बारा ए.वे.ए.ठि. , हिवाळी २०१२

Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता: 
. मैत्रेयी चे घर. जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल. .

तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
eviethi2012.png

मेनु,

सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्‍या - अ‍ॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.

तारीख/वेळ: 
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol आता लक्षात आलं. जरा लंबा कनेक्शन होतं बरका. तिरंगी बिर्यानी ह्यावरुन थेट चरित्र काय? मॅडम प्रायोजक झालीयेस अगदी. Proud

स्वाती ,
मी नसले तरी चालेल, माझा रिप्रेझेंटेटिव मैत्रेयीचा पोरगा आर्यक आहे, त्याला सांग ट्रिक, त्याला पण ३ इडियट्स आवडला होता Proud

फचिन, सध्या झक्कींना तिरंगी कपडे सुचव बरं. मोठ्या विवंचनेत आहेत ते.
>>
बरं ठीक आहे. झक्की, तुम्ही असं करा. निळ्या रंगाची जीन, भगवा टी-शर्ट आणि पांढरे स्पोर्टस शूज घाला आणि डोळ्यांवर हिरवा रेबॅनचा गॉगल लावून या! हाकानाका Proud

बिर्यानी वरून चरित्रं नाही , हिरव्या रंगाचा विषय काढलात म्हणून चटणी ( अता ३ इडियट्स नंतर चटणी ही केवळ चटणी राहिली नसून चारित्रं ओळख टुल आहे :फिदी:)

आता झक्की यायची वाट आहे फक्त. मी नक्की येणारच आहे २८ जानेवारीला. इथे आलो नाही कारण क्लोजेट उलथेपालथे करत होतो. भगवा शर्ट काहि सापडत नाहीये. हिरवंहि काही नाही! लेबर डे नंतर पांढरे कपडे घातले नि मुलीला कळले तर ती रागावेल. तेंव्हा मी निळे कपडे घालतो, तुम्ही इतर जण माझ्या भोवती भगवा, पांढरा नि हिरवा पोषाख घालून उभे रहा, नि आपण फोटो काढू!
कदाचित राजभोगमधे तिरंगी मिठाई मिळेल.

आणि कुणितरी ते वर लिहीलेले नीट करा. काय हे - दुसर्‍या ओळीत म्हंटले आहे २१ जानेवारी (तारिख? तारीख असे लिहीतात. मराठीत उर्दू शब्द नि तेहि चुकीचे! मराठी बरोबर उर्दूचे हि वाटोळे!!) Light 1
नि खाली मोठ्या लालभडक अक्षरात २८!
आणि येणार्‍यांची यादी सुद्धा बरोबर आहे की नाही हे बघा. अबेडेकर येणार नाहीयेत असे वाचल्याचे आठवते आहे.

नि साधी गोष्टः ते पिवळ्या लाल नि काळ्या अक्षरात एव्हढी मोठी सूचना आहे, तीच तिरंगी झेंड्याच्या चार रंगाची का करत नाही?

असो, खरे तर याचे सात आठ भाग करून लिहायला पाहिजे होते, म्हणजे हजारीकडे जोरात घोडदौड चालू आहे त्याला हातभार (की पायभार म्हणायचे?) लागला असता.

आत्तापासून ए. वे. ए. ठि. संपेस्तवर भारत व पुणेकर या विषयांबद्दल अज्जिबात लिहिणार नाही!

आजचा इ-प्रसारणचा मराठी कार्यक्रम ऐका.

आत्तापासून ए. वे. ए. ठि. संपेस्तवर भारत व पुणेकर या विषयांबद्दल अज्जिबात लिहिणार नाही! >> ए. वे. ए. ठि. संपेस्तवर भारत व पुणेकर या विषयांबद्दल अज्जिबात बोलणारही नाहि असे असते तर ए. वे. ए. ठि. ची उपस्थितीही वाढेल बघा Lol

अनिलभाई,म्हणूनच समोशापुढचे प्रश्नचिन्ह सोयीस्करपणे दुर्लक्षित केलेय मी. (नवरा आणि मुलांना भरपायीसाठी आणू का त्यापेक्षा?)

Pages