकून आहे. एकदा त्या दरीत उतरून बघायचंय! कधी योग येणार देवच जाणे.तसंच भोर रस्त्यावर इंगवली नंतर खाली यायला एक वळणाचा रस्ता आहे त्या परिसराला खंडोबाचा माळ म्हणतात, तिथेच मी पहिल्यांदा ग्लोरी लीली (कळलावी) बघितली होती. त्याच रस्त्यावर महरुखाची झाडं दीपमाळेसारख्या फांद्या पसरून उभी आहेत......
करंजासारखी वाटली. << याची
करंजासारखी वाटली. << याची फुले बुटकी असतात
स्निग्धा नी दिनेश सिग्धा
स्निग्धा नी दिनेश
सिग्धा माबोवर नविन आहे. तिला मागची जगबुडीची गंमत माहित नाहीय
योग्या, करंजाची फुले वाटाण्याएवढी असतात रे...
सिग्धा माबोवर नविन आहे. तिला
सिग्धा माबोवर नविन आहे. तिला मागची जगबुडीची गंमत माहित नाहीय >>>> मग आता कळायला हवी. <हट्ट करणारी बाहुली>
स्निग्धा, हे वाच...
स्निग्धा, हे वाच... http://www.maayboli.com/node/2876
पण हाफिसात बसुन वाचु नकोस. तु वेड्यासारखी हसायला लागलीस तर इतरांच्या कामावर परिणाम होईल.
साधना.......मी घरीच बसून लिंक
साधना.......मी घरीच बसून लिंक वाचली आणि........
पुणे सातारा रोड वरची वडाची
पुणे सातारा रोड वरची वडाची झाडं !! आई ग.. बालपणीच्या रम्य काळाची आठवण झाली. बालाजी नगर वरून कात्रज च्या बागेत चालत चालत जायचो सगळी भावंडं.. तेव्हा ह्या झाडांच्या पारंब्यांना लोंबकळत खेळ चालायचे. आमच्या भाच्च्यांना हि अशी मजा नाही अनुभवायला मिळत आताच्या पुण्यात. असो. प्रगती हवीय ना.. आंधळी का असेना..
तुम्ही सगळ्यांनी मस्त मस्त झाडा - फुलांचे फोटो टाकलेयत. मी एक थंड गार फोटो टाकते :). बर्फ पडून गेल्यावर रस्त्यात काढलेला साधा फोटो: लहानपणी बिल्डींग मध्ये एक कापसाचं झाड होतं त्याची बोंड फुलली की ते असाच दिसायचं
रस्त्यावरच्या, बागेतल्या आणि
रस्त्यावरच्या, बागेतल्या आणि आजु बाजूच्या ९० टक्के झाडांवर एकही पान शिल्लक नाही. फळा फुलांचं नामोनिशाण नाही. नुसत्या काड्या उरल्यायत फांद्यांच्या. बिचारे पक्षी कुठे जात असतील ? काय खात असतील ? काहीतरी नक्कि खात असतील कारण वर्षभर गुटगुटीत दिसतात.
शकुन, छान फोटो. सगळे पक्षी
शकुन, छान फोटो. सगळे पक्षी स्थलांतर करुन दक्षिणेकडे गेले. अणि शीतनिद्रा घेऊ शकणारे प्राणी झोपी गेले...
शकुन छान फोटो. शांकली तो
शकुन छान फोटो.
शांकली तो गुलाबी बहावा आहे होय !!!!! धन्स.
साधना बघते मी लावून आता.
वरची फुले उंदीरमारीचीच आहेत.
एवढी वडाची झाडे तोडली
एवढी वडाची झाडे तोडली त्यावेळी नुसती सावलीच नाही, तर अनेक प्राणी, पक्ष्यांचा निवारा पण हरपला.
===
या पक्ष्यांच्या हिवाळी स्थलांतराबद्दल एक अनोखी क्लीप बघितली होती. आता जरी हि स्थलांतराची अंतरे हजारो किलोमीटर्स असली, तरी आधी ती तशी नव्हती, कारण पुर्वी
बर्फ पडणारा भाग बराच खाली होता. जशी बर्फाची रेषा वरवर सरकत गेली, तसे त्या
छोट्या जीवांना, जास्तीत जास्त अंतर कापावे लागले.
माझ्याकडे चार शेंगांचे प्रकार
माझ्याकडे चार शेंगांचे प्रकार सध्या निघत आहेत. त्यातले हे दोन.
घेवड्याच्या वर्गातल्या आहेत
घेवड्याच्या वर्गातल्या आहेत ना?
Pages