बारा ए.वे.ए.ठि. , हिवाळी २०१२

Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता: 
. मैत्रेयी चे घर. जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल. .

तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
eviethi2012.png

मेनु,

सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्‍या - अ‍ॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.

तारीख/वेळ: 
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा प्लॅन चेंज झालाय. म्हणजे गाजराच्या कोशिंबीरीऐवजी मी भाजीसदृश आणतेय जे भाकरीबरोबर जाईल आणि प्रजासत्ताक दिनाच्या थीमशी मॅच होईल.

भरली वांगी आहेत ना.>> हो. त्यात मागच्या आठवड्यात हवा भरली होती. आता गॅस झाली असेल त्याची. Happy

केक त्यात बुडवून खाता येईल....आणि केक संपल्यास नुसतीच रम पण चालेल.

या वेळी येणारे लोकांचे, वरील ड्यू आय डी नसतील, तर मला माहित नसलेले बरेच लोक आहेत.
ते बॉस्टनचे ग्रॉन्कॉवस्की नि गोष्टावस्की येणारे आहेत की नाही, की घाबरतात जायंट कंट्रीत यायला? अहो घाबरू नका जायंट बहुतेक घरी तरी असतील किंवा इंडियाना ला.
ए. वे. ए. ठि. ला येण्याबद्दल त्यांनी नाव नोंदवले नाहीये.
ज्यांनी नाव नोंदवले त्यांनी २ X २ चे ब्लॅक अँड व्हाईट फोटो, त्यात एक कान पूर्ण दिसला पाहिजे, असे ओळखपत्र आणायला पाहिजे. अश्या ओळखपत्राच्या दोन कॉपीज, मागल्या बाजूला एकावर तुमची सही व दुसरे नोटराईज केलेले पाहिजे. ते दोन्ही अर्जावर चिकटवले पाहिजेत, स्टेपल करू नका, डिंकाने चिकटवा.

(आता ते चिकटवल्यावर मागे सही केली आहे की नाही हे कसे कळणार? त्यासाठी १० वा २० डॉ. दिल्यास तो प्रश्न सोडवण्यात येईल)
ते सर्व कागदपत्र ए. वे. ए. ठि. च्या किमान एक महिना अगोदर मैत्रेयीकडे पोचायला हवेत. - भारतातले कायदे.
(अर्थात तसे नच काही जमले तर एक म्हातारा, टकल्या गृहस्थ तिथे असेल, त्याची आतपर्यंत ओळख आहे. एक ५०, १०० डॉ. त्याला दिल्यास तो सर्व काही बरोबर जमवेल. मूळचा भारतीयच आहे तो. पण त्याला नवीन मराठी समजत नाही.)

उद्या यायला जमेल असे वाटतेय. बाईंची पुस्तके, टोपी, असामीला हवी असलेली पुस्तके घेउन येईन.
अजून कोणाला पुस्तके हवी आहेत का ? >>

झक्की Rofl

गटगला शुभेच्छा. मजा करा. खा, प्या आणि आमची आठवण काढा. शिक्रेटली वृत्तांत लिहा आणि आम्हाला फोटोंसकट पाठवा :).

भाई, नोंदणी नाही केली कारण १००% येइनच असं नाही. आम्ही सकाळी निघणार व्हर्माँटहून. तासा-दीड तासासाठीच जमेल यायला.
स्वाती, घरातल्या इतर मेंब्रांनी माझ्या प्लॅनला साथ दिल्यास नक्की Happy

हायला बिल्वे! तू तर माझ्या !!! ला अगदीच बेवारस करून टाकलंस की! :आता?:
बाई, सिंडी यांनी तर बिचारीचं (पक्षी : !!! चं) नावच टाकलंय! Sad

Proud

Pages