निसर्गाच्या गप्पांच्या धाग्याचा ६ वा भाग चालू होत आहे. त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
२८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) स्मित
हो हो घेवडाच. माझ्याकडे सध्या
हो हो घेवडाच.
माझ्याकडे सध्या हा लाल-पिवळा झेंडू/मखमल फुललाय.

साधनाताई, मी पण लिंक वाचली
साधनाताई, मी पण लिंक वाचली आणि......
जबरीच फोटो आहेत
जबरीच फोटो आहेत
दिनेशदा तुम्ही मागे झिपरी
दिनेशदा तुम्ही मागे झिपरी बद्दल बोलत होतात. माझ्याकडे तिन प्रकारच्या झिपर्या आहेत.
रुंद पानांची

लांबट पानांची

वरचीचीच बारीक जात.

जागू, ती पहिली रुंद (गोलसर)
जागू, ती पहिली रुंद (गोलसर) पानांची आहे ती पुर्वी वेण्यांमधे वापरायचे. तिचा
हिरवागार रंग शोभून दिसायचा अगदी. पण माझ्या बघण्यत कधी हिला फुले
आलेली नाहीत.
मोगर्याची, शेवंतीची, करवंदाची, गुलाबकळ्यांची, सोनचाफ्याची.. अशा कितीतरी
वेण्या असायच्या बाजारात. आंबाडे घालणार्या बायका पण असायच्या ना !
वेणी वळणार्या बायका भराभर वेणी विणत असायच्या. नुसत्या गाठी मारुन विणायच्या
त्या.
जागू, कोंबड्या आहेत ना तूमच्याकडे ? त्यांना झेंडूच्या सुकलेल्या पाकळ्या खायला
देत जा. अंड्याचा बलक पिवळाजर्द होतो.
जागू, कोंबड्या आहेत ना
जागू, कोंबड्या आहेत ना तूमच्याकडे ? त्यांना झेंडूच्या सुकलेल्या पाकळ्या खायला
देत जा. अंड्याचा बलक पिवळाजर्द होतो.>>>>> होमिओपॅथीमधेही झेंडूपासून काही औषध केलेले आहे ना (बहुतेक कॅलेंडुला) - मला वाटतं अँटीसेप्टिक म्हणून वापरतात.
लहानपणी त्या झेंडूच्या फुलाच्या पाकळ्या काढून त्यातील मधला पांढरा भाग खोबरं म्हणून खाल्ल्याचं आठवतंय......
जागु, मस्तच रंग आहे झेंडुचा.
जागु, मस्तच रंग आहे झेंडुचा.
दिनेशदा आता कोंबड्या नाहीत
दिनेशदा आता कोंबड्या नाहीत आमच्याकडे आमचे जुने घर होते तिथे होत्या सासर्यांनी पाळलेल्या. त्या घराच्या बाजूलाच एक चिंचेचे मध्यम झाड होते. त्या झाडाला सासरे शिडी लावायचे त्यावर कोंबड्या चढून झाडावर रात्री रहायच्या.
झेंडूच्या पानांचा रस पुर्वी आजी कान दुखल्यावर कानात घालायची.
जागू, झेंडूमधे दोन प्रकार
जागू, झेंडूमधे दोन प्रकार आहेत. एक फ्रेंच (बुटका, शोभिवंत ) तर दुसरा आफ्रिकन
(उंच वाढणारा, उग्र वासाचा). ती कोंबड्यांना झेंडूच्या पाकळ्या खायला घालायची
कल्पना, फ्रेंच डोक्यातून आलीय. नुसता बलकच नव्हे तर मांसाचा रंग पण केशरी होतो.
हो हल्ली तो बुटका झेंडू बराच
हो हल्ली तो बुटका झेंडू बराच बाजारात यायला लागला आहे.
माझ्याकडे धरलेले हे गुलाबाचे फळ.
लहानपणी त्या झेंडूच्या
लहानपणी त्या झेंडूच्या फुलाच्या पाकळ्या काढून त्यातील मधला पांढरा भाग खोबरं म्हणून खाल्ल्याचं आठवतंय...... > अगदी अगदी.
लहानपणी त्या झेंडूच्या
लहानपणी त्या झेंडूच्या फुलाच्या पाकळ्या काढून त्यातील मधला पांढरा भाग खोबरं म्हणून खाल्ल्याचं आठवतंय...... > मी पण ! आता आठवण करुन दिल्यावर परत एकदा खाल्लं पाहिजे
अश्विनी कित्ती दिवसांनी आलीस
अश्विनी कित्ती दिवसांनी आलीस इथे.
अगं ना मला कुठलं झाड ओळखता
ती कोंबड्यांना झेंडूच्या
ती कोंबड्यांना झेंडूच्या पाकळ्या खायला घालायची
कल्पना, फ्रेंच डोक्यातून आलीय. नुसता बलकच नव्हे तर मांसाचा रंग पण केशरी होतो.>>>>> झेंडूपासून मिळवलेला हा केशरी रंग नैसर्गिक तरी आहे पण भारतातल्या पंजाबी किंवा इतर डिशेस् मधे जे कृत्रिम रंग (विशेषतः पिवळा/केशरी व हिरवा) घालतात ते आपलं आरोग्य बिघडवत नसले म्हणजे मिळवलीच म्हणायचं.......
रच्याकने - ते पालक पनीर मधे काय घालतात ज्यामुळे तो पालक शिजवल्यावरही हिरवागार दिसतो अगदी......
ते पालक पनीर मधे काय घालतात
ते पालक पनीर मधे काय घालतात ज्यामुळे तो पालक शिजवल्यावरही हिरवागार दिसतो अगदी..>> पालक बॉइल केल्याकेल्या, बर्फाच्या थंड पाण्यात लग्गेच टाकायचा, मग रंग हिरवा रहातो.
स्वाती +१ किंवा किंचीत खायचा
स्वाती +१
किंवा किंचीत खायचा सोडाही घालतात शिजवताना.
जागू, ती पहिली रुंद (गोलसर)
जागू, ती पहिली रुंद (गोलसर) पानांची आहे ती पुर्वी वेण्यांमधे वापरायचे.>>
माझ्या सासुबाई - चुलत सासवा गोव्याच्या. सगळ्यांच्या लग्नांच्या फोटोमध्ये मोठ्ठे मोठ्ठे अंबाडे. त्यावर आबोली च्या वेण्या आणी वेगळ्या झिपरी च्या वेण्या. (मला वाटत आमच्याकडे त्याला बकरा म्हणतात) शिवाय त्यात झिरमिळी पण असायच्यात.
गोव्याची आबोली थोडी वेगळी असते. थोडा गडद रंग आणि कमी फुललेली असते.
जागु गुलाबाला रोग लागला आहे
जागु गुलाबाला रोग लागला आहे का?
७-८ वर्षापुर्वीपर्यंत
७-८ वर्षापुर्वीपर्यंत आमच्याइथेही गजर्यात झिपरी असायची. त्यानंतर तो इंग्लिश पाला यायला लागला.
रिमा अग ती किड नाहि आमच्या गड्याने राखाडी टाकली होती.
शशांक, पंजाबी लोक रतनज्योत
शशांक, पंजाबी लोक रतनज्योत नावाचा मसाला वापरतात. पातळ दालचिनीसारखा
असतो. त्याला फक्त रंग असतो, स्वाद नसतो.
पण आपल्याकडे जिलेबी वगैरेमधे जे भडक रंग दिसतात, ते खरोखरच प्रमाणित असतील का अशी शंका आहे मला.
पळसापासून केशरी, बीट पासून लाल, भेंडाच्या फळापासून पिवळा, मायाळूच्या फळापासून जांभळा, निळीपासून निळा असे रंग आम्ही रंगपंचमीला करत असू, लहानपणी. अजिबात अपायकारक नाहीत ते.
दिनेशदा - हे भेंडा व मायाळूची
दिनेशदा - हे भेंडा व मायाळूची फळं कशी असतात - काही फोटो देऊ शकाल का ?
पळसापासून केशरी, बीट पासून लाल, भेंडाच्या फळापासून पिवळा, मायाळूच्या फळापासून जांभळा, निळीपासून निळा असे रंग आम्ही रंगपंचमीला करत असू, लहानपणी. अजिबात अपायकारक नाहीत ते.>>>>> तुमची पिढी खूप भाग्यवान असे नैसर्गिक रंग मिळू शकले - सध्या कुठली घातक्/विषारी रसायने वापरत असतील देव जाणे !!!!!!!!!!
शशांक, पिंपळाच्या पानासारखी
शशांक,
पिंपळाच्या पानासारखी पाने असणारे एक कॉमन झाड म्हणजे भेंडा. त्याला पिवळी फुले
येतात, मग ती फुले कोमेजताना लाल रंगाची होतात. त्यालाच सुपारीएवढी फळे लागतात.
त्याच्या आत पिवळा रंग असतो.
मायाळूची गोल पानांची वेल असते. तिच्या पानांची भाजी व भजी करतात. कर्नाटकात
तिची डाळ, फणसाच्या बिया घालून आमटी करतात. (पुलंना पण आवडायची ती) तिला
बारीक फळे येतात.
याशिवाय, कुंकवाचे झाड असते. (बि़क्सा अनाटा ) यापासून तर खाद्यरंग करतात. हे झाड
कोकणात खुप आहे.
---
वर वेणीची चर्चा चालली होती. आणि हा आहे निसर्गाने विणलेला देखणा गजरा.
दक्षिण आफ़्रिकेतले, पाईनापल फ़्लॉवर !!
दिनेशदा, खल्लास फोटो.
दिनेशदा, खल्लास फोटो.
उगीच फुलुनी आलं फुल उगीच
उगीच फुलुनी आलं फुल उगीच जिवाला पडली भूल (राणीबागेतील पुष्पप्रदर्शन)
दिनेशदा, मस्त फोटो अतिशय
दिनेशदा, मस्त फोटो

अतिशय सुरेख रंगाची फुले
दिनेशजी मस्तच फोटो
दिनेशजी मस्तच फोटो
मस्त फोटो वेणीचा... झेंडु आणि
मस्त फोटो वेणीचा... झेंडु आणि कोंबड्यांची माहिती पण छानच...
दिनेश, ते सितेची वेणी (fox
दिनेश, ते सितेची वेणी (fox tail) ऑर्किड आहे का? सितेची वेणी मी बर्याच लांबून पाहिलय त्यामुळे नक्की सांगता येत नाहिये.
दिनेशदा, क्लास फोटो.
दिनेशदा, क्लास फोटो.
Pages