बारा ए.वे.ए.ठि. , हिवाळी २०१२

Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता: 
. मैत्रेयी चे घर. जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल. .

तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
eviethi2012.png

मेनु,

सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्‍या - अ‍ॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.

तारीख/वेळ: 
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिप्रा, तुम्हांला व्हेज / नॉनव्हेज / गोड काय आणणं प्रेफरेबल आहे?
काही नॉनव्हेज अ‍ॅपेटायझर आणू शकाल का?

(खरंतर तुम्ही चित्रं देणार तेवढं पुरे आहे की! :P)

छे: छे: !! प्रचंड गोंधळ! अहो हे ए. वे. ए. ठि. २८ जानेवारीला आहे की २१ ला होऊन गेले? वर २१ जानेवारी लिहीले आहे, त्या दिवशी येणार्‍यांची यादी तशीच, त्यात झालेले बदल अजून दिसत नाहीत!

आहे ना नक्की २८ जानेवारीलाच?? मैत्रेयि, वैद्यबुवा, किंवा सायो या तिघांपैकी कुणीतरी सांगेल का नक्की आहे म्हणून? बाकीच्यांचे काही खरे नाही. एकदा २१ लिहीतात, मग २८ लिहीतात!!

मला गुळाच्या पोळ्याचे नक्की करायचे करायचे आहे, आज सकाळी ११ वाजेस्तवर. नसेल ए. वे. ए. ठि. तर मी काही तडफडत कुठेतरी जाउन गुळाच्या पोळ्या आणून खाण्याएव्हढा वेडा नाहीये.

धन्यवाद.

तुम्ही काळजी करु नका. मी सुमावाल्यांना फोन करुन सगळ्यांच्याच ऑर्डरी कनफर्म करणार आहे ११.०० वाजता. एवेएठि २८ तारखेला आहे.

धन्यवाद, वैद्यबुवा. आता मी इतर गोष्टींकडे लक्ष देणार नाही. २८ तारखेला सकाळी १० वाजता सायो कडे यायचे हे नक्की ना? तेव्हढे बास मला. मग पुढचा काही का कार्यक्रम असेना? जेवायच्या वेळी जेवायला मिळले की बास.

साडेदहा.
च्च! अहो दहा, दहा, दहा!
रंपा माझ्याजवळ. शिवाय गुळाच्या पोळ्या. जेव्हढे लवकर जाउ तेव्हढे जास्त वेळ पीत बसता येईल, गुळाच्या पोळ्या आहेतच! . हो की नाही, वैद्यबुवा?
कसे या बायकांना साध्या गोष्टीत सुद्धा काSही कळत नाही हो!
Happy Light 1

झक्की, साडे दहाला माझ्याकडे.
ठीक आहे. तिकडे पोचल्यावर भराभरा पीईन नि खाईन मी!

नॉनवेज अ‍ॅपेटाइजर जरा कठिण आहे. माझा प्रेफरन्स (एक निवडा)
१. रसमलाइ
२. ढोकळा
३. प्लम (रम) केक
४. गाजरहलवा

हवेच असेल तर बघते नॉनव्हेज.

अन्कॅनी, त्यांना असं घाबरवू नको. कालच त्यांनी "मी काय आणू" असा प्रश्न विचारला तेव्हा मी काहीतरी लिहीणार होतो पण म्हंटल त्या अजून इतक्या रुळलेल्या नाहीयेत म्हणून जाऊ दे. Proud

सुमा फूड्सला फोन करुन ऑर्डर कनफर्म केली आहे.

१च का ? अरे आपल्या पोटाची काही चिंता? जिभेसाठी किती सोसतं बिचारं.

आणि हो, चित्रं वाटायला अनुमोदन दिलं नाहिये अजून. दाखवायला आणीन फक्त.

रच्याकने : मला पण ३ चालेल.

164056_479711735966_586470966_6123121_6955023_n.jpg

रम मुरली नाही तर वेगळी आणा... केक त्यात बुडवून खाता येईल.... Proud

कुणाला गाणं म्हणायची इच्छा असेल (आणि कुठलं गाणं ते माहीत असेल) तर मला मेल टाका.
जमल्यास Music Track Download करून ठेवीन..

Pages