निसर्गाच्या गप्पांच्या धाग्याचा ६ वा भाग चालू होत आहे. त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
२८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) स्मित
शशांकजी, नक्कीच
शशांकजी, नक्कीच
छान प्रचि जिप्सी...
छान प्रचि जिप्सी...
दिनेशदा, आत्ताच तुम्ही वर
दिनेशदा, आत्ताच तुम्ही वर दिलेल्या दोन्ही लिंक्स बघितल्या. मस्त, फोटो आणि माहिती दोन्ही छान. शशांक म्हणतात त्याप्रमाणे तुमच्या सगळ्या लेखांच्या लिंक्स इथे द्या ना, म्हणजे त्या सगळ्या एका ठिकाणी आम्हाला वाचता येतील.
शांकली फोटो आणि माहिती मस्तच
शांकली फोटो आणि माहिती मस्तच
शांकली, जिप्सी, दिनेशदा मस्त
शांकली, जिप्सी, दिनेशदा मस्त फोटो.
शशांक, मी कालच लिहिले होते,
शशांक,
मी कालच लिहिले होते, तूम्ही दिलेल्या पुस्तकातील लेख वाचल्यावर
मला असे वाटायला लागलेय, कि आपल्याला तर अजून मूळाक्षरेही
नीट माहित नाहीत. भारतात असताना काहि साधने, पुस्तके होती
म्हणून लिहित गेलो. पण परदेशी आल्यावर तर सगळेच अनोखे दिसायला
लागलेय. आठ फ़ुट वाढलेला तेरडा काय, रस्त्याच्या कडेला फुलणारे
गुलाब काय, स्वप्नवतच वाटतय सगळे.
जिप्सीच्या फोटोतले मात्र सगळे ओळखीचे वाटतेय !
शांकली, त्या कुमुदीनीसारखेच भातकमळ म्हणून एक फूल असते. भाताच्या शेतातच उमलते.
महाभारतात वर्णन आलेले रक्तवर्णाचे, सहस्त्र पाकळ्यांचे कमळ... त्याचा कळा मला
बघायला मिळाला. त्याचे पण फोटो टाकतो इथे.
जिप्सी, शांकली मस्त फोटो.
जिप्सी, शांकली मस्त फोटो.
शांकली मस्त फोटो आणि माहिती.
शांकली मस्त फोटो आणि माहिती.
मस्त नविन पान. सर्व फोटो,
मस्त नविन पान. सर्व फोटो, माहिती छान.
शांकली, जिप्सी, दिनेशदा मस्त
शांकली, जिप्सी, दिनेशदा मस्त फोटो.
शांकली, किती योगयोग !! मी पण या सोमवारीच मोहाचे झाड बघितले. (अर्थात नाव आता कळले.) मी त्या झाडाखालीच उभे राहुन फोटो काढायचा विचार करत होते ईथे विचारण्यासाठी पण मोबाईल्वर नीट आला नाही फोटो. मी हे झाड पुण्याच्याच कॉन्सिल हॉलच्या आवारात बघितले.
शांकली मस्त फोटो आणि
शांकली मस्त फोटो आणि माहिती.
जिप्सी..........कोकणातले फोटो मस्तच!
काल संध्याकाळी गच्चीत चकरा मारत असतानाहे दोघे दिसले. एक काळा आणि एक खाकी/हिरवट/पिवळट रंगाचा. साइझ सेम. शीळही सेमच. आणि दोघे बरोबरच कडुलिंबावर बसले होते. नंतर एकत्रच उडून गेले.
आस धन्यवाद. मोहाच्या वृक्षाचे
आस धन्यवाद. मोहाच्या वृक्षाचे अजून एक लोकेशन कळाले त्याबद्दल.
मानुषी - सनबर्ड (फुलचुखे,
मानुषी - सनबर्ड (फुलचुखे, शिंजीर, सूर्यपक्षी) पक्ष्याची जोडी आहे ही. त्याची नाजुक लांब चोच बघ - त्या चोचीत असलेल्या दोरीसारख्या जिभेने तो फुलातील साखरपाणी (मरंद) पिऊ शकतो.
नि ग च्या ५व्या भागात मी याच पक्ष्याच्या पिल्लाचा हा फोटो टाकला होता -
राणीच्या बगेतले प्रदर्शन कधी
राणीच्या बगेतले प्रदर्शन कधी आहे याबद्दल कोणाला काही माहिती आहे का? का आधीच होऊन गेले?
sorry, ethe mi worng post
sorry,
ethe mi worng post karate aahe.
but i don't know the procedure.
mi kahi divasnapurvi ithe animal santury trip baddal vachle hote. systematic tour arrange karnarya eka websitecha dekhil tyat address hota.
yabaddal koni kahi sangu shakel kay?
marathi operate kase karayche?
maura
शांकली किती सुंदर वेगवेगळी
शांकली किती सुंदर वेगवेगळी माहीती आणि फोटो दिलेस.
जिप्स्या मस्त फोटो.
मयुरा, कुठल्या प्राणी
मयुरा, कुठल्या प्राणी अनाथाश्रमाबद्दल ? कात्रजच्या का ?
इथे शांकली, मार्गदर्शन करु शकेल.
माधव, याच महिन्यात असायला हवे ते प्रदर्शन. मी कधी चुकवायचो नाही ते.
माधव, दिनेशदा कालच जिप्सिच
माधव, दिनेशदा कालच जिप्सिच आणि माझ फोनवर बोलण झाल. प्रदर्शन बहुतेक एप्रिल- मे मध्ये भरणार आहे.
मायबोलीकर मानस मला फोन करणार
मायबोलीकर मानस मला फोन करणार आहे प्रदर्शनाबद्दल. मी नक्क्की तारीख सांगतो. कारण माझा दुसरा एक मित्र बीएमसी मध्ये आहे तो म्हणाला कि आजपासुन सुरू होईल. वर्तमानपत्रात अजुन जाहिरात आली नाही. उद्यापर्यंत कन्फर्म सांगतो.
आत्ताच फोन आलेला प्रदर्शनाला
आत्ताच फोन आलेला प्रदर्शनाला आजपासुन सुरुवात झाली आहे. ४ दिवस असणार आहे.
मी शनिवारी जातोय. Anybody interested?????
एवढे लेट? जानेवारीच्या २५-२८
एवढे लेट? जानेवारीच्या २५-२८ तारखेला असते दरवर्षी..
मयुरी, कुठल्या भागातल्या अनिमल संक्चुअरीबद्दल बोलताहात?? भाग माहित असेल तर तुम्ही नेटवर धुंडाळू शकता. इथे रणथंबोर, बांधवगड वगैरेचे रिपोर्ट्स ही आहेत. तुम्ही 'शोध' मध्ये तसे नाव टायपुन शोधू शकता.
मराठीत कसे लिहायचे याबद्दल इथे वाचा. - http://www.maayboli.com/node/1554
तसे काही खास करायचे नाही. control+\ हे करा आणि टायपायला सुरवात करा. मराठीत अक्षरे उमटतील. त साठी t आणि ट साठी T एवढे लक्षात ठेवा, म्हणजे द आणि ड वगैरे जमतील.
मी शनिवारी जातोय. Anybody
मी शनिवारी जातोय. Anybody interested?????
शनिवरी आम्ही फुल डे हाफिसात
मी कदाचित रविवारी जाईन. काही
मी कदाचित रविवारी जाईन. काही वर्षांपुर्वी नेमाने जायचे, गेली काही वर्षे गेलेच नाहीय.
जिप्सी मी येणार असेन तर तुला
जिप्सी मी येणार असेन तर तुला फोन करीन उद्या.
ओके, माधव.
ओके, माधव.
अरे वा ईथे बरीच माहीती जमा
अरे वा ईथे बरीच माहीती जमा झाली आहे, आमच्याकडे बहाव्याला बर्याच शेंगा आल्या आहेत त्या जर रुजवल्या तर त्यातुन झाडे येतील का ?
शनिवरी आम्ही फुल डे हाफिसात
शनिवरी आम्ही फुल डे हाफिसात >> आमच्याकडे पण तेच.
तिथे ४ दिवसांचा वर्कशॉप आहे म्हणे! तो कसला असतो?
नितीन, शेंगा झाडावरच पूर्ण
नितीन, शेंगा झाडावरच पूर्ण वाळू दे. त्यातला काळा गर थोडा थोडा खाऊ शकतोस.
गोड लागतो. (पण थोडाच खायचा !! औषधी आहे.) बिया नक्कीच रुजतील. माकडे तो गर खाऊन, बियांचा प्रसार करतात.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/21536
इथे माझी, मोहाचं झाड हि कथा आहे.
तिथे ४ दिवसांचा वर्कशॉप आहे
तिथे ४ दिवसांचा वर्कशॉप आहे म्हणे! तो कसला असतो?
झाडांची माह्ती, गार्डनिंगची माहिती काही भाषणे व.व. असते. पेपरात जाहिरात आली असेल तर वर्क्शॉप्सचे पण डिटेल्स असतील.
Pages